काही दिवसांपूर्वी माझी भेट घेण्यासाठी काही लोकांना विनंती केली होती. श्री. दवे यांनी यासंदर्भात वेळ मागितला होता. त्यानंतर आमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना याची कल्पना देऊन त्यांनाही या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले. #pressconference#Pune
जिल्हाध्यक्षांकडून समजले की, दवेच नाही तर महाराष्ट्रातील अन्य ठिकाणाहूनही अनेक लोक भेट घेण्यासाठी इच्छुक आहे. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांतून नऊ ते दहा संघटनांचे साधारण ४० लोक आले होते. ज्यामध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आले.
त्यापैकी त्यांच्यात माझ्या पक्षातील काही सहकाऱ्यांनी विधाने केली त्यासंबंधीची अस्वस्थता होती.याबद्दल त्यांना सांगितले की, पक्षांतर्गत त्या विधानांविषयी चर्चा झाली असून अशा पद्धतीने पुन्हा कोणत्याही जाति-धर्मावर न बोलता धोरणात्मक कार्यक्रमावर बोलण्याचा अधिकार आहे असा निर्णय झाला.
त्यामुळे भेटीसाठी आलेल्या सर्व मंडळींनी हा विषय इथेच संपवावा, असे बैठकीदरम्यान मी सांगितले. अलिकडच्या काळात ग्रामीण भागातील ब्राह्मण समाजाचा वर्ग हा नागरी भागात जास्त येतोय. त्यामुळे नोकरीमध्ये संधी मिळवण्यासाठी आरक्षण मिळावे ही त्यांची दुसरी मागणी होती.
मात्र साधारणत: महाराष्ट्रातील आणि केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार अशा नागरी भागातील नोकऱ्यांचे लोकसंख्येतील प्रमाण पाहता मला स्वत:ला याठिकाणी आरक्षणाचे सूत्र बसेल असे वाटत नाही, असे मत मी बैठकीत मांडले. आरक्षण हे कोणालाच देऊ नका अशी बैठकीला आलेल्यांची भूमिका होती.
मात्र असे करता येणार नाही. देशातील दलित, आदिवासी, ओबीसी या घटकाला आरक्षण हे द्यावेच लागेल. हा वर्ग शैक्षणिक आणि प्रगतीसंदर्भात मागे राहिलेला आहे. त्यामुळे इतर समाजाच्या स्तरापर्यंत हा वर्ग येईपर्यंत आरक्षणाची अशी चर्चा करता येणार नाही.
त्यामुळे आरक्षणाला तुम्ही विरोध करू नये असे मत मी त्यांच्यापुढे मांडले. विविध समाजांना विकासाला अथवा व्यवसायाला मदत करण्यासाठी विविध महामंडळे आहेत. तशा प्रकारचे महामंडळ ब्राह्मण समाजासाठी स्थापन व्हावे अशी तिसरी मागणी त्यांनी मांडली.
त्याला परशुराम हे नाव सुचवण्यात आले आहे. मात्र हा प्रश्न माझ्या संबंधात नसून राज्य सरकारशी निगडीत आहे. त्यामुळे संदर्भात मुख्यमंत्र्यांना याची माहिती देऊन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागू, असे मी सर्वांना आश्वस्त केले. यानंतर ही बैठक संपली.
माझ्या मते राज्यात वातावरण खराब होईल असे वाटत नाही. पण जबाबदार लोकांनी, जबाबदार राजकीय पक्षाच्या घटकांनी केलेल्या काही विधानांच्या संबंधी एखादा वर्ग किंवा समाज अस्वस्थ होऊ शकतो. त्यात गैरसमज असतील तर जाणकारांनी ते दूर करण्याची काळजी घ्यावी.
तसेच अशी स्थिती होणार नाही याचीही काळजी घ्यावी, अशीच चर्चा ही आजच्या बैठकीत दोन्ही बाजूकडून झालेली आहे. पेट्रोल-डिझेल इम्पोर्ट केल्यानंतर पहिला टॅक्स हा केंद्र सरकार घेतं. या टॅक्सची लिमिट हे केंद्र करतं. त्यानंतर राज्ये करतात.
पहिला टॅक्स जो केंद्राचाच इतका होता की त्यामुळे राज्य सरकारला आपला टॅक्स वाढवावा लागत होता किंवा कमी करण्यासाठी स्कोप नव्हता.
आता राज्यावर अजिबात संकट येणार नाही इतका जर केंद्र सरकारने टॅक्स कमी केला असेल तर त्याचा परिणाम होईल. नाहीतर ठीक आहे, अजिबातच नाही म्हणण्यापेक्षा एक पाऊल टाकले एवढाच निष्कर्ष काढता येईल.
राज्यसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकच जागा आहे. ही जागा निर्वाचित करण्यासाठी आवश्यक नंबर आमच्याकडे आहे. एक जागा निवडून देऊनही काही मते शिल्लक आहेत. दोन वर्षांपूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी सुद्धा एकच जागा मिळत होती.
मात्र मी मुख्यमंत्र्यांना दोन जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात अशी विनंती केली. तेव्हा मी व फौजिया खान दोघांच्या जागा होत्या. त्यामुळे शिवसेनेने त्यावेळी माघार घेतली. मात्र पुढच्यावेळी दुसरी जागा ही शिवसेनेला द्यावी ही मागणी त्यांनी केली ती आम्ही मान्य केली.
त्यामुळे एक जागा लढवून उर्वरित मतही शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय कोणालाही देऊ शकत नाही. शिवसेना जे नाव देईल त्याला आमचा पाठिंबा असेल.
महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था या सगळ्या मूलभूत प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून नवे प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. त्याचा सामान्य माणसाला काही फरक पडत नाही.
सामान्य माणसाला प्रश्न आहे त्याच्या मुलाच्या नोकरीचा, त्याचा प्रपंच चालवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्या किमतीचा प्रश्न आहे. हे प्रश्न आजचे केंद्रातले राज्यकर्ते सोडवू शकत नाहीत.
त्यामुळे नाही त्या गोष्टींना लक्ष्य करून कारण नसताना समाजा समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतोय. कोर्टाने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत असे केवळ मत नमूद केले आहे, त्यांचा हा निर्णय नाही. गेली अनेक वर्षे मी नवाब मलिक यांना ओळखतो.
माझ्या मनात मलिक यांच्या इंटेग्रिटीबद्दल अशा चुकीच्या लोकांशी संबंध ठेवण्यासंबंधी विश्वास नाही. असे आरोप केले जातात. याचे उदाहरण मी स्वत: आहे. माझ्यावरही असेच अनेक आरोप केले होते.
शेवटी ज्यांनी आरोप केले त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी विधिमंडळात भाषण करून सांगितले की आम्ही जी टीका करत होतो त्यात काही तथ्य नाही. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून बोलत होतो. माझी खात्री आहे संपूर्ण चित्र समोर आल्यानंतरच नवाब मलिक यांची स्थिती स्पष्ट होईल.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
वानवडी, पुणे येथे महात्मा फुले सांस्कृतिक भवनात 'व्यापाराचे विद्यापीठ' या पुस्तकाचे प्रकाशन करताना आनंद वाटला.
दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक तयार झाले आहे.
व्यापारी समाज हा कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशाच्या विविध प्रांतांतून कित्येक पिढ्या आधी पुणे भागामध्ये येऊन स्थिरावला. महाराष्ट्र भूमी हीच आपली भूमी मानून उद्योग व्यवसायांमध्ये लौकिक कमावला. त्यामुळे पुण्यातील अर्थकारणाला चालना मिळाली.
पुण्याचा शिक्षण क्षेत्रात लौकिक आहेच. व्यापाराचे विद्यापीठ या ग्रंथाच्या प्रकाशनाने व्यापारी क्षेत्राच्या ज्ञानात मोलाची भर घालणारे म्हणून देखील पुणे शहराचा नावलौकिक होईल. या पुस्तकातील प्रत्येकाची जीवनगाथा जिद्द, प्रामाणिकपणा, कष्ट, सकारात्मकता, शिस्त, चिकाटी हे गुण दर्शवते.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणाऱ्या छायाचित्रांमधून त्यांच्या आठवणींना उजाळा देता आला.
विद्यार्थीदशेच्या काळानंतर अनेक वर्षानंतर मला या वास्तूत यायची संधी मिळाली. मुंबईतील काही वास्तू जगप्रसिद्ध आहेत. त्या जगप्रसिद्ध वास्तूंमध्ये मुंबई विद्यापीठाची ही वास्तू अत्यंत महत्त्वाची आहे. इथल्या वास्तूमध्ये हा आगळावेगळा कार्यक्रम आज इथे घेतला जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन तसेच त्यांच्या नावाने काही अभ्यासक्रमही इथे सुरू करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे हे एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं. आमचे त्यांच्याशी अतिशय घनिष्ट संबंध होते, तसेच आमच्यात संघर्षही होता.
प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. गेली अनेक वर्षे नेत्रचिकित्सा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. तात्याराव लहानेंमार्फत आता हे नवीन नेत्रालय उभे राहत आहे.
ही आपल्या राज्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या नवीन नेत्रालयामार्फतही गरजूंना दृष्टिदान करण्याचे काम डॉ. लहाने अखंडपणे करत राहतील, असा माझा ठाम विश्वास आहे.
डॉ. लहानेंची एक इच्छा होती की, मुंबईमध्ये एक उत्तम नेत्रालय असावे. त्यांची ती इच्छा आज पूर्ण झाली. या नेत्रालयाचे नाव त्यांनी रघुनाथ नेत्रालय ठेवले आहे. रघुनाथराव हे माझे सहकारी होते. सध्या ते हयात नाहीत.
नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व राजकीय हेतूने कारवाई केली गेली आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना यातना देण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला जात आहे. गेली २० वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक आहेत. या काळात नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले नाहीत.
एखादा मुस्लिम कार्यकर्ता दिसला की त्याला दाऊदचा जोडीदार बोलायचं. कारण नसताना हे आरोप केले जात आहेत.
कधीकाळी माझ्यावरही असेच आरोप झाले होते. हे लोक या पद्धतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्याची चिंता करण्याचे कारण नाही.
नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रिमंडळातून काढा, अशी मागणी केली जात आहे. मलिक यांना अटक झाली हे खरं. परंतु सिंधुदुर्गातील आमचे जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहण्यात आले नाही.
आज पुणे येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलो असता पत्रकारांशी संवाद साधला. युक्रेन-रशिया संघर्ष आणि इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका यावेळी व्यक्त केली.
युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना देशात आणण्यासाठी भारत सरकार व दुतावासाने काही प्रयत्न केले आहेत. काल रशियाच्या सीमेपासून पाच तासांवर असलेल्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी फोनवरून संवाद साधला. परराष्ट्र मंत्र्यांशीही माझे बोलणे झाले आहे.
केंद्र सरकार या मुलांना परत आणण्यासाठी जे जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही अजून विद्यार्थी तेथे आहेत. भारतीय दुतावासाने त्यांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर युक्रेनच्या सीमेबाहेर येता येईल असा प्रयत्न करा.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ सुवर्ण महोत्सव अधिवेशन कार्यक्रमास आज उपस्थित होतो. या कार्यक्रमानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या संस्था चालकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
स्व. वसंतदादा पाटील यांच्या विचारांमधून हे दालन उभे राहिले. महाराष्ट्र हे शैक्षणिक संस्थेचे प्रमुख द्वार असलेले राज्य आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये शिक्षणाचा विस्तार झाला, मात्र याची प्रामुख्याने जबाबदारी त्या त्या राज्यातील राज्य सरकारने उचलली आहे.
केरळसारख्या राज्यात गेलात तर खासगी शिक्षण संस्था ही संकल्पानाच कोणाला माहिती नाही. याउलट महाराष्ट्राचा अनेक वर्षांचा इतिहास पाहिला तर ज्ञानदानाच्या कामाशी संबंधित जबाबदारी ही प्रामुख्याने एका बदलानंतर खासगी शिक्षणसंस्थांनी स्वीकारली आहे.