मित्रांनो .. अपार स्नेह !
बरेच दिवस झाले आपल्याशी गुफ्तगू करून. चुकल्या-चुकल्या सारखे वाटतेय. गेली दोन वर्षे तुमच्याशी संवादी राहण्याचा हाच तर एक ज़रिया होता , हे कसे विसरू ? आता मैफिली सुरू झाल्या आणि दौरे सुद्धा. संपर्कात कदाचित थोडे अंतर पडेल यापुढे , एवढेच !
असो ! #म#मराठी
मैफिलींचे जुने रेकॉर्डिंग्ज धुंडाळताना दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पार्ले - मुंबई येथील साधारण दहाएक वर्षांपूर्वीच्या 'गज़लांकित' मैफिलीतील ही तुमची एक खूप आवडती गज़ल मिळाली ...
तू चोर पावलांनी येऊ नकोस आता
स्वप्नातल्या प्रमाणे ये राजरोस आता...
व्वा , क्या कहने !
दीपक करंदीकर या जेष्ठ गज़लकाराची ही गज़ल चंद्रकौंस रागाचा आधार घेऊन मी स्वरबद्ध केली आणि तुम्ही रसिकांनी भरघोस दाद देऊन ती आपलीशी केली.
आपल्या सेवेत त्याच गज़लचे हे लाईव्ह रेकॉर्डिंग पेश आहे ...
माझा-तुझा घरोबा मृत्यो जुनाच आहे
होऊन हाडवैरी का वागतोस आता..!
"मेहबूबा असो की मृत्यू , यायचे असेल तर दोघांनीही राजरोसपणे यावे , लपत-छपत नव्हे !"