Pradnyesh Molak (Saaku) Profile picture
Creative Director @zivastudios | Budget Traveller | Activist | Observer | Slow Life | #ZindagiVasool
May 7, 2023 7 tweets 3 min read
“एक दिवस आम्ही अदृश्य होऊ,” असे तुवालू - Tuvalu देशाचे नागरिक गेली काही वर्ष म्हतायत. समुद्र सर्व वाळू खात आहे. पूर्वी तिथे वाळू लांब लांब पसरली जायची, आणि लोकांना तिथे पोहताना कोरल दिसायचे. आता सर्व वेळ ढगाळ वातावरण आहे आणि कोरल पण मरण पावले आहेत. तुवालू बुडत आहे. ImageImageImageImage हे सगळं वाचून भितीदायक वाटतं ना? खरंच तुवालू बुडत आहे. तुवालू हा देश म्हणजे जगातील किमान भेट दिलेला देश आहे. केवळ २००० लोकं वर्षभरातून तुवालूला भेट देतात (फेसबुकवरसुद्धा फक्त १० हजार लोकांनी तिथं check in केलंय).

तुवालू हा दक्षिण पॅसिफिकमधील नऊ लहान बेटांचा गट आहे
Jun 6, 2022 4 tweets 1 min read
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या २०२० च्या आकडेवारीनुसार, जवळपास १३.६ दशलक्ष भारतीय भारताबाहेर राहतात. या संख्येतील सर्वात मोठा हिस्सा, ३४ लाख लोकं संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २५ लाख लोकं सौदी अरेबियामध्ये आणि अमेरिकेत १३ लाख भारतीय राहतात. तसेच कुवेतमध्ये १० लाख, ओमानमध्ये ७.७९ लाख आणि कतारमध्ये ७.५६ लाख भारतीय राहतात. थोडक्यात काय, तर परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, बहुसंख्य NRIs, जवळजवळ ७.६ दशलक्ष मध्य पूर्व म्हणजेच आखाती (Gulf) अर्थातच मुस्लिम देशात राहतात. हे भारतीय आपल्या देशात परकीय चलन आणतात जे की मोठं काम आहे.
Jun 6, 2022 4 tweets 2 min read
“एक लक्षात घेतले पाहिजे की, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, तो हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे केला आणि तो तसा करणे आवश्‍यक होते. याचा अर्थ शिवाजी महाराजांचे राज्य फक्त हिंदूंकरिता निर्माण झाले असे नाही. शिवरायांचे राज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते.
#ShivrajyabhishekDin #Shivray आणि म्हणून हिंदू धर्मशास्त्रापासून पूर्णपणे फारकत न घेता शास्त्र व परंपरा सांभाळून महाराजांनी महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर सर्व देशातल्या भूमिपुत्रांना आश्‍वस्त केले. या देशात आता भूमिपुत्रांचे राज्य निर्माण झाले आहे.”
- डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक
#ShivajiMaharaj