ADITI Gujar Profile picture
May 8 11 tweets 2 min read
पुणेरी ताट

पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रम आयोजकांनी "पुणेकरास" मेनू विषयी त्याचं मत मागितल... त्यावेळी त्यांना पुणेकराने दिलेले हे उत्तर...

"मेनू साधारण असा असावा"

१. वरण-भात, तूप, मीठ, लिंबू - त्यात शक्य असल्यास चमचाभर पूरण.
२. मसाले भात पण त्यावर ताज्या ओल्या नारळाच किसलेलं खोबर आवश्यक...

३. पुऱ्या, आळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी,

४. सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.

५. पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसळा भजी.
६. "ओल्या नारळाची" कोथिंबीरीची चटणी, काकड़ी- शेंगदाणे कूट आणि दही घातलेली कोशिंबीर.

७. चवी पुरतं पंचामृत.

८. गोडात श्रीखंड किंवा बासुंदी.

९. मठ्ठा.

"आता काही सूचना.... लक्ष्य पूर्वक वाचा.."

आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.
तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.

श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये...

आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही... श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही...

आळुच्या भाजीतील शेंगदाणे आख्खे असावे, उगाच तुकडे तुकडे टाकू नये...
तसेच, खोबरे देखील पाऊण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.
मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते ५ ते ६ मि.मी. पेक्षा जास्त लांबीचे नको.

वरणाची डाळ "एक-पात्रीच" हवी, नाहीतर चव बदलते
पापड-कुरडई मरतुकडे नको.... त्याच्यातला "कुरकुरीतपणा" निघुन गेल्यास आमची "कुरकुर" सुरु होईल...

गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.

ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी... तिखट नको... त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारखं तिखट त्यात उधळू नये...
"आता पान वाढावयाच्या सूचना -"

१. पाट मांडून त्यासमोर छान रांगोळी घालावी..

२. पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे...

३. पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग "शून्य अंश" पकडून मीठ वाढावे आणि
४. त्याच्या "उणे पाच अंशावर" लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे वाढावे...

५. उणे ९० अंशावर पापड़, त्याखाली पूरी वाढावी.

६. मध्यभागी भाताचा मुद असावा व सगळं वरण "भसकन" वाढू नये... वरणाचा ओघळ नको... आणि त्यावर "साजूक तुपाची धार" हवीच...
पण त्यासाठी जेवणार्यास वाट पहायला लावू नये... तुपाचा चमचा चांगला खोलगट असावा.. मागून चेपलेला अपेक्षित नाही.

७. मुदाचा आकार प्रमाणशीर असावा... "भसाडा नको..."

८. वरण-भाता खाली मसाले भात वाढावा.

९. मसाले-भाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी..
१०. आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.

११. उजव्या हाताला वरच्या बाजूला ४५ अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.

१२. आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.
वर नमूद केलेल्यात काही त्रुटी असल्यास तुमच्या तुम्हीच दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये. आणि उपकार केल्यासारखा वाढप्याचा चेहरा असू नये.

बस ऐवढेच अपेक्षित आहे. सुचना संपल्या.

"काटेकोर" पुणेकर...

#वाचलेले

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with ADITI Gujar

ADITI Gujar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @AditiGujar

May 9
हिन्दू

"हिंदू' शब्द 'सिंधु' शब्दाVचा अरबी अपभ्रंश आहे.असे आपल्याला आता
पर्यंत सांगितले गेले आहे.पण खालील लेखामध्ये ते कसे असत्य आणि दिशा
भूल करणारे आहे,हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.
ते वाचून आपल्या सर्व समूहात
शुद्ध मराठीत अग्रेशित(forward)करा.
सामायिक(share)करा
"हिन्दू' हा शब्द- "हीनं दुष्यति इति
हिन्दूः।"
म्हणजे-
'जो अज्ञान आणि हीनतेचा त्याग करतो,'
त्याला हिन्दू म्हणतात'.
'हिन्दू' हा शब्द अनन्त वर्षांचा प्राचीन असलेला मूळ संस्कृत शब्द आहे.
या संस्कृत शब्दाचा सन्धीविग्रह केल्यास तो हीन+दू=हीन भावना+पासून दूर असलेला,मुक्त असलेला तो हिन्दू होय
आणि आपल्याला हे वारंवार खोटे सांगून फसविले जात होते की,'सिन्धूचे अपभ्रंशित रूप म्हणजे हिन्दू' हा शब्द आपल्याला मोगलांनी दिला.
Read 12 tweets
May 9
महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्ण दुर्योधनाच्या दरबारात गेले होते, आम्हाला युद्ध नको, तुम्ही संपूर्ण राज्य ठेवा...पांडवांना फक्त पाच गावे द्या, ते शांततेत राहतील, तुम्हाला काहीच बोलणार नाहीत! Image
श्रीकृष्णाला माहित होते की दुर्योधन प्रस्ताव स्वीकारणार नाही... त्याच्यात तडजोड हा प्रकारच नव्हता हा प्रस्ताव त्याच्या स्वभावाचा विरोधात होता!

मग श्रीकृष्ण असा प्रस्ताव घेऊन का गेले?
दुर्योधन किती वाईट होता हे सिद्ध करायला ते गेले होते! दुर्योधनाच्या मनात पांडवांन बद्दल किती द्वेष आहे हे दाखवायला श्रीकृष्णानी हा प्रस्ताव ठेवला होता.

ते फक्त पांडवांना दाखवायला गेले होते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला युद्ध लढायचे आहे.
मनात काहीही शंका असेल तर काढून टाका.
Read 12 tweets
May 6
JUST LEAVE IT principle:

-🖋️ Try convincing a person once or twice. If he or she refuses to get convinced
Just Leave it

- 🖋️When the children grow up and take their own decisions, do not impose
Just Leave it
- 🖋️Your frequency doesn't match with everyone in life. If you can't connect with someone
Just Leave it

- 🖋️After a certain age if someone criticises you don't get upset
Just Leave it
- 🖋️ When you realise that nothing is in your hands, stop worrying about others and the future
Just Leave it

- 🖋️ When the gap between your wish list and your capabilities increases, stop self expectations
Just Leave it
Read 4 tweets
May 2
अक्षय्यतृतीयेचे महत्व

येत्या दि. ३ मे रोजी अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात.
श्रीविष्णूंच्या २४ अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली‌. अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे.
याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम - मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. अक्षय्यतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे.
Read 5 tweets
Apr 30
शेवटपर्यंत जरूर वाचा.

धर्मनिरपेक्षता

'रणजित देसाई' यांच्या 'श्रीमान योगी' या ऐतिहासिक कादंबरीत याचे खूप छान उदाहरण सापडते. ते इथे फक्त संदर्भ म्हणून देत आहे. कोणाचेही हितसंबंध डावलण्याचा हेतू नाही.

राजांची छावणी तिरुवन्नमलईला पडली होती...
सकाळची वेळ होती. राजे हंबीरराव, जनार्दनपंत यांच्यासह छावणीची पाहणी करत होते.

राजे म्हणाले, 'गाव किती सुरेख आहे !'

'एके काळी हे गाव हिंदूंचे तीर्थक्षेत्र होते.' जनार्दनपंतांनी सांगितले.

'एके काळी?'

'हो. येथे श्रीशिव आणि समेत्तिपेरुमल दैवतांची सुरेख मंदिरे होती.'
'मग त्याचं काय झालं?'

'विजयनगर साम्राज्याच्या विध्वंसाबरोबर ती मंदिरे मुसलमानी आक्रमणाखाली पाडली गेली.'

'अरेरे ! आता त्या ठिकाणी काहीही नाही?' राजांनी विचारले.

'त्या पुरातन मंदिरांच्या जागेवर
मुसलमानांनी मशिदी बांधल्या आहेत’.....
Read 8 tweets
Apr 24
प्रसाद...

एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते. गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ !
माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते. “फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते. गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.
देवळात गेलो. मी 🙏 केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला. मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते!
Read 17 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(