'I don’t have any other words to explain to my relationship with you ( Communist) and Me'
Comrade Pinarayi invited me for this seminar I accept it immediately because comrade is a role model for me. (1/4)
Pinarayi Vijayan is front fighter for common man rights and string secularist ,Comrade Pinarayi’s Development & Welfare models are models for this nation . so it’s my duty to accept his invitation “
And it also help Kerala and Tamil Nadu historic relationships. (2/4)
BJP is following British polices which destroys secular and federalism of our country .these should be opposed strongly .
All secular party’s should unit together to fight against BJP’s policy . then only social justice , Equality and Secularism possible. (3/4)
Let us fight together for social justice, Equality and Secularism.
केरळमध्ये कन्नूर येथे पार पडलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २३व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाने निवडलेल्या नवीन केंद्रीय कमिटीने अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांची पक्षाच्या १७ सदस्यांच्या नवीन पॉलिटब्युरोवर निवड केली आहे (१/५) #CPIM23rdPartyCongress
सीटूचे राज्य उपाध्यक्ष नरसय्या आडम हे ७५ वर्षांच्या वयाच्या अटीमुळे या महाअधिवेशनात केंद्रीय कमिटीमधून सन्मानाने निवृत्त झाले. (२/५)
डॉ. अशोक ढवळे हे माकपच्या पॉलिटब्युरोवर महाराष्ट्रातून निवडून आलेले तिसरे नेते आहेत. यापूर्वी पक्षाचे एक 'नवरत्न' आणि सीटूचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बी. टी. रणदिवे, आणि सीटूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम. के. पंधे हे पक्षाच्या पॉलिटब्युरोचे अनेक वर्षे सदस्य होते. (३/५)
महात्मा फुले झोपताना आपल्या बिछान्याखाली दांडपट्टा ठेवत असत. तो काळ दीडशे वर्षांपूर्वीचा आहे. बुरसटलेल्या रुढीवादाला अधिकृत पर्यायी व्यवस्था नसताना सनातनी आणि कट्टरतावाद्यांविरोधात त्यांनी शड्डू ठोकणं धाडसी काम होतं.
कारण फुल्यांना अपेक्षित असलेल्या व्यवस्थेचं फळ तोपर्यंत कुणी चाखलेलं नव्हतं. त्यामुळं पाठिंब्याची शक्यता शून्य होती. पण फुल्यांच्या आक्रमक भूमिकेमुळेच अनुनासिक बोलणाऱ्या पुणेरी पगड्यांची कढी पातळ होत होती. ती जरब दाखवली नसती तर फुल्यांवर केव्हाच हराळ उगवली असती.
आणि आज आपल्याला लघुशंकेवेळी कानात जानवं गुतवण्याचे वैज्ञानीक फायदे सांगत फिरावं लागलं असतं.
आज फुलेंच्या किंवा शाहूंच्या विचारांना विरोध करणाऱ्यांची स्वतःची आई, बहीण, मुलगी फुलेंच्या त्यागाचा शिक्षणाद्वारे प्रत्यक्ष फायदा आणि स्वतंत्र उपभोगत आहेत.
सत्तेवर बसलेल्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष मारामारी करणं सामान्य माणसाला कधीच परवडणारं नसतं. याच्यात जीव सामान्य माणसाचाच जाणार असतो. हत्तीला मुंगी चावल्यावर हत्तीला काही फरक पडेल का. त्यामुळे लोकशाहीत सत्तेसोबत लढण्याची पद्धत ही आंदोलनाचीच असते, असायला हवी.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या न्याय्य असल्या तरी त्या सरकारपुढे मांडण्याची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने मांडल्या गेल्या पाहिजेत. काहीही झालं तरी. जेवढं पदरात पडतय तेवढं पाडून घेऊन उरलेल्या मागण्यांसाठी नव्या जोमाने लढणं हाच एक मार्ग आहे.
शारीरिक बळाच्या जोरावर तुम्ही सरकार नावाच्या अजस्र यंत्रणेसोबत लढू शकत नसता. जर तुमचा असा कुणी समज करून देत असेल तर तो तुमचा सत्यानाश करत आहे. कर्मचारी नेतृत्वाच्या अभावी सैरभैर झाले आहेत. खरं नेतृत्व कधीच लोकांना अधांतरी सोडत नाही. तुटेपर्यंत ताणत नाही.
एखाद्या पक्ष
अथवा संघटनेचा
सभासद होण्याची औपचारिकता
पार पाडणं
म्हणजे नव्हे
कॉम्रेड होणं
अंतर्बाह्य माणूस
होण्याची प्रक्रिया
म्हणजे असतं कॉम्रेड होणं
कॉम्रेड नसतो
नास्तिकता मिरवणारा
कॉम्रेड असतो सर्वाधिक आस्तिक
कारण त्याचा असतो विश्वास
जगण्यावर अन
धरतीवरील सगळी
मानवनिर्मित दु:खं नाहीशी करुन
जीवनाला सुखी बनवण्यावर
ह्या वसुंधरेवरच स्वर्ग निर्माण करणारा
तो असतो स्वत:च प्रेषित
अन माणसाला माणसाच्या
गुलामीतून मुक्त करणारा
तो असतो परम धार्मिक
मानवजातीने संचित केलेल्या
ज्ञानाचा तो
असतो अभ्यासक
पण म्हणून तो नसतो
पुस्तकी किंवा रुक्षही
एअर इंडियाने युक्रेनचे २३ हजारेचे तिकीट आता ५५ हजाराला केलं आहे. बाक्की तुम्ही व्हाट्सएपच्या थेरीज वाचून खाजगीकरणाला पाठींबा देत रहा. #टाटाच्या_नावानं_चांगभलं