एक नवीन छोटीशी लाट या समुद्रा मध्ये तयार झाली. तिला पण बेबी लाट म्हणू.
इकडे तिकडे बघून इतके मजा वाटली तिला. छोटे बुडबुडे कायम इकडे तिकडे येत होते. फेस असलेले पाणी. त्या छोट्या बुडबुडे बघून लाटेला वाटू लागले मी
बघा किती मोठी तुमच्यापेक्षा. एवढ्यात कैक मोठ्या लाटा देखील दिसल्या मग थोडीशी हिरमुसली. हळूहळू ही पण मोठी होत होती.
तेवढ्यात तीचे लक्ष किनार्यावर गेले. तेथे अनेक लाटा जाऊन जमिनीवर आपटत होत्या किंवा दगडांवर
आपटत होत्या आणि फुटून नष्ट होत होत्या.
तेवढ्यात तिला शेजारी एक मोठी लाट दिसली..
बेबी लाट: काय हो या लाटा किनाऱ्यावर जाऊन मरतात का?
मोठी लाट: हो कोणतीही लाट किनाऱ्या वर जाऊन आपटून फुटून नष्ट होऊन जाते.
बेबी लाट: बापरे🙄🙄😳😳😳😳😳😳😳
म्हणजे मी पण किनार्यावर जाऊन मारणार का?
मोठी लाट: हो, जास्तीत जास्त पाच मिनिटाच्या आत .
बेबी लाट: आईच्या गावात....(पुंग्या टाईट)
जाम घाबरली बेबी लाट.
तेवढ्यात मागून एक वेदांत जाणवलेली आणि आणि आत्मसाक्षात्कार झालेली लाट जवळ आली.
वेदांती लाट: काय झाले बाळ? भीती वाटतेय का?
बेबी लाट: हो. मी मरणार आहे. 🥺😕🙁☹️
वेदांती लाट: आजूबाजूला बघ किती पाणी आहे... हे पाणी तर कधीच मरत नाही.
बेबी लाट: असेल असेल...मी काय करू त्याचे? पण माझं काय? मी तर मरणारच आणि किती छान दिसते मी ते रूप आकार देखील जाणार . 🙄🙄
वेदांती लाट: तू कधी स्वतःच्या आत मध्ये काय आहे ते बघितले आहेस का? तुझा आकार छान आहे तू दिसतेस
देखील खूप छान. पण तू स्वतः कष्यापासून बनलेली आहेस हे कधी तू बघितलस का?
बेबी लाट विचारात 🙄🙄🤔🤔
वेदांती लाट: तू देखील पाण्या पासून बनलेली आहेस असे नाही का वाटत तुला? नीट बघ. तुला आकार असला किंवा रूप असले तरीदेखील पाणी आणि तू
अजिबात वेगळे नाही आहात. तुझ्या आकारामुळे पाण्या पेक्षा वेगळी तू आहेस असे तुला वाटत असेल पण तसे अजिबात नाहीये. हो की नाही?
बेबी लाट: ( खरोखर विचार करून व आजूबाजूला आणि स्वतःच्या आत मध्ये बघून) अरे हो की मी देखील पाणीच आहे.
पण तरीदेखील मी मरणार हेदेखील सत्यच आहे.
वेदांती लाट: हो तुझा आकार आणि रूप निघून जाणार हे सत्यच आहे. पण तू कधीही मरत नाही. कारण पाणी रूपाने तू कायम अस्तित्वातच असणार आहेस.
बेबी लाटेला एका प्रकारचे समाधान आणि शांती येऊ लागली होती.
आत्तापर्यंत जे काही बेबी लाटेला समजले त्याला अद्वैत वेदांत म्हणत नाहीत तर त्याला सांख्य शास्त्र असे म्हणतात. अद्वैत वेदांत याच्यापुढे चालू होतो.
अद्वैत लाट पुढे म्हणाली. अजून एक मजा सांगते तुला.
तुझ्या आजूबाजूला जितक्या लाटा दिसत आहेत.
जितके बुडबुडे दिसत आहेत त्यांच्याकडे बघून तुला असे वाटायचं की तू त्यांच्यापेक्षा मोठी आहेस. किंवा मोठ्या लाटा बघून तुला असे वाटायचे की तू खूप छोटी आहेस. पण त्यादेखील पाण्या पासूनच बनलेल्या आहेत हे कधी बघितलेस का? तू देखील पाणी आणि त्या लाटा देखील पाणी. मग कशासाठी गर्व करायचा आणि
कशासाठी डिप्रेस व्हायचे?
बेबी लाट िनार्यावर येऊ लागली होती. परंतु आता प्रत्येक क्षण तिला मजेचा वाटू लागला होता. आपण कधीही मरू शकत नाही हे तिला आतून उमजले होते. जोपर्यंत हे रुप आणि आकार आहे तोपर्यंत त्यात मजा करायची. व ज्यावेळी त्या नष्ट होईल त्यावेळी देखील
पाणी म्हणून आपले अस्तित्व उपभोगायचे. जीवन तेच होते परंतु बघायचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलल्यामुळे प्रत्येक क्षण अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा आणि पूर्ण शांतीचा होता.
अतिव समाधानाने भरलेली ही बेबी लाट खऱ्या अर्थाने किनार्याला लागलेली होती.
सामान्य माणसाला अद्वैत वेदांत समजायला कठीण जातो.कारण ते अशा पद्धतीने लिहिलेले आहे हे वाचताना दमछाक होऊ शकते. बुद्धीची आणि विचारांची. त्यामुळे क्लिष्ट काय वाचत बसायचे हा कंटाळा आपण करत असतो. त्यासाठी जास्तीत जास्त सोप्या प्रकारे या गोष्टीत मांडायचा प्रयत्न केला. #mayurthelonewolf
आजच साईबाबा याविषयी बऱ्याच पोस्ट बघितल्या व लोकांच्या कमेंट बघितल्या. परंतु खालील गोष्टीची कल्पना त्यांना असते की नसते हे माहीत नाही. 1. लोकांना वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे महाराज माहिती असतील तर स्वतः टेंबे महाराज यांनी साईबाबा यांना नारळ पाठवल्याचे लिखित रूपात आढळले आहे.
2. लोकमान्य टिळक यांनी ज्याप्रमाणे शेगावचे गजानन महाराज व गोंदवलेकर महाराज यांचे आशीर्वाद आपल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी घेतले होते तसेच ते शिर्डी येथे जाऊन साईबाबांना भेटल्याचे देखील आढळते.
3. नाशिकचे अत्यंत महान नाथपंथी योगी श्री ब्रह्मभूत गजानन महाराज गुप्ते यांनी
स्वतःच्या आत्मचरित्रात " आत्मसाक्षात्कार मार्ग प्रदीप" यामध्ये लहानपणी साधनेच्या कालखंडात ते शेगाव येथे गजानन महाराज त्याचप्रमाणे मारुती महाराज शिर्डी येथील साईनाथ महाराज यांच्या सहवासात राहिल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे.
माझ्या आयुष्यात पहिला काढलेला फोटो.
माझ्या आईचा. तिसरीत असताना.
ती चिडली होती काही कारणाने माझ्यावर. आणि मी माकड उड्या मारत बसलेलो
तेव्हा बाबांनी हळूच आमचा कॅमेरा दिला माझ्या हातात. आणि हा फोटो क्लिक झाला. #MothersDay#MotherDay2022#photo#PhotoOfTheDay
त्यानंतर राजधानी एक्स्प्रेस मध्ये 1999 मध्ये हा काढलेला
बरेच लोक स्थळ जुळवणे, लग्नामध्ये मध्यस्थी करणे वगैरे वगैरे काम करत बघितलेले आहे. बसल्या बसल्या कुंडल्या जुळवत बसणे. व आपण दोघांचे लग्न जुळवून किती मोठे काम केले आहे असे अत्यंत मानभावीपणाने समजतात आणि सांगतात.
त्यांच्याकडूनच इन्स्पिरेशन घेऊन एकटे, single, bachelor राहण्याची इच्छा असणाऱ्या मुलामुलींसाठी सल्ला *केंद्र किंवा *कोर्स उघडले पाहिजे असे वाटायला लागले आहे 😒😒😒🤣🤣
या कोर्समध्ये खालील गोष्टींचा समावेश करावा असे वाटते.
श्रींच्या कृपेने.. 1. एकटे राहणे फायद्याचे कसे आहे हे त्या इच्छुक मुलाला आणि मुलीला किती समजले आहे हे बघून ते पूर्णपणे मनावर बिंबवणे.😁
2.आजूबाजूच्या लोकांना व्यवस्थित उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद कशी करावी याचे प्रशिक्षण.
शंकराचार्य जयंती:
अद्वैत वेदांत हे म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानातील एक उच्च शिखर. परंतु एक काळ असा आला होता ज्या वेळेला याच तत्वज्ञानावर इतर अनेक शाखा एका प्रकारचे टीका करत होते. तर टीकेचे महत्त्वाचे कारण म्हणजे अद्वैत वेदांत या मधील "माया" ही संकल्पना.
अद्वैत वेदांत मानणाऱ्या व्यक्तीला मायावादी असे देखील म्हटले जात असे. भारतातील सनातन धर्मामध्येच अनेक शाखा उदाहरणार्थ विशिष्ट अद्वैतवाद किंवा बुद्धीजम ज्या वेळेला अत्यंत लोकप्रिय होऊ लागला होता त्यानंतर अद्वैत वेदांतवर बरीच टीका झाली.
आणि पुन्हा अद्वैत वेदांत आला भारतीय तत्त्वज्ञानातील शाखांमध्ये उच्च जागेवर ठेवण्याकरता पुन्हा त्याच अद्वैत गाणे मानवी शरीराने अवतार घेतला. ते म्हणजे आद्य शंकराचार्य. वयाच्या आठव्या वर्षीच शिवोहम् ही जाणीव झालेली आत्मसाक्षात्कार व्यक्ती म्हणजे शंकराचार्य.
कोणत्याही नात्यात सगळ्यात महत्वाची जाणीव असली पाहिजे ती म्हणजे
I love you
But I don't need you.
ज्याला वरचे वाक्य पटू शकते किंवा त्याचा मतितार्थ अगदी नीट समजू शकतो. तो माणूस बेस्ट रेलेशन देऊ शकतो आणि बेस्ट एकटा पण राहू शकतो.
कोणत्याही रिलेशन अत्यंत जबरदस्त आणि पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी फक्त वर जे काही लिहिलेले आहे तो एकच आणि एकच रस्ता आहे.
कोणी आयुष्यामध्ये आल्यामुळे तुम्हाला आनंद होत असेल तर ती एक प्रकारची गरज असते. कोणीतरी दुसरी व्यक्ती जेव्हा तुम्हाला आनंद देते त्या वेळेला तो
आनंद कधी ना कधीतरी संपणारा असतो हे नक्की.
त्यामुळे ज्या वेळेला स्वतःच्या आतून आपण स्वतः आनंदस्वरूप आहोत हे समजेल त्यावेळेला दुसऱ्या मुळे आनंदी होण्याची गरज संपते व एक वेगळाच प्रवास चालू होतो. समोरील व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आहे म्हणून किंवा तिचे काही विचार किंवा वागणे आपल्याला
आज जंगली महाराज रस्त्यावर थांबलो आणि एका हॉटेल मध्ये जाऊ लागलो. एवढाच दोन मॅनेजमेंट वगैरे करणाऱ्या मुली असतात, ज्या काही survey वगैरे करतात अश्या मुलींनी मला थांबवले. काहीतरी गळ्यात मारणार असे वाटत होते तेव्हाच त्यांनी सुरुवातीला सांगितले की आम्ही काहीही विकायला आलेलो नाही
त्यानंतर त्याने बरीच मोठी कहाणी सांगून त्यानंतर एक पुस्तक दाखवून त्यामध्ये बरेच फोटो दाखवून एकंदरीत हे सांगायचा प्रयत्न केला की भारतात एकूण किती मुलांचा जन्म झाल्यानंतर लवकर मृत्यू होतो. UNICEF त्यावर कसे काम करत आहे व त्याद्वारे तुम्ही कसे पैसे डोनेट करू शकता जेणेकरून
त्या मुलांचे आयुष्य वाचले जाऊ शकते. वगैरे वगैरे
त्या वेळेला माझ्या मनात विचार आला तो हा
1. UNICEF सारखे संघटना इतकी प्रचंड मोठी आहे व तिला इतका मोठा फायनान्स देखील मिळत असतो तरी देखील रस्त्यावर जाऊन भीक मागायची गरज काय?