त्या संध्याकाळी तो एकटाच नदीच्या किनारी जाऊन झाडाला टेकून बसला होता. नेहमी मित्रांच्यात प्रचंड खेळणारा व दिवसभर दंगा करणारा तो शांतपणे कसलातरी गहन विचार करत होता. प्रचंड मोठ्या घडामोडी होणार होत्या त्याच्या केवळ एका निर्णयामुळे.
गेल्या काही दिवसातील घडलेल्या प्रसंगामुळे व एकूणच लहानपणापासून घडत आलेल्या गोष्टी यामुळे आपण नक्कीच वेगळे आहोत याची जाणीव त्याला होती. परंतु त्यावर त्याने कधी विचार केलेला नव्हता. आपले सवंगडी आपल्या गावातील लोक यांच्या प्रचंड प्रेमामुळे त्याला बहुदा हा विचार करण्यासाठी वेळच
मिळाला नव्हता. आपण केवळ त्यांच्यासाठी आहोत हेच भावना त्याच्या मनामध्ये होती.
परंतु आज वेळच अशी आलेली होती. त्याच्या एका निर्णयामुळे त्याचे स्वतःचे व आजुबाजू ला असणाऱ्या लोकांचे आयुष्य बदलणार होते कायमचे.
प्रेम म्हणजे नक्की काय हा प्रश्न झाला पहिल्यापासून सतावत होताच.आई-वडिलांचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम असते का? शारीरिक आकर्षणामुळे विरुद्ध लिंगी माणसाबद्दल असलेली भावना म्हणजे प्रेम का? की भक्त आपल्या देवावर करतो ते प्रेम?
आपल्यामध्ये व तिच्यामध्ये असलेली भावना म्हणजे नक्की काय
मला जे तिच्या बद्दल वाटते ते म्हणजे नक्की काय? ती कायम माझ्याशी बांधलेली असते ती का? आपल्या या निर्णयामुळे तिचे काय होईल? आई बाबांचे काय?
भावनांचा प्रचंड हल्ला कल्लोळ मनात चालू होता.
प्रेम म्हणजे मुक्ती चा आणि मोक्षा चा रस्ता असेल तर प्रेम कोणाला बांधून कसे काय ठेवू शकते?
ते कोणाला अडवु कसे काय शकते?
शेवटी त्याने शेवटचा पर्याय म्हणून झाडाच्या खोडाला डोके टेकवले आणि डोळे मिटले. त्याने डोळे मिटल्यावर नेहमीच त्याच्या आतून चालू असलेला आवाज त्याला प्रकर्षाने ऐकू येऊ लागला. तो आवाज अगदी कुठून तरी
आतून ऐकू यायचा त्याला. "सोहम, सोहम" हा आवाज ऐकू गेल्यावर त्याचे सर्व ताण नाहीसे झालेले असायचे, गोंधळ संपलेले असायचे. तो आवाज ज्या ठिकाणाहून येतोय ते शरीर नाही किंवा मन आणि बुद्धी देखील नाही इतके जाणीव त्याला असायची. आज पर्यंत तो आवाज
आपल्या आतूनच अज्ञात अशा जागेमधून येत आहे इतकेच त्याला माहीत होते.
आज पर्यंत इतका प्रचंड गोंधळ व भावना कल्लोळ असलेली स्वतःच्या मनाची अवस्था त्याने कधीच पाहिले नव्हते त्यामुळे त्यातून शांतता मिळवण्यासाठी तो अजूनच एकाग्रतेने तो आतून येणारा ध्वनी ऐकू लागला.
त्यानंतर काही क्षणात सर्व काही बदलणार होते. आज पर्यंत त्याच्याकडून आपोआप खूप काही अमानवी गोष्टी व चमत्कारिक गोष्टी घडून आल्या होत्या. त्याचे कारण कदाचित त्याला स्वतःला देखील माहीत नव्हते. त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल असलेली उत्कंठा किंवा या गोष्टी कशा काय होतात याबद्दलची
उत्सुकता या सर्व गोष्टी काही क्षणात संपणार होत्या.
त्याच्या अंतर्मनातील कानाला अंतःकरणाच्या तो आतील ध्वनी अजूनच जाणवू लागला. दोन भुवयांच्या मध्ये असलेले अज्ञा चक्र चक्र जणू काही त्या ध्वनिकडे खेचून घेऊन जाऊ लागले. शरीर पालापाचोळा सारखे उडून जाते की काय ही एक क्षणिक भावना व
विचार मनात उमटला परंतु आता आतील प्रवास चालू झाला होता. तो थांबवणे कोणालाच शक्य नव्हते. ना त्याला स्वतःला देखील.
आणि त्या स्वस्वरुपाची जाणीव त्याचक्षणी निर्माण झाली. जीव शिवाचे मिलन झाले होते. सर्व शंका संपल्या होत्या.
सर्व प्रश्न संपले होते. तेथे फक्त जाणीव होती ती अस्तित्वाची. स्वतः तो परमेश्वर असल्याची. शिव असल्याची. शरीर व मन व बुद्धी हे खरे नसून ते ज्यापासून तयार होतात तो मी म्हणजे हे एकच सत्य ही जाणीव झाली होती. भाव भावना आणि एकूणच विश्व हा स्वतःचाच खेळ आणि पसारा.
त्याने सावकाश डोळे उघडले..
तेवढ्यात कोणीतरी आपल्या दिशेने येत आहे याची त्याला जाणीव झाली. परंतु त्याने मागे वळुन बघण्याचे कष्ट घेतले नाहीत. आज पर्यंत मानसिक शक्ती थोडी जरी वापरली तरीदेखील त्याला समजून यायचे हे सर्व काही. मागून कोण येत आहे किंवा कोण काय बोलत आहे
या सर्व गोष्टी त्याला जणू जन्मजात प्राप्त होत्या. त्या का हे देखील त्याला.माहीत नव्हते. परंतु आज पहिल्यांदाच त्याला ती शक्ती वापरण्याची देखील इच्छा झाली नाहीं.
तेवढ्यात मागून आवाज आला.
" कान्हा इकडे काय करतोयस? यशोदा मैय्या , नंद बाबा, अक्रूर जी सगळे वाट बघत आहेत".
त्याच्या दादा चा , बलरामाचा.
अत्यंत स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटले. कधीही कोणात न अडकणारा, अशा त्या महान योगी कृष्णाने उद्या बाबत निर्णय घेतलेला होता. मथुरेला जायचा. कष्यातही न अडकता.
गेल्या काही महिन्यांमध्ये ध्यानाविषयी काहीतरी लिही असे बऱ्याच जणांनी सांगितले परंतु मी अशा विषयावर लिहिण्यास पात्र आहे का हे मला माहीत नव्हते. आणि अर्थातच अजूनही मी त्याला पात्र नाही हे मला ठाऊक आहे. मी स्वतः हल्ली काहीच करत नाही त्यामुळे मला या विषयावर लिहिण्याचा
किंवा बोलण्याचा काय हक्क. तरीदेखील अनुभवी संत आणि आत्मसाक्षात्कार लोकांनी जे काही सांगितले आहे ते केवळ एक पोपटपंची करणारा या नात्याने लिहिण्याचा प्रयत्न करतो. खरेतर ज्या पद्धतीने शरीर कसे कमवावे हे केवळ एखाद्या मल्लाने किंवा पैलवानाने लिहिले पाहिजे व त्या गोष्टीला मी पूर्णपणे
छेद देत आहे त्याबद्दल क्षमस्व. या लिखाणामध्ये माझी स्वतःची कणभर देखील पात्रता नाहीये हे लक्षात सुरुवातीलाच घ्यावे.
असो तर,
आपण बऱ्याच वेळेला ध्यानाला बसणे किंवा ध्यान लावणे किंवा मेडिटेशन करणे या गोष्टी ऐकत असतो
गुमनामी बाबा-२ #netaji #नेताजी
1985 साल:
उत्तर प्रदेशमधील गुफ्तार घाट येथे फक्त मोजक्या माणसांच्या उपस्थिती मध्ये एक अंतिम संस्कार चालू होता. हा घाट भगवान श्रीराम यांच्या समाधी साठी देखील प्रसिद्ध आहे. भगवान श्रीराम यांनी या घाटाला जवळच जलसमाधी घेतली असे मानले जाते, त्यामुळे या
प्रभु श्रीराम यांचे मंदिर आहे व या जागेला धार्मिक दृष्ट्या एक महत्त्वदेखील आहे.
तो एरिया मिलिटरीच्या अंडर असल्यामुळे कोणत्याही परमिशन शिवाय पटापट हे अंतिम संस्कार उरकले गेले. कोणालाही याबद्दल माहित नव्हते व हे अचानक झालेले अंतिम संस्कारां नंतर
व्यक्तीची खोली उघडण्यात आली. आणि त्यानंतर जो काही गजहब आणि गोंधळ उडाला.
सात हजार पेक्षा जास्त गोष्टी त्या बंद खोली मधून घेण्यात आल्या. त्याचे एक छोटेसे सॅम्पल मी खाली फोटो मध्ये देणार आहे. त्यामध्ये हजारो पत्र व कागदपत्रे, मिलिट्री मध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्बिणी, गोल भिंगाचे
प्रसंग 1:
भोपाळमध्ये गॅस दुर्घटना झाली. प्रचंड लोक मृत्युमुखी पडले. अनेक घरे उद्ध्वस्त झाली. पण काही घरे अशी होती ज्यांच्या आजूबाजूला प्रचंड मनुष्यहानी झालेली होती पण त्या घरांना धक्का देखील लागलेला नव्हता. ना त्या घरातील लोकांना त्रास झाला.
या घटनेनंतर लवकरच
प्रणग 2:
रशियामधील चरनोबिल येथे अनुभट्टी चा स्फोट झाला व त्याचे रेडिएशन अगदी पोलांड पर्यंत येऊन पोहोचले. परंतु पोलंडमध्ये काही अत्यंत छोटी गावे अशी सापडली ज्यामध्ये आश्चर्यकारकरीत्या कोणत्याही किरणोत्सर्गाचा टच देखील झालेला नव्हता. ना तेथील गवतामध्ये
किरणोत्सर्ग आढळून आले शेतामध्ये ना पशूंमध्ये.
वरील दोन्ही घटनांमध्ये जी घरे नित्यनेमाने अग्निहोत्र करीत होते त्यांची घरे या हल्ल्यापासून वाचलेली होती. हो, पोलंडमध्ये देखील त्या गावांमध्ये काही घरांमध्ये नियमित अग्निहोत्र चालू होते.
ज्या व्यक्तीने भारताच्या स्वातंत्र्य मध्ये प्रचंड मोठी भूमिका पार पाडली ती व्यक्ती काळाच्या ओघात प्रचंड दाबली गेली. ती व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. कितीही वर्ष त्यांचा मृत्यू व त्याबाबतची गूढता दाबण्याचा प्रयत्न भारतामध्ये
व भारताच्या बाहेर कायम झालेला आहे तरीदेखील सत्तर वर्ष होऊन सुद्धा या महान माणसाबद्दल असलेली भारतीयांना आत्मीयता ही प्रचंड आहे. त्यांच्या मृत्यूच्या गुढते बाबत जे वलय आहे ते तसेच आहे.
मी ह्याचा गाढा अभ्यासक नाही परंतु अनुज धर @anujdhar व @chandrachurg यांसारख्या दिग्गज लोकांनी वीस वर्ष हा विषय पिंजून काढला व त्याबद्दल देशात आणि देशाबाहेर त्याचप्रमाणे आयआयटीसारख्या संस्थांमध्ये अनेक व्याख्याने दिली त्याचबरोबर प्रचंड मोठी पुस्तके लिहिली.
2014 मध्ये नागझिरा येथे पहिल्यांदा गेलो. सोलो (एकटा) गेलो होतो. माझे सगळ्यात आवडते जंगल असेल तर ते म्हणजे नागझिरा. इतर जंगलां सारखा येथे बाजार भरलेला नाही. कमर्शियल गोष्टी अत्यंत कमी जवळपास नाहीतच. तेथे पिटेझरी नावाचे कोर जंगलाचे एकच गेट आहे.
हे जंगल त्या मानाने अत्यंत लहान आहे परंतु या जंगलाला नैसर्गिक देणगी अफाट आहे. येथे असलेली गर्द झाडी हे जंगलाचे वैभव. डिसेंबर महिना होता ज्या वेळेला मी या जंगलात आलो. 25 डिसेंबर. तरीदेखील अजिबात गर्दी नव्हती. लोकांना वाघ बघण्याचा आकर्षण जास्त असते तो येथे हमखास दिसेलच असे नाही.
डिसेंबर मधील विदर्भामधील थंडी आणि त्यामध्ये जंगलात असल्यामुळे ती थंडी अधिकच बोचरी होती. पितेझरी गेट जवळच म्हणजे तसे म्हटले तर या गेटच्या आत मध्ये तेथील गावकऱ्यांनी राहण्यासाठी तंबू ची व्यवस्था केलेली होती. पाच ते सहा तंबू व त्याच्या आजूबाजूला एक कुंपण टाकलेले होते.