मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांमधून त्यांच्या आठवणींना उजाळा देता आला.
विद्यार्थीदशेच्या काळानंतर अनेक वर्षानंतर मला या वास्तूत यायची संधी मिळाली. मुंबईतील काही वास्तू जगप्रसिद्ध आहेत. त्या जगप्रसिद्ध वास्तूंमध्ये मुंबई विद्यापीठाची ही वास्तू अत्यंत महत्त्वाची आहे. इथल्या वास्तूमध्ये हा आगळावेगळा कार्यक्रम आज इथे घेतला जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन तसेच त्यांच्या नावाने काही अभ्यासक्रमही इथे सुरू करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं. आमचे त्यांच्याशी अतिशय घनिष्ट संबंध होते, तसेच आमच्यात संघर्षही होता.
मला आठवतंय, मी पूर्वी खेडगल्ली, दादर येथे राहायला होतो. त्याच काळात नुकतीच शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली होती. ज्यावेळेस राजकारणात माझ्या खांद्यावर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली, त्याचवेळेस शिवसेनेचा महाराष्ट्रभर प्रसार होत होता.
आम्ही दोघांनीही भाषणांमधून एकमेकांवर खूप टीका केली. त्याकाळात आम्ही दिवसभर कुठेही असलो तरी संध्याकाळी एकत्र असायचो. मीनाताई आमच्या आवडीचं जेवण बनवायच्या, तासन् तास आमच्या गप्पा चालायच्या, काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व्हायची.
बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य होतं. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एक नवनेतृत्व तयार केलं. या नेतृत्वातील बहुसंख्य नेते हे सामान्य घरातील होते. ज्यांना आयुष्यात कधीही विधानसभा आणि संसद माहीत नव्हती त्या लोकांना बाळासाहेबांनी मोठमोठ्या पदांवर बसवलं.
त्यामुळे अशा या मोठ्या व्यक्तीचं आज या ठिकाणी छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. अत्यंत देखणं असं हे प्रदर्शन आहे. बाळासाहेब स्वत:ही एक कलाकार आणि व्यंगचित्रकार होते.
त्यांच्या व्यंगचित्रांना एक प्रकारची धार असायची. त्या धारेचा विरोधकांवर जो काही परिणाम व्हायचा त्याची किंमत मलासुद्धा कधीकधी मोजावी लागली.
आज या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करून फोटोग्राफी असोसिएशनने अतिशय उत्तम काम केलं आहे. माझी खात्री आहे की मुंबईकरांसमवेत बाळासाहेबांविषयी आस्था असणाऱ्या लोकांना हे प्रदर्शन पाहून एक वेगळेच समाधान मिळेल.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण आज कळवण, नाशिक येथे होत आहे याचा अतिशय आनंद आहे. एवढ्या मोठ्या सोहळ्यासाठी तुमच्यातील तरूण माणसाने पुढाकार घेतला याचादेखील मला आनंद आहे.
इथल्या सर्व तरूणांची शक्ती मागे उभी राहिली आणि त्यांच्या कष्टातून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे स्मारक उभे करून एक इतिहास घडला. देशाच्या राजकारणात आणि देशाच्या इतिहासात अनेक माणसे होऊन गेली.
पण तीनशे वर्ष झाल्यानंतरही सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये कोणत्या व्यक्तीचे नाव अजूनही आहे हा प्रश्न काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही विचारला तर एकच नाव समोर येते ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपती.
आज एका ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आजचा दिवस हा एका शूरवीर, कर्तृत्ववान अशा व्यक्तिमत्वाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. स्वातंत्र्याच्या आधी या देशात संस्थानिकांची राज्यं होती. तीन-साडेतीनशे वर्षात अनेक संस्थानिक, राजे देशात होऊन गेले.
पण साडेतीनशे वर्षांनंतरही ज्या राजाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात, लोकांच्या अंतःकरणात आजही आहे, असे एकच राजे आहेत ज्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज.. राजे होते पण त्यांची खरी ओळख होती ती म्हणजे रयतेचा राजा, सामान्य माणसांचा राजा.. आणि त्यांचे आज स्मरण करण्याचा दिवस आहे.
मला आनंद आहे की सामान्यांसाठी सत्तेचा वापर हे सूत्र घेऊन ज्यांनी कारभार केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आपण करत आहोत आणि
मुंबई ड्रायफ्रुटस् आणि डेट्स मर्चंट्स असोसिएशनतर्फे नवी मुंबई येथे बेदाणे जाहीर लिलाव सौदे बाजाराचे उद्घाटन करून आनंद वाटला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.
एक काळ असा होता की आपले सगळे बाजार हे मुंबई शहरात होते. ते स्थलांतरित करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यावेळी विरोधही झाला. व्यावहारिक नुकसान होईल अशी चिंता व्यापाऱ्यांना होती. परंतु आम्ही लोकांची सातत्याने समजूत काढली आणि कृषी बाजार समितीचे कामकाज या प्रांगणात आणले.
चौदा दिवसात लाखोंचा व्यवहार हा कोट्यवधींचा व्यवहार झाला. शेतकऱ्यांचा फायदा झाला, व्यापाऱ्यांचा फायदा झाला. कष्ट करणारा माथाडी कामगार जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतो, विशेषतः सातरा, सांगली, पुणे या भागातून आलेल्या माथाडी कामगारांच्या जीवनात एक प्रकरची स्थिरता आली.
जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा होत असलेला हा सन्मान आनंददायी आहे.
जीवनाच्या विविध क्षेत्रात प्रतिकूल परिस्थिती असतानाही ज्या महिलांनी आपले कर्तृत्व दाखवले, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला आणि त्या रस्त्याने जाऊ पाहणाऱ्या इतर भगिनींना प्रोत्साहित करण्याचे काम या माध्यमातून केल्याबद्द्ल @ChakankarSpeaks व त्यांच्या सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो.
लोकांचा महिलांच्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा सुधारेल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कर्तृत्व हे फक्त पुरूषांमध्ये असते यावर माझा विश्वास नाही. संधी दिली, प्रोत्साहन दिलं तर समाजातील ५० टक्के वर्गदेखील कर्तृत्व दाखवण्यात कधी मागे राहत नाही. #InternationalWomensDay
कसबा पोटनिवडणुकीचे विजयी उमेदवार श्री. रविंद्र धंगेकर यांनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. #pressconference bit.ly/41PxHIU
कसबा पोटनिवडणुकीत यश मिळेल असे आम्हाला सामान्यांमधून ऐकण्यात मिळत होते. पण मला याची खात्री नव्हती, त्याचे मुख्य कारण नारायण, सदाशीव, शनिवार हे होते. हा सर्व भाग भाजपचा गड आहे असे अनेक वर्षे बोलले जाते. तसेच याठिकाणी बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनीधित्व केले होते.
बापट यांचे वैशिष्ट्य असे की त्यांचे भाजपची विचारधारा न मानणारा जो पुण्यातील वर्ग आहे त्या सर्वांशी मैत्रीचे संबंध त्यांनी ठेवले आहेत. त्यामुळे बापट यांचे लक्ष ज्याठिकाणी अधिक केंद्रीत आहे तो मतदारसंघ आपल्याला जड जाईल असा अंदाज आमचा होता.
आज नई दिल्ली में हुई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विस्तारित राष्ट्रीय कार्य समिति बैठक में उपस्थित पार्टी के सहकारी मित्रों से संवाद साधा। #NCP
साथियों, पुरे विश्व में कोरोना की समस्या होने के कारण आज जैसे हम इकठ्ठा हुए ऐसी स्थिति दो सालों में नही थी। भारत सरकारने कुछ गाइडलाइन्स दी थी।
बैठक लेने के लिए कुछ रुकावटे आई थी, इसिलिए उस कठिन समय में हम लोग मिल नहीं सके। मुझे खुशी है की आज बड़े पैमाने पर हम सब वर्किंग कमिटी की बैठक के लिए इकठ्ठा हुए है। और पिछले दो सालों में राष्ट्रीय अधिवेशन हम नहीं ले सके वही अधिवेशन लेने का मौका हमें मिल रहा हैं।