Dasarp Edihb Profile picture
Jun 15 9 tweets 7 min read
#मराठा_आरक्षण मोर्चाच्या वेळी स्टेजवरून एक मुलगी "आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही" असं तत्कालीन मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांना म्हणत होती तेव्हा आपण गप्प होतात, #सुप्रियाताई. मुख्यमंत्र्याला असं म्हणणं म्हणजे #महाराष्ट्राचा_अपमान आहे असं आपल्याला तेव्हा वाटलं नव्हतं. १/९
आज तुमच्या #अजितदादा ला, म्हणजेच उपमुख्यमंत्र्याला भाषण करायला मिळालं नाही तर तुम्हाला तो #महाराष्ट्राचा_अपमान वाटतोय? वा ताई वा! भले शाब्बास.

उपमुख्यमंत्री हे संविधनिक पद नाही. प्रोटोकॉलमधे त्याचा विचार झालाच पाहिजे अशी सक्ती नसावी. २/९
तरीही भाषणासाठी #पंतप्रधान #नरेंद्र_मोदी यांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मोदींनी खुणेनेच अजितदादांना बोलण्याचं सुचवलं परंतु त्यांनीच नकार दिला हे कॅमेरात स्पष्ट दिसतं. ३/९
तुम्हाला प्रश्न विचारायचाच असेल तर "ज्यांच्या नावातच यू टर्न आहे" असं ज्या #उद्धव_ठाकरे यांबद्दल आपण बोलला होतात त्या उद्धव ठाकरेंना आपण विचारा की #श्रीक्षेत्र_देहू येथे जगद्गुरु #संत_तुकाराम महाराजांच्या शिळा मंदीराच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी हजेरी का लावली नाही. ४/९
#महाराष्ट्राचा_अपमान झालाच असेल तर मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे झाला असेल. हल्लीराष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेला थोडं जरी कुणी बोललं तरी तो लगेच #महाराष्ट्राचा_अपमान होतो. एखाद्या फेसबुक पोस्ट वरुन #निखिल_भामरे, #केतकी_चितळे सारखी तरुण मुलंमुली तुरुंगात सडवली जातात. ५/९
त्यांच्याच पक्षातील #सक्षणा_सलगर मोदींना वाटाणा फडणवीसांना फुटाणा म्हणत असताना #सुप्रियाताई खिदळत होत्या. #दिपाली_सय्यद सारख्या सहयोगी पक्षाच्या प्रवक्त्या जेव्हा पंतप्रधानांवर खालच्या भाषेत टीका करतात तेव्हा मात्र सुप्रियाताईंच्या नाकाच्या शेंड्यावर अजिबात राग दिसत नाही. ६/९
तेव्हा त्यांना पंतप्रधानांचा अपमान हा देशाचा अपमान असं वाटत नाही? यांचे मंत्री अंडरवर्ल्ड डॉनशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत परंतु त्यांचं मंत्रीपद अजूनही काढून घेण्यात आलेलं नाही. #महाराष्ट्राचा_अपमान जर कुठे होत असेल तर तो अशा प्रकरणांत होतो, #सुप्रियाताई. ७/९
#दाऊद_इब्राहिम शी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेले #नवाब_मलिक अजूनही मंत्रीपदावर कसे? आपल्याच पक्षाचे #गृहमंत्री #अनिल_देशमुख भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात कसे? ८/९
आणि असं असूनही #राज्यसभा#विधानसभा निवडणुकीत त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी निर्लज्जपणे तुम्ही कोर्टाची दारं ठोठावत आहात. #महाराष्ट्राचा_अपमान जर कुठे होत असेल तर या अश्या उदाहरणांत तो होतोय, #सुप्रियाताई.९/९

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Dasarp Edihb

Dasarp Edihb Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @prasadbhide

Nov 16, 2021
काही धार्मिक धारणा म्हणा अथवा गैरसमजूत म्हणा परंतु वस्तुस्थिती ही आहे की बहुतांश मुस्लिम समाज रक्तदान अथवा मरणोत्तर देहदान त्याज्य (हराम) समजतो. अशी समजूत असणारे मुसलमान स्वतःचा अथवा आपल्या जिवलगाचा जीव वाचवताना दुसऱ्याचे रक्त वा अवयव घेण्याचे सुद्धा टाळत असेल का? १/८
तर अर्थातच त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि अगदी नाईलाजास्तव जर ते दुसऱ्याचे अवयव घेत असतील तर वरील वस्तुस्थिती पाहता ते अवयव एखाद्या हिंदूचे (काफिर) असण्याची शक्यताच जास्त. तर मग अशा वेळी एखाद्या काफिराचे अवयव आपल्या शरीरात जोडून घेणे हराम होत नाही का? २/८
डॉ. अमोल कोल्हे यांनी भगव्याचे रक्त, हिरव्याचे रक्त अशा अर्थाची काहीतरी टिपण्णी केल्याची बातमी वाचण्यात आली त्यावरून हे मुद्दे डोक्यात आले. तुमचा पेशंट मरत असेल आणि त्याला रक्ताची गरज असेल तर हिरव्याचं रक्त आहे का भगव्याचं रक्त आहे हे विचारणार का असा प्रश्न कोल्हे करतात. ३/८
Read 8 tweets
Nov 16, 2021
ज्या दिवशी महाराष्ट्राच्या सशस्त्र पोलीस दलाने नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आदिवासींच्या एका जाहीर कार्यक्रमात शरद पवारांनी "अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही" अशा अर्थाचं एक विधान केलं. १/७
पवारांचं हे विधान एरवी कितीही सुयोग्य वाटलं तरी त्याचं टायमिंग बघता ते बुद्धीभेद करणारं ठरावं. पवारांना असं खरंच वाटत असेल तर त्यांनी मुक्तकंठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून वनवासी कल्याण आश्रमांद्वारे आदिवासीबहुल भागात जे मोलाचं काम केलं जातं त्याचं कौतुक करावं. २/७
परंतु वस्तुस्थिती अशी आहे की स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या पवारांसहित तथाकथित सेक्युलर बुद्धिवाद्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे काम डोळ्यात सलतं. डाचतं. ३/७
Read 7 tweets
Nov 15, 2021
महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर एल्गार परिषद प्रकरणी अटक असलेल्यांची सुटका होण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केले. या सरकारच्या काळात शहरी नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेचा सशस्त्र पोलीस दलाकडून खातमा करण्यात आला. राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यानी त्याबद्दल पोलीस दलाचं अभिनंदन केलं.
बाबासाहेब पुरंदरेंवर नको तितकी खालच्या पातळीवरची टीका करणाऱ्या आणि त्यांच्या मृत्यू बद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या ब्रिगेडींना एरवी पाठीशी घालणाऱ्या शरद पवारांनी, सुप्रियाताईंनी व अजितदादांनी पुरंदरेंच्या देहावसनानंतर शोक व्यक्त केला.
सावरकरांवर सातत्याने होणाऱ्या टीकेला मूक संमती देणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाच्या अजित दादा पवार यांचं नाव पिंपरी चिंचवड मधील सावरकर स्मारक व उद्यानाच्या कोनशिलेवर आहे. खुद्द शरद पवार यांनी सावरकरांची स्तुती जाहीर भाषणात केलेली आहे.
Read 4 tweets
Nov 15, 2021
१. कित्येकांना २०१४ साली भारतात हुकुमशाही अवतरली असं वाटतं. एखादीला २०१४ साली भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असं वाटत असेल तर त्यात एवढी आदळआपट करण्यासारखं काय आहे?
२. खरं स्वातंत्र्य २०१४ मधे मिळालं असं कंगना म्हणाली तर फणकारणारेच जेव्हा कन्हैय्या छाप झोळीवाले अजूनही आझादी मागत असतात तेव्हा खुश होऊन टाळ्या पिटताना दिसतात.
थोडक्यात काय तर विचार आणि उच्चार स्वातंत्र्य फक्त यांना स्वतःसाठी हवं आहे. इतरांनी विचार करु नये आणि केलाच तर त्याचा उच्चार करु नये.

इतकी वर्ष एकाचएक विचारधारेचा धाक समाजमनावर होता तो आता उरला नाही आणि समाजमाध्यमं आल्यापासून यांना उघडं पाडणं सहज शक्य झालं हे यांचं खरं दुःख आहे.
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(