नवनाथ आणि बाकीचे नाथपंथी योगी आपणास ऐकून माहीत असतीलच. बर्याचशा लोकांनी नवनाथांच्या पोथीचे पारायण देखील केलेले असेल. एकूणच भारतीय इतिहासामध्ये नाथपंथाचे कार्य इतके मोठे आहे की सर्वकाही त्यांचेच असून त्यांचे नावही कोठे नाही.
नाथ संप्रदायाचे प्रमुख मच्छिंद्रनाथ व त्यांचे प्रमुख शिष्य गोरक्षनाथ यांनी भारतीय इतिहासाला अत्यंत उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले आहेत. धर्म जातीभेद या सर्वांचा त्यांनी विरोध केला. प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथ हे मासे पकडणाऱ्या कुटुंबामधील. व गोरक्षनाथ हे कश्मीरी पंडितांच्या कुटुंबातून
आलेले. साधारण नवव्या व दहाव्या शतकामध्ये ही होऊन गेलेली गुरु-शिष्याची जोडी.
या सर्व परिपूर्ण आणि अत्यंत देखण्या अशा ब्राह्मण तरुणाचे गुरु हे एका खालील जातीमधील होते. व त्यांची गुरुसेवा आणि गुरुभक्ती ही आत्तापर्यंत मी ऐकलेल्या कोणत्याही शिष्याच्या फार वेगळी आणि असामान्य आहे.
मच्छिंद्रनाथ हे स्त्री राज्यांमध्ये मोहमाया मध्ये अडकलेले असताना (नाथ ग्रंथांमध्ये दिलेल्या उल्लेखाप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी हनुमानाला जे वचन दिले होते ते पूर्ण करण्याकरता स्त्री राज्यांमध्ये ते लग्न करून रममाण झाले होते) या शिष्याने आपल्या गुरूला तेथून सोडवून आणले.
व एका प्रकारे पतित झालेल्या गुरुला पुन्हा आपल्या गुरुस्थानीच बसवून त्यांच्या चरणांची सेवा या शिष्याने केली. अशी गुरु-शिष्याची जोडी फारच वेगळी आहे.
परमेश्वर प्राप्ती व मुक्ती हा प्रत्येक जन्मलेल्या मनुष्याचा मूलभूत अधिकार आहे.त्यासाठी स्त्री-पुरुष जाती भेद धर्म वर्ण या कशाचेही
बंधन नाही. हा प्रसार मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांनी केला. त्या काळामध्ये असा प्रचार प्रसार केल्यामुळे त्यांचे शत्रू देखील अनेक होते. परंतु नाथ संप्रदाय खास करून या 9 नाथांच्या काळातला इतका प्रबळ होता हे त्यांच्या विरुद्ध कोणीही काहीही करू शकले नाही.
त्या काळामध्ये नाथ संप्रदाय किती पसरला असेल ते बघा. तिबेटमधील बुद्ध हे मच्छिंद्र आणि गोरक्षनाथ यांना महापुरुष मानतात. नेपाळमधील गुरखा ही अत्यंत धाडसी आणि प्रसिद्ध असलेले जमात गोरखनाथांच्या म्हणजेच गोरक्षनाथांच्या नावा वरून पुढे उदयास आली. कानफाडी संप्रदाय त्याचप्रमाणे शाक्त
संप्रदायात हटयोग यामध्ये या दोघांची प्रवीणता वाखाणण्याजोगी होती. शाबरी विद्या जी अत्यंत प्रभावशाली मानले जाते ती गोरक्षनाथांनी निर्माण केली. संस्कृतचा अत्यंत गाढा अभ्यास असणारे एक कुशल नर्तक आणि वादक होते. वैराग्य आणि ब्रह्मचर्य या गोष्टींच्या पालन
या मध्ये त्यांना उच्च स्थान आहे. उत्तर भारतामधील काश्मीर पंजाब नेपाळ बंगाल तिबेट या सर्व भागांमध्ये नाथ संप्रदायाचे काम प्रचंड आहे. बंगालमधील जी तंत्रविद्या आहे तीदेखील गोरक्षनाथांनी विकसित केली. हल्लीच्या काळामध्ये तंत्र विद्येला विकृत स्वरूप आले आहे तो भाग वेगळा.
परंतु शाबरी आणि तंत्र विद्या यांचे प्रणेते किंवा यांना आधुनिक त्याने पुढे नेणारे गोरक्षनाथ हे स्वतः पूर्ण ब्रह्मचारी आणि संन्यासी होते.
आता थोडीफार आपल्या भागातील माहिती घेऊ.
गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू हे साधारणतः आठ ते
नऊ वर्षाचे असतानाच त्यांना अनुग्रह दिला. म्हणजेच निवृत्तीनाथ हे स्वतः नाथपंथी योगीच होते. त्यापाठोपाठ निवृत्तीने ज्ञानेश्वरांना व ज्ञानेश्वरांनी सोपान आणि मुक्ताबाईंना अनुग्रह दिला. ज्ञानेश्वरांचे शिष्य विसोबा खेचर यांनी नामदेवांना अनुग्रह दिला. त्यांच्यापासून वारकरी संप्रदाय
तयार झाला. म्हणजे आता त्यांची व्याप्तीच बघा ना नवनाथांनी जे काम केले होते त्याची. आज आपण जी पंढरीला जाणारी जगातील सगळ्यात मोठी यात्रा आणि वारी बघतो ते नाथपंथी योगी यांनीच सुरू केली होती ज्ञानेश्वर व नामदेव.
महाराष्ट्रातील सर्व संत परंपरा जी आहे ती नाथपंथी आहे.
परंतु आपल्याला हे फारसे माहीत नसतं.
मच्छिंद्रनाथ यांचे गुरु हे प्रत्यक्ष शिव आणि दत्तगुरु. आणि दत्त संप्रदायामध्ये देखील सर्व लोक हे नाथपंथी आहेत. दत्तगुरूंनी मच्छिंद्रनाथ यांच्याच बरोबर त्यानंतरच्या नजीकच्या काळातच जालंदरनाथ यांनादेखील अनुग्रह दिला.
त्याचप्रमाणे अवधूत व नंतर परंपरेने चालत आलेले श्री स्वामी समर्थ , साई बाबा आणि शंकर महाराज हे देखील नाथपंथाचे संबंधित आहेत. दत्त गुरु हे नाथ संप्रदायाचे गुरु असल्यामुळे जनार्दन स्वामी एकनाथ महाराज हे देखील नाथ संप्रदायाशी जवळचे मानले जातात. रामदास स्वामींचे
थोरले बंधू गंगाधरस्वामी यांना एकनाथांनी अनुग्रह दिला होता. रामदास स्वामींचे प्रत्यक्ष गुरु हे कोणीच नव्हते असे मानले जाते. परंतु जी व्यक्ती दासबोधामध्ये गुरु आणि शिष्य व त्यातील गुरूचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे सांगते त्यांना गुरु नव्हते हे मानणे संशयास्पद आहे.
त्यामुळे कदाचित त्यांना लहानपणीच एकनाथांनी किंवा गंगाधर स्वामी यांनी अनुग्रह दिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाथपंथावर भारतीय इतिहासाने फारसा अभ्यास केलेला प्रसिद्ध नाहीये. तिबेटी बुद्धांच्या ग्रंथांमध्ये त्याचप्रमाणे नवनाथ ग्रंथ आणि सहीरोबानची सिद्धांतमाला , अशा काही
ग्रंथांमध्ये नाथांचा उल्लेख सापडतो. परंतु इतिहासाला ज्या गोष्टी अपेक्षित असतात त्या पद्धतीने याचा अभ्यास झालेला नाही किंवा याची फारशी माहितीही उपलब्ध नाही.
निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर यांच्या नंतरचे जे नाथपंथी होऊन गेले त्यांच्याबाबत बऱ्यापैकी माहिती मिळते.
परंतु मुख्य नऊ नाथ म्हणजेच मच्छिंद्र, गोरक्ष, जालंदर, चरपटी, मीननाथ, नागेश, भरतरी, रेवणनाथ, कानिफनाथ,चौरंगीनाथ,अंडबंग नाथ यांची फारशी माहिती उपलब्ध नाही. या 9 मूळ नाथान शिवाय अजून 84 सिद्ध पुरुष हे मानले जातात. रवळनाथ, नवलोबा नाथ वगैरे जी देवळे आपण बघतो
ते खरे देव नसून नाथ पांथांमधील सिद्ध होऊन गेले त्यांची नावे आहेत.
नवनाथ कथासार तेव्हा असे काही आध्यात्मिक ग्रंथ आहेत ते लोक वाचतातच त्यामुळे त्यातून त्यांची थोडीफार माहिती व सामर्थ्य लक्षात येते. परंतु त्या ग्रंथांमधील बऱ्याचशा गोष्टी या फक्त गोष्टी वाटतात त्यातून सत्य फार कमी
कळते. त्यांच्या सामर्थ्यावर माझी कोणत्याही प्रकारची शंका नाही. परंतु मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी प्रत्यक्ष सुर्याशी लढाई केली ही गोष्ट वाचण्यापेक्षा त्यांची खरोखर कोणाबरोबर लढाई झाली होती हे माहिती करून घ्यायला जास्त आवडेल. त्या काळातील कोणतेही इतर विरोधी शक्ती त्यांच्यासमोर
टिकू शकली नाही ते कसे काय हे माहिती करून घ्यायला आवडेल. आणि नुसतेच टिकून राहिले असं नाही तर ते प्रचंड प्रसिद्ध व नावाजले गेले की त्यांच्याविरुद्ध कोणतेही वाईट गोष्ट कोणीही बोलत नाही.
प्रचंड शारीरिक म्हणजे हठ योगाची साधना , संन्यास ब्रह्मचर्य हा नाथपंथी
योगी यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होता. नाथ पंथांमध्ये प्रवेश करण्याआधी प्रचंड शारीरिक व मानसिक साधना करून घेतल्यानंतरच अशा व्यक्तीला संन्यासदीक्षा देऊन नाथ पंथांमध्ये घेण्यात येत असे. ब्रह्मचर्य आणि वैराग्य या गोष्टींना तर गोरक्षनाथांनी अत्यंत महत्त्व दिले आहे.
आजच्या काळामध्ये आपण या गोष्टींची चेष्टा उडवत असू.परंतु या लोकांनी जे काही मिळवले आहे ते पाहता या गोष्टी चेष्टेने उडवण्या सारख्या नक्कीच नाही. हो आपण ते पालन करण्यात अयशस्वी अशी पण याचा अर्थ असा होत नाही की ते मिथ्या आहे. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस,
शंकराचार्य, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, स्वतः बुद्धाचे आयुष्य, येशू ख्रिस्त या सगळ्यांच्या मतानुसार ब्रह्मचर्य आणि वैराग्य या माणसाला फार उच्च पातळी पर्यंत घेऊन जाऊ शकतात. आता इतके लोक आणि तेसुद्धा आपापल्या मार्गावरील अधिकारी आणि प्रचंड यशस्वी पूर्णतः खोटे बोलत नसावेत.
तरी यावर आयुष्यामध्ये कधी ना कधी प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे.
जवळपास सर्व भारतातील संतांचा पाया असणारे हे नऊ जण किती सामर्थ्यवान आणि किती जबरदस्त असतील याचा फक्त अंदाज बांधलेला बरा. यांनी जो संप्रदाय आणि विचार नवव्या ते दहाव्या शतकामध्ये
चालू केला तो अजूनही तेवढ्याच भक्कमपणे चालू आहे.
दैवी म्हणजे अजून तरी काय असले पाहिजे?
अद्वैत वेदांत किंवा अष्टावक्र यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष ब्रम्ह किंवा परमेश्वर म्हणजे आपण स्वतः आहोत. व आत्ता या क्षणी देखील तेच सत्य आहे. परंतु मग साधना किंवा अध्यात्मिक उपासना या गोष्टींची गरज काय? जर का मी मुक्त आहे तर अजून कोणते मुक्ती मिळवणार??
गौडापाद म्हणजे शंकराचार्यांच्या गुरूंचे गुरू. त्यांनी लिहिलेल्या मांडुक्य कारिका या ग्रंथामधील एक श्लोक असे सांगतो की उत्पत्ती आणि लय या दोन्ही गोष्टी मिथ्या असतात. उत्पत्ती मिथ्या आहे आणि लय देखील. बंधन मिथ्या आहे आणि मुक्ती देखील. अध्यात्मिकता मिथ्या आहे आणि आणि अध्यात्मिक साधन
देखील.
हे सर्व वाचले की आपल्यासारखे लोक उतावळेपणाने हे म्हणायला सुरु करू शकतात की मग अध्यात्मिक साधना करण्यात काय पॉईंट?? मी जर का प्रत्यक्ष ब्रह्म आहे तर मग मी साधना करून साधणार तरी काय?
दोन वर्षांपूर्वी नाशिकला गेलो होतो. ऑफिसच्या कामासाठी. ऑफिसला वीस वर्ष पूर्ण झाल्या बद्दल नाशिक मधील ऑफिसचे एक व्हिडीओ शूट करायचे काम शनिवारी करायचे होते. ऑफिस नाहीच येण्या जाण्याकरता गाडी दिली होती व बरोबर एक दोन माझ्याबरोबरच काम करणारे लोकही होते. सकाळी
जाऊन दुपारी परत निघणार होतो. परंतु नाशिक मध्ये गेलेलो च आहे तर काही मनात असलेली एक-दोन कामे उरकण्यासाठी थांबावे हा विचार मनात आला. मी आणि माझे सहकारी गाडीने पुण्यासाठी परत निघालेलो होतो. मी गाडी थांबवायला सांगितली आणि त्यांना सांगितले की तुम्ही पुढे जा मी उद्या येईन परत.
तेथून निघालो तो डायरेक्ट पंचवटी मध्ये आलो कारण तेथेच सगळ्यात महत्त्वाचे काम होते. राहायची सोय हॉटेलमध्ये रात्री कोठेही करता येईल त्यामुळे आधी पंचवटी ला गेलो. गोदावरी काठी काही संत महात्म्यांच्या समाधी आहेत तेथे जाण्याचे गेले कैक वर्ष मनात होते. परंतु नाशिकला बऱ्याच वर्षांमध्ये
मोतीयाचे हे धन
असे सर्वांचे जवळ
तरी ई ई यक करून
अपमान का तो करी??
खरेतर प्रत्येकाजवळ असणारी ही गोष्ट. प्रत्येकाने अनुभवलेली. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष चाखलेली. पण सगळेजण अगदी ई ई ई ई असे करतील.
प्रत्येकाने याचे आजूबाजूला देखील खूप निरीक्षण केलेला असेल व अनुभवलेले ही असेल. पेन्सिल ला टोक करण्याचे टोक यंत्र किंवा गिरमिट याची पहिली idea हे नाकात बोट घालून मेकुड काढतानाच सुचलेले असणार यात मला शंका नाही.
मी तर बाबा या बाबतीत प्रचंड निर्लज्ज माणूस आहे.
लहानपणी सकाळी सहा
वाजता शाळेसाठी उठल्यावर सगळ्यात पहिले मागच्या अंगणात मधील पाणी तापवणारे चुलीसमोर जाऊन बसायचं. मस्तपैकी हात शेकून घ्यायचे. आणि मग त्यात तंद्री मध्ये आणि समाधी मध्ये जाण्याकरता एक बोट नाकात घालून ते खर्डावयला सुरुवात केलेली असायचे. ती एक सहज समाधीची लेवल आहे.
What is Brahmin? ब्राह्मण म्हणजे काय?
ब्राह्मण म्हणजे काय?
हे फक्त अश्या लोकांनी वाचावे ज्यांना खरोखर खूप खोल वर विचार करता येणे शक्य आहे.
आज माझ्या सर्टिफिकेट वर ब्राह्मण हा शिक्का आहे. मला पण लहानपणी वाटायचे की ब्राह्मण आहोत.आणि अभिमान देखील होता.तसेच प्रत्येक माणसाला
त्याच्या जातीचा अभिमान असणे साहजिक आहे. आता जातीं मध्ये देखील खूप पोट प्रकार आहेत. ते सध्या बाजूस ठेवू.
मी मोठा होत गेलो तसे स्वतः विचार करू लागलो, की नक्की काय आहोत आपण. पुस्तके वाचत गेलो त्यातून निरनिराळी मते वाचली.मी माझे मत हळूहळू बनवायला लागलो. विचार करून.
मी मोठा होत गेलो तसे स्वतः विचार करू लागलो, की नक्की काय आहोत आपण. पुस्तके वाचत गेलो त्यातून निरनिराळी मते वाचली. मी माझे मत हळूहळू बनवायला लागलो. विचार करून.
मुळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे प्रकार का आले? त्याचे अर्थ काय?
लग्न
खरे तर या विषयावर मी बोलणे म्हणजे लोक मला मूर्खातच काढतील. पण हे मी आज सविस्तर आणि प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न करतोय.
पण लग्न का केले या प्रश्नाला सहसा लोकांकडे खरच उत्तर नसते. कारण लहानपणापासून हे डोक्यात बिंबलेले असते की एक वय झाले की लग्न करायचे असते.
आजूबाजूला 99 टक्के हेच पाहत आपण मोठे होते. पण खरंच लग्न संस्था म्हणजे काय हे कोणी कधीच पाहत नाही. एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये admission घेण्या आधी देखील आपण तेथील रेकॉर्ड तपासून पाहतो. हल्ली तर पहिली मध्ये ऍडमिशन घेताना पण सगळे बघितले जाते. परंतु लग्न का करायचे याचे उत्तर
थातूर मातूर असेच मिळते की आयुष्याचा भाग आहे हा. आपल्या संस्कृती मधला आणि संस्कारातला एक भाग आहे हा. पण लग्न करायचे की नाही यापेक्षा लग्न संस्था अस्तित्वात का आली आणि तिचे फायदे तोटे कोणते यावर आपण कधीच विचार केलेला नसतो
पॉर्न बघणे गुन्हा आहे का?
आज एक पॉर्न वर असलेली पोस्ट वाचली. केवळ पॉर्न बघितल्यामुळे बलात्कार करण्याची इच्छा कशी होत असेल याबाबत.
मी देखील पॉर्न बघितलेले आहेत एकेकाळी. परंतु त्यानंतर ते बंद केले कारण मला माझा स्वतःचा रस्ता बदलायचा होता म्हणून. परंतु नंतर काही गोष्टी समोर
आल्या त्या मांडायचा प्रयत्न करतो. त्याआधी एक स्वतःचा अनुभव सांगतो.
कॉलेजला असताना मी बुधवार पेठ मधील वेश्या वस्ती मध्ये तेथील वेश्यांच्या मुलांना शिकवण्या करता जायचो शनिवारी. साधारण काही महिने गेलो असेल. त्यामध्ये तेथील एका मुलाच्या आईची ओळख झाली होती. तीस पस्तीस वर्षाची असेल ती.
या व्यवसायात कशी आली हे मी तिला एकदा विचारले होते तिच्याकडे चहा पिताना. तिने मला सांगितले ती मूळची बंगालची. लहानपणी आई-वडील वारले. ती तिच्या काकाकडे राहायला होती. 13 14 वर्षाची असताना काकाने तिला विकले कलकत्त्यामध्ये.