ओम
या शब्दाला आपल्याकडे प्रचंड महत्त्व आहे. याचा अर्थ विविध प्रकारे सांगण्यात येतो. परंतु एक उपनिषद खास या शब्दासाठी तयार केले गेले आहे ते म्हणजे मांडक्योपनिषद.
अ ऊ म या तीन अक्षरांचा व त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा अर्थ या उपनिषदात सांगण्यात आला आहे.
तर हे उपनिषद काय सांगते? केवळ 12 श्लोक असलेले हे उपनिषद्. यामध्ये कोणत्याही दैवतांची चर्चा नाही, आपण रोज जे काही अनुभवतो त्या गोष्टींचा आधार घेऊन ब्रह्म म्हणजेच परमेश्वर काय आहे तो सांगण्याचा प्रयत्न यात आहे. अद्वैत वेदांत किंवा उपनिषदांची खासियत हीच.
रोजच्या रोज आपण जे काही अनुभवतो त्याचा आधार घेऊन बुद्धीच्या द्वारे त्याच्या खोलात शिरून त्याचा नक्की अर्थ काय हे समजून घेणे.
तर मांडक्योपनिषद हे सांगते आपल्या तीन अवस्था ज्या आपण रोज अनुभवतो 1. जागृतावस्था: आपण रोज दिवसभरात जे काही करत असतो ते म्हणजे जागृत अवस्था 2. स्वप्नावस्था:
झोपी गेल्यावर आपण जे काही अनुभवतो. स्वप्न सृष्टी मध्ये एक नवीन जग आपल्यासाठी तयार होते व ते खरे आहे असे आपल्याला त्या वेळापुरते तरी वाटत असते ती आवस्था.
गाढ निद्रा: ज्या ठिकाणी मनाचे व्यवहार पूर्णपणे थांबलेले असतात. त्या ठिकाणी कोणताही विचार नसतो कोणतेही स्वप्न नसते. त्या वेळी
ना प्रिय व्यक्तींची आठवण असते ना शत्रूंची. त्याठिकाणी काहीच नसते. केवळ blankness.
या अवस्थेला सुषुप्ति अवस्था असे देखील म्हणतात.
परंतु आता खोलात गेले तर ही अवस्था देखील अनुभवणारा कोणीतरी मी हा गाढ झोपेमध्ये देखील असतो.
म्हणूनच आपल्याला त्या वेळा मध्ये काय घडलं याची जाणीव नसली तरीदेखील मी गाढ झोपलो होतो हे आपण म्हणू शकतो. व त्या अवस्थेमध्ये आपले प्रियजन किंवा त्यांची नावे किंवा त्यांचा विचारही कोठेही नसला तरीदेखील सर्वात जास्त समाधान व शांतता आपण गाढ झोपेमध्ये अनुभवत असतो.
म्हणजेच जागृत अवस्थेमध्ये आहे सुखाचे क्षण आल्यावर आपण आनंदी होतो. किंवा दुःख आले तर त्यामुळे आपण दुःख देखील अनुभवत असतो. परंतु जागृतावस्थेत मधील आनंद किंवा दुःख स्वप्नामध्ये जवळपास नाहीसे झालेले असते. स्वप्ना मधील अडचणी किंवा सुखे ही वेगळीच असतात.
व गाढ झोपेमध्ये यातील काहीच नसते
यावरून आपण जेव्हा म्हणतो की मी खूप खुश आहे आज किंवा मी खूप दुःखात आहे आज त्या वेळेला खोल जाऊन विचार करणे आवश्यक आहे की खरोखर " मी" जो कोणी आहे जो या तिन्ही अवस्था अनुभवत असतो त्याच्यावर या तीनही अवस्थांचा परिणाम असतो का?
जर खरोखर ा जागृतावस्थेत घडणार्या घटनांचा किंवा स्वप्नावस्था मध्ये घडणाऱ्या घटनांना मी चिकटलो असतो तर प्रत्येक अवस्थेमध्ये त्यातील सुख व दुःख माझ्याबरोबर राहिलेच असते. पण प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही.
मला जागृत अवस्थेमधील सुख व दुःख देखील चिकटत नाहीत व स्वप्न अवस्थेमधील देखील भेट द्या किंवा आनंदाचे क्षण चिकटत नाहीत. त्याचप्रमाणे गाढ झोपी मधील पूर्ण blankness देखील चिकटत नाही. ज्याप्रमाणे टीव्हीच्या स्क्रीनवर किंवा थेटर मधील पडल्यावर विविध दृष्य येतात. मग त्यात मारहाण असते ,
जाळपोळ असते किंवा रोमान्स असतो किंवा भेटी असते तरीदेखील त्या पडद्यावर मात्र या कोणत्याही गोष्टींचा प्रत्यक्ष परिणाम होत नाही. इतकेच काय तर त्या पडद्यावर सिनेमा दाखवला काय किंवा नाही दाखवला काय तरी देखील तो आपल्या जागी तसाच असतो. त्याच प्रमाणे "मी" हा आहे.
त्या "मी" वरती जागृत किंवा स्वप्नावस्था किंवा गाढ झोप म्हणजेच सूषुप्ती या कोणत्याही व्यवस्थेचा परिणाम नसतो व तो त्यापासून पूर्णपणे वेगळा असतो. म्हणून त्याला या तीन अवस्थान पासून वेगळा म्हणजेच "चौथा" म्हणजेच "तूरीय" असे म्हटले गेले आहे. तो तुरिय किंवा मी जो कोणी आहे तो
म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वर. निर्गुण निराकार.
आता यावरून पुढे जाऊन मांडक्योपनिषद हे सांगते. ओम च अर्थ.
अ - स्थूल शरीर व त्याच्याशी निगडित असलेले अनुभव म्हणजेच जागृतावस्था. कारण जागृत अवस्थेमध्ये मुख्यतः आपण आपल्या पाच इंद्रियांनी या जगाला अनुभवत असतो.
ऊ - मन किंवा सूक्ष्म शरीर
व या सूक्ष्म शरीराने अनुभवत असलेले स्वप्नामध्ये जग कारण तेथे प्रत्यक्ष स्थूल शरीर काहीच काम करत नसते किंवा कोणताही अनुभव घेत नसते. आपले पाचवे इंद्रिये त्या वेळी सक्रिय असतात. कारण त्या ठिकाणी केवळ मन किंवा सूक्ष्म शरीर याद्वारे अनुभव मिळतात.
म - सुषुप्ती किंवा गाढ निद्रा म्हणजेच आपले कारण शरीर किंवा कारण देह जेथे अस्तित्व तर असते परंतु मन व शरीर यांना कोणत्याही प्रकारे कोणताच अनुभव न देणारे अस्तित्व त्या ठिकाणी असते.
थोडक्यात ओम म्हणजे स्थूलदेह, सूक्ष्म देह आणि कारण देह किंवा जागृतावस्था स्वप्नावस्था आणि गाढ निद्रा. व ओम म्हणून झाल्यावर जी शांतता असते ती शांतता म्हणजे ती चौथी अवस्था किंवा तुरिया अवस्था किंवा "मी" स्वतः.
म्हणून बऱ्याच संतांनी हे सांगून ठेवलेले आहे कोणतेही नामस्मरण करत असताना
नाम घेतल्यावर दुसऱ्यांदा नाम घेताना त्या दोन नामांच्या मध्ये जी शांतता असते त्यामध्ये खरा परमेश्वर असतो. त्यामुळे ज्या व्यक्तीला खरे नामस्मरण करण्याचे कौशल्य मिळाले आहे तो त्या नावापेक्षा त्या दोन नामांच्या मध्ये येणाऱ्या शांततेवर एकाग्रचित्त करतो.
म्हणजेच ओम् म्हणून झाल्यावर दुसरा ओम म्हणताना मध्ये जे चौथी अवस्था आहे तो म्हणजे प्रत्यक्ष "परमेश्वर" किंवा "मी" किंवा "तूरिया". #mayurthelonewolf
#फोटोग्राफी_टीप #photography_tip #thelonewolfotos
कॅमेरा पेक्षा खरा फोटोग्राफर फ्रेमींग बघतो. म्हणजे फोटो च्या आत कोणती वस्तू कशी आहे कोणत्या जागी आहे. याचा अभ्यास आयुष्यभर केला तरी संपत नाही असे मोठे फोटोग्राफर सांगत असतात.
त्यामुळे कंपोजीशन किंवा फ्रेमिंग सगळ्यात महत्त्वाचे.
हल्ली प्रत्येकाकडे मोबाईल असतो त्यामुळे ही प्रॅक्टीस प्रचंड सोपी आहे. 2008 पासून मला सवय लागली आहे मी माझ्या बाईकच्या आरशाचा उपयोग फ्रेम म्हणून करतो. कुठेही थांबलो असेल तर त्या आरशातून मागे बघायची मला सवय लागली आहे. मग आरसा हलवत बसायचा व त्याचे चौकोनी आरशात, मागील दिसणारे जग
जास्त कोणत्या अँगलने चांगले दिसेल हे बघत बसायचे ...hehe. तुम्ही म्हणाल काय वेड्याचे चाळे आहेत. पण खरच सांगतो या गोष्टीमुळे चौकोनी प्रेम मध्ये गोष्टी कशा चांगल्या बसवाव्यात हे थोडेफार समजू लागले व ती सवय लागली. हल्ली मोबाईल असल्यामुळे सरळ मोबाईलचा कॅमेरा ऑन करावा व मोबाईलमध्ये
बरेच लोक मला विचारतात कि कोणता कॅमेरा घेऊन डीएस्एल्आर मध्ये कोणता चांगला कॅमेरा आहे?
परंतु माझे उत्तर थोडे वेगळे असतात कारण मी ज्या पद्धतीने माझ्या आयुष्यात शिकत गेलो त्या पद्धतीने मी सांगतो.
पहिल्यांदी कधीच डीएस्एल्आर घेऊ नका असेच मी सांगेन.
अर्थात हल्ली डीएस्एल्आर तीस हजार मध्ये देखील येतो. त्याबरोबर एखादी लेन्स येते शक्यतोवर १८-५५ mm. परंतु खरोखर फोटोग्राफी मध्ये इंटरेस्ट असेल तर त्यामध्ये कोणत्याच प्रकारचे एक्सपिरिमेंट करता येत नाहीत. मग नवीन लेन्स घेणे भाग. तिची कमीत कमी किंमत बारा ते पंधरा हजार पासून असणार
आणि हे सर्व करीत असताना आपल्याला नेमके कोणत्या प्रकारची फोटोग्राफी आवडते याचा स्वतःलाच अंदाज येत नाही. त्यापेक्षा मी तरी असे सुचवतो की सर्वात पहिले हाय एंड डिजिटल कॅमेरा घ्या. त्यामध्ये तुम्हाला प्रचंड झूम मिळतो. हल्ली अक्षरशहा चंद्रावरील खड्डे बघता येतील अशा पद्धतीने झूम मिळतो.
आजच साईबाबा याविषयी बऱ्याच पोस्ट बघितल्या व लोकांच्या कमेंट बघितल्या. परंतु खालील गोष्टीची कल्पना त्यांना असते की नसते हे माहीत नाही. 1. लोकांना वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे महाराज माहिती असतील तर स्वतः टेंबे महाराज यांनी साईबाबा यांना नारळ पाठवल्याचे लिखित रूपात आढळले आहे.
2. लोकमान्य टिळक यांनी ज्याप्रमाणे शेगावचे गजानन महाराज व गोंदवलेकर महाराज यांचे आशीर्वाद आपल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यासाठी घेतले होते तसेच ते शिर्डी येथे जाऊन साईबाबांना भेटल्याचे देखील आढळते.
3. नाशिकचे अत्यंत महान नाथपंथी योगी श्री ब्रह्मभूत गजानन महाराज गुप्ते यांनी
स्वतःच्या आत्मचरित्रात " आत्मसाक्षात्कार मार्ग प्रदीप" यामध्ये लहानपणी साधनेच्या कालखंडात ते शेगाव येथे गजानन महाराज त्याचप्रमाणे मारुती महाराज शिर्डी येथील साईनाथ महाराज यांच्या सहवासात राहिल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे.
माझ्या आयुष्यात पहिला काढलेला फोटो.
माझ्या आईचा. तिसरीत असताना.
ती चिडली होती काही कारणाने माझ्यावर. आणि मी माकड उड्या मारत बसलेलो
तेव्हा बाबांनी हळूच आमचा कॅमेरा दिला माझ्या हातात. आणि हा फोटो क्लिक झाला. #MothersDay#MotherDay2022#photo#PhotoOfTheDay
त्यानंतर राजधानी एक्स्प्रेस मध्ये 1999 मध्ये हा काढलेला
बरेच लोक स्थळ जुळवणे, लग्नामध्ये मध्यस्थी करणे वगैरे वगैरे काम करत बघितलेले आहे. बसल्या बसल्या कुंडल्या जुळवत बसणे. व आपण दोघांचे लग्न जुळवून किती मोठे काम केले आहे असे अत्यंत मानभावीपणाने समजतात आणि सांगतात.
त्यांच्याकडूनच इन्स्पिरेशन घेऊन एकटे, single, bachelor राहण्याची इच्छा असणाऱ्या मुलामुलींसाठी सल्ला *केंद्र किंवा *कोर्स उघडले पाहिजे असे वाटायला लागले आहे 😒😒😒🤣🤣
या कोर्समध्ये खालील गोष्टींचा समावेश करावा असे वाटते.
श्रींच्या कृपेने.. 1. एकटे राहणे फायद्याचे कसे आहे हे त्या इच्छुक मुलाला आणि मुलीला किती समजले आहे हे बघून ते पूर्णपणे मनावर बिंबवणे.😁
2.आजूबाजूच्या लोकांना व्यवस्थित उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद कशी करावी याचे प्रशिक्षण.