लहानपणी आजी घरात नेहमी सांगायची ही नकारार्थी बोलायचं नाही किंवा वाईट बोलायचं नाही कारण वास्तुपुरुष कोणत्याही गोष्टीला तथास्तु म्हणत असतो. त्यामुळे घरात नेहमी चांगले व सकारात्मक बोलावे.
सहा एक वर्षांपूर्वी सहजच काही पुस्तके वाचायला घेतली. लॉ ऑफ अट्रॅक्शन चे फ्याड लय वाढत असलेले बघून अंतर्मनावर भरपूर काम केलेला डॉक्टर जोसेफ मर्फी याची बरेच ची पुस्तके वाचून काढली. पॉवर ऑफ सबकॉन्शस माइंड हे त्यांचे सर्वात गाजलेले पुस्तक.
प्रत्येक माणसाने खरोखर एकदा वाचावे कारण त्याचा नक्कीच फायदा प्रत्येकाला होईल.
त्या म्हणण्याप्रमाणे दोन मने आपल्याला असतात एक बहिर्मन आणि एक अंतर्मन..
बहिर्मन म्हणजे मेंदू व त्याचा कार्यभाग डिसिजन घेण्याची क्षमता वगैरे वगैरे. परंतु अंतर्मन म्हणजेच सब कॉन्शियस माइंड
हे फारसे कधी प्रकाशात किंवा कार्यरत दिसत नाही.
बहिर मनाला चांगले आणि वाईट कळते परंतु अंतर्मनाला ते कळत नाही. तर अंतर्मन म्हणजेच सबकॉन्शस माइंड कसे काम करते ते आपण बघू.
एखादी सूचना अंतर्मनाला दिली असतात आपण झोपे मध्ये असताना किंवा सुप्त अवस्थेमध्ये असताना आपले अंतर्मन ब्रह्मांड धुंडाळत आपल्याला हवी ती गोष्ट आपल्यासाठी आणण्याचा प्रयत्न करत असते. हिप्नोटाइज करून रुग्णांवर किंवा लोकांवर उपचार केले जातात त्या वेळेला या अंतर्मनाला सूचना दिलेल्या
असतात.
अंतर्मनाला हो किंवा नाही या गोष्टी कधीच कळत नाहीत. एक उदाहरण म्हणून पुढील गोष्ट करा. लगेच तुमच्या लक्षात येईल अंतर्मन कसे काम करते. पुढील गोष्ट खरोखर लगेच करून बघा मजा येईल.
डोळे मिटा आणि स्वतःच्या मनाला सूचना द्या की, " गुलाबी रंगाचा हत्ती इमॅजीन करू नको." " गुलाबी रंगाचा हत्ती इमॅजीन करू नको."
कितीही प्रयत्न केलात आणि स्वतःच्या मनाला गुलाबी रंगाचा हत्ती इमॅजिन करायचा नाही असे सांगून देखील तुमचे मन तुमच्या बंद डोळ्यांसमोर गुलाबी रंगाचा हत्ती
इमॅजीन करण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
म्हणजेच इमॅजिन कर किंवा इमॅजिन करू नकोस अशी सुचना अंतर्मनाला दिलेली कधीही कळत नाही. त्याला हो किंवा नाही असे कळतच नाही तर त्याला फक्त त्या सूचने मधील ऑब्जेक्ट किंवा मुख्य विषय एवढेच दिसते.
समजा एखाद्या माणसाला दारू किंवा सिगरेट सोडायची मनापासून इच्छा असेल आणि जर का त्याने तशी सूचना मनाला दिली तर ते सहज शक्य असते. परंतु इच्छा असूनही म्हणजे मनाला माहीत असून देखील तसे का घडत नाही??
वरील उदाहरणावरून लक्षात आले असेल की आपले अंतर्मन हो किंवा नाही याची भाषा समजत नाही. म्हणजे एखाद्याने अंतर्मनाला सुचना केली की मला दारू सोडायची आहे. तर त्यामुळे त्याचे दारू सुटत नाही. अंतर्मन दारू ही गोष्ट लक्षात ठेवते आणि ते तुमच्यासाठी शोधू लागते. एखाद्याला व्यसन सोडायचे असेल तर
अंतर्मनाला हे सांगावे. मी अत्यंत आरोग्यदायी आणि हेल्दी लाइफस्टाइल जगत आहे.
असे सांगितल्यामुळे अंतर्मण हेल्दी आणि आरोग्यदायी लाईफस्टाईल ही गोष्ट लक्षात ठेवते. त्या पद्धतीने तुमच्या आयुष्यात बदल करण्याचा प्रयत्न आपोआप होतो.
आता यामध्ये देखील खूप साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ते म्हणजे अंतर्मनाला आपण जे काही सांगत आहोत ती गोष्ट उघडेल यावर आपला विश्वास असणे. फार महत्त्वाचे असते हे. नाहीतर तुम्ही अंतर्मनाला एखादी गोष्ट सांगाल आणि तुमच्या मनातच शंका आणि डाऊट असतील
तर अंतर्मन ती गोष्ट शोधायला जाते पण प्रत्येक वेळी शंका-कुशंका मध्ये येऊन ती गोष्ट अंतर्मनाला सापडत नाही.
याचे उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करतो.
तुम्ही एका टॅक्सीमध्ये बसला आहे ड्रायव्हरला एका जागी जाण्याकरता सांगितले. ड्रायव्हर तुमचे ऐकून त्या
दिशेने गाडी चालवायला लागेल. तुम्ही आता मध्येच त्या ड्रायव्हरला सांगितले की नाही नाही मला तिकडे जाता येणार नाही किंवा मला दुसरीकडे जायचे आहे. जर का पाच मिनिटांनी तुम्ही ड्राइव्हवर ल वेगळी सूचना दिली तर ड्रायव्हर गोंधळून जाईल. तसेच आपल्या अंतर्मनात बाबत होते.
आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे हे आपण अंतर्मनाला सांगत असतो परंतु ते होणार की नाही याबद्दल शंका कुशंका मनामध्ये ठेवल्याने त्या सूचनांचा काहीच उपयोग होत नाही.
असो तर हे सर्व सांगण्याचा उद्योग मी केला. त्याचे कारण पहिल्या ओळी मधील वास्तुपुरुष. आपल्या
पूर्वजांनी ही गोष्ट किती सोप्या पद्धतीने मांडून ठेवले. कोणतीही नकारार्थी गोष्ट घरात बोलू नये कारण वास्तुपुरुष तथास्तु बोलत असतो. हा वास्तुपुरुष म्हणजे आपले अंतर्मनच नाही का?
परंतु प्रत्येक माणसाने सहजपणे ही गोष्ट अंगी बनवण्याकरता वास्तुपुरुष ही गोष्ट निर्माण केली गेली.
पाश्चात्य विज्ञान हे अंतर्मनावर काम करण्याकरता या शतकामध्ये सुरू झाले. परंतु आपल्याकडे वास्तुपुरुष ही संकल्पना मात्र हजारो वर्षांपासून आहे. म्हणजेच आपल्याकडील तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञांचा किती गाढ अभ्यास होता व त्यांनी सर्वसामान्य लोकांना शब्दांच्या जाळ्यात अडकवणे अपेक्षा सोप्या
कशा पद्धतीने घालून दिल्या. प्रचंड नवल वाटते मला या गोष्टीचे. त्यामुळे या वास्तुपुरुषाला म्हणजेच स्वतःच्या अंतर्मनाला प्रत्येकाने प्रतिसाद देऊन त्याचा अत्यंत योग्य पद्धतीने वापर करून आपले आयुष्य समृद्ध बनवावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आज सकाळी मी लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आपल्या अचेतन मनाची ताकद या वरती हा लेख टाकला होता. परंतु यांच्या विरोधातील किंवा थोडीशी विरुद्ध गोष्ट मी टाकायचा प्रयत्न करणार आहे.
नक्कीच लॉ ऑफ अट्रॅक्शन हा खोटा नाही. परंतु त्याची गरज कोणासाठी? ज्या व्यक्तीला या भौतिक जगामध्ये काहीतरी मिळवायचे आहे त्याच्यासाठी.
मुळामध्ये गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात येथील प्रत्येक गोष्ट ही प्रकृती ठरवत असते. म्हणजे माझ्या आयुष्यात काय होणार हे आधीच ठरलेले आहे.
हे जर का मला खरोखर समजले नसेल तर मग मी लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे वापरून पैसा, प्रेम, चांगली माणसे, ज्ञान किंवा, प्रसिद्धी, स्वतःचे आयुष्य सुधारणे यापैकी काहीही मिळवायचा प्रयत्न करेन परंतु ज्या माणसाची मानसिक स्थिती अशा लेव्हलला पोहोचली असेल जेथे आयुष्यात काहीही आले तरी त्याचे स्वागत
दोन दिवसापूर्वी एक लेख वाचला. त्यामध्ये स्त्रीचे आईमध्ये रूपांतर कसे होते किंवा स्त्रीला त्यातून कशा पद्धतीने जावे लागते याबद्दल. त्यामध्ये किती ती कष्ट व वेदना असतात व त्याच प्रमाणे त्यात वात्सल्य व प्रेम या गोष्टी कश्या असतात वगैरे वगैरे. पुरुषांसाठी मात्र या गोष्टी पूर्ण
वेगळ्या असतात..बाजू छान मांडली होती.
पण माझा मुद्दाच वेगळा आहे यावर.....अर्थात माझा विषय मूळ विषयाला सोडून काहीतरी भलताच असतो यात वाद नाही. सवय आहे ती कशी जाणार...
परंतु हे सगळे वाचताना माझ्या मनात हा प्रश्न आला की मुलांना जन्म देण्याचे धाडस कुठून येते लोकांकडे? अर्थात हे मी थट्टेने किंवा टीका करण्यासाठी बोलत नाहीये तर मला खरोखर त्याचे नवलही वाटते आणि जिज्ञासा देखील.
नेताजी यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी देशांमध्ये पोहोचली होती. सर्व देशावर दुःखाची छाया पसरली होती. काही लोकांमध्ये शंका-कुशंका नेताजींचा मृत्यू या बाबत उलट सुलट चर्चा चालू होत्या.
परंतु त्यावर कोणताही राजकीय विचार किंवा ॲक्शन अशी गोष्ट नव्हती कारण नेताजींचा मृत्यू झालेला आहे हे मान्य करण्यात आले होते.
सर्वात पहिल्यांदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूवर काम करण्यास अमेरिकेने चालू केले. कारण नेताजींच्या मृत्युचा एकही स्पष्ट पुरावा कोणा समोरच नव्हता
त्यांचे मृत शरीर कोणाच्याही हाती लागले नाही किंवा त्यांच्या मृत शरीराचा फोटो कुठेही नव्हता किंवा त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल कोठेही नव्हता. अशाप्रकारे डायरेक्ट लिंक असलेला कोणताच पुरावा त्याबाबत उपलब्ध झाला नाही त्यामुळे अमेरिका व इंग्लंड या बाबत साशंक होती. नेताजींचा मृत्यू
हे लेख लिहिणे यामागे कोणावरही टीका किंवा कोणावरही आक्षेप घेणे हा उद्देश नाहीये तर सत्य काय होते हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न आहे. स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन करणारे, पहिली आर्मी स्थापन करणारे, पहिले चलन काढणारे, पहिला ध्वज असलेले
असलेले सरकार म्हणजे नेताजी.
नेताजी सुभाष चंद्र बोस त्यांच्या गूढ मृत्यूबाबत आपण पर्याय निवडून काढले तर ते 3 निघतात. 1. विमान दुर्घटना (सरकारी मान्यता ) 2. रशियामधील मृत्यू 3. गुमनामी बाबा
आपण आता जे 3 ऑप्शन आहेत ते क्रमाक्रमाने बघणार आहोत. त्यातील पहिली शक्यता व ज्याला सरकारने
मान्यता दिलेली आहे ते version बघू.
ते म्हणजे नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात झाला.
अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून दुसरे महायुद्ध संपवले होते. येत्या काही दिवसात जपानच्या शरणागतीची तयारी चालू होती. सिंगापूर मध्ये हेड क्वार्टर्स किंवा हेड ऑफिस असलेल्या INA मध्ये देखील
माझी चौथीची परीक्षा संपली. मे महिन्याच्या सुट्ट्या चालू झाल्या. आई बाबा म्हणाले होते कुठेतरी फिरायला जायचे आहे. कोठे ते काहीच सांगितले नव्हते मला. सुट्टी
लागल्यावर तीन-चार दिवसांनीच सकाळी सहा वाजताच आंबेसेटर दाराशी आली. बाबांच मित्राची गाडी होते व तोच ते गाडी चालवणार होता.
आम्ही निघालो. मी विचारत होतो कुठे जातोय. आई म्हणाली, "आपण गोव्याला फिरायला चाललो आहोत."
मी असला खुश झालो. पण आधी का मला सांगितले नाही म्हणून वादही घातला.
गोव्याला आम्ही साधारण संध्याकाळी सहाला वगैरे पोहोचलो. मला आता सगळी नावे आठवत नाहीत. परंतु एका मस्त हॉटेलमध्ये बाबा आणि बाबांचा मित्र असे
बऱ्याच जणांसाठी हा लेख म्हणजे अत्यंत जहाल जळजळीत असे रसायन असू शकेल त्यामुळे वाचायच्या आधीच विचार करा.
उत्क्रांतीवाद या वरती केलेले बरेच पेपर आणि डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत.
त्याचप्रमाणे ज्यांना वैद्यकशास्त्र कळते किंवा स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर व मन काय पद्धतीने बनले आहे हे कळते या लोकांशी देखील तुम्ही या विषयी प्रामाणिकपणे बोलून बघा. याची देखील गरज नाही जर का तुम्ही खरोखर स्वतःच्या आत मध्ये खोलवर शिरून गोष्टी बघू शकतात तर....
मुळामध्ये सेक्स हे गोष्ट अति प्रचंड महत्त्व देऊन उदात्त केले गेलेली गोष्ट आहे. खरेतर एक सर्वसाधारण शारीरिक गरज इतकेच त्याचे महत्त्व असायला हवे. परंतु ते कोणाबरोबर केले गेले तर पवित्र कोणाबरोबर केले गेले तर अपवित्र याबद्दल हजारो वर्षे आपल्या डोक्यामध्ये गोष्टी कोंबण्यात आलेले आहेत