आज फेसबुक उघडलं फक्त बघण्यासाठी की ज्यांना रामनवमीच्या यात्रांचा काही त्रास नाही झाला त्यांना नक्कीच दांडेकर पुल या भागात होणाऱ्या लाईट शो आणि गाणी, मिरवणूक याचा त्रास झालं की नाही...
या अशाच लोकांमुळे त्या तसल्या चेहऱ्याच्या पुस्तकाचा वीट आला...
+
अपेक्षे प्रमाणे लोकांना त्रास झाला आहेच, खरं सांगायचं तर मला पण नाही पटत जेव्हा DJ लावून दारू पिऊन लोक अशा दिवशी झिंगतात
पण हे फक्त या दिवशी होत का? २४-४८ तास जास्त वेळ चालणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीत काय होत? नवरात्री मध्ये गरबा काय २ डेसिबल volume ठेवून खेळतात का?
+
मग याच रस्त्यावर दांडेकर पुल ते आंबील ओढा पर्यंत जेव्हा अशा मिरवणुकांकडे नाक मुरडून बघायचं पण याच रस्त्यावर जेव्हा गणपती मंडळ त्यांचे मांडव, नवरात्र उत्सव असतो तेव्हा नाही असा outrage बघायला मिळत...
तिथे गेले काही वर्ष राम नवमी सुद्धा अशीच साजरी होते हे दिसत नाही???
+
अगदी दोन दिवस आधी माझ्या ओळखीत एक जण मुद्दाम माझ्या समोर १४ एप्रिल चा विषय काढण्यासाठी माझ्या सोबतच्या व्यक्तीला बोलला काय मग परवा मिरवणूक बघायला जाणार की नाही... त्याला वाटलं तो चेष्टा करून cool वगैरे दिसेल...
तिथेच त्याला विचारलं काय रे रामनवमी ला जे लोक करत होते ते पटलं का?
+
त्यावर म्हणे नाही मला फार काही माहीतच नाही काय झालं... आत्ता कळलं की एम पी मध्ये काही भागात कर्फ्यु आहे... अरे मग तो काय हाऊस म्हणून लावला का?
तिथल्या मिरवणुकीला काय सगळेच रामाचं नाव जपत होते का? तिथे नाही का काही लोक पिऊन झिंगले, त्यांनी उन्माद केला तो दिसला नाही का?
+
नक्की राग कशाचा आहे या मिरवणुक आणि ध्वनी प्रदूषण त्यावर नाच गाणं होणं हे सगळं थिल्लर वाटत असेल तर ते बरोबर आहे आणि सत्य पण आहे... पण हेच सगळं याच भागात इतर सणावाराला होत तेव्हा का नाही बोलत आपण...
बाबासाहेब यांनी काय फक्त एका ठराविक समुदाया साठी काम केलं का?
+
आपण सगळे लाभार्थी नाही! त्याचा इतर भारतीयांना, महिलांना काहीच फायदा झाला नाही??
उत्तर येतं बाबासाहेबांबद्दल काही नाही पण हे लोक...
मग येतो पुढचा मुद्दा पण मग बाबासाहेब बोलले होते ना ठराविक काळासाठी च आरक्षण द्या मग का नाही काढलं...
अरे ठराविक म्हणजे किती काळासाठी माहीत नाही...
+
आरक्षण नक्की का, कशासाठी? कळत नाही पण त्यांना ते आरक्षण मिळत म्हणून पोटदुखी
हा सगळा अजून ही एखाद्या समाजाकडे तुच्छतेने बघण्यासाठी शोधण्यात येणाऱ्या कारण मिमांसा या प्रकारात येतो
कारण यांना स्वतः आपण इतरांचा द्वेष करतो हे मान्य करायचं नसतं
मग अशा प्रकारे सेलेक्टीव टीका करायची
+
आपण सगळ्यांनी एकदा नाही तर सतत आत्मपरीक्षण करण्याची गरज असते की आपल्याला नक्की त्रास कशाचा आहे... आणि का आहे... आपण सगळ्या गोष्टींवर नेहमी एकसारख्या प्रकारेच react होतो का?
आपलं एखाद मत उद्या बदलेल पण... पण ते बदलण्यासाठी जो जाणीव पूर्व प्रयत्न असतो तो आपण करायला पाहिजे...
आत्मपरिक्षण, चिकित्सा हाच मार्ग आहे, पण ते जाणीवपूर्वक स्वतः केलं पाहिजे...
अजून खुप बरे वाईट अनुभव आहेत सांगायला पण ते सांगण्यापेक्षा ते बदलत गेले तर जास्त आनंद वाटेल