माझी चौथीची परीक्षा संपली. मे महिन्याच्या सुट्ट्या चालू झाल्या. आई बाबा म्हणाले होते कुठेतरी फिरायला जायचे आहे. कोठे ते काहीच सांगितले नव्हते मला. सुट्टी
लागल्यावर तीन-चार दिवसांनीच सकाळी सहा वाजताच आंबेसेटर दाराशी आली. बाबांच मित्राची गाडी होते व तोच ते गाडी चालवणार होता.
आम्ही निघालो. मी विचारत होतो कुठे जातोय. आई म्हणाली, "आपण गोव्याला फिरायला चाललो आहोत."
मी असला खुश झालो. पण आधी का मला सांगितले नाही म्हणून वादही घातला.
गोव्याला आम्ही साधारण संध्याकाळी सहाला वगैरे पोहोचलो. मला आता सगळी नावे आठवत नाहीत. परंतु एका मस्त हॉटेलमध्ये बाबा आणि बाबांचा मित्र असे
दोघे हॉटेलमध्ये रूम ची चौकशी करायला गेले. ते हॉटेल बीच वरच होते. मी आणि आई हॉटेल बाहेरील त्या बीच वरील वाळूतच असलेल्या एका बेंच वर बसलो बाबांची वाट बघत. तेवढ्यात एक फॉरेनर बाई समुद्रामधून आंघोळ वगैरे करून तिच्या कमी कपड्यांमध्ये ( बिकिनी
घातली होती तिने) त्याच बेंच वर माझ्या शेजारी येऊन बसली. अशाप्रकारे इतक्या कमी कपड्यांमध्ये कोणत्याही स्त्रीला मी पहिल्यांदाच बघत होतो. त्यात इतकी गोरी मुलगी. फुल कौतुकाने आणि मजे ने मी तिच्याकडे बघत बसलो. पहिल्यांदाच गोरी बाई बघत होतो तीदेखील अशी ...त्यामुळे 😂😂.
आईचे लक्ष गेले मग तिने माझ्याकडे असे काही रागाने बघितलेले आहे, आणि त्या फॉरेनर बाईकडे पण 😂😂😂. मला लगेच तिथून उठायला सांगून दुसऱ्या बाजूला बसायला सांगितले आईने. मी तसा हिरमुसलेला होऊनच दुसऱ्या बाजूला बसलो 😂😂.
तर अशा पद्धतीने गोव्याची ही पहिलीच ओळख झाली होती.
जास्त दिवस आम्ही नव्हतो तिकडे. तीन रात्री गोव्यामध्ये व एक रात्र पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या मठामध्ये राहणार होतो. पहिल्या दोन रात्री एकदम मस्त हॉटेल होते. मला जाम आवडले. इकडे तिकडे फिरलो.
चर्च वगैरे बघितल्याचे माझ्या लक्षात आहे. एक म्युझियम देखील बघितले होते आम्ही. काही देवळे व समुद्रकिनारे.
तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही कोलवा बीचला गेलो. आजूबाजूला बरीच हॉटेल्स बघितली. परंतु एप्रिल महिन्यांमधील दिवस असल्यामुळे सर्वत्र लॉज आणि
हॉटेल्स फूल होती. शेवटी अगदी अंधार पडण्याच्या वेळेला कोलवा बीच ला लागूनच एक हॉटेल होते त्यामध्ये काही रूम्स शिल्लक होत्या. मी आणि माझी बहीण आणि दोघेही जण दिवसभराच्या प्रवासाने वैतागलेले होतो. कधी रूम मध्ये जातो आणि थोडावेळ विश्रांती घेऊन समोरच बीचवर जातोय असे झाले होते.
तेथील नोकर आमच्या बॅगा घेऊन आम्हाला आमच्या खोलीकडे नेण्यास निघाला. जाताना जे कॉरिडोर लागले तिथे मला विचित्र वाटू लागले. एक थंडपणा, विचित्र प्रकारचा गंध, आणि काहीतरी विचित्र जे शब्दात सांगता येऊ शकत नाही.
मी आईला म्हणालो मला इथे स्मशानात झाल्यासारखे वाटते आहे. आई म्हणाली, "गप्प बस उगाचच काहीही बडबडू नकोस. "
त्याच्या पूर्वी मी कधी स्मशानात गेलो नव्हतो. पण मला तिथे प्रचंड विचित्र वाटत होते म्हणून मी आईला हे वाक्य म्हणाल्याचे माझ्या पूर्ण लक्षात आहे.
व माझ्या आईच्या देखील ते बरोबर लक्षात आहे.
रूम मध्ये गेल्यावर आम्ही फ्रेश झालो व समुद्रावर गेलो. बाबा व त्यांचा मित्र पोहोले व त्यानंतर हॉटेलवर गेले कपडे बदलण्याकरिता. मी, अनु आणि आई वाट बघत बसलो बाबा केव्हा येतात ते. बाबा जाऊन जवळपास तास सव्वा तास झाला
तरी त्यांचा पत्ता नव्हता. आमच्या पोटात आता कावळे ओरडायला लागले होते. तेवढाच बाबा आले.
मग हे समजले की बाबा आंघोळीला गेलेले असताना त्या रूममधील पंखा बंद पडला. ते दिवस मे महिन्या मधले असल्यामुळे पंख्या शिवाय रूम मध्ये राहणे शक्यच नव्हते.
त्यामुळे बाबांनी रूम चेंज करायला सांगितली. त्यावेळेला तो मालक एक रूम द्यायला लागला. परंतु तो पाहिला आमचे सामान नेणारा नोकर होता त्याचे आणि मालकाचे काहीतरी वाजले. कोकणी भाषेमध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी वादावादी चालू होती.
चिडलेला तो नोकर शेवटी बाबांना म्हणाला की दुसरा रूम मध्ये
तुम्हाला शिफ्ट करतो. अशाप्रकारे दुसरी रूम आम्हाला मिळाली होती. हे सर्व स्टोरी ऐकल्यावर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवणा करता गेलो.
आम्ही जेवण वगैरे केले. आता रूमवर जाण्यास निघालो. बघतोय तर काय ज्या कॉरिडॉरमध्ये मला ते घाणेरडे फिलिंग येत होते त्याच जागी असलेली रूम आम्हाला मिळाली होती.
मी तसा नाराजीनेच रूम मध्ये गेलो. परत एकदा मी आईला तेच म्हणालो. येथे मला अजिबात आवडले नाही एकदम विचित्र आहे हे हॉटेल. परंतु आई म्हणाली आपले कालचे हॉटेल खूपच जास्त चांगले होते ना म्हणून तुला असे वाटत असेल.
मी आणि अनु गेल्याबरोबर काही वेळातच गाढ झोपलो
आई बाबा काही वेळ जागे होते हिशोब मांडण्या करता. एकूण दोन-तीन दिवसात किती खर्च झाला आहे वगैरे वगैरे. त्यानंतर ते देखील झोपले.
बाबा:
रात्री साधारण एक च्या सुमारास हिने मला उठवले. तिला झोप लागत नव्हते असे म्हणाली. मग अग तिला एक एलर्जी ची गोळी दिली आणि आम्ही नेहमी
आमच्याबरोबर साईबाबांचा अंगारा आणतो तो उशाशी ठेवला. पुढे पाच मिनिटातच तिला झोप लागली. आता माझी झोप उडाली होती का कुणास ठाऊक.
विचार करत पडलो होतो. दोन दिवस छान गेले हे विचार मनात होते. मयूर आणि अनु दोघेही खुश होते. ही रूम तसे बेताचीच होती. मयुर ला काही हे हॉटेल फारसे
आवडलेले दिसले नाही. दुसरीकडे कुठेच रुमस शिल्लक नव्हत्या. परंतु फक्त एक रात्र काढायची आहे त्यामुळे ठीक होते. रुमला एक दरवाजा होता ज्याच्या बाहेर गॅलरी होती. गॅलरी च्या बाजूने वरती जाणारा जिना होता.
एक मोठी काचेची खिडकी होती. बऱ्यापैकी रुंद, चार
फूट वगैरे. तिला गज वगैरे काहीही नव्हते. खिडकीच्या वर एक रुंद असा काचेचा झरोका होता. मागील बाजूला समुद्राची वाळू व लांबवर सुरूचे बन होते. सुरूचे बन आणि गॅलरी या मध्ये तशी खूप मोठी गॅप जेथे फक्त वाळूची पुळण होती.
अचानक माझं लक्ष त्यात खिडकी वर असणाऱ्या मोठ्या झरोक्या कडे गेले. बाहेरील बाजूला वाळूमध्ये स्ट्रीट लॅम्प होता. त्याचा पुरेसा प्रकाश खिडकी व त्याच्यावरील झरोक्यावर पडत होता.
आणि अचानक तेथे काहीतरी हलताना दिसले. मी पटकन सावध झालो. की नक्की त्या काचेवरून
फिरताना काय दिसत आहे. आणि तो एक हाताचा पंजा होता. जो त्या काचेच्या अगदी जवळून फिरत होता. आधी वाटले की बहुदा झाडाची सावली वगैरे असू शकेल. परंतु तो स्ट्रेट लांब आणि ती खिडकी ची काच यामध्ये कोणते झाड किंवा काहीच नव्हते. आणि ती सावलीही वाटत नव्हती. नक्की काय आहे ते दोन मिनिटं
निरीक्षण करून मग ठरवू असे मनाशीच म्हणालॉ.
ते सावली नव्हते तर हाताचा पंजा फक्त डाव्या बाजूने उजव्या बाजू पर्यंत फिरायचा. आधी मनात आले की कोणी चोर वगैरे नाही ना. कारण झोपण्याआधी मी आणि ही एकंदरीतच पैसे व त्याचा हिशोब बोलत त्यानंतर झोपलो.
त्यावेळेला बाहेरून जिन्यावरुन कोणी ऐकले असेल तर???
किंवा कोणीतरी चेष्टा करीत असावे उगीचच घबरवण्याकर्ता जिन्यावरून. पण खिडकी खूप मोठे होती. जिन्यावरून जर का कोणी असे चाळे करत असेल तर तो हात उतरता जाईल. जिन्या मुळे. आणि खिडकीचा झरोका बऱ्यापैकी उंचावर होता.
सर्व प्रकारचे तर्क मी लावण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणताच सुसंगत बसत नव्हता. साधारण दर अर्ध्या मिनिटानंतर तो पण ज्या फक्त डावीकडून उजवीकडे फिरायचा. पण उजव्या बाजूने डावीकडे कधीच
फिरलेला दिसला नाही. मला आता खरोखरच काळजी वाटू लागली होती की हे नक्की काय आहे. मग शेवटी मी तिला उठवण्याचे ठरवले.
आई:
मला झोप लागत नव्हती त्या दिवशी रात्री. मग शेवटी ह्यांना उठवले. त्याने एलर्जी एक छोटी गोळी दिली व साईबाबांचा अंगारा माझ्या उषा खाली ठेवला. त्यानंतर अगदी लगेच माझा डोळा लागला.
मी झोपल्यानंतर वीसेक मिनीटातच हे मला उठवत होते. हे कधी मला असे उठवत नाहीत. मी उठल्यावर बघितले तर ते मला उठवत जरी असले तरी त्यांचे लक्ष खिडकीवरील झरोक्याकडे होते. झोपेतून उठल्या बरोबर त्यांना तसे तिकडे बघताना पाहूनच एक थंड शिशारी अंगामधून गेल्यासारखी वाटली.
काहीतरी नक्कीच घडलेले आहे. एका क्षणामध्ये मेंदूने अलर्ट दिला होता.
हे मला म्हणाले, " ते बघ काय आहे तिकडे".
माझे बघण्याची हिंमत होईना. आधी मला वाटले हे उगाचच मला घाबरवत आहेत की काय.
पण ते परत म्हणाले तिकडे बघ त्या झरोक्यामधून हात दिसतो आहे बाहेर हलताना..
मी कसेबसे तिकडे वळून बघितले. वर झरोक्यामध्ये काहीच नव्हते. फक्त बाहेरून येणारा ट्यूबलाइट चा प्रकाश.
आणि अचानक सर्रकन डावीकडून उजवीकडे एक हाताचा पंजा जाताना दिसला. ती सावली नक्कीच नव्हते. जाग्यावरच मी थिजले. आमच्या दोघांच्या मध्ये मयूर आणि अनु झोपलेले होते.
बाहेर चोर वगैरे आले असतील तर काय करायचे या कल्पनेने माझ्या घशाला कोरड पडली.
दबक्या आवाजात मी म्हणाले, " हे काय आहे आणि कोण आहे? चोर आलेले आहेत की काय?
कारण महाडच्या आमच्या घरामध्ये नुकतेच काही महिन्यांपूर्वी चोर येऊन गेले होते
तो अनुभव अत्यंत भयप्रद होता.
हे म्हणाले, "हे कोणी चोर किंवा माणूस वाटत नाहीये".
हे ऐकल्यानंतर मी अजूनच घाबरले.
तेवढ्यात बालकनी मधला लाईट चालू झाला. आम्ही दोघे बेडवर दचकलो होतो अचानक लाईट चालू झाल्यामुळे. त्या लाईटचे एक बटन बाल्कनीमध्ये होते व एक आत मध्ये. हे झोपले होते
त्यांच्याच बाजूला बेड जवळ.
यांनी तो लाईट आतील बटणाने बंद केला.
मी यांना दबक्या म्हणाले हा नक्की काय प्रकार आहे इथे रात्रभर कसे थांबायचे? बाहेर चोर असतील तर काय करणार? सुरे वगैरे घेऊन ते आरामात आत मध्ये येऊ शकतात कारण खिडकीला गज देखील नाहीयेत.
वरचा झरोका देखील अर्धवट उघड आहे त्याला देखील गज नाही आहेत. काय करायचे?
तेवढ्यात बाहेरचा गॅलरीमध्ये लाईट परत लागला.
आम्ही दोघांनी एकमेकाकडे दचकून बघितले. मी तर पूर्णपणे घाबरलेली होते.
यावेळेला यांनी तो लाईट बंद केला नाही.
हे म्हणाले, " मी बाथरूममधून जी खिडकी आहे त्यातून
बघतो कारण तेथून गॅलरी स्पष्ट दिसते." कारण बाथरूम त्याच बाजूला होते.
हे तिघांना सोडून बाथरूममध्ये गेले आणि समजा कोणी बाहेरून आत आले तर काय करायचे? मी ठामपणे नाही म्हणून सांगितले.
तो हात पंजा मधूनच दिसत होता. माझे लक्ष हाताच्या
पंजाकडे देखील होते व आता लाइट लागला आहे इकडे देखील.
कानामध्ये जीव आणून गॅलरीमध्ये कोणी आहे का याचा कानोसा घेण्याचा देखील प्रयत्न चालू होता दोघांचा. परंतु कोणत्याही प्रकारचा पावलांचा किंवा कोणीही असल्याची चाहूल यत्किंचितही नव्हती.
मी वरती झरोक्या कडे बघितले. आता परत एकदा हात फिरेल या अपेक्षेने.
आणि तेथून एक मुंडक यासारखा आकार डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे गेला. माझ्या तोंडामधून एक अस्पष्ट किंचाळी बाहेर आली. यांनी माझ्याकडे बघितले कि काय झाले?
,मी झरोक्या कडे बोट दाखवून त्यांना हळू आवाजात म्हणाले की आत्ता तेथून हात नाही तर एक मुंडकं गेलं. आम्ही दोघं झरोक्या कडे बघत बसलो.
आता तेथून यांनादेखील मुंडक यासारखा आकार डावीकडून उजवीकडे जाताना दिसला. आता इतक्या उंचावरून मुंडके हलवणे तर शक्यच नव्हते ते देखील
कोणी चाळे करत असले तरीदेखील त्यामुळे त्याला पकडणारा हात किंवा काठी काहीतरी दिसणे गरजेचे होते.
हे बेडवरून उठले.
मी अस्वस्थ होऊन प्रचंड भीतीने त्यांना म्हणाले, " आहो काय करताय? "
हे म्हणाले, "मी बाथरूम मधून बघून येतो, नक्की काय चालू आहे ते."
मी यांना काहीही बोलायच्या आत ते बाथरूमच्या दिशेने गेले. आता मात्र मला काहीही सूचेना. मी रामाचा जप चालू केला होता. सतत खिडकीकडे व गॅलरीतील दरवाजा कडे लक्ष होते.
प्रत्येक सेकंद अक्षरशः मिनिटं सारखा वाटत होता.
हे एखाद दीड मिनिटातच बाथरूम मधून परत आले असतील. परंतु तेवढा कालावधी देखील कैक मिनिटे होऊन गेल्यासारखा वाटत होता.
हे म्हणाले, "बाहेर काहीही नाहीये. गॅलरी मध्ये देखील कोणीही नाही."
एव्हाना साधारण दोन वाजत आले होते.
आता करायचे काय हा मोठा प्रश्न. आणि जे काही आहे ते मानवी नाही याची जवळपास खात्री आम्हाला दोघांनाही पटली होती. आम्ही दोघांनी मग देवादिकांच्या गोष्टी करण्याचे ठरवले. आपण गोव्यामधील कोण कोणते मंदिर बघितले त्याचप्रमाणे साईबाबांचे वगैरे
अनुभव या सगळ्या गोष्टींवर चर्चा करत बसू या असे आम्ही दोघांनी ठरवले. आम्ही ट्यूब लावली होती. म्हणजे जर का कोणी माणूस असेलच तर आम्ही जागे आहोत हे समजण्या करता.
मधूनच गॅलरी लाईट बंद होता व लागत होता. हा प्रकार साधारण तीन वाजेपर्यंत चालला.
रात्र कधी जमते व कधी पहाट होते याची आम्ही इतकी वेड्यासारखी वाट बघत होतो.
आता आता हात व मुंडके हे देखील जवळपास थांबले होते.
आम्ही दोघे देखील थोडे रिलॅक्स झाल्यासारखे वाटत होते.
आणि साधारण चारच्या सुमारास मेन डोअर ची आतली कडी जोरात खाडकन वाजली.
आम्ही दोघे परत इतके दचकलो. काय करायचे काहीही कळेना. बरं हे दोन पोरं अगदी आरामात झोपले होते.
साधारण दहा साडेचार वाजले आणि वरच्या रूम मध्ये राहणाऱ्यांचा उठल्या चां आवाज आला. तो आवाज ऐकून जीवात जीव आला.
मी:
खरेतर त्यादिवशी निवांत जायचे सकाळी असे ठरले होते. कारण सलग दोन दिवस आम्ही लवकर उठून फिरायला जात होतो.
पण पाच साडेपाच वाजताच आईने मला आणि अनुला उठवले. तिची इतकी घाई चालू होती. आम्हाला दोघांना तिथे दात पण घासू दिले नाहीत.
आम्ही दोघेही झोपेतच होतो. आमच्या सगळ्या वस्तू घेतल्या आणि साधारण पावणे सहा वाजता आम्ही गाडीत जाऊन बसलो.
बाबा पैसे वगैरे देऊन साधारण पंधरा मिनिटात आले व आम्ही पावस कडे रवाना झालो.
त्या दिवसानंतर पुढे कितीतरी दिवस बाबा मला हाक मारून फक्त हाताचा पंजा माझ्यासमोर उगाच
हलवायचे. त्यांविषयी गाडीत पण त्यांनी तसे केले.
आई असली वैतागली आहे बाबांवर. उगाचच काहीपण काय दाखवत बसत आहे मुलांना?
काहीतरी सिक्रेट आहे म्हणून मी खोदून खोदून विचारत होतो काय झालं काय झालं?? पण तेव्हा काही उत्तर मिळाले नाही.
असंच मजा करत आहे असं बाबांनी सांगितलं. अर्थात माझ्या मनाचे समाधान झाले नव्हते.
त्यानंतर सहावीमध्ये असताना आईने मला सांगितले की काय घडले होते. ते ऐकून तर मी पूर्ण चक्रावलो. मी आईला म्हणालो बघ मी त्यादिवशी सांगितले होते की मला तिथे स्मशानात सारखा वाटतंय आणि नेमकी त्याच खोलीमध्ये
आपल्याला टाकलं. आपली पहिली खोली पण बदलली.
आई म्हणाली सकाळी बाबांनी त्या नोकराला बाजूला घेतले होते. आदल्या दिवशी बाबांना ती रूम देताना त्याने मालकाबरोबर जो वाद घातला होता तो काय आणि रात्रभर काय त्रास झाला आहे हे त्याला बाबांनी सांगितले. त्या मॅनेजरला देखील बाबांनी खुप झाडल.
परंतु मॅनेजर कडून फक्त सॉरी आणि असे का झाले याचे कारण माहित नाही इतकेच झाले.
म्हणून मग बाबांनी तो नोकर दिसल्यावर त्याला बाजूला बोलावून घेतले व त्याला खोदून हा प्रकार नक्की काय आहे ते विचारले. बरोबर बाबांचा मित्र देखील होताच त्याने तर त्याला धमकीच दिली.
तेव्हा त्या नोकराने
सांगितले.
साधारण साडेतीन ते चार महिन्यांपूर्वी त्या खोलीमध्ये एका मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला होता. त्यानंतर काही लोक त्या रूममध्ये राहिले त्यांना प्रचंड त्रास झाले. दोन तीन जणांनी तर रात्रीच ती रूम सोडली. हल्ली शक्यतोवर आम्ही ती रूम कोणालाही देत नाही.
त्यात तुमच्या बरोबर दोन लहान मुले होते त्यामुळे मी मालकाला काल ती रूम का देत आहात म्हणून विचारत होतो. त्यावरच मी त्याच्याशी हुज्जत घालत होतो.
हे कारणदेखील बाबांनी आईला आम्ही महाडला गेल्यानंतर सांगितले. व मला ते मी सहावीत असताना समजले.
तर लक्षात ठेवा कोलवा बीच वरील ते हॉटेल आणि ती रूम आणि तेथून हलत जाणारा पंजा.
हे लेख लिहिणे यामागे कोणावरही टीका किंवा कोणावरही आक्षेप घेणे हा उद्देश नाहीये तर सत्य काय होते हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न आहे. स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन करणारे, पहिली आर्मी स्थापन करणारे, पहिले चलन काढणारे, पहिला ध्वज असलेले
असलेले सरकार म्हणजे नेताजी.
नेताजी सुभाष चंद्र बोस त्यांच्या गूढ मृत्यूबाबत आपण पर्याय निवडून काढले तर ते 3 निघतात. 1. विमान दुर्घटना (सरकारी मान्यता ) 2. रशियामधील मृत्यू 3. गुमनामी बाबा
आपण आता जे 3 ऑप्शन आहेत ते क्रमाक्रमाने बघणार आहोत. त्यातील पहिली शक्यता व ज्याला सरकारने
मान्यता दिलेली आहे ते version बघू.
ते म्हणजे नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात झाला.
अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून दुसरे महायुद्ध संपवले होते. येत्या काही दिवसात जपानच्या शरणागतीची तयारी चालू होती. सिंगापूर मध्ये हेड क्वार्टर्स किंवा हेड ऑफिस असलेल्या INA मध्ये देखील
बऱ्याच जणांसाठी हा लेख म्हणजे अत्यंत जहाल जळजळीत असे रसायन असू शकेल त्यामुळे वाचायच्या आधीच विचार करा.
उत्क्रांतीवाद या वरती केलेले बरेच पेपर आणि डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत.
त्याचप्रमाणे ज्यांना वैद्यकशास्त्र कळते किंवा स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर व मन काय पद्धतीने बनले आहे हे कळते या लोकांशी देखील तुम्ही या विषयी प्रामाणिकपणे बोलून बघा. याची देखील गरज नाही जर का तुम्ही खरोखर स्वतःच्या आत मध्ये खोलवर शिरून गोष्टी बघू शकतात तर....
मुळामध्ये सेक्स हे गोष्ट अति प्रचंड महत्त्व देऊन उदात्त केले गेलेली गोष्ट आहे. खरेतर एक सर्वसाधारण शारीरिक गरज इतकेच त्याचे महत्त्व असायला हवे. परंतु ते कोणाबरोबर केले गेले तर पवित्र कोणाबरोबर केले गेले तर अपवित्र याबद्दल हजारो वर्षे आपल्या डोक्यामध्ये गोष्टी कोंबण्यात आलेले आहेत
गेल्या काही महिन्यांमध्ये ध्यानाविषयी काहीतरी लिही असे बऱ्याच जणांनी सांगितले परंतु मी अशा विषयावर लिहिण्यास पात्र आहे का हे मला माहीत नव्हते. आणि अर्थातच अजूनही मी त्याला पात्र नाही हे मला ठाऊक आहे. मी स्वतः हल्ली काहीच करत नाही त्यामुळे मला या विषयावर लिहिण्याचा
किंवा बोलण्याचा काय हक्क. तरीदेखील अनुभवी संत आणि आत्मसाक्षात्कार लोकांनी जे काही सांगितले आहे ते केवळ एक पोपटपंची करणारा या नात्याने लिहिण्याचा प्रयत्न करतो. खरेतर ज्या पद्धतीने शरीर कसे कमवावे हे केवळ एखाद्या मल्लाने किंवा पैलवानाने लिहिले पाहिजे व त्या गोष्टीला मी पूर्णपणे
छेद देत आहे त्याबद्दल क्षमस्व. या लिखाणामध्ये माझी स्वतःची कणभर देखील पात्रता नाहीये हे लक्षात सुरुवातीलाच घ्यावे.
असो तर,
आपण बऱ्याच वेळेला ध्यानाला बसणे किंवा ध्यान लावणे किंवा मेडिटेशन करणे या गोष्टी ऐकत असतो
गुमनामी बाबा-२ #netaji #नेताजी
1985 साल:
उत्तर प्रदेशमधील गुफ्तार घाट येथे फक्त मोजक्या माणसांच्या उपस्थिती मध्ये एक अंतिम संस्कार चालू होता. हा घाट भगवान श्रीराम यांच्या समाधी साठी देखील प्रसिद्ध आहे. भगवान श्रीराम यांनी या घाटाला जवळच जलसमाधी घेतली असे मानले जाते, त्यामुळे या
प्रभु श्रीराम यांचे मंदिर आहे व या जागेला धार्मिक दृष्ट्या एक महत्त्वदेखील आहे.
तो एरिया मिलिटरीच्या अंडर असल्यामुळे कोणत्याही परमिशन शिवाय पटापट हे अंतिम संस्कार उरकले गेले. कोणालाही याबद्दल माहित नव्हते व हे अचानक झालेले अंतिम संस्कारां नंतर
व्यक्तीची खोली उघडण्यात आली. आणि त्यानंतर जो काही गजहब आणि गोंधळ उडाला.
सात हजार पेक्षा जास्त गोष्टी त्या बंद खोली मधून घेण्यात आल्या. त्याचे एक छोटेसे सॅम्पल मी खाली फोटो मध्ये देणार आहे. त्यामध्ये हजारो पत्र व कागदपत्रे, मिलिट्री मध्ये वापरल्या जाणाऱ्या दुर्बिणी, गोल भिंगाचे
त्या संध्याकाळी तो एकटाच नदीच्या किनारी जाऊन झाडाला टेकून बसला होता. नेहमी मित्रांच्यात प्रचंड खेळणारा व दिवसभर दंगा करणारा तो शांतपणे कसलातरी गहन विचार करत होता. प्रचंड मोठ्या घडामोडी होणार होत्या त्याच्या केवळ एका निर्णयामुळे.
गेल्या काही दिवसातील घडलेल्या प्रसंगामुळे व एकूणच लहानपणापासून घडत आलेल्या गोष्टी यामुळे आपण नक्कीच वेगळे आहोत याची जाणीव त्याला होती. परंतु त्यावर त्याने कधी विचार केलेला नव्हता. आपले सवंगडी आपल्या गावातील लोक यांच्या प्रचंड प्रेमामुळे त्याला बहुदा हा विचार करण्यासाठी वेळच
मिळाला नव्हता. आपण केवळ त्यांच्यासाठी आहोत हेच भावना त्याच्या मनामध्ये होती.
परंतु आज वेळच अशी आलेली होती. त्याच्या एका निर्णयामुळे त्याचे स्वतःचे व आजुबाजू ला असणाऱ्या लोकांचे आयुष्य बदलणार होते कायमचे.
प्रसंग 1:
भोपाळमध्ये गॅस दुर्घटना झाली. प्रचंड लोक मृत्युमुखी पडले. अनेक घरे उद्ध्वस्त झाली. पण काही घरे अशी होती ज्यांच्या आजूबाजूला प्रचंड मनुष्यहानी झालेली होती पण त्या घरांना धक्का देखील लागलेला नव्हता. ना त्या घरातील लोकांना त्रास झाला.
या घटनेनंतर लवकरच
प्रणग 2:
रशियामधील चरनोबिल येथे अनुभट्टी चा स्फोट झाला व त्याचे रेडिएशन अगदी पोलांड पर्यंत येऊन पोहोचले. परंतु पोलंडमध्ये काही अत्यंत छोटी गावे अशी सापडली ज्यामध्ये आश्चर्यकारकरीत्या कोणत्याही किरणोत्सर्गाचा टच देखील झालेला नव्हता. ना तेथील गवतामध्ये
किरणोत्सर्ग आढळून आले शेतामध्ये ना पशूंमध्ये.
वरील दोन्ही घटनांमध्ये जी घरे नित्यनेमाने अग्निहोत्र करीत होते त्यांची घरे या हल्ल्यापासून वाचलेली होती. हो, पोलंडमध्ये देखील त्या गावांमध्ये काही घरांमध्ये नियमित अग्निहोत्र चालू होते.