येत्या दि. ३ मे रोजी अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात.
श्रीविष्णूंच्या २४ अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे.
याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम - मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. अक्षय्यतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे.
'रणजित देसाई' यांच्या 'श्रीमान योगी' या ऐतिहासिक कादंबरीत याचे खूप छान उदाहरण सापडते. ते इथे फक्त संदर्भ म्हणून देत आहे. कोणाचेही हितसंबंध डावलण्याचा हेतू नाही.
राजांची छावणी तिरुवन्नमलईला पडली होती...
सकाळची वेळ होती. राजे हंबीरराव, जनार्दनपंत यांच्यासह छावणीची पाहणी करत होते.
राजे म्हणाले, 'गाव किती सुरेख आहे !'
'एके काळी हे गाव हिंदूंचे तीर्थक्षेत्र होते.' जनार्दनपंतांनी सांगितले.
'एके काळी?'
'हो. येथे श्रीशिव आणि समेत्तिपेरुमल दैवतांची सुरेख मंदिरे होती.'
'मग त्याचं काय झालं?'
'विजयनगर साम्राज्याच्या विध्वंसाबरोबर ती मंदिरे मुसलमानी आक्रमणाखाली पाडली गेली.'
'अरेरे ! आता त्या ठिकाणी काहीही नाही?' राजांनी विचारले.
'त्या पुरातन मंदिरांच्या जागेवर
मुसलमानांनी मशिदी बांधल्या आहेत’.....
एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !
माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते. गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.
देवळात गेलो. मी 🙏 केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते!
महाभारताबद्दल माझ्या वाचण्यात आलेला हा सुंदर तर्क..
महाभारतात असे म्हंटले आहे की सुमारे ८०% मनुष्यबळ युद्धाच्या अठराव्या दिवशी मृत्युमुखी पडले होते. जेव्हा युद्ध संपले तेव्हा संजय युद्ध झाले तिथे म्हणजेच कुरुक्षेत्राच्या मैदानात आला.
त्याचा मनात शंका आलेली होती की हे युद्ध खरंच झाले आहे का? खरंच एवढा मोठा नरसंहार झालेला आहे का? ती हिच जागा आहे का जिथे सामर्थ्यवान पांडव आणि भगवान श्रीकृष्ण उभे होते? ही तीच जागा आहे का जिथे श्रीमद् भगवत गीता सांगितली गेली? हे सगळे खरंच झाले आहे की मला तसा भ्रम होतोय??
"तुला कधीच ह्याचे सत्य माहित होणार नाही!!", एक शांत वयोवृद्ध आवाज त्याचा कानी पडला. संजयने आवाज आलेल्या दिशेला पाहिले तर त्याला एक साधू तिथे दिसला. साधू हलक्या आवाजात परत म्हणाला, "मला माहित आहे तू इथे कुरुक्षेत्राचे युद्ध खरंच झाले आहे का ते पाहायला आला आहेस.