लग्न
खरे तर या विषयावर मी बोलणे म्हणजे लोक मला मूर्खातच काढतील. पण हे मी आज सविस्तर आणि प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न करतोय.
पण लग्न का केले या प्रश्नाला सहसा लोकांकडे खरच उत्तर नसते. कारण लहानपणापासून हे डोक्यात बिंबलेले असते की एक वय झाले की लग्न करायचे असते.
आजूबाजूला 99 टक्के हेच पाहत आपण मोठे होते. पण खरंच लग्न संस्था म्हणजे काय हे कोणी कधीच पाहत नाही. एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये admission घेण्या आधी देखील आपण तेथील रेकॉर्ड तपासून पाहतो. हल्ली तर पहिली मध्ये ऍडमिशन घेताना पण सगळे बघितले जाते. परंतु लग्न का करायचे याचे उत्तर
थातूर मातूर असेच मिळते की आयुष्याचा भाग आहे हा. आपल्या संस्कृती मधला आणि संस्कारातला एक भाग आहे हा. पण लग्न करायचे की नाही यापेक्षा लग्न संस्था अस्तित्वात का आली आणि तिचे फायदे तोटे कोणते यावर आपण कधीच विचार केलेला नसतो
आणि केला असेल तर खरच किती प्रामाणिकपणे आणि सचोटीने हे प्रत्येकाने स्वतः मध्ये तपासून पाहावे.
विवाह संस्थेविषयी माझे मत काय आहे हे सांगेनच मे आणि खूप जणांना ते पटणार देखील नाही. पण आपण आयुष्यात खरोखर इतक्या मोठ्या निर्णयाचा किती आणि कश्यापद्धतीने विचार केला आहेहे देखील प्रत्येकान
तपासून पाहावे. लग्न का केले नाही याची उत्तरे देण्याकरता मी लग्न या विषयावर बऱ्यापैकी खोल वर विचार केला.
पण लग्न केलेल्यांनी किती खोल विचार केला की फक्त मोठे सांगतायत म्हणून,की आई वडील मागे लागलेत म्हणून, स्वतःच्या शारीरिक गरजा हाक मारतायत की समाजविचारतोय म्हणून मी लग्न केले?
खरेच एखादी व्यक्ती आपल्याला आवडू लागली तर तिला बंधनात बांधून ठेवणे योग्य की त्या व्यक्ती बरोबर स्वातंत्र्य अनुभवणे योग्य?
समाज हा अत्यंत दुतोंडी आहे. एकीकडे sex आणि बाकी गोष्टी असे शब्द बोलून बोलायच्या नसतात. पण त्यांना छान नाटवून बोलले तर मात्र उदो उदो होतो.
Ex1: घरात सेक्स बद्दल बोलायला बंदी असते. बाहेर जर कोणी जाऊन सांगितले की आम्ही दोघे सेक्स करणार आहोत तर सगळे म्हणतील किती निर्लज्ज आहे. पण 1000 लोकांना लग्नाच्या निमित्ताने बोलावून खायला पयेयला घालून त्यांचे आशीर्वाद घेऊन नक्की काय सांगायचे असते हेच ना की आज पासून आमची मुले सेक्स
करणार आहेत.
Ex: एखादी लग्न मुलगी घरी जाऊन सांगते की ती sexually satisfied नाहीये तर आई बाप म्हणतात असे विषय आमच्याशी बोलायचे नाहीत. पण तेच आई बाप नातेवाईक मित्रा मंडळी सांगतात लग्न झाले की अरे नातू कधी देणार? पाळणा कधी हलणार? म्हणजे हेच सांगायचे असते ना की protection शिवाय सेक्स
कधी करणार? हे सांगताना त्या आई बापाला लाज वाटत नाही. पण मुलीचा प्रॉब्लेम ऐकताना लाज वाटते. हे बोलणे अगदी छान कपड्यात गुंडाळून बोललेले असते. आणि हे मी माझ्या एका friend चे रिअल example देतोय.
तर main मुद्दा खाली मांडतोय, प्रयत्न करतोय.
#####जे लोक हे सांगतात की हा धर्माचा किंवा संस्कारांचा भाग आहे. वेदांमध्ये देखील गृहस्थाश्रम सांगितलेला आहे. त्यांना माझे हे सांगणे आहे की त्यात 4 आश्रम सांगितलेले आहेत
1 ब्राह्मचार्यश्रम - जो हल्ली क्वचितच पळाला जातो
2. गृहस्थाश्रम- जो अत्यंत आवडीने पाळायला लोक तयार असतात
3. वानप्रस्थाश्रम- याचा अर्थ प्रत्यक्ष वनात जाऊन राहण्यापेक्षा साधारण 50 ते 55 वय आले मुले बाळे स्वतःचे कमवू लागली की त्यांच्यापासून अलिप्त राहणे. त्यांच्या आयुष्यात कमी लुडबुड करणे.
4 सन्यासाश्रम: पूर्णपणे अलिप्त होऊन स्वतः स्वतःसाठी जगणे.
वरील 4 स्टेजस मधली गृहस्थाश्रम ही स्टेज कधी संपतच नाही. आई बापाला आपला मुलगा मुलगी कोणाशी लग्न करतोय? का करतोय?मग त्यांना मुले बाळे होतायत की नाही? मग आपली काळजी मुले का घेत नाहीत? इथपासून 12 गावच्या चौकश्या.
पण लग्नासाठी कारण देताना मात्र आपल्या आश्रम व्यवस्थेचे कारण बेमालूम पणे देतो. बाकी सगळे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करून.
इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की आश्रम व्यवस्थेत देखील मुलांनी आई वडिलांचा सांभाळ करणे आवश्यक समजले नाहीये.म्हणून वानप्रस्थाश्रम आणि सन्यासाश्रम याना स्थान दिले.
अर्थात ज्या मुलांना आई वडिलांचा सांभाळ करायचा असेल तर छानच आहे. तो त्याचा भाव झाला. पण आई वडिलांनी अलिप्त राहणे हे महत्वाचे.
मला माझ्या सुदैवाने असे आई वडील लाभले ज्यांनी मला कधीही कश्यासाठी जबरदस्ती केली नाही. त्यांनी त्यांचे कर्तव्ये अत्यंत चोख पार पाडली. आणि आमच्यात असून
असून देखील अलिप्त राहिले त्यामुळे काही बाबतीत मतभिन्नता असून देखील एक आदर्श नाते बानू शकले. म्हणून मी एक स्वतंत्र विचारसारणी असलेला बनू शकलो. त्यासाठी त्यांचे आभार मानावेत तितके कमीच असतील.
लोक म्हणतात की आयुष्यात साथीदार असणे गरजेचे आहे. मान्य आहे. पण म्हणून त्या साथीदाराला जबरदस्तीने आयुष्याशी बांधून ठेवणे लग्न या दोरीने मला तरी जाचक वाटते. ज्या व्यक्तीला तुम्ही आवडत असाल ती व्यक्ती तिला न बांधून ठेवता अख्खे आयुष्य तुमच्या सोबत काढेलच. पण लग्न संस्था एखाद्या
व्यक्तीला तुमच्या बरोबरचे जीवन कठीण जात असेल तरी त्यातून निघणे खूप अवघड करून ठेवते. एखाद्या माणसावर आपला विश्वास नसला की आपण बॉण्ड तयार करतो. तेव्हा लग्न ही संस्थाच बॉण्ड म्हणजेच insecururity वर आधारित आहे. खरोखर एकमेकांना जीव लावणारे लोक एकतर एकमेकाला सोडणार नाहीतआणि काही कारणान
काही काळ लांब गेले तरी एकत्रच येतील. तेव्हा माझ्यासारख्या परखड माणसासाठी अविश्वास हे एकच कारण दिसते.
आणि आयुष्यभर साथीदार कुठे पुरतो? उलट जेव्हा अंगात शक्ती असते, practically कोणाचीही फारशी गरज नसते तेव्हा आपला साथीदार असतो. पण जेव्हा
आपण थकतो, म्हातारे होतो तेव्हाच आपल्याला साथीदार सोडून जाणार असतो. किंवा आपण त्याला एकटे सोडून जाणार असतो. तर खरोखर जेव्हा गरज असते तेव्हा तुम्ही एकटे असणार आहेत हे नक्की.
लोक म्हणतात लग्न नसेल तर मुळंबळांवर के संस्कार होतील ते कसे वाढतील?
. लग्नात राहून भांडणे आणि वादविवाद आणि मारामाऱ्या करणारे आई बाप असतातच ना? कैक लोक जबरदस्ती एकत्र राहतात करण मुले झाली आहेत. पण त्या मुलांवर होयचा तोच संस्कार होतो. करण आई बाप
कितीही ऍडजस्ट करून राहत असतील तरी त्यांच्यात प्रेम किंवा माया नाहीये हे एक वयात आलेल्या मुलांना कळतेच. त्यामुळे असे जबरदस्ती एकत्र राहूं स्वतःचे आणि परिणामी मुलांचे आयुष्य बरबदच करतात असे लोक. त्यामुळे मुले हे अत्यंत क्षुल्लक कारण आहे.
जे लोक एकमेकांवर प्रचंड विश्वास ठेवून एकत्र
राहतील त्यांच्या मुलाबाळांना प्रेमच मिळेल. किंबहुना जास्त प्रेम मिळेल.
म्हणून मूला बाळांचे कारण देणे संयुक्तिक नाही.
######
व्यभिचारिता वाढेल हे एक कारण असते.
लोक लग्नात राहून देखील जे करायचंय ते करतातच. आणि त्यात चूक बरोबर हा भाग देखील देश , समाज याप्रमाणे बदलतो.
आपण त्याला व्यभिचारिता म्हणतो ती दुसऱ्या देशातील संस्कृती असेल. त्यामुळे त्यात चूक बरोबर असे काहीही नसते. जबरदस्ती ज्या माणसात मन नाहीये त्याला खोटे प्रेम दाखवत राहणे हा तर मोठा गुन्हा आहे. आपल्या देशात कैक लोक केवळ आई बाप आणि समाज या मुळे ज्या माणसात आपले मन नाहीये
त्या बरोबर आयुष्य घालवून स्वतःची आणि त्या माणसाची फसवणूक करत जगत असतात. ते कदाचित जबाबदाऱ्या पार पडायच्या म्हणून पार पाडत देखील असतील.पण मी त्याला खोटेपणा म्हणीन. करण केवळ आई बाप आणि समाजाची भीती. जेथे आपले मन नाहीये तेथे राहणे मग ते आई बापामुळे असो
किंवा परमेश्वरामुळे ती केवळ फसवणूक असते.
आणि जर मला माहित असेल की लग्न केल्यानंतर माझ्या साथीदाराच्या मनात अजून कोणी व्यक्तीआहे फक्त आपल्या लग्नामुळे काही करू नाही शकत . तर त्या साथीदाराच्या बराबर आयुष्यभट राहून उपयोग तो काय? मग त्याने खरोखर काही केले किंवा नाही केले तरीसुद्धा
तरीसुद्धा दोघेही अस्वस्थच आणि अशांत असणार. त्यामुळे लग्न करा किंवा करू नका मन हे चंचल असणारच. लग्न च्या बांधनाने ते बांधून ठेवणे कधीच शक्य नाही. मन आटोक्यात आणण्यासाठी वेगळी उपाय योजना लागते.
बोलण्यासारखे अजून खूप काही आहे. पण एक शेवटची गोष्ट सांगतो आजच्या पुरती.
प्रत्येक मनुष्य आयुष्यात एकाच शोधात असतो ते म्हणजे आनंद आणि समाधान. इथे किती आई वडील असे आहेत जे खोल विचार करून हे सांगू शकतात की लग्नाची वाट चोखाळून ते आज पूर्ण आनंदी आणि समाधानी आहेत आणि हा आनंद आणि समाधान कधीही संपणार नाही? अगदी मनापासून विचार करा
आणि बघा. उत्तर नाही असेच असेल. तेव्हा आपल्या मुलांनी आपण चाललेला हा रस्ता ज्यावर आपल्याला पूर्ण समाधान आणि आनंद मिळाला नाही तो रस्ता चालावा असे म्हणणे किंवा जबरदस्ती करणे म्हणजे दुष्टपणा च नाही का? आणि जवळपास कोणाला असे फील देखील होत नाही की हा दुष्टपणा आहे.
त्यांना हे प्रेम आणि काळजी वाटते. हे दुर्दैव.
मी एखाद्या ट्रेक ला गेलो आणि मला ज्या रस्त्यावर संकटे आली तो रस्ता मे दुसऱ्याला मुद्दाम चालायला सांगणे हा अपराध आहे. मला खरच त्या व्यक्तीची काळजी असेल तर मी नक्कीच दुसरा रास्ता घ्येयला सांगेन.
अर्थात हा प्रत्येकाने विचार करण्यासारखा विषय आहेच. लग्न करा किंवा करू नका. दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट का करताय याचे ठोस कारण असणे गरजेचे आहे.
माझ्यादेखील विचार सारणीत खूप चूक असतील. अनुभवाने ते अजून परिपक्व होतील. तरी कोणी दुखावले गेले असेल तर क्षमस्व
- Mayur
अद्वैत वेदांत किंवा अष्टावक्र यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष ब्रम्ह किंवा परमेश्वर म्हणजे आपण स्वतः आहोत. व आत्ता या क्षणी देखील तेच सत्य आहे. परंतु मग साधना किंवा अध्यात्मिक उपासना या गोष्टींची गरज काय? जर का मी मुक्त आहे तर अजून कोणते मुक्ती मिळवणार??
गौडापाद म्हणजे शंकराचार्यांच्या गुरूंचे गुरू. त्यांनी लिहिलेल्या मांडुक्य कारिका या ग्रंथामधील एक श्लोक असे सांगतो की उत्पत्ती आणि लय या दोन्ही गोष्टी मिथ्या असतात. उत्पत्ती मिथ्या आहे आणि लय देखील. बंधन मिथ्या आहे आणि मुक्ती देखील. अध्यात्मिकता मिथ्या आहे आणि आणि अध्यात्मिक साधन
देखील.
हे सर्व वाचले की आपल्यासारखे लोक उतावळेपणाने हे म्हणायला सुरु करू शकतात की मग अध्यात्मिक साधना करण्यात काय पॉईंट?? मी जर का प्रत्यक्ष ब्रह्म आहे तर मग मी साधना करून साधणार तरी काय?
नवनाथ आणि बाकीचे नाथपंथी योगी आपणास ऐकून माहीत असतीलच. बर्याचशा लोकांनी नवनाथांच्या पोथीचे पारायण देखील केलेले असेल. एकूणच भारतीय इतिहासामध्ये नाथपंथाचे कार्य इतके मोठे आहे की सर्वकाही त्यांचेच असून त्यांचे नावही कोठे नाही.
नाथ संप्रदायाचे प्रमुख मच्छिंद्रनाथ व त्यांचे प्रमुख शिष्य गोरक्षनाथ यांनी भारतीय इतिहासाला अत्यंत उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले आहेत. धर्म जातीभेद या सर्वांचा त्यांनी विरोध केला. प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथ हे मासे पकडणाऱ्या कुटुंबामधील. व गोरक्षनाथ हे कश्मीरी पंडितांच्या कुटुंबातून
आलेले. साधारण नवव्या व दहाव्या शतकामध्ये ही होऊन गेलेली गुरु-शिष्याची जोडी.
या सर्व परिपूर्ण आणि अत्यंत देखण्या अशा ब्राह्मण तरुणाचे गुरु हे एका खालील जातीमधील होते. व त्यांची गुरुसेवा आणि गुरुभक्ती ही आत्तापर्यंत मी ऐकलेल्या कोणत्याही शिष्याच्या फार वेगळी आणि असामान्य आहे.
दोन वर्षांपूर्वी नाशिकला गेलो होतो. ऑफिसच्या कामासाठी. ऑफिसला वीस वर्ष पूर्ण झाल्या बद्दल नाशिक मधील ऑफिसचे एक व्हिडीओ शूट करायचे काम शनिवारी करायचे होते. ऑफिस नाहीच येण्या जाण्याकरता गाडी दिली होती व बरोबर एक दोन माझ्याबरोबरच काम करणारे लोकही होते. सकाळी
जाऊन दुपारी परत निघणार होतो. परंतु नाशिक मध्ये गेलेलो च आहे तर काही मनात असलेली एक-दोन कामे उरकण्यासाठी थांबावे हा विचार मनात आला. मी आणि माझे सहकारी गाडीने पुण्यासाठी परत निघालेलो होतो. मी गाडी थांबवायला सांगितली आणि त्यांना सांगितले की तुम्ही पुढे जा मी उद्या येईन परत.
तेथून निघालो तो डायरेक्ट पंचवटी मध्ये आलो कारण तेथेच सगळ्यात महत्त्वाचे काम होते. राहायची सोय हॉटेलमध्ये रात्री कोठेही करता येईल त्यामुळे आधी पंचवटी ला गेलो. गोदावरी काठी काही संत महात्म्यांच्या समाधी आहेत तेथे जाण्याचे गेले कैक वर्ष मनात होते. परंतु नाशिकला बऱ्याच वर्षांमध्ये
मोतीयाचे हे धन
असे सर्वांचे जवळ
तरी ई ई यक करून
अपमान का तो करी??
खरेतर प्रत्येकाजवळ असणारी ही गोष्ट. प्रत्येकाने अनुभवलेली. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष चाखलेली. पण सगळेजण अगदी ई ई ई ई असे करतील.
प्रत्येकाने याचे आजूबाजूला देखील खूप निरीक्षण केलेला असेल व अनुभवलेले ही असेल. पेन्सिल ला टोक करण्याचे टोक यंत्र किंवा गिरमिट याची पहिली idea हे नाकात बोट घालून मेकुड काढतानाच सुचलेले असणार यात मला शंका नाही.
मी तर बाबा या बाबतीत प्रचंड निर्लज्ज माणूस आहे.
लहानपणी सकाळी सहा
वाजता शाळेसाठी उठल्यावर सगळ्यात पहिले मागच्या अंगणात मधील पाणी तापवणारे चुलीसमोर जाऊन बसायचं. मस्तपैकी हात शेकून घ्यायचे. आणि मग त्यात तंद्री मध्ये आणि समाधी मध्ये जाण्याकरता एक बोट नाकात घालून ते खर्डावयला सुरुवात केलेली असायचे. ती एक सहज समाधीची लेवल आहे.
What is Brahmin? ब्राह्मण म्हणजे काय?
ब्राह्मण म्हणजे काय?
हे फक्त अश्या लोकांनी वाचावे ज्यांना खरोखर खूप खोल वर विचार करता येणे शक्य आहे.
आज माझ्या सर्टिफिकेट वर ब्राह्मण हा शिक्का आहे. मला पण लहानपणी वाटायचे की ब्राह्मण आहोत.आणि अभिमान देखील होता.तसेच प्रत्येक माणसाला
त्याच्या जातीचा अभिमान असणे साहजिक आहे. आता जातीं मध्ये देखील खूप पोट प्रकार आहेत. ते सध्या बाजूस ठेवू.
मी मोठा होत गेलो तसे स्वतः विचार करू लागलो, की नक्की काय आहोत आपण. पुस्तके वाचत गेलो त्यातून निरनिराळी मते वाचली.मी माझे मत हळूहळू बनवायला लागलो. विचार करून.
मी मोठा होत गेलो तसे स्वतः विचार करू लागलो, की नक्की काय आहोत आपण. पुस्तके वाचत गेलो त्यातून निरनिराळी मते वाचली. मी माझे मत हळूहळू बनवायला लागलो. विचार करून.
मुळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे प्रकार का आले? त्याचे अर्थ काय?
पॉर्न बघणे गुन्हा आहे का?
आज एक पॉर्न वर असलेली पोस्ट वाचली. केवळ पॉर्न बघितल्यामुळे बलात्कार करण्याची इच्छा कशी होत असेल याबाबत.
मी देखील पॉर्न बघितलेले आहेत एकेकाळी. परंतु त्यानंतर ते बंद केले कारण मला माझा स्वतःचा रस्ता बदलायचा होता म्हणून. परंतु नंतर काही गोष्टी समोर
आल्या त्या मांडायचा प्रयत्न करतो. त्याआधी एक स्वतःचा अनुभव सांगतो.
कॉलेजला असताना मी बुधवार पेठ मधील वेश्या वस्ती मध्ये तेथील वेश्यांच्या मुलांना शिकवण्या करता जायचो शनिवारी. साधारण काही महिने गेलो असेल. त्यामध्ये तेथील एका मुलाच्या आईची ओळख झाली होती. तीस पस्तीस वर्षाची असेल ती.
या व्यवसायात कशी आली हे मी तिला एकदा विचारले होते तिच्याकडे चहा पिताना. तिने मला सांगितले ती मूळची बंगालची. लहानपणी आई-वडील वारले. ती तिच्या काकाकडे राहायला होती. 13 14 वर्षाची असताना काकाने तिला विकले कलकत्त्यामध्ये.