#गांधीविचार ह्या विषयावर व्याख्यान असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करून @DrAbhayBang साहेब तुम्ही काय मिळवले कोणास ठाऊक ?
संघाने कधीही गांधींना कमी लेखलं नाही, मग हे #विषयांतर कशाला ?
@DrAbhayBang साहेब, तुम्हाला जर असे वाटत असेल की संघाने समाजात धार्मिक द्वेषभावना रुजवण्यासाठी एका शतकाची रणनीती आखली असावी , तर आज तुम्ही संघाच्या प्रगती कडे बघा. गेले ९७ वर्षांपासून संघावर दोनदा बंदी आणून सुध्दा संघ वाढतच जात आहे..तो वाढतच जाईल. कारण , संघाची प्रार्थमिकाता +
ही आपला देश ,आपले देशबांधव आणि आपली सनातन संस्कृतीचे जतन करणे आहे.
तुम्ही म्हणता की त्यांनी स्वातंत्र्य लढा आणि इतर कोणत्याही आंदोलनात भाग घेतला नाही. या काळात ते माणसांची मने घडवण्याचे काम करीत होते..
तर स्वातंत्र्यासाठी कणखर मन , आणि तेव्हढेच मजबूत मनगट आवश्यक होते असे +
तुम्हाला वाटत नाही का ? स्वातंत्र्यप्राप्ती आधी आणि नंतर काँग्रेसने गांधीजींचा व त्यांच्या नावाचा फायदा करून घेतला असे तुम्हाला अजिबात वाटू नये , ही आश्चर्याची गोष्ट आहे ?त्यांच्या नावाचा उपयोग तर ते आत्ताही करत आहेत, मग त्यांना तुम्ही काहीच कसे बोलत नाही ?
हा तुमचा selective +
Agenda आहे, असे आम्ही म्हणायचे का ?
बरं, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही हे जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही संघाच्या शाखेत न जाता ,काठावर बसून संघावर टीका का करता?
मी एक स्वयंसेवक म्हणून तुम्हाला आमच्या शाखेवर बोलवतो..त्यानंतर संघाच्या वर्गांना पण बोलवतो , याल का ?
सुजात मित्रा ,
तुला खरं सांगू का ? ब्राह्मण समाजाला जगातील काहीही काम नसले तरीही ते असले काही करणार नाहीत.
अरे, त्यांनी ठरवलय की अभ्यास करायचा आणि मोठं व्हायचे. नोकरी धंदा करायचा , बाहेरच्या देशात जायचे , लग्न करून बायको व मुला बाळांसोबत सुखी राहायचे आहे.
तुला माहितीये +
खूप ब्राह्मण मुलांचे आयुष्य ते स्वतः राजकारणात नसल्यामुळे सुखी आहे. त्यांना कशाचीच घेणे देणे नाही. शिक्षण ईमानदारीत घेऊन आणि संपवून लगेच पोटा पाण्याचे बघतात. देशात असतील काय नसतील काय, कमावलेल्या पैशाचा tax ते न चुकता भरतात. घर घेतात म्हणून home loan फेडतात. सुखाने फिरायचे +
म्हणून गाडी घेतात. जमल्यास weekend ला फिरायला जातात. हॉटेल्स मध्ये जेवतात आणि परत सोमवारी आपल्या कामाला लागतात. बऱ्याच अंशी कमाईतील काही हिस्सा स्वतःहून समाजकार्यात ही देतात. ते , आपले समाजाप्रती एक कर्तव्य आहे असे समजतात. आई वडिलांची सेवा, औषधपाणी, मुलांची फि... ह्यातून हे +
इतिहासातील ३ महान व्यक्तींचे जीवन आपण जर नीट अभ्यासले तर राजकारण कसे करावे हे खूप चांगले समजते.
१. भगवान श्रीकृष्ण - महाभारतात श्रीकृष्णाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. जन्म झाल्यापासून ते कौरव पांडवांचे युद्ध संपे पर्यंत त्याने सत्य आणि धर्म
१
विजयी व्हावा ह्या साठी अतिशय सुरेख चाली खेळल्या. त्यात शेवट पर्यंत कौरवांना समजून सांगण्याचा प्रयत्न असो किंवा अर्जुनाला गीता सांगून त्याला धर्मयुद्ध का गरजेचे आहे हे समजावणे असो. भीमा कडून जरासंधाला मारून युधिष्ठिराला चक्रवर्ती राजा बनवणे असो किंवा दुर्योधनाला गांधारी समोर
२
विवस्त्र जाण्यापासून थांबविणे असो.
स्वतः युद्धातून पळून जाऊन द्वारका स्थापन करणे असो वा युधिष्ठिराला इंद्रप्रस्थ बनवायला मदत करणे असो. तो जेवढा कृपाळू होता तेवढाच मोठा राजकारणी होता. त्याच्याशिवाय पांडवांना युद्ध जिंकणे अवघड होते. त्याने प्रत्येक डावपेच बरोबर वेळेस खेळले.
१३ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांना मी खालील email केले होते..त्यावर २ दिवसानंतर मी पुन्हा एकदा त्यावर पोच पावती / उत्तर देण्याची विनंती केली.
विषय - दहावीची परीक्षा न घेण्याच्या आपल्या निर्णयाला उच्च न्यायालयाने मान्यता न दिल्या बद्दल.
माननीय,
आपल्या राज्यात शिक्षणाचा अधिकार असलेल्या सर्वांना शिक्षण देणे हे सरकारचे धोरण असले पाहिजे. कदाचित तुमचे सुद्धा असेल.
+
पण गेल्या वर्षभरात corona मुळे ह्या धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला कोणालाच फार काही करता आले नाही.
तरी खूप शाळांनी online शाळा घेऊन शिक्षण देण्याचे कर्तव्य केले.त्यात प्रामुख्याने १०वी चे वर्ग ही होते.
१०वी आणि १२वी ह्या आपल्याकडील अतिशय महत्वाच्या परीक्षा मानल्या जातात. +
१०वी ही तर शालांत परीक्षा असते. म्हणजे शाळे बाहेरील पहिली परीक्षा देण्याची पहिली संधी मुलांना मिळते. महाराष्ट्र सरकारने त्यांना ही संधी corona चे कारण देऊन दिली नाही. असे काहीही नव्हते की परीक्षा घेता आली नसती. कित्येक शाळा कित्येक कॉलेजेस ह्या दरम्यान बंदच होते. +
मला सहजच त्या म्हाताऱ्या माणसाची गोष्ट आठवली जिथे तो आपल्या मुलांना काड्या देतो आणि मोडायला लावतो ..मग नंतर काड्यांची मुळी बनवतो...जी त्यांना मोडता येत नाही.
विषय निघालाच म्हणून...सांगतो की खूप वर्षांपूर्वी मी एक कविता केली होती...
श्रीराम मंदिर करावे म्हणून...जी त्या वेळी मी तत्कालीन सरसंघचालक पूजनीय सुदर्शनजी ह्यांना दिली होती..त्यावर त्यांची