आपल्या सध्याच्या सनातन धर्मात दुफळी का आहे याचे कारण शोधायचा प्रयत्न करत होतो.
खरे तर सनातन धर्म म्हणजे सर्वव्यापी.
याच ठिकाणी एकमेकाच्या मतांना आव्हान देणारी दर्शनांची निर्मिती झाली. प्रत्यक्षात कोणी किती दर्शने वाचली आहेत हे मला माहीत नाही. परंतु मुल सनातन धर्मात किती पद्धती
आणि प्रकार आहेत हे देखील लोकांना माहीत आहे की नाही याबद्दल मला कल्पना नाही. परंतु केवळ आपल्या बायो मध्ये सनातनी असे नाव लावले की काम झाले असे प्रत्येकाला वाटते. सनातन धर्म याचे प्रमुख साहित्य मानले जाते ते म्हणजे वेद.
या वेदांना धरूनच अनेक दर्शनाची निर्मिती झाली.
तर वेदांना धरुन असणाऱ्या साहित्याला आपल्या भारतात वैदिक अशी मान्यता मिळते. परंतु जे वेदांना मानत नाहीत त्यांना देखील आपल्याकडे तेव्हढीच मान्यता आहे. असे महान आहे भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्म.
तर आता आपण वेदांना कोण मानत नाही हे प्रकार पहिल्यांदा बघू. Buddhism, चार्वाक याची चरक संहिता, जैन तत्वज्ञान आणि अजीवक तत्वज्ञान. चरक संहिता ही पूर्णपणे नास्तिकता वाद याला धरून आहे. ब्रह्म असेल किंवा नसेल या गोष्टीवर चार्वाक अजिबात आयुष्याचा वेळ घालवण्यासाठी सांगत नाही.
जे समोर आहे त्याचा उपभोग घ्या. हेच आयुष्य आहे. बाकी वैदिक तत्वज्ञान यांच्यावर तो कडाडून टीका करतो. चार्वाक जर अस्तिक माणसाने मनापासून वाचला तर त्याला देखील तो प्रचंड भावेल. एका अस्तिकाला देखील नास्तिक बनवण्याची ताकद आहे त्याच्या शब्दात. इतक्या जबरदस्त पद्धतीने तो नास्तिकता वाद
समजावून सांगतो.
त्यानंतर Buddhism.
यामध्ये प्रत्यक्ष गौतम बुद्ध यांनी फार काही सांगितले नाही परंतु बुद्धांच्या नंतर जे कोणी विद्वान आले त्यांचे साहित्य जास्त प्रमाण मानले जाते. यामध्ये वेदा मधून काही गोष्टी घेण्यात आलेले आहेत जसे की आचरण कसे असावे किंवा विविध ध्यानपद्धती.
पुढे नागार्जुन याने मांडलेली शून्यता वादाची concept. अर्थात त्याला स्वतःच्याच लोकांनी विरोध केला. कारण तो शून्यता वाद हा वेदांता मधील ब्रह्म याचेच स्वरूप आहे.
परंतु मुख्यतः आयुष्यामधील दुःख असण्याचे कारण आणि ते दूर करण्याचे कारण हे Buddhism शिकवतो.
या अवैदिक साहित्याला देखील सनातन धर्म तितकाच मान देतो. आता वैदिक साहित्य आहे त्यामध्ये देखील एकमेकात विरोधी मध्ये आहेतच.
तर कोणत्या प्रकारची वेगवेगळी वैदिक मते आहेत?
अद्वैत वेदांत, सांख्य शास्त्र, न्याय, विशिष्ट आद्वैत, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, द्वैत वेदांत,
पातंजल
योगसुत्रे, काश्मिरी शैव या वेदांवर आधारीत साहित्यामध्ये देखील प्रचंड खोल अभ्यास करून एकमेकावर केलेली प्रचंड टीका आहे. एकमेकांच्या विरुद्ध मते आहे.
परंतु आपण याचा अभ्यास खरोखर किती केलेला असतो? कोणत्या आधारावर आपण स्वतःला सनातनी म्हणतो? केवळ भगवे झेंडे आणि मी सनातनी आहे हे बायो
मध्ये लिहिणे परंतु वरील कोणाच्याच दर्शना बाबत अगदी बेसिक माहिती नसताना असे लिहिणे हे किती योग्य आहे?
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःच्याच संस्कृतीबाबत व इतक्या प्रचंड मोठ्या तत्वज्ञानावर बाबत काहीच जाणत नाही. व्हॉट्सऍप वर आलेल्या लेखन शिवाय अजून स्वतःहून कोणताच अभ्यास करू
इच्छित नाही. मग अभिमान धरायचा तरी कसला?
दुसरी महत्त्वाची गोष्ट ही असते की एकमेकांच्या विचारांचे खंडन अत्यंत विचाराने व संयमाने आणि ज्ञानाने करणे. परंतु मुळात आपण स्वतःला काहीच वाचले नसल्यामुळे एखाद्या व्यक्तीने मत मांडले आहे
तर त्याला फक्त विरोधासाठी विरोध करायचा आहे याला अर्थ काय?
शंकराचार्यांनी स्वतः वाद-विवाद घातले प्रत्येक प्रकारच्या तत्वज्ञानाच्या ज्ञानी लोकांबरोबर. प्रत्येक वाद-विवाद जिंकला. अद्वैत वेदांत हा श्रेष्ठ आहे हे त्यांनी सर्व वादविवादात दाखवून दिले. त्यानंतर तीनशे ते चारशे वर्षांनंतर
रामानुजन शास्त्रे यांनी विशिष्ट आद्वैत यामधून शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांत यावर टीका लिहिली आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिलेली आहे.
परंतु येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे यामध्ये व्यक्तीच्या तत्त्वज्ञानावर टीका आहे व्यक्तीवर नाही.
शंकराचार्यांनी देखील त्यांच्या काळातील विद्वानांच्या ज्ञानाबरोबर वादविवाद केले परंतु त्या विद्वानांचा वैयक्तिक अपमान कधी केला नाही.
परंतु आत्ताच्या काळातील स्वतःला सनातनी म्हणवणारी व्यक्ती बुद्धीने वाद घालण्यापेक्षा व केवळ विचारांवर वाद घालण्यापेक्षा
पर्सनल अटॅक जास्त करते.
उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी मी साईबाबांवर ती एक लेख माझ्या माहितीनुसार लिहिला होता त्यावर कोणतेही प्रत्यक्ष पुरावे न देता मी कसा सनातनी आहे हे सांगण्यात लोकांना जास्त स्वारस्य होते. किंवा स्वामी विवेकानंद नॉनव्हेज खात होते म्हणून ते कसे हिंदू नाहीत हे
सांगण्या मध्ये लोकांना स्वारस्य होते परंतु स्वामी विवेकानंदांच्या विचाराबरोबर त्यांची वाद घालण्याची इच्छा नाही आणि शक्तीही नाही.
ज्याप्रमाणे मडके भरलेलं असेल तरच वाचते किंवा उथळ पाणी असते तेथेच त्याचा खळखळाट असतो त्याच पद्धतीने ज्ञान घेतले नसले तरच अशा पद्धतीने
पर्सनल अटॅक केले जातात.
जर का खरोखर सनातन धर्माचे मान उंच करायची असेल तर या विविध प्रकारच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करणे फार गरजेचे आहे.
त्यामुळे स्वतःची बैठक स्थिर होईलच पण त्याचबरोबर कोणाशीही तोंड देताना, वाद घालताना वाकडेपणा येणार नाही. #mayurthelonewolf
अथर्वशीर्ष खूप जणांना पाठ असेल.
अथर्ववेद याचा भाग असलेल्या हे गणेशाचे वर्णन.
पण त्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा शांतपणे गणपती समोर बसून आपण त्याच्याशी अथर्वशीर्षाच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून संवाद करतो.
जरी आपल्या समोर सगुणरूपी गणपतीची मूर्ती असेल तरी जसा म्हणण्यामागे भाव येत जातो तसे हळूहळू निर्गुण गणेशा कडे वाटचाल होण्यास सुरुवात होते. मग अथर्वशीर्ष म्हणणे हे केवळ यांत्रिक राहत नाही. प्रत्येक ओवी किंवा वाक्य म्हणताना त्याचा अनुभव येत जातो.
अथर्वशीर्ष हे जास्त करून तर निर्गुण गणेश, ओंकार रूपे गणेश याचेच वर्णन करते.
सुरुवातीची जवळपास सर्व ओव्या ह्या निर्गुण गणेशाच्या स्तवना साठी वापरलेली आहेत.
जागृत जीवन आणि स्वप्न यात अंतर नसते.
तुम्ही तुमच्या आयुष्यात घडलेला कोणताही प्रसंग आठवायचा प्रयत्न करा आणि तुमचे कोणतेही स्वप्न आठवायचा प्रयत्न करा.
दोन्ही ची माहिती एकाच स्वरूपात साठवलेली असते. दोन्ही thoughts असतात. एकदा हा चालू क्षण संपला की स्वप्न आणि त्यात काहीच अंतर नसते.
तुम्ही कधीतरी हे स्थापित देखील करू शकत नाही की नक्की मी आठवलेली ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडली होती का मी ती स्वप्नात बघितली होती. कारण दोन्ही गोष्टी घडून गेल्यानंतर त्या मेमरी झालेले असतात. जेव्हा कधीही आपण ते आठवायचा प्रयत्न करू त्यावेळेला विचाराच्या स्वरूपातचते आपल्यासमोर येतात
त्यामुळे आपण जागृतावस्थेत जगलेले जीवन आणि स्वप्नामध्ये जगलेले जीवन यामध्ये काही अंतर राहतच नाही.
आयुष्यात या रोज आपण अनुभवणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण त्यांच्याकडे कदाचित कधी निरखून बघत नाही. प्रचंड बिझी आयुष्य आपण जगत असतो आणि स्वतःच्या आत डोकवायला वेळ मिळत नाही.
A stolen life: Jaycee dugard...
The girl who was kidnapped for 18 years.
हे पुस्तक वाचले तर पुढे काही दिवस झोप येणार नाही किंवा प्रचंड अस्वस्थ असाल.
खऱ्या घटनेवर आधारित पुस्तक माझ्या हातात तीन वर्षांपूर्वी पडले. जगामधील सगळ्यात मोठी म्हणजे अठरा वर्ष किडन्याप केल्या गेलेल्या
मुलीने लिहिलेले पुस्तक आहे हे.
Jaycee dugard नावाची एक सुंदर छोटी अकरा वर्षाची मुलगी शाळेमध्ये जात असताना तिला एका व्यक्तीने किडनॅप केलेले. त्यानंतर ते 18 वर्ष त्या माणसाच्या ताब्यात होती. तिचा अकरा वर्षाचा असताना
चा फोटो या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती आहे. वय वर्ष 29 झाल्यावर तिची सुटका झाली आणि ती देखील अत्यंत आश्चर्यकारक आणि आपल्याला विचार करायला लावणाऱ्या पद्धतीमुळे.
तो माणूस आणि त्याची बायको या दोनच व्यक्ती जेसी क्या आयुष्यात होत्या त्या 18 वर्षात. तो माणूस प्रचंड
ओम
या शब्दाला आपल्याकडे प्रचंड महत्त्व आहे. याचा अर्थ विविध प्रकारे सांगण्यात येतो. परंतु एक उपनिषद खास या शब्दासाठी तयार केले गेले आहे ते म्हणजे मांडक्योपनिषद.
अ ऊ म या तीन अक्षरांचा व त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा अर्थ या उपनिषदात सांगण्यात आला आहे.
तर हे उपनिषद काय सांगते? केवळ 12 श्लोक असलेले हे उपनिषद्. यामध्ये कोणत्याही दैवतांची चर्चा नाही, आपण रोज जे काही अनुभवतो त्या गोष्टींचा आधार घेऊन ब्रह्म म्हणजेच परमेश्वर काय आहे तो सांगण्याचा प्रयत्न यात आहे. अद्वैत वेदांत किंवा उपनिषदांची खासियत हीच.
रोजच्या रोज आपण जे काही अनुभवतो त्याचा आधार घेऊन बुद्धीच्या द्वारे त्याच्या खोलात शिरून त्याचा नक्की अर्थ काय हे समजून घेणे.
तर मांडक्योपनिषद हे सांगते आपल्या तीन अवस्था ज्या आपण रोज अनुभवतो 1. जागृतावस्था: आपण रोज दिवसभरात जे काही करत असतो ते म्हणजे जागृत अवस्था 2. स्वप्नावस्था:
#फोटोग्राफी_टीप #photography_tip #thelonewolfotos
कॅमेरा पेक्षा खरा फोटोग्राफर फ्रेमींग बघतो. म्हणजे फोटो च्या आत कोणती वस्तू कशी आहे कोणत्या जागी आहे. याचा अभ्यास आयुष्यभर केला तरी संपत नाही असे मोठे फोटोग्राफर सांगत असतात.
त्यामुळे कंपोजीशन किंवा फ्रेमिंग सगळ्यात महत्त्वाचे.
हल्ली प्रत्येकाकडे मोबाईल असतो त्यामुळे ही प्रॅक्टीस प्रचंड सोपी आहे. 2008 पासून मला सवय लागली आहे मी माझ्या बाईकच्या आरशाचा उपयोग फ्रेम म्हणून करतो. कुठेही थांबलो असेल तर त्या आरशातून मागे बघायची मला सवय लागली आहे. मग आरसा हलवत बसायचा व त्याचे चौकोनी आरशात, मागील दिसणारे जग
जास्त कोणत्या अँगलने चांगले दिसेल हे बघत बसायचे ...hehe. तुम्ही म्हणाल काय वेड्याचे चाळे आहेत. पण खरच सांगतो या गोष्टीमुळे चौकोनी प्रेम मध्ये गोष्टी कशा चांगल्या बसवाव्यात हे थोडेफार समजू लागले व ती सवय लागली. हल्ली मोबाईल असल्यामुळे सरळ मोबाईलचा कॅमेरा ऑन करावा व मोबाईलमध्ये
बरेच लोक मला विचारतात कि कोणता कॅमेरा घेऊन डीएस्एल्आर मध्ये कोणता चांगला कॅमेरा आहे?
परंतु माझे उत्तर थोडे वेगळे असतात कारण मी ज्या पद्धतीने माझ्या आयुष्यात शिकत गेलो त्या पद्धतीने मी सांगतो.
पहिल्यांदी कधीच डीएस्एल्आर घेऊ नका असेच मी सांगेन.
अर्थात हल्ली डीएस्एल्आर तीस हजार मध्ये देखील येतो. त्याबरोबर एखादी लेन्स येते शक्यतोवर १८-५५ mm. परंतु खरोखर फोटोग्राफी मध्ये इंटरेस्ट असेल तर त्यामध्ये कोणत्याच प्रकारचे एक्सपिरिमेंट करता येत नाहीत. मग नवीन लेन्स घेणे भाग. तिची कमीत कमी किंमत बारा ते पंधरा हजार पासून असणार
आणि हे सर्व करीत असताना आपल्याला नेमके कोणत्या प्रकारची फोटोग्राफी आवडते याचा स्वतःलाच अंदाज येत नाही. त्यापेक्षा मी तरी असे सुचवतो की सर्वात पहिले हाय एंड डिजिटल कॅमेरा घ्या. त्यामध्ये तुम्हाला प्रचंड झूम मिळतो. हल्ली अक्षरशहा चंद्रावरील खड्डे बघता येतील अशा पद्धतीने झूम मिळतो.