तो सध्या काय करतो ?
हे काय विचारणं झालं, तो फुल्ल बिझी असतो .
सकाळी नऊला उठतो, कडक पाण्यानी आंघोळ करतो देव्हार्यातल्या देवांच्या पाया पडतो, हातात तांब्याचं कडं घालतो , कडक ओपन शर्ट आणी मळकी जीन घालतो घरातला नाष्टा त्याला चालत नाय. त्याला चौकातल्या अन्नाची मिसळ लागती .
ईकडुन १०० ची नोट घेतो, येवढ्यात काय होनार? आजुन एका नोटेसाठी हुज्जत घालतो , गाडीत ५० च पॕट्रोल टाकतो
मग थाटात एक पौष्टिक तर्रीवाली मिसळ चार पाव खातो. मग चौकात येऊन गन्या, आंड्या, र्हावल्याला फोन लावतो .ते आल्यावर भाऊंच्या आॕफीसमधे जाऊन पेपर मधल्या कालच्या टोळी राड्याच्या,
राॕबरीच्या , देशातल्या कुठल्याशा भागातल्या हिंदू मुस्लीम दंग्याच्या, बलात्काराच्या बातम्या वाचतो. भाऊच्या भागातल्या लोकांची आधारकार्ड,दवाखाना चिठ्ठीची कामं करतो, इकडं तिकडं टाइमपास करुन दुपारी जेवायला घरी येतो. त्या घरच्या भाज्या आवडत नाय. मग चिडचीड करतो.पंखा लाऊन छान ताणुन देतो.
आई बाप आणी लग्नाची तरुण बहीण कामाला गेलेले असतात. हा निवांत असतो.चार वाजता उठुन आवरुन परत चौकात त्या आयटमची वाट पहात उभा रहातो, तोवर आंड्या र्हावल्या गन्या आलेलेच असतात. शाळेच्या वर्गातली मृण्मई ग्रॕज्युएशन संपवुन कुठल्यातरी कंपनीत नोकरीला लागलेली असते .
१०/१२ वी त गणित इंग्लीश मधे गचकल्यावर याने शिक्षणाकडे कायमची पाठचं फिरवलेली असते,संध्याकाळी पक्षाच्या पाडवा दसरा मेळाव्याच्या तयारित व्यस्त होतो, झेंड्याची मोजणी आणी ठिकाणांच्या जागा ठरवतो, मेळाव्यात " ए आव्वाज कुणाच्चा " अशी गगनभेदी घोषणा घोकतो.
मंडळात IPL च्या मॕचवर काॕटरच्या पैजा लावतो .रात्री भुर्जीच्या गाडीवर काॕटर,बाॕइल,भुर्जीची शाही पार्टी झोडतो .उशिरा गपचुप दार उघडुन घरात आल्यावर आई फादरनी जाब विचारलाच तर थेट धाऊन जातो अंगावर, गावाकडची जमिन कधी विकणार,मला कॕब घ्यायचीय टुरिस्टच्या धंद्याला,आमच्या साठी काय केलं तुमी
असा प्रश्न विचारून त्यांच्याशी हमरीतुमरी करतो, बहीणीच्या पर्समधे हात घालुन मिळेल ती नोट खिशात घालतो. आणी बेडवर बिनघोर झोपुन जातो. दोस्ती खातर अंगावर केस घेतो, पोलीस चौकी न कोर्टाच्या चकरा मारतो. तो दोस्तीच्या दुनियेतला राजा असतो ! वाढदिवसाच्या फ्लेक्सवरच्या १०/१२ जणांसोबत झळकतो .
कोविड काळात हा गरजुंच्या घरी भाऊंनी पाठवलेली किट वाटतो. स्वतः च्या घरासाठी असलं काही घेण त्याच्या इज्जतीत बसत नाय .
कधीतरी ओला उबेरवर बदली ड्रायव्हींग करतो आणी सगळेच उपाय संपल्यावर भाऊचे इलेक्शन संपल्यावर हा झुमॕटो, स्वीगीची पार्सलं पोचवतो,
तोवर हा ३० पार झालेला असतो किडनीचा विकार जडलेला असतो . याच्या तारुण्याचा जोश संपून तो अगतीक आयुष्य ढकलत असतो . तो सध्या असाच असतो .
लिफ्ट.!
कार मधे तिला लिफ्ट देऊन मध्यरात्री त्याने तिला जंगलात मदत केली म्हणून तिच्या हातावर हात ठेवत त्याने विचारले,"अर्ध्यारात्री कुणा पुरुषाबरोबर एकटे गाडीत बसायला भीती नाही वाटत?"
त्याचा इशारा तिला समजला होता! वासना त्याच्या डोळ्यात दिसत होती.
तिने हळूच त्याच्या हाताला घट्ट पकडुन म्हटले,"नाहीरे, इथे येणारे लोक सज्जन असतात, गेल्या दोनशे वर्षापासून तरी कोणीच मला काहीच केले नाही".... आणि तिने हात अजून घट्ट केला! त्याला तिच्या डोळ्यातला खट्याळपणा आणि दोनशे वर्षाचा अनुभव घट्ट होणाऱ्या हातात जाणवत होता!
हळूच तिला जरा बाथरूमला जाऊन येतो, असं म्हणून तो खाली उतरला आणि तिथून सुसाट पळत सुटला!
दहा मिनिटांनी ती कारच्या बाहेर आली आणि तिने एक शिट्टी मारली! चार मुली अजून झाडी झुडपातून बाहेर आल्या! आता पाचही जणी कार मधे बसल्या आणि कार शहराकडे धावू लागली!
टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला .
९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते.
त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल,ते गेले नाहीत.
१८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.
८ किमी वर कैथरीन नावाचे जहाज होते, त्यांनीही हा प्रकाश पाहीला व ते त्वरीत मदतीसाठी वळले पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरी सुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले.
थोडक्यात तुम्हाला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात.
या काळजीने ही, आपल्या मैत्रिणीच्या घरी फोन करते... घर सगळं उध्वस्त...पार कोलमडून गेलं असेल...साधारण अशा अपेक्षेने...आणि तिला दुःखद धक्का बसतो..तिच्या मैत्रिणीच्या जाण्याने नात्याची पोकळी नक्कीच निर्माण झाली होती...पण कुणाचं अडून राहिलं न्हवत..घरकामाला दोन जास्तीच्या बायका लाऊन.
साधारण प्रत्येकाची पोटापाण्याची...घरकामाची सोय झाली होती...आणि प्रत्येकजण आपल्या वाटेकडे परत वळुन व्यस्त झाला होता...घरच्यांचं ही फारस, चुकलय असं ही न्हवत...उणीव जाणवतच होती, पण शेवटी घडी बसवावी लागणारच होती.
सदर पोस्ट मी विजय पांढरे यांच्या वतीने लिहिली आहे, त्यांना त्यांच्या मुलासाठी लेखनिक ची अत्यंत गरज आहे, आपणा सर्वांना कळविण्यात येते की, माझा सुपुत्र चि. प्रतीक पांढरे हा 17 नंबर फॉर्म भरून 10 वि च्या परीक्षेत मार्च 2022 ला बसणार आहे.परीक्षा केंद्र Pune केंब्रिज, Dhankawdi,Pune.
त्याला Epilepsy अर्थात फेफरं चा त्रास व बौद्धिक अक्षमता व्यंग्य असल्याने त्याला लिहिण्याचा प्रक्रियेत अडथळा येतो. या कारणाने त्याला परीक्षेत लिखाणासाठी इयत्ता 9 वित असणाऱ्या लेखनिक ची आवश्यकता आहे. तसेच लेखनिक विद्यार्थ्यांच्या आई - वडील यांची हरकत नसावी.
घर ते परीक्षेत येण्या जाण्याची सर्व सोय करण्यात येईल.
आर्थिक अपेक्षा असल्यास कृपया तसे अगोदर कळवावी.
आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला आहे पण त्यात अजूनही काही यश आले नाही. मुलाची परीक्षा 16 मार्च रोजी सुरू होणार असून फार कमी वेळ राहिला आहे.
हे आहेत भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत प्रवेश केलाय . Persistent या मल्टीनॅटशनल सॉफ्टवेअर कंपनीचे ते संस्थापक आहेत. तब्बल १८ देशांत ५३ ऑफिस असणाऱ्या या कंपनीने आणखी एका ठिकाणी नवीन
ऑफिसमध्ये 'गृह' प्रवेश केला.
सॉफ्टवेअर कंपनी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे 'वेस्टर्न कल्चर'. पण Persistent त्याला अपवाद. सोबतचा हा फोटो पहा. भारतीय (हिंदू) पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करून त्यांनी या नवीन ठिकाणी प्रवेश केला. या कंपनीत केवळ भारतीय म्हणजे हिंदू
त्यातही मराठीच सणांना सुट्टी दिली जाते.म्हणजे नूतनवर्ष १ जानेवारी नाही, तर 'गुढीपाडव्याला' सुट्टी नक्की असते. ख्रिसमसला नाही पण गणेशमूर्ती स्थापना आणि विसर्जन या दोनही दिवशी सुट्टी असते.पुण्यातील हिंजवडीमध्ये ऑफिसचे ४ टॉवर आहेत त्यांना ऋग्वेद,सामवेद,यजुर्वेद आणि अथर्ववेद अशी नावं
नमस्कार
मी स्वप्नील मेहेंदळे! मी स्वतः कर्णबधिर आहे.. कर्वे नगर पुणे येथे राहतो. मी आर्टिस्ट असून मातीच्या साधे कुंड्या घरी आणून त्यावर चित्र काढून विकतो..
तसेही पावसाळ्यात झाडे व फुले छान आणि लवकर वाढतात आणि कुंड्यावर असे वेगवेगळे चित्र काढले की आणखी छान आणि उठून दिसते..
●कुंड्याची Size:-
Height - 8 inch
Big size 10 inch
●किंमत:-
8 इंच 250/-
10 इंच 300/-
लवकरच ऑर्डर द्या
कुंड्या घरपोच देण्यात येईल..
त्यासाठी अंतरानुसार चार्जेस घेतले जाईल..
जास्त हवी असल्यास तुम्ही येऊन घेऊन जाणे..
मी काढलेले 3री आणि 4थी वॉल पैंटिंग
वारली बरोबर फुले झाडे, कार्टून, इमोजीस तसेच entrance, किंवा बाल्कनी, हॉल वर पेंट काढायचे असल्यास मला ऑर्डर देऊ शकता..
साधारण 9-10 बाय 4-5 फूट पर्यंत भरून काढायचे असल्यास 3/4 दिवस लागतील..
किंमत:- 4 ते 10 हजार