बऱ्याच जणांसाठी हा लेख म्हणजे अत्यंत जहाल जळजळीत असे रसायन असू शकेल त्यामुळे वाचायच्या आधीच विचार करा.
उत्क्रांतीवाद या वरती केलेले बरेच पेपर आणि डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत.
त्याचप्रमाणे ज्यांना वैद्यकशास्त्र कळते किंवा स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर व मन काय पद्धतीने बनले आहे हे कळते या लोकांशी देखील तुम्ही या विषयी प्रामाणिकपणे बोलून बघा. याची देखील गरज नाही जर का तुम्ही खरोखर स्वतःच्या आत मध्ये खोलवर शिरून गोष्टी बघू शकतात तर....
मुळामध्ये सेक्स हे गोष्ट अति प्रचंड महत्त्व देऊन उदात्त केले गेलेली गोष्ट आहे. खरेतर एक सर्वसाधारण शारीरिक गरज इतकेच त्याचे महत्त्व असायला हवे. परंतु ते कोणाबरोबर केले गेले तर पवित्र कोणाबरोबर केले गेले तर अपवित्र याबद्दल हजारो वर्षे आपल्या डोक्यामध्ये गोष्टी कोंबण्यात आलेले आहेत
अत्यंत सोयीस्कर रित्या आणि शिस्तीत.
नैसर्गिक दृष्ट्या विचार केला गेला किंवा तुम्ही देखील खरोखर स्वतःच्या खाजगी आयुष्यात डोकावून बघितले तर लक्षात येईल की स्त्रियांचे शारीरिक भूक भागवणे करता सर्वसाधारणपणे एक पुरुष हा कधीच पुरेसा नसतो. मी असे म्हणणार नाही की असे सर्वत्र असू
शकते परंतु जनरली एखाद्या पुरुषाबरोबर स्त्रीचे शारीरिक संबंध झाले की पुरुष ढळलेला असतो... दुसऱ्यांदा लगेच संभोग करण्याकरता स्त्री ही त्वरित तयार होते परंतु पुरुषाला त्यासाठी प्रचंड वेळ लागतो. म्हणजेच नैसर्गिक दृष्ट्या स्त्री किंवा मादी ही अनेक पुरुषांशी संबंध ठेवण्याची कपॅसिटी
आपल्या अंगी बाळगून असते.
उत्क्रांती व त्यावर अभ्यास करणाऱ्या लोकांचे म्हणणे हे आहे की ज्या वेळेला माणूस हा नुकतेच गट करून राहण्यास लागला होता अगदी त्या वेळेपर्यंत एक स्त्री अनेक पुरुषांशी सहज संबंध ठेवत असे. ज्याप्रमाणे आजदेखिल गोरिला, एप किंवा ओरांगुटान या
माकडांमध्ये या पद्धतीची गोष्ट दिसून येते. थोडक्या मध्ये त्या वेळेला स्त्री ही पुरुषांची मक्तेदारी नव्हती. परंतु आपले जीन्स व आपले रक्त पुढे नेण्यासाठी पुरुषांमध्ये स्पर्धा तयार झालेली असायची.
या स्पर्धे मधूनच पुढे पुरुष शारीरिक दृष्ट्या ताकदवान असल्यामुळे आपल्याला हवी ती स्त्री आपल्याकडे ठेवणे हे त्याच्या पुरुषत्वाचा असलेले एक आव्हान आणि अभिमानास्पद गोष्ट बनली. अर्थातच स्त्री ही नैसर्गिक दृष्ट्या सेक्युरीटी या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व देणारी असते. स्वतःची आणि
स्वतःच्या बाळाची सेक्युरिटी ही तिला जास्त महत्वाची असल्यामुळे तीदेखील जास्त सामर्थ्यशाली पुरुषाबरोबर राहण्यास तयार होण्यास सुरुवात झाली. त्यातून पुढे जाऊन स्त्री म्हणजे एका प्रकारे आपली मालमत्ता किंवा आपल्या सामर्थ्याचे प्रतीक असणे ही पुरुषांसाठी स्वाभाविक गोष्ट होती.
जितक्या जास्त स्त्रिया तेवढे आपण जास्त सामर्थ्यशाली अशी गोष्टही काही काळाने होत गेली.
आपले स्त्री दुसऱ्या पुरुषाच्या नजरेस पडू नये यासाठी देखील प्रचंड काळजी घेण्यात आलेली आहे सर्व धर्मांमध्ये वा संस्कृतीमध्ये. स्त्रीला घराबाहेर जाण्याचा प्रसंग फारसा येत नसल्यामुळे वेगवेगळ्या
धर्मांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपास वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रियांसाठीचे व्रतवैकल्ये किंवा स्त्रिया एकमेकांना भेटून करत असलेले काही सामाजिक सोहळे तयार केले गेले जेणेकरून त्यांना थोडे तरी बरे वाटावे. म्हणजे आपण नाहि का आपल्या लहान मुलाने इकडे तिकडे जाऊ नये
म्हणून त्याच्यासाठी आपण वेगवेगळे आकर्षणे किंवा खेळणी आणून ठेवतो म्हणजे मग ते त्यातच रमेल व बाकी गोष्टींचा विचार करणार नाही. अत्यंत व्यवस्थित प्लानिंग केली गेलेली ही सगळे पुरुषप्रधान सिस्टीम आहे.
त्यामुळे मग तत्वज्ञान किंवा धर्म व त्यामधील नियम अशा गोष्टी हळूहळू उदयास यायला
व त्यामधून लग्नसंस्था ही अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे मुळातच स्त्रियांना जबरदस्ती आपल्याकडे आणून त्यांना बांधून ठेवणे या पुरुषांच्या विकृती मधून एका प्रकारे विवाह संस्था उदयास आली व नंतर हजारो वर्षे टिकली.
आत्ताच्या लोकांनी हा कधी विचारच केलेला नसतो कारण त्यांना असे वाटत असते की सर्वजण एकच विवाह करतात. कारण आजूबाजूला जे घडत असते त्याचा परिणाम सर्वात जास्त असतो. परंतु फक्त सत्तर वर्षांपूर्वी मागे जाऊन बघितले तर भारतामध्ये देखील पुरुष आरामात एकापेक्षा जास्त लग्न करत होते.
मुलगी विधवा झाली तर तिला परत लग्न करण्याकरता कोणताच रस्ता नव्हता. मग भले ते राजघराण्यातील असो किंवा गरीबाच्या घरात. म्हणून पेशव्यांच्या घरात देखील टक्कल करून ठेवलेल्या गोपिकाबाई त्याचप्रमाणे तारुण्यात विधवा झालेल्या विश्वास भाऊ यांच्या पत्नी आयुष्यभर त्यांना तसेच दिवस काढावे
लागले. हेच वर्षाची बायको गेली असते तर मात्र त्यांचा दुसरा विवाह लगेच करण्यात आला असता.
पहिल्या पत्नीपासून मुल होत नसेल तर दुसरी पत्नी करण्याचा प्रघात अगदी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व घरांमध्ये आढळून येतो.स्त्रीला मात्र आपल्या पुढच्या पासून सुख प्राप्त होत नसेल तर असा कोणताही
उपाय दिसत नाही.
आपल्या सासरी जर का आपल्याला त्रास होत असेल तर स्त्री माहेरी सुद्धा जाऊ शकत नसे. कारण आता सासरच तुझे घर आहे व तुझे मध्ये किंवा तिरडी देखील उठेल ते सासर वरूनच . आता माहेरची तुझा संबंध नाही हे सांगितले जात असे.
आता कोणीतरी येऊन बोलेल कि हे सर्वत्र नव्हते तर ते महा मुर्खपणाचे विधान असेल इतकेच.
म्हणजेच थोडक्यात लग्नसंस्था ही तयारच झाली आहे ती स्त्रियांना आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी व आपण सामर्थ्यशाली आहोत हे समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी. पूर्वीच्या काळात देखील कुठल्या
राजकन्येने राजपुत्राचे हरण करून दिले आहे असे ऐकिवात येत नाही नाही का?
राजपुत्र मात्र जाऊन एखाद्या राजकन्येचे किंवा कोणत्याही स्त्रीच्या हरण आरामात करीत असे. व कौतुक असे की पुढे जाऊन त्याला मान्यता देखील मिळत असे. त्याला एका प्रकारचा पराक्रम मानला जाई.
त्यामुळे लग्न संस्था ही हजारो वर्षे टिकून राहिली त्याचे कारण अगदी 70 वर्षांपूर्वीपर्यंत स्त्रियांना माहीतच नव्हते की त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात, माहेर किंवा सासर या दोन्ही गोष्टींना टाळून स्वतः स्वतंत्र राहू शकतात, शिक्षण घेऊ शकतात पैसे कमवू शकतात.
त्यामुळे ज्या लोकांचे हे म्हणणे असते की पूर्वीच्या काळात संसार कसे व्यवस्थित चालत होते अत्यंत कमी घटस्पोट होत होते तर त्या लोकांनी या गोष्टीचा अभ्यास कधीही केला नव्हता इतकेच लक्षात येते. कारण सत्तर वर्षांपूर्वी पर्यंत स्त्री पैसे कमवू शकत नव्हते ना धड शिकू शकत होते तर ते नवऱ्याल
सोडून जाणार कुठे?? त्यामुळे स्त्रीच्या मनात देखील यायचं नाही की आपण घर सोडून एकटे कुठेतरी राहू शकतो.
थोडक्या मध्ये स्त्री घर सोडून जाणारच नाही अशा प्रकारे पूर्ण परिस्थिती अत्यंत प्लानिंग ने तयार केलेले होती. त्यामुळे घटस्फोट होण्याची संख्या कमी असणार यात नवल ते काय??
म्हणजे उद्या घरात आणलेला पाळीव प्राणी समजाने साखळीने बांधून ठेवला तर तो कधी पळून जाणारच नाहीये. आणि या बद्दल लोकांना अभिमान वाटतो की तो पळून गेला नाही हे प्रचंड हास्यास्पद आहे.
काही लोक अत्यंत बुद्धी गहाण ठेवून प्रश्न विचारतात
जर पूर्ण नैसर्गिकच राहायचे असेल तर कपडे देखील का वापरावेत? पण त्यांना पाचवी मध्ये शिकलेली गोष्ट विसरलेली असते ते म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा या कोणत्याही माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. सेक्स कोणाबरोबर करायचा आणि कोणा बरोबर नाही किंवा
मुळातच सेक्स ही गोष्ट मूलभूत गरज म्हणून मानले गेले नाहीये.
हळूहळू पाश्चात्त्य देशांमध्ये सर्वप्रथम बदल घडत गेले व स्त्री ही स्वतंत्र होत गेली त्यामुळे तेथे घटस्फोट व विलग होण्याचे प्रमाण वाढत गेले. आता आपल्याकडे देखील ही गोष्ट सुरू झालेली आहे.
तरीदेखील अजून सुद्धा एखाद्या मुलीने नवऱ्याशी काडीमोड घेण्याचा विचार केला की तिच्या घरून मात्र ज्या पद्धतीने विरोध होतो किंवा समाजामध्ये तिच्याकडे ज्या पद्धतीने बघितले जाते ती लाजिरवाणी गोष्ट आहे. हळूहळू येणाऱ्या पिढीमधील मुले या पूर्णपणे स्वतंत्र
विचाराच्या स्वतंत्रपणे कमावणाऱ्या व स्वतंत्रपणे राहणारे असतील. पुरुषांवर असणारे अवलंबित्व अत्यंत कमी झालेले असेल. किंबहूना ते नष्ट होण्यास सुरुवात झालेली आहे.
अर्थात मुले जन्माला येण्याच्या दृष्टीने त्याचे आई वडील यांनी एकत्र राहणे हे कधीही फायदेशीर असते याबद्दल माझे दुमत नाही.
परंतु त्याकरता लग्नाच्या बेड्या घालूनच जबरदस्त तसे राहणे यामध्ये देखील अर्थ नसतो. जर खरोखर एकमेकांवर प्रेम असेल तर समाजासमोर आणाभाका घेऊन आणि एकमेकाला वचने देऊन राहण्याचा संबंधच येत नाही.
बाँड किंवा करारपत्र तेव्हाच बनवण्यात येते ज्यावेळेला दोन लोकांचा एकमेकावर विश्वास नसतो. ज्या वेळेला विश्वास असतो त्या वेळेला असे करार पत्र बनवण्याची गरजच लागत नाही. व ज्या पद्धतीने लग्नाचे सर्टिफिकेट व मी अमुक एका माणसाबरोबर लग्न करून त्या बरोबर
प्रामाणिक राहणार आहे या कागदावर सही करण्यात येते याचा अर्थ हे सर्व काही अविश्वासाच्या बेस वरच बनलेले आहे.म्हणूनच तेथे एकमेकाची सही घेऊन विश्वासार्हता दाखवावे लागते.
त्यामुळे आपल्या देशातील संस्कृतीचा जर का मला आदर वाटतो तर तो वैवाहिक दृष्ट्या कोणत्याही ही व्यक्ती बद्दल वाटत नाही
मला माझ्या संस्कृतीचा आधार आहे तो संन्यास यामुळे अनेक योग्यांमुळे. शंकराचार्य स्वामी विवेकानंद बुद्ध मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ ज्ञानेश्वर यांसारख्या विभूते मुळे मला आपल्या संस्कृतीबद्दल प्रचंड आदर आहे. ज्या लोकांनी सेक्स ही गोष्टच मुळात कस्पटासमान मानली
व त्याला महत्त्व दिले नाही. अर्थात अनेक महान आत्मसाक्षात्कार ए संत हे वैवाहिक आयुष्य जगले. परंतु ते त्यामध्ये आपल्यासारखे कधी अडकून राहिले नाहीत. त्यामुळे संत तुकाराम संत नामदेव संत चोखामेळा हे देखील अत्यंत महानच आहेत माझ्या दृष्टीने.
आताच्या मुलींना आपण पैसे कमावतो म्हणजे किती माज असतो व त्या स्वतःला किती जास्त शहाण्या समजायला लागले आहेत अशी विधाने देखील आरामात ऐकू येतात. परंतु ज्या गोष्टीला हजारो वर्षे तुम्ही दाबून त्या प्रेशर कुकर मधील प्रेशर इतके वाढवून ठेवले आहे
म्हणल्यावर झाकण काढल्यानंतर आत मधील वाफ उसळी घेणारच.
या जगामध्ये जी गोष्ट उदयास येते त्या गोष्टीचा अंत निश्चित असतो. लग्नसंस्था ही देखील पूर्णपणे मानवनिर्मित व अत्यंत चुकीच्या कारणांसाठी व कारणांमुळे तयार झालेली संस्था आहे.
तिचा उदय हजारो वर्षांपूर्वी झालेला असेल. परंतु येत्या काही शतकांमध्ये तिचा पूर्णपणे ऱ्हास होणार आहे किंवा ती नाममात्र उरेल इतके नक्की.
कारण स्त्रिया स्वतंत्र होत आहेत.
हा लेख वाचून अनेक पुरुषांचा पुरुषी अहंकार दुखावले जाण्याची शक्यता आहे त्याबद्दल क्षमस्व.
हे लेख लिहिणे यामागे कोणावरही टीका किंवा कोणावरही आक्षेप घेणे हा उद्देश नाहीये तर सत्य काय होते हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न आहे. स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन करणारे, पहिली आर्मी स्थापन करणारे, पहिले चलन काढणारे, पहिला ध्वज असलेले
असलेले सरकार म्हणजे नेताजी.
नेताजी सुभाष चंद्र बोस त्यांच्या गूढ मृत्यूबाबत आपण पर्याय निवडून काढले तर ते 3 निघतात. 1. विमान दुर्घटना (सरकारी मान्यता ) 2. रशियामधील मृत्यू 3. गुमनामी बाबा
आपण आता जे 3 ऑप्शन आहेत ते क्रमाक्रमाने बघणार आहोत. त्यातील पहिली शक्यता व ज्याला सरकारने
मान्यता दिलेली आहे ते version बघू.
ते म्हणजे नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात झाला.
अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून दुसरे महायुद्ध संपवले होते. येत्या काही दिवसात जपानच्या शरणागतीची तयारी चालू होती. सिंगापूर मध्ये हेड क्वार्टर्स किंवा हेड ऑफिस असलेल्या INA मध्ये देखील
माझी चौथीची परीक्षा संपली. मे महिन्याच्या सुट्ट्या चालू झाल्या. आई बाबा म्हणाले होते कुठेतरी फिरायला जायचे आहे. कोठे ते काहीच सांगितले नव्हते मला. सुट्टी
लागल्यावर तीन-चार दिवसांनीच सकाळी सहा वाजताच आंबेसेटर दाराशी आली. बाबांच मित्राची गाडी होते व तोच ते गाडी चालवणार होता.
आम्ही निघालो. मी विचारत होतो कुठे जातोय. आई म्हणाली, "आपण गोव्याला फिरायला चाललो आहोत."
मी असला खुश झालो. पण आधी का मला सांगितले नाही म्हणून वादही घातला.
गोव्याला आम्ही साधारण संध्याकाळी सहाला वगैरे पोहोचलो. मला आता सगळी नावे आठवत नाहीत. परंतु एका मस्त हॉटेलमध्ये बाबा आणि बाबांचा मित्र असे
गेल्या काही महिन्यांमध्ये ध्यानाविषयी काहीतरी लिही असे बऱ्याच जणांनी सांगितले परंतु मी अशा विषयावर लिहिण्यास पात्र आहे का हे मला माहीत नव्हते. आणि अर्थातच अजूनही मी त्याला पात्र नाही हे मला ठाऊक आहे. मी स्वतः हल्ली काहीच करत नाही त्यामुळे मला या विषयावर लिहिण्याचा
किंवा बोलण्याचा काय हक्क. तरीदेखील अनुभवी संत आणि आत्मसाक्षात्कार लोकांनी जे काही सांगितले आहे ते केवळ एक पोपटपंची करणारा या नात्याने लिहिण्याचा प्रयत्न करतो. खरेतर ज्या पद्धतीने शरीर कसे कमवावे हे केवळ एखाद्या मल्लाने किंवा पैलवानाने लिहिले पाहिजे व त्या गोष्टीला मी पूर्णपणे
छेद देत आहे त्याबद्दल क्षमस्व. या लिखाणामध्ये माझी स्वतःची कणभर देखील पात्रता नाहीये हे लक्षात सुरुवातीलाच घ्यावे.
असो तर,
आपण बऱ्याच वेळेला ध्यानाला बसणे किंवा ध्यान लावणे किंवा मेडिटेशन करणे या गोष्टी ऐकत असतो
गुमनामी बाबा-२ #netaji #नेताजी
1985 साल:
उत्तर प्रदेशमधील गुफ्तार घाट येथे फक्त मोजक्या माणसांच्या उपस्थिती मध्ये एक अंतिम संस्कार चालू होता. हा घाट भगवान श्रीराम यांच्या समाधी साठी देखील प्रसिद्ध आहे. भगवान श्रीराम यांनी या घाटाला जवळच जलसमाधी घेतली असे मानले जाते, त्यामुळे या
प्रभु श्रीराम यांचे मंदिर आहे व या जागेला धार्मिक दृष्ट्या एक महत्त्वदेखील आहे.
तो एरिया मिलिटरीच्या अंडर असल्यामुळे कोणत्याही परमिशन शिवाय पटापट हे अंतिम संस्कार उरकले गेले. कोणालाही याबद्दल माहित नव्हते व हे अचानक झालेले अंतिम संस्कारां नंतर
व्यक्तीची खोली उघडण्यात आली. आणि त्यानंतर जो काही गजहब आणि गोंधळ उडाला.
सात हजार पेक्षा जास्त गोष्टी त्या बंद खोली मधून घेण्यात आल्या. त्याचे एक छोटेसे सॅम्पल मी खाली फोटो मध्ये देणार आहे. त्यामध्ये हजारो पत्र व कागदपत्रे, मिलिट्री मध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्बिणी, गोल भिंगाचे
त्या संध्याकाळी तो एकटाच नदीच्या किनारी जाऊन झाडाला टेकून बसला होता. नेहमी मित्रांच्यात प्रचंड खेळणारा व दिवसभर दंगा करणारा तो शांतपणे कसलातरी गहन विचार करत होता. प्रचंड मोठ्या घडामोडी होणार होत्या त्याच्या केवळ एका निर्णयामुळे.
गेल्या काही दिवसातील घडलेल्या प्रसंगामुळे व एकूणच लहानपणापासून घडत आलेल्या गोष्टी यामुळे आपण नक्कीच वेगळे आहोत याची जाणीव त्याला होती. परंतु त्यावर त्याने कधी विचार केलेला नव्हता. आपले सवंगडी आपल्या गावातील लोक यांच्या प्रचंड प्रेमामुळे त्याला बहुदा हा विचार करण्यासाठी वेळच
मिळाला नव्हता. आपण केवळ त्यांच्यासाठी आहोत हेच भावना त्याच्या मनामध्ये होती.
परंतु आज वेळच अशी आलेली होती. त्याच्या एका निर्णयामुळे त्याचे स्वतःचे व आजुबाजू ला असणाऱ्या लोकांचे आयुष्य बदलणार होते कायमचे.
प्रसंग 1:
भोपाळमध्ये गॅस दुर्घटना झाली. प्रचंड लोक मृत्युमुखी पडले. अनेक घरे उद्ध्वस्त झाली. पण काही घरे अशी होती ज्यांच्या आजूबाजूला प्रचंड मनुष्यहानी झालेली होती पण त्या घरांना धक्का देखील लागलेला नव्हता. ना त्या घरातील लोकांना त्रास झाला.
या घटनेनंतर लवकरच
प्रणग 2:
रशियामधील चरनोबिल येथे अनुभट्टी चा स्फोट झाला व त्याचे रेडिएशन अगदी पोलांड पर्यंत येऊन पोहोचले. परंतु पोलंडमध्ये काही अत्यंत छोटी गावे अशी सापडली ज्यामध्ये आश्चर्यकारकरीत्या कोणत्याही किरणोत्सर्गाचा टच देखील झालेला नव्हता. ना तेथील गवतामध्ये
किरणोत्सर्ग आढळून आले शेतामध्ये ना पशूंमध्ये.
वरील दोन्ही घटनांमध्ये जी घरे नित्यनेमाने अग्निहोत्र करीत होते त्यांची घरे या हल्ल्यापासून वाचलेली होती. हो, पोलंडमध्ये देखील त्या गावांमध्ये काही घरांमध्ये नियमित अग्निहोत्र चालू होते.