भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या २०२० च्या आकडेवारीनुसार, जवळपास १३.६ दशलक्ष भारतीय भारताबाहेर राहतात. या संख्येतील सर्वात मोठा हिस्सा, ३४ लाख लोकं संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २५ लाख लोकं सौदी अरेबियामध्ये आणि अमेरिकेत १३ लाख भारतीय राहतात.
तसेच कुवेतमध्ये १० लाख, ओमानमध्ये ७.७९ लाख आणि कतारमध्ये ७.५६ लाख भारतीय राहतात. थोडक्यात काय, तर परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, बहुसंख्य NRIs, जवळजवळ ७.६ दशलक्ष मध्य पूर्व म्हणजेच आखाती (Gulf) अर्थातच मुस्लिम देशात राहतात. हे भारतीय आपल्या देशात परकीय चलन आणतात जे की मोठं काम आहे.
२०१७ मध्ये, आखाती देशांमधून भारतात ३७ अब्ज डॉलर्स पाठवले गेले. आखाती देश लाखो भारतीयांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देतात आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फलदायी असतात. दूर्दैवाने, भाजपातील काही मुख्य लोकं द्वेषापोटी मूर्खपणे काही ही बरळतात आणि परिणामी भारताची बदनामी होते.
मग पुढं सर्व बाजूने #Boycott चं रडगाणं सुरु होतं. खरंतर, भारताने १९९० साली LPG - खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण स्वीकारलंय आणि त्याचा भारताला तसेच आपल्या देशाकडून जगाला भरपूर फायदा झालाय. २१वं शतक धार्मिक राजकरण करण्याचे नसून माणूसकी जपत विकासाचे राजकारण करण्याचे आहे.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
“एक लक्षात घेतले पाहिजे की, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, तो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे केला आणि तो तसा करणे आवश्यक होते. याचा अर्थ शिवाजी महाराजांचे राज्य फक्त हिंदूंकरिता निर्माण झाले असे नाही. शिवरायांचे राज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. #ShivrajyabhishekDin#Shivray
आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रापासून पूर्णपणे फारकत न घेता शास्त्र व परंपरा सांभाळून महाराजांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर सर्व देशातल्या भूमिपुत्रांना आश्वस्त केले. या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे.”
- डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक #ShivajiMaharaj
सांस्कृतिक संघर्ष उभा राहवा म्हणून काहीजण त्यांच्या पद्धतिने/सोयाने मुद्दे मांडतात परंतु ते जनसामन्यांना पटत नाही कारण आता लोक तेवढे चिकित्सक नक्कीच झाले आहेत आणि त्यात डॉ. जयसिंगराव पवार सरांसारखे ज्येष्ठ इतिहास संशोधक असल्यामुळे आपल्या सर्वांपुढे खरा इतिहास समोर येतो.