ज्येष्ठ नागरिकांसाठी, खरे तर सर्वांसाठी!
लघवी केली की लगेच पाणी प्यायला हवे!
नॉक्टुरिया म्हणजे रात्री वारंवार लघवी होणे, हे हृदयाच्या विफलतेचे लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.
शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे. याचा प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते.
झोप मोड होईल वा उठण्याचा कंटाळा, या भीतीने लोक रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. पाणी प्यायलं तर लघवी करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावं लागेल, असं त्यांना वाटतं. त्यांना माहित नाही की झोपण्यापूर्वी किंवा रात्री लघवी केल्यानंतर पाणी न पिणे ...
हे प्रौढ आणि वृद्ध लोकांमध्ये वारंवार पहाटे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचे एक महत्त्वाचे कारण आहे.
खरं तर, नॉक्टुरिया म्हणजे वारंवार लघवी होणे ही मूत्राशय बिघडल्याची समस्या नाही. हे वयोमानानुसार वृद्धांमध्ये हृदयाचे कार्य कमी झाल्यामुळे होते ...
कारण हृदय शरीराच्या खालच्या भागातून रक्त शोषण्यास (पुरेसे पंपिंग) सक्षम नाही.
अशा स्थितीत दिवसा जेव्हा आपण उभे असतो तेव्हा रक्ताचा प्रवाह अधिक खालच्या दिशेने होतो. हृदय कमकुवत असल्यास हृदयातील रक्ताचे प्रमाण अपुरे पडते आणि शरीराच्या खालच्या भागावर दाब वाढतो.
म्हणूनच प्रौढ आणि वृद्ध व्यक्तींना दिवसा शरीराच्या खालच्या भागात सूज येते. जेव्हा ते रात्री झोपतात तेव्हा शरीराच्या खालच्या भागाला दाबातून आराम मिळतो आणि त्यामुळे ऊतींमध्ये भरपूर पाणी साठते. हे पाणी पुन्हा रक्तात येते. जास्त पाणी असल्यास, पाणी वेगळे करण्यासाठी ...
आणि मूत्राशयातून बाहेर ढकलण्यासाठी मूत्रपिंडांना अधिक मेहनत करावी लागते. हे नॉक्टुरियाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.
त्यामुळे तुम्ही झोपायला आडवे झाल्यावर आणि पहिल्यांदा टॉयलेटला जाता तेव्हा साधारणतः तीन ते चार तास लागतात.
त्यानंतर, जेव्हा रक्तातील पाण्याचे प्रमाण पुन्हा वाढू लागते, तेव्हा तीन तासांनंतर पुन्हा लघवीला जावे लागते.
आता प्रश्न असा पडतो की ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका हे महत्त्वाचे कारण का आहे?
दोन-तीन वेळा लघवी केल्यावर रक्तात फारच कमी पाणी असते, तसे श्वासोच्छवासानेही शरीरातील पाणी कमी होते. यामुळे रक्त घट्ट आणि चिकट होते आणि झोपेच्या वेळी हृदयाची गती मंदावते. जाड रक्त आणि संथ रक्तप्रवाहामुळे, अरुंद रक्तवाहिनी सहज अवरोधित होते ...
यामुळेच प्रौढ आणि वृद्ध लोकांना नेहमी पहाटे ५-६ च्या सुमारास हृदयविकाराचा झटका किंवा अर्धांगवायू झाल्याचे आढळून येते. या अवस्थेत ते झोपेतच मरतात.
सगळ्यांना सांगायची पहिली गोष्ट म्हणजे नॉक्टुरिया ही मूत्राशयाची खराबी नाही, ती वृद्धत्वाची समस्या आहे.
म्हणून शक्य झाले तर पायाचा भाग उंचावर राहील अशा पध्दतीने झोपावे. उठावे लागले तरी पाणी प्यायचे टाळू नये.
खरे तर गोष्ट झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे आणि रात्री उठल्यावर पुन्हा लघवी झाली की पुन्हा पाणी प्यावे!
नॉक्टुरियाला घाबरू नका. भरपूर पाणी प्या, कारण पाणी न पिल्याने तुमचा जीव जाऊ शकतो.
तिसरी गोष्ट म्हणजे हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुम्ही सामान्य वेळेत जास्त व्यायाम केला पाहिजे.
मानवी शरीर हे यंत्र नाही की त्याचा अतिवापर केला तर बिघडेल, उलट त्याचा जितका जास्त वापर केला जाईल तितका तो मजबूत होईल. अस्वास्थ्यकर अन्न खाऊ नका, विशेषतः जास्त स्टार्च आणि तळलेले पदार्थ टाळा!
हा लेख तुमच्या प्रौढ आणि वृद्ध मित्रांसोबत शेअर करा.
घरातील जाणत्या तरुणांनी आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींना पाणी प्यायचा सल्ला द्या!
वारंवार उठावे लागते म्हणून पाणी प्यायचा कंटाळा तुम्हास हृदय घात किंवा लकवा भेट देऊन कायमचे उठवू शकते ... म्हणून रात्री किंवा दिवसा देखील पाणी प्यायचे टाळू नका!
लोकांच्या मनावर एखादी गोष्ट कशी बिंबवायची याचे एक आधुनिक विज्ञान आहे आणि त्यामधील पीएचडी भाजपने संपादन केली आहे. मोदीजींनी फारसा विकास केला नसूनही, ते 'विकासपुरुष' असल्याची प्रतिमा या मंडळींनी निर्माण केली.
त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सकाळी हातपायतोंड धुवून, मग लगेच पैसे खायला बसतात, अशाप्रकारचे समीकरण त्यांनी ठळक केले आहे. हे सरकार महावसुली सरकार आहे, असे भाजपमधील सर्व नेते जप केल्यासारखे म्हणत असतात.
जणू यांच्याबाबत मात्र 'गंगा मेरी माँ का नाम बाप का नाम हिमाला' अशीच स्थिती आहे... मविआ सरकारमधील काहीजण भ्रष्ट आहेतच, पण अवघे मंत्रिमंडळ अहोरात्र नोटा मोजत आहेत, असे कोणी म्हणू लागले, तर नाइलाजाने दुसरी बाजूही दाखवावी लागते.
सुपर मार्केटमध्ये वाइन विकायला ठेवली म्हणून काही प्रत्येक दारू न पिणारा माणूस वाइन प्यायला सुरू करणार नाही. हातभट्टी, देशी, फेनी, व्हिस्की, स्कॉच, रम, जिन, ब्रँडी, व्होडका, टकीला, श्यांपेन वगैरे वेगळ्या प्रकारची दारू पिणारे लोकही इतर सगळ्या दारू सोडून ...
फक्त वाइन प्यायला सुरू करणार नाहीयेत.
वाइन ही आजकाल उच्चभ्रू आणि रईस (जमिनी विकून श्रीमंत झालेल्या अडाणी लोकांना वगळून) लोकांमध्ये इज्जतीने पिली जाणारी गोष्ट आहे. २००० रुपयांची वाइन पिवून कुठल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराने बायकोला मारहाण केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.
ख्रिस्ती धर्मात वाइन हे सर्वमान्य आणि दैवी पेय आहे. येशू ख्रिस्ताने एका लग्नात वाइन कमी पडली म्हणून पाण्याला वाइनमध्ये बदलण्याचा चमत्कार केला. आजही जगभरातल्या चर्चमध्ये प्रार्थनासभेत प्रसादासारखी बुचभर वाइन प्यायला दिली जाते.
बराक ओबामांची अकरा मिनिटं आणि मोदींची वीस मिनिटं...
पंतप्रधान मोदींच्या पुलावरील वीस मिनिटाच्या जाममुळं गोदी मीडिया पिसाळला होता. अगदी राष्ट्रपती भवन ते सर्वोच्च न्यायालयही धुंडाळून झाले. २०१० मध्ये जगाचा महासत्तेचे प्रमुख तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा मुंबईत आले होते.
मुंबईच्या झेवियर महाविद्यालयात कृषी प्रदर्शन (USDA-ICAR) करार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद असा कार्यक्रम होता. कृषी पत्रकार या नात्याने अमेरिकन कॉन्सुलेटने हा कार्यक्रम कव्हर करण्याची संधी मिळाली. बराक ओबामा ताज हॉटेल थांबले होते. माझे कार्यालय फोर्ट विभागात होते.
अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी पूर्ण फोर्ट आणि नरिमन पॉईंट विभागाची नाकेबंदी केली होती. सोबतीला मुंबई पोलिसांची यंत्रणा होती.
सेंट झेवियर येथे ओबामा यांच्या भेटीच्या एक दिवस अगोदर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस यांच्यात खटका उडाला होता.
शहिद शिवराम हरी राजगुरु ...
काही न माहित असलेल्या गोष्टी ...
पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल त्रोटक तरी माहिती असते. परंतू 'राजगुरु' मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही. ही काय दर्जाची उपेक्षा म्हणायची?
मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता. ते इतके निष्णांत होते की, संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत.
कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता. नेमबाजीत ते शब्दवेधी होते.
एवढेच नव्हे तर उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवित (कधी प्रयत्न करा मग कळेल ही गोष्ट किती अवघड आहे ते!).
स्वत:स कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत-धावत १५-२० मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत, इतका त्यांचा दम होता.
कोल इंडिया लिमिटेड हि कंपनी भारत सरकारचा उपक्रम म्हणून १९७५ साली सुरु झाली. त्या वर्षी बहुदा इंदिरा गांधी प्रधानमंत्री असाव्यात.
भारतातल्या ८२ टक्के कोळशाचे उत्पादन कोल इंडिया करते. कोल इंडिया मध्ये जवळपास २७२००० कर्मचारी कार्यरत आहेत, पैकी १८००० अधिकारी वर्गाचे आहेत.
२०१० मध्ये कोल इंडियाचा आयपीओ आला ज्याला अपेक्षेपेक्षा १४ पट जास्ती लोकांनी प्रतिसाद दिला. २०११ मध्ये तत्कालीन सरकारने कोल इंडियाला ‘ महारत्न ‘ कंपनीचा दर्जा दिला. या काळात डॉ.मनमोहन सिंग प्रधानमंत्री असावेत बहुदा.
ऑक्टोबर २०१५ मध्ये कोल इंडियाचे बाजारमूल्य २.११ लाख कोटी होते.
जे भारतातल्या मौल्यवान कंपन्यात आठव्या क्रमांकावर होते आणि त्यावेळी कोल इंडियाचे बाजारमूल्य रिलायन्स पेक्षा जास्त होते.
२०१२ मध्ये कोल इंडिया फोर्ब्सच्या ५०० कंपन्याच्या यादीत ३७७ क्रमांकावर होती आणि २०१२ मध्ये भारतातल्या फोर्च्युन इंडिया ५०० लिस्टमध्ये नवव्या.