नेताजी यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी देशांमध्ये पोहोचली होती. सर्व देशावर दुःखाची छाया पसरली होती. काही लोकांमध्ये शंका-कुशंका नेताजींचा मृत्यू या बाबत उलट सुलट चर्चा चालू होत्या.
परंतु त्यावर कोणताही राजकीय विचार किंवा ॲक्शन अशी गोष्ट नव्हती कारण नेताजींचा मृत्यू झालेला आहे हे मान्य करण्यात आले होते.
सर्वात पहिल्यांदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूवर काम करण्यास अमेरिकेने चालू केले. कारण नेताजींच्या मृत्युचा एकही स्पष्ट पुरावा कोणा समोरच नव्हता
त्यांचे मृत शरीर कोणाच्याही हाती लागले नाही किंवा त्यांच्या मृत शरीराचा फोटो कुठेही नव्हता किंवा त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल कोठेही नव्हता. अशाप्रकारे डायरेक्ट लिंक असलेला कोणताच पुरावा त्याबाबत उपलब्ध झाला नाही त्यामुळे अमेरिका व इंग्लंड या बाबत साशंक होती. नेताजींचा मृत्यू
देहाचा फोटो म्हणून जपान ने जो फोटो जगासमोर दाखवला त्या फोटोत पूर्ण मृतदेह झाकलेला आहे. व तो एकमेव व फोटो त्यांचा मृत्यू म्हणून उपलब्ध आहे. व ज्या दिवशी एक्सीडेंट झाला त्यानंतर जपानने तेथेच त्यांचे क्रियाविधि केले व त्यांच्या अस्थी जपानमध्ये नेण्यात
आल्या असे जपान सरकारने जाहीर केले. व तेदेखील तेवीस तारखेला म्हणजे मृत्यूनंतर तब्बल पाच दिवसांनी. यातील बऱ्याच गोष्टींमुळे इंग्रज व अमेरिकेचा नेताजींचा मृत्यू झाला आहे या गोष्टीवर विश्वास नव्हता व त्या दृष्टीने त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती.
1945 मध्ये तत्कालीन
इंग्रज सरकारने दिल्लीमध्ये आत्ता जे मिलेटरी ऑफिस आहे त्याठिकाणी आपल्या सर्व बेस्ट अधिकाऱ्यांना घेऊन एक शोध समिती स्थापन केली. डब्ल्यू. डेकोईट हा त्याचा हेड होता. फिनी, रायबहादूर बक्षी, बद्रीनाथ असे त्या जमान्यातील इंटेलिजन्स ब्युरो चे मोठे नावाजलेल्या अधिकारी या
चौकशी वर काम करत होते. त्याने सर्वत्र जाऊन याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये व सिंगापूर मध्ये परंतु त्यांच्या नजरेस हे येऊ लागले की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची बातमी खोटी आहे त्यावेळी त्यांनी मदतीसाठी अमेरिकेला विचारले. कारण अमेरिकेने इंग्लंडच्या आधी यावर काम
चालू केले होते व त्यांनी नेताजींचा सर्वात जवळचा साथीदार रहमान याला पकडून त्याची चौकशी आधीच केलेली होती.
इंग्लंडने अमेरिकेला याबाबत त्यांचा अहवाल काय आहे हे विचारले. त्यावर अमेरिका डिव्हिजन म्हणजेच आत्ताच्या पेंटॅगॉन ने दिलेल्या अहवालात हे स्पष्ट
सांगितलेले आहे की कोणतेही डायरेक्ट प्रूफ नेताजींचा मृत्यू दाखवीत नाही. सर्व गोष्टी केवळ ऐकीव आहेत. प्रत्यक्ष दर्शी पुरावा नाही.
नेताजींचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी झाला. त्यानंतर पंडितजींनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती 30ऑगस्ट 1945 रोजी.
त्यावेळेला आल्फ्रेड wagg या अमेरिकन आर्मी बरोबर असलेल्या रिपोर्टरने पंडितजींना विचारले की चार दिवसांपूर्वी नेताजींना सयगोन येथे जिवंत पाहिलेले आहे यावर तुमचे काय मत आहे. त्यावर पंडितजींनी आश्चर्य दर्शवले व याबाबत त्यांना पहिल्यांदाच समजते आहे असे सांगितले.
महात्मा गांधींच्या यावर कधीही विश्वास नव्हता. महात्मा गांधी यांनी पब्लिकली सुभाष जिवंत आहे या बद्दल अनेकदा बोललेले आढळते. "मला जरी सुभाष ची कोणी राख आणून दाखवली तरीदेखील मी विश्वास ठेवणार नाही की सुभाष मृत झाला आहे" .
6 जानेवारी 1946 मध्ये न्यूयॉर्क टाईम ने देखील बातमी छापली होती, गांधीजींचा सुभाषच्या मृत्यू वर विश्वास नाही, त्यांचा हा विश्वास आहे की सुभाषचंद्र बोस हे अजून जिवंत आहेत व पुढील तयारी करीत आहेत व योग्य वेळेची वाट बघत आहेत.
अर्थात या सर्व गोष्टी झाल्या या सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यू नंतर लगेच घडलेल्या. परंतु 1956मध्ये सुभाष चंद्र बोस यांच्या गुढ मृत्यूबाबत पहिली चौकशी समिती नेमली गेली ती म्हणजे शहानवाज समिती. त्यामधील काही इंटरेस्टिंग आणि विवादात्मक लोकांच्या मुलाखती कडे आपण बघू.
ज्यामध्ये मुख्यतः असे लोक होते ज्यांनी स्वतः तो अपघात बघितला होता व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू देखील.
एखादी व्यक्ती मृत झाल्यावर त्याचे मृत्यूचे प्रमाणपत्र व त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टर हे अत्यंत महत्त्वाचे असतात. तर नेताजींच्या मृत्यूचे प्रमाणपत्र कोणी
दिले हे आपण बघू.
डॉक्टर योशिमी हे जपान मिलिट्री मधील डॉक्टर त्यावेळेला उपस्थित होते. हे वक्तव्य त्यांनी 1946 मधील इंग्लंडने केलेल्या चौकशीमध्ये दिले होते.
" नेताजींचे पार्थिव शरीर कॉफिन मधून ताईहोकु एअरपोर्ट मध्ये नेले गेले व नंतर आणले गेले. त्यानंतर
मग मी डेथ सर्टिफिकेट दिले." यामध्ये त्याने कोणत्या नावाने डेथ सर्टिफिकेट दिले याचा उल्लेख केला नाही. व त्याने सांगितले की वीस तारखेला मी डेथ सर्टिफिकेट दिले. म्हणजे नेताजींच्या मृत्युचा दिवस 18 ऑगस्ट होता परंतु डेथ सर्टिफिकेट दिले गेले ते 20 ऑगस्ट या रोजी.
व त्या देत सर्टिफिकेट मध्ये मृत्यूची कारणे दिलेली आहेत, थर्ड डिग्री बर्न ( extensive burning )
याच डॉक्टरने शहानवाज समितीसमोर म्हणजे 1956 मध्ये आपले विधान बदलले. त्यामध्ये योशीमी म्हणाले की 18 तारखेला रात्री मी डेथ सर्टिफिकेट दिलेले आहे. व त्यानंतरच ते मी लगेच तेथील इन्चार्ज
ऑफिसर कडे सुपूर्द केले. मला खास इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की यांच्या नावात कोणतेही अफरातफर करायची नाही त्यामुळे मी डेथ सर्टिफिकेटवर "chandra bose" असे नाव लिहिले. याचाच अर्थ सुभाषचंद्र बोस यांच्या खऱ्या नावाने डेथ सर्टिफिकेट बनविण्यात आले होते.
1946 मध्ये दिलेले विधान म्हणजे वीस तारखेला दिलेले डेथ सर्टिफिकेट व कॉफिन हे मात्र सर्व गायब झाले होते 1956 मधील चौकशीमध्ये.
आता त्याहून मोठी मजा म्हणजे त्याच वेळेला तैवान मध्ये उपस्थित असलेले दुसरे जपानी डॉक्टर, डॉक्टर तुसुरा यांनी शहानवाज कमिटीला सांगितले, की त्यांनी
स्वतःने कोणतेही डेथ सर्टिफिकेट दिले नाही परंतु त्यांना याची कल्पना नाही की डॉक्टर योशिमि यांनी डेथ सर्टिफिकेट दिले आहे की नाही.
आता सगळ्यात काँन्ट्रोवर्शियल गोष्ट ही आहे की डॉक्टर तुसुरा यांनी काही महिन्यांनंतर जपान मध्ये झालेल्या
चौकशीत हे सांगितले की बोस यांचे डेथ सर्टिफिकेट मीच दिलेले आहे.
आता त्याहून मोठे ट्विस्ट:
त्यांनी जपानमध्ये झालेल्या चौकशीत असे सांगितले आहे. "बोस यांचा मृत्यू झाल्यावर काही दिवसांनी आर्मी हेडकॉटर मधून मला डेथ सर्टिफिकेट देण्यास सांगितले.
ते मृत शरीर सुभाषचंद्र बोस यांचे होते. त्यामुळे आर्मी हेडकॉटर ने मला सांगितले होते की त्यावर सुभाषचंद्र बोस यांचे नाव लिहायचे नाही. त्यावर ती एका जपानी सैनिकाचे नाव लिहिण्यास मला आर्मी हेडकॉटर ने सांगितले. त्यामुळे मी त्यावर नाव लिहिले "हचिरो ओकुरा"."
म्हणजेच नेताजींचे मृत असल्याचे प्रमाणपत्र कोणी दिले आहे व कोणत्या तारखेला दिले आहे याबाबत तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी वेगवेगळ्या डेट, वेगवेगळी नावे वेगवेगळ्या चौकशीत पूर्ण वेगवेगळी सांगितलेली आहेत.
म्हणजे थोडक्यात एकाच मृत शरीराचे दोन डेथ सर्टिफिकेट दोन डॉक्टरांनी पूर्णपणे गुंतागुंतीच्या आणि आपली विधाने बदलत दिलेली आहेत असे समोर येते. आणि या दोन्ही गोष्टींना शहानवाज समितीने अत्यंत छोटी गोष्ट म्हणून पूर्णपणे दुर्लक्ष केले. काय मजा आ
आणि सगळ्यात मजेची आणि विनोदाची गोष्ट म्हणजे यातील कोणतेही डेथ सर्टिफिकेट कधीच मिळालेले नाही 😂😂😂😂😂 आणि हे सर्टिफिकेट मिळालेले नाही ही हे प्रमाण मानून शहानवाज समितीने या दोन्ही डॉक्टरांच्या स्टेटमेंट ना महत्त्व दिले नाही.
दुसऱ्या महायुद्धाचा शेवटचा काळ होता. जपान पूर्णपणे संपला होता व त्या देशात जो काही हल्लकल्लोळ माजला होता त्या नादात हे सर्टिफिकेट हरवले असतील इतके साधे सरळ सोपे म्हणून आपल्याकडील ग्रेट इतिहासकार ( JNU मधून आलेले) या गोष्टीला सोडून देतात.
याच प्रमाणे रहेमान यांचे चौकशी अत्यंत सर्वांना चकवा देणारी आहे. प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन व वेगवेगळी गोष्ट सांगून आपले मागील स्टेटमेंट चुकीचे ठरवणे यात त्यांचा हातखंडा होता. नेताजी यांचे अंतिम संस्कार कुठे झाले कधी झाले कसे झाले याबाबत प्रत्येक वेळेला वेगवेगळी स्टोरी
रहमान सांगतात. ते स्वतःला contradict करतात असे नाही तर बाकीचे लोक रहमान यांच्यापेक्षा अजून वेगळी मते सांगताना शहानवाज चौकशीमध्ये समोर आलेले आहे. This is all messy.
तरीदेखील आपण फक्त डेथ सर्टिफिकेट ह्यावरच सध्या चिकटून राहू
कारण त्यातील गोंधळ अजून संपलेला नाही. 😂
ताईवान मध्ये अंतिम संस्कार करण्याकरता डेथ सर्टिफिकेट ची गरज असते. त्याशिवाय अंतिम संस्कार करण्याची परमिशन मिळत नाही. मग बॉस यांच्या शरीराचे अंतिम संस्कार डेथ सर्टिफिकेट शिवाय कसे झाले असतील??
अत्यंत महान पत्रकार हरेन शहा यावर ती आपली एक थियरी घेऊन येतात. खालती त्यासंदर्भात फोटो चिकटवलेला आहे.
हरेन शाह यांनी त्यांच्या एका पुस्तकात एक मृत्यु प्रमाणपत्र जोडलेले आहे. त्यावर मयताचे नाव आहे okara ichiro. व त्यावर लिहिलेले आहे कि तो एक जपानी सैनिक होता. एकोणीस ऑगस्ट रोजी
संध्याकाळी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण हार्ट अटॅक. परंतु डॉक्टर योशीमि वॉर म्हणतात की त्यांनी "chandra bose" या नावाने सर्टिफिकेट दिले आहे.
यावर हरिन शाह म्हणतात की त्या काळात सुभाषचंद्र बोस यांचे नाव लपवण्या करता मुद्दामून अंतिम संस्कार करण्याकरता जपानी सैनिकाचे नाव दिलेले असेल. परंतु तेथील डॉक्टर हे सांगतात की त्यांनी स्वतः सुभाष चंद्र बोस यांचे स्वतःचे नाव लिहिलेले होते. म्हणजेच या
महान पत्रकारांने उगाच काहीही लॉजिक लावून सरकारची थेरी कशी बरोबर आहे हेच प्रुव करण्यासाठी हे प्रयत्न केलेले आहेत.
व हेच डॉक्युमेंट जपानने भारताला पाठवली ज्यामध्ये नेताजींचे खरे नाव नव्हतेच.
म्हणजे भारताला जे मृत प्रमाणपत्र मिळाले त्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांचे नाव नव्हते.
परंतु काही बोस कुटुंबामधील लोक व तत्कालीन सरकारमधील लोक यांनी हेच धरून ठेवले की ही खरी डॉक्यूमेंट आहेत यावर नेताजींचे नाव नाहीये.
खोसला समितीने देखील हे सांगितले की हे दोन्ही डॉक्युमेंट नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी रिलेटेड नाहीत. परंतु तरी देखील अत्यंत बुद्धिवान व महान
नेत्यांनी व काही बोस कुटुंबांमधील लोकांनी फक्त या एकाच गोष्टीला पाठिंबा दिला किती सुभाषचंद्र बोस यांचे डॉक्युमेंट आहेत फक्त नाव बदललेले...
काय गोंधळ आहे ना? असेच शेकडो गोंधळ पुढे येणार आहेत.
या सर्व गोष्टी असताना अत्यंत सहजपणे व अत्यंत रोखठोक निर्वाळा दिला शहनावाज समितीने की सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातातच झालेला आहे.
यापुढे आपण अजून अशाच अत्यंत गूढ आणि गुंतागुंतीच्या स्टेटमेंट बाबत बोलणार आहोत. म्हणजे
नेताजी या एका माणसाने आपल्या बद्दल किती आणि काय प्रकारच्या गोष्टी उठवून दिल्या होत्या याबाबत विचार केला तरी डोके हलायला लागते. जसे जसे मी नेताजी बद्दल वाचत आहे तसे मला समजत आहे की या जगात नेताजींचा सारखा अजून दुसरा माणूस कधीही झालेला नसेल.
ज्याने अख्या जगाला आपल्या मृत्यूच्या कोड्यामध्ये इतके बेमालूमपणे अडकवले असेल.
आता येथेच थांबतो.
ज्यांना ही लेखमाला आवडत असेल त्यांनी नक्की शेअर करत राहा. माझ्या काही चुका असतील तर त्या मला दाखवत राहा सांगत राहा.
आज सकाळी मी लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आपल्या अचेतन मनाची ताकद या वरती हा लेख टाकला होता. परंतु यांच्या विरोधातील किंवा थोडीशी विरुद्ध गोष्ट मी टाकायचा प्रयत्न करणार आहे.
नक्कीच लॉ ऑफ अट्रॅक्शन हा खोटा नाही. परंतु त्याची गरज कोणासाठी? ज्या व्यक्तीला या भौतिक जगामध्ये काहीतरी मिळवायचे आहे त्याच्यासाठी.
मुळामध्ये गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात येथील प्रत्येक गोष्ट ही प्रकृती ठरवत असते. म्हणजे माझ्या आयुष्यात काय होणार हे आधीच ठरलेले आहे.
हे जर का मला खरोखर समजले नसेल तर मग मी लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे वापरून पैसा, प्रेम, चांगली माणसे, ज्ञान किंवा, प्रसिद्धी, स्वतःचे आयुष्य सुधारणे यापैकी काहीही मिळवायचा प्रयत्न करेन परंतु ज्या माणसाची मानसिक स्थिती अशा लेव्हलला पोहोचली असेल जेथे आयुष्यात काहीही आले तरी त्याचे स्वागत
लहानपणी आजी घरात नेहमी सांगायची ही नकारार्थी बोलायचं नाही किंवा वाईट बोलायचं नाही कारण वास्तुपुरुष कोणत्याही गोष्टीला तथास्तु म्हणत असतो. त्यामुळे घरात नेहमी चांगले व सकारात्मक बोलावे.
सहा एक वर्षांपूर्वी सहजच काही पुस्तके वाचायला घेतली. लॉ ऑफ अट्रॅक्शन चे फ्याड लय वाढत असलेले बघून अंतर्मनावर भरपूर काम केलेला डॉक्टर जोसेफ मर्फी याची बरेच ची पुस्तके वाचून काढली. पॉवर ऑफ सबकॉन्शस माइंड हे त्यांचे सर्वात गाजलेले पुस्तक.
प्रत्येक माणसाने खरोखर एकदा वाचावे कारण त्याचा नक्कीच फायदा प्रत्येकाला होईल.
त्या म्हणण्याप्रमाणे दोन मने आपल्याला असतात एक बहिर्मन आणि एक अंतर्मन..
बहिर्मन म्हणजे मेंदू व त्याचा कार्यभाग डिसिजन घेण्याची क्षमता वगैरे वगैरे. परंतु अंतर्मन म्हणजेच सब कॉन्शियस माइंड
दोन दिवसापूर्वी एक लेख वाचला. त्यामध्ये स्त्रीचे आईमध्ये रूपांतर कसे होते किंवा स्त्रीला त्यातून कशा पद्धतीने जावे लागते याबद्दल. त्यामध्ये किती ती कष्ट व वेदना असतात व त्याच प्रमाणे त्यात वात्सल्य व प्रेम या गोष्टी कश्या असतात वगैरे वगैरे. पुरुषांसाठी मात्र या गोष्टी पूर्ण
वेगळ्या असतात..बाजू छान मांडली होती.
पण माझा मुद्दाच वेगळा आहे यावर.....अर्थात माझा विषय मूळ विषयाला सोडून काहीतरी भलताच असतो यात वाद नाही. सवय आहे ती कशी जाणार...
परंतु हे सगळे वाचताना माझ्या मनात हा प्रश्न आला की मुलांना जन्म देण्याचे धाडस कुठून येते लोकांकडे? अर्थात हे मी थट्टेने किंवा टीका करण्यासाठी बोलत नाहीये तर मला खरोखर त्याचे नवलही वाटते आणि जिज्ञासा देखील.
हे लेख लिहिणे यामागे कोणावरही टीका किंवा कोणावरही आक्षेप घेणे हा उद्देश नाहीये तर सत्य काय होते हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न आहे. स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन करणारे, पहिली आर्मी स्थापन करणारे, पहिले चलन काढणारे, पहिला ध्वज असलेले
असलेले सरकार म्हणजे नेताजी.
नेताजी सुभाष चंद्र बोस त्यांच्या गूढ मृत्यूबाबत आपण पर्याय निवडून काढले तर ते 3 निघतात. 1. विमान दुर्घटना (सरकारी मान्यता ) 2. रशियामधील मृत्यू 3. गुमनामी बाबा
आपण आता जे 3 ऑप्शन आहेत ते क्रमाक्रमाने बघणार आहोत. त्यातील पहिली शक्यता व ज्याला सरकारने
मान्यता दिलेली आहे ते version बघू.
ते म्हणजे नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात झाला.
अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून दुसरे महायुद्ध संपवले होते. येत्या काही दिवसात जपानच्या शरणागतीची तयारी चालू होती. सिंगापूर मध्ये हेड क्वार्टर्स किंवा हेड ऑफिस असलेल्या INA मध्ये देखील
माझी चौथीची परीक्षा संपली. मे महिन्याच्या सुट्ट्या चालू झाल्या. आई बाबा म्हणाले होते कुठेतरी फिरायला जायचे आहे. कोठे ते काहीच सांगितले नव्हते मला. सुट्टी
लागल्यावर तीन-चार दिवसांनीच सकाळी सहा वाजताच आंबेसेटर दाराशी आली. बाबांच मित्राची गाडी होते व तोच ते गाडी चालवणार होता.
आम्ही निघालो. मी विचारत होतो कुठे जातोय. आई म्हणाली, "आपण गोव्याला फिरायला चाललो आहोत."
मी असला खुश झालो. पण आधी का मला सांगितले नाही म्हणून वादही घातला.
गोव्याला आम्ही साधारण संध्याकाळी सहाला वगैरे पोहोचलो. मला आता सगळी नावे आठवत नाहीत. परंतु एका मस्त हॉटेलमध्ये बाबा आणि बाबांचा मित्र असे
बऱ्याच जणांसाठी हा लेख म्हणजे अत्यंत जहाल जळजळीत असे रसायन असू शकेल त्यामुळे वाचायच्या आधीच विचार करा.
उत्क्रांतीवाद या वरती केलेले बरेच पेपर आणि डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत.
त्याचप्रमाणे ज्यांना वैद्यकशास्त्र कळते किंवा स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर व मन काय पद्धतीने बनले आहे हे कळते या लोकांशी देखील तुम्ही या विषयी प्रामाणिकपणे बोलून बघा. याची देखील गरज नाही जर का तुम्ही खरोखर स्वतःच्या आत मध्ये खोलवर शिरून गोष्टी बघू शकतात तर....
मुळामध्ये सेक्स हे गोष्ट अति प्रचंड महत्त्व देऊन उदात्त केले गेलेली गोष्ट आहे. खरेतर एक सर्वसाधारण शारीरिक गरज इतकेच त्याचे महत्त्व असायला हवे. परंतु ते कोणाबरोबर केले गेले तर पवित्र कोणाबरोबर केले गेले तर अपवित्र याबद्दल हजारो वर्षे आपल्या डोक्यामध्ये गोष्टी कोंबण्यात आलेले आहेत