आज जंगली महाराज रस्त्यावर थांबलो आणि एका हॉटेल मध्ये जाऊ लागलो. एवढाच दोन मॅनेजमेंट वगैरे करणाऱ्या मुली असतात, ज्या काही survey वगैरे करतात अश्या मुलींनी मला थांबवले. काहीतरी गळ्यात मारणार असे वाटत होते तेव्हाच त्यांनी सुरुवातीला सांगितले की आम्ही काहीही विकायला आलेलो नाही
त्यानंतर त्याने बरीच मोठी कहाणी सांगून त्यानंतर एक पुस्तक दाखवून त्यामध्ये बरेच फोटो दाखवून एकंदरीत हे सांगायचा प्रयत्न केला की भारतात एकूण किती मुलांचा जन्म झाल्यानंतर लवकर मृत्यू होतो. UNICEF त्यावर कसे काम करत आहे व त्याद्वारे तुम्ही कसे पैसे डोनेट करू शकता जेणेकरून
त्या मुलांचे आयुष्य वाचले जाऊ शकते. वगैरे वगैरे
त्या वेळेला माझ्या मनात विचार आला तो हा
1. UNICEF सारखे संघटना इतकी प्रचंड मोठी आहे व तिला इतका मोठा फायनान्स देखील मिळत असतो तरी देखील रस्त्यावर जाऊन भीक मागायची गरज काय?
2. ज्या लहान मुलांवर ती ही परिस्थिती आहे त्यांच्यासाठी अत्यंत हळहळ आणि दुःख मनाला वाटले.
3. पण त्याचबरोबर मनात हा प्रश्न आला की एक तर मुलांना जन्म द्यायची हौस किती असते. त्यामध्ये स्वतःची आर्थिक परिस्थिती नसताना ही हौस असते. कोणाच्या जीवावर हे लोक मुलांना जन्माला घालतात?
आणि यांनी जन्माला घातलेल्या मुलाचा भार बाकी लोकांनी का घ्यायचा? अशी अपेक्षाच का? म्हणजे माझ्यासारखे लोक आयुष्यात एकाप्रकारे दुसऱ्याच्या आयुष्यावर जुगार खेळायला नको आणि आयुष्य गुंतागुंतीचे नको म्हणून मुलांना जन्म देऊ नये हे मत बाळगतात.
आणि दुसऱ्या बाजूला कोणतीही जबाबदारी न घेता लोक मुलांना जन्म देत बसतात आणि वर पुन्हा त्या मुलांना काही झाले तर आर्थिक परिस्थिती देखील नसते आलेल्या गोष्टी सांभाळायची.
अर्थात जन्मलेल्या त्या इतक्याश्या जिवाबद्दल नेहमीच सहानुभूती आहेच परंतु त्या पालकांबद्दल कोणतीही दयामाया मला तरी
शंकराचार्य जयंती:
अद्वैत वेदांत हे म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानातील एक उच्च शिखर. परंतु एक काळ असा आला होता ज्या वेळेला याच तत्वज्ञानावर इतर अनेक शाखा एका प्रकारचे टीका करत होते. तर टीकेचे महत्त्वाचे कारण म्हणजे अद्वैत वेदांत या मधील "माया" ही संकल्पना.
अद्वैत वेदांत मानणाऱ्या व्यक्तीला मायावादी असे देखील म्हटले जात असे. भारतातील सनातन धर्मामध्येच अनेक शाखा उदाहरणार्थ विशिष्ट अद्वैतवाद किंवा बुद्धीजम ज्या वेळेला अत्यंत लोकप्रिय होऊ लागला होता त्यानंतर अद्वैत वेदांतवर बरीच टीका झाली.
आणि पुन्हा अद्वैत वेदांत आला भारतीय तत्त्वज्ञानातील शाखांमध्ये उच्च जागेवर ठेवण्याकरता पुन्हा त्याच अद्वैत गाणे मानवी शरीराने अवतार घेतला. ते म्हणजे आद्य शंकराचार्य. वयाच्या आठव्या वर्षीच शिवोहम् ही जाणीव झालेली आत्मसाक्षात्कार व्यक्ती म्हणजे शंकराचार्य.
कोणत्याही नात्यात सगळ्यात महत्वाची जाणीव असली पाहिजे ती म्हणजे
I love you
But I don't need you.
ज्याला वरचे वाक्य पटू शकते किंवा त्याचा मतितार्थ अगदी नीट समजू शकतो. तो माणूस बेस्ट रेलेशन देऊ शकतो आणि बेस्ट एकटा पण राहू शकतो.
कोणत्याही रिलेशन अत्यंत जबरदस्त आणि पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी फक्त वर जे काही लिहिलेले आहे तो एकच आणि एकच रस्ता आहे.
कोणी आयुष्यामध्ये आल्यामुळे तुम्हाला आनंद होत असेल तर ती एक प्रकारची गरज असते. कोणीतरी दुसरी व्यक्ती जेव्हा तुम्हाला आनंद देते त्या वेळेला तो
आनंद कधी ना कधीतरी संपणारा असतो हे नक्की.
त्यामुळे ज्या वेळेला स्वतःच्या आतून आपण स्वतः आनंदस्वरूप आहोत हे समजेल त्यावेळेला दुसऱ्या मुळे आनंदी होण्याची गरज संपते व एक वेगळाच प्रवास चालू होतो. समोरील व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आहे म्हणून किंवा तिचे काही विचार किंवा वागणे आपल्याला
आज सकाळी मी लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा आपल्या अचेतन मनाची ताकद या वरती हा लेख टाकला होता. परंतु यांच्या विरोधातील किंवा थोडीशी विरुद्ध गोष्ट मी टाकायचा प्रयत्न करणार आहे.
नक्कीच लॉ ऑफ अट्रॅक्शन हा खोटा नाही. परंतु त्याची गरज कोणासाठी? ज्या व्यक्तीला या भौतिक जगामध्ये काहीतरी मिळवायचे आहे त्याच्यासाठी.
मुळामध्ये गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात येथील प्रत्येक गोष्ट ही प्रकृती ठरवत असते. म्हणजे माझ्या आयुष्यात काय होणार हे आधीच ठरलेले आहे.
हे जर का मला खरोखर समजले नसेल तर मग मी लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे वापरून पैसा, प्रेम, चांगली माणसे, ज्ञान किंवा, प्रसिद्धी, स्वतःचे आयुष्य सुधारणे यापैकी काहीही मिळवायचा प्रयत्न करेन परंतु ज्या माणसाची मानसिक स्थिती अशा लेव्हलला पोहोचली असेल जेथे आयुष्यात काहीही आले तरी त्याचे स्वागत
लहानपणी आजी घरात नेहमी सांगायची ही नकारार्थी बोलायचं नाही किंवा वाईट बोलायचं नाही कारण वास्तुपुरुष कोणत्याही गोष्टीला तथास्तु म्हणत असतो. त्यामुळे घरात नेहमी चांगले व सकारात्मक बोलावे.
सहा एक वर्षांपूर्वी सहजच काही पुस्तके वाचायला घेतली. लॉ ऑफ अट्रॅक्शन चे फ्याड लय वाढत असलेले बघून अंतर्मनावर भरपूर काम केलेला डॉक्टर जोसेफ मर्फी याची बरेच ची पुस्तके वाचून काढली. पॉवर ऑफ सबकॉन्शस माइंड हे त्यांचे सर्वात गाजलेले पुस्तक.
प्रत्येक माणसाने खरोखर एकदा वाचावे कारण त्याचा नक्कीच फायदा प्रत्येकाला होईल.
त्या म्हणण्याप्रमाणे दोन मने आपल्याला असतात एक बहिर्मन आणि एक अंतर्मन..
बहिर्मन म्हणजे मेंदू व त्याचा कार्यभाग डिसिजन घेण्याची क्षमता वगैरे वगैरे. परंतु अंतर्मन म्हणजेच सब कॉन्शियस माइंड
दोन दिवसापूर्वी एक लेख वाचला. त्यामध्ये स्त्रीचे आईमध्ये रूपांतर कसे होते किंवा स्त्रीला त्यातून कशा पद्धतीने जावे लागते याबद्दल. त्यामध्ये किती ती कष्ट व वेदना असतात व त्याच प्रमाणे त्यात वात्सल्य व प्रेम या गोष्टी कश्या असतात वगैरे वगैरे. पुरुषांसाठी मात्र या गोष्टी पूर्ण
वेगळ्या असतात..बाजू छान मांडली होती.
पण माझा मुद्दाच वेगळा आहे यावर.....अर्थात माझा विषय मूळ विषयाला सोडून काहीतरी भलताच असतो यात वाद नाही. सवय आहे ती कशी जाणार...
परंतु हे सगळे वाचताना माझ्या मनात हा प्रश्न आला की मुलांना जन्म देण्याचे धाडस कुठून येते लोकांकडे? अर्थात हे मी थट्टेने किंवा टीका करण्यासाठी बोलत नाहीये तर मला खरोखर त्याचे नवलही वाटते आणि जिज्ञासा देखील.
नेताजी यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी देशांमध्ये पोहोचली होती. सर्व देशावर दुःखाची छाया पसरली होती. काही लोकांमध्ये शंका-कुशंका नेताजींचा मृत्यू या बाबत उलट सुलट चर्चा चालू होत्या.
परंतु त्यावर कोणताही राजकीय विचार किंवा ॲक्शन अशी गोष्ट नव्हती कारण नेताजींचा मृत्यू झालेला आहे हे मान्य करण्यात आले होते.
सर्वात पहिल्यांदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूवर काम करण्यास अमेरिकेने चालू केले. कारण नेताजींच्या मृत्युचा एकही स्पष्ट पुरावा कोणा समोरच नव्हता
त्यांचे मृत शरीर कोणाच्याही हाती लागले नाही किंवा त्यांच्या मृत शरीराचा फोटो कुठेही नव्हता किंवा त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल कोठेही नव्हता. अशाप्रकारे डायरेक्ट लिंक असलेला कोणताच पुरावा त्याबाबत उपलब्ध झाला नाही त्यामुळे अमेरिका व इंग्लंड या बाबत साशंक होती. नेताजींचा मृत्यू