Ajay Profile picture
Jun 15, 2022 9 tweets 4 min read Read on X
👇ह्या ट्विट वरून आइन्स्टाईनची एक भारी गोष्ट आठवली..

गोष्टीची सुरुवात👇खग्रास सूर्यग्रहणाच्या छायाचित्रापासून करू..ह्या चित्रात उजवीकडे वर एक तारा दिसतोय..खरे तर अशाच एका चिमुकल्या तारा समूहाच्या मदतीने आइन्स्टाईनने जग नेहमीसाठी बदलून टाकले..!

ही त्याचीच गोष्ट आहे..❤️ #म १/९
साल होते..१९१६..पाहिल्या महायुद्धाने जोर धरला होता..ह्या महायुद्धाच्या धामधुमीत वैज्ञानिक जगतात नवखा म्हणावा अश्या फक्त ३७ वय असलेल्या अल्बर्ट आईन्स्टाईनने सापेक्षवादाचा सामान्य सिद्धांत (Theory of General Relativity) मांडला..!

खरं तर वैज्ञानिक जगात प्रतिष्ठेला फार महत्व असते.. Image
त्यात आइन्स्टाईन पडला जर्मन..त्यात नवीन..त्याने त्याचा सिद्धांत मांडून इंग्लंड साठी देवासमान असणाऱ्या न्यूटनच्या सिद्धांतालाच आव्हान केले होते..!!

न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रकाश किरण हे एका सरळ दिशेत प्रवास करतात आणि आइन्स्टाईनचे म्हणणे होते की - Image
गुरुत्वाकर्षण त्या प्रकाश किरणांना वळवू शकते..! झाला ना मोठा पेच..!

आता कोण बरोबर हे ठरवण्यासाठी काय प्रयोग करायचा हे ठरवता ठरवता २-३ वर्ष गेली..तेवढ्यात महायुध्दही संपले..साल उजाडले १९१९..!

ह्या वर्षी एक मोठे खग्रास सूर्यग्रहण होते..त्याचा फायदा घेऊन प्रयोग करायचे ठरले- Image
होते काय की..खग्रास सूर्यग्रहणच्या वेळी चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येतो..त्यामुळे पृथ्वीच्या काही भागातून (निळी रेषा 👆) तेवढा वेळ सूर्य दिसतच नाही..म्हणजेच दिवसा रात्र होते आणि दिवसा तारे दिसू लागतात..!

आता..न्यूटनच्या म्हणण्याप्रमाणे अशा वेळेस👆सर्व तारे दिसायला ImageImage
पाहिजे..फक्त.. सुर्याच्यामागे असणारे तारे सोडून..कारण प्रकाश सरळ रेषेत येत असेल तर सूर्य मध्ये आल्याने त्यामागचे तारे आपल्याला दिसायला नको..🧐

आणि आइन्स्टाइनचे म्हणणे होते की सूर्य त्या ताऱ्यापासून येणारा प्रकाश वळवतो म्हणून आपल्याला ते तारे पण दिसतील..!! Image
ह्या प्रयोगातील ते तारे म्हणजे वृषभ नक्षत्रातील एक तारका समूह होता..आणि जसे आइन्स्टाईनच्या सिद्धांताने सांगितले तसेच झाले..आणि त्याने जग नेहमीसाठी बदलून टाकले..!!

असे म्हणतात की ह्या सिद्धांतामुळे माणसाने उत्क्रांतीच्या एका नव्या पर्वात प्रवेश केला..इतका हा मोठा शोध होता..😍 ImageImage
अशातच शोधल्या गेलेल्या गुरूत्वीय लहरी ह्या पण आइन्स्टाईनने १०६ वर्षापूर्वीच सांगितलेल्या सिद्धांतालाच बळ देतात.. आणि अजूनही आपण त्या सिद्धांताचे नवनवीन निष्कर्ष शोधतोच आहे..!!

हे 👇 १९१९ च्या त्या सूर्यग्रहणाचे छायाचित्र व त्याचा कॅमेरा अन् उपकरण..❤️ ImageImage
टीप - विज्ञान न आवडणाऱ्या लोकापर्यंत पण आइन्स्टाईनची महती पोचावी ह्या हेतूने खूपशा तांत्रिक बाबी मुद्दाम गाळल्या आहेत..🙏

अजून काही 👇

गुरूत्वीय लहरी - विश्वाची हाक

maayboli.com/node/69167

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ajay

Ajay Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @amhiraigadkar

Apr 13
काल चीन मधील एका सिमेंट कंपनीचा शेअर शेवटच्या १५ मिनिटात ९९% नी पडला..🤯🟥🤯

ती कंपनी जर भारतात असती तर ती देशातील ३री सर्वात मोठी कंपनी ठरली असती..!

मग..असं काय झालं की हा शेअर अचानक इतका पडला / पाडला गेला..?!

जाणून घेऊ आजच्या ह्या थ्रेडमधून👇

#StockMarketअभ्यास

#मराठीच #म Image
उत्तर एका ओळीत सांगायचं तर - चीनमधील अनेक मोठे बिल्डर कर्जबाजारी झाल्याने तेथील सिमेंटची मागणी कमी झाली..म्हणून हा शेअर पडला असे म्हणता येईल !

पण..हे बिल्डर कर्जबाजारी झालेच कसे ?

ह्या प्रश्नाचं मूळ मात्र चीनच्या इतिहासात..मुळात चीन कम्युनिस्ट कसा झाला त्या गोष्टीत आहे..👇

२/n Image
पहिली गोष्ट जी अनेकांना माहीत नसेल ती म्हणजे..

भारतात जशी ब्रिटिशांनी वसाहत स्थापन केली तशी वसाहत चीनमध्ये कधीच..कोणाचीही नव्हती..!

काही भाग इतरांकडे होते..
जसे - हाँगकाँग >ब्रिटिश,
कंबोडिया > फ्रेंच इ

पण संपूर्ण चीनवर कधीही परकियांनी सत्ता केली नाही..🤯

न् ह्याची कारणे ३

+ Image
Read 25 tweets
Mar 3
जगाच्या इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात श्रीमंत माणूस , विश्वगुरू भारत , डॉलरचा देश अमेरिका आणि मी ; एक सामान्य नागरिक !

#StockMarketअभ्यास #मराठीच #म

आज जगात सर्वात जास्त गरिबी असलेल्या आफ्रिका खंडात आजपर्यंतचा सर्वात श्रीमंत माणूस होऊन जावा ह्यासारखा विरोधाभास दुसरा नसावा..!

आणि ह्या विरोधाभासाचे नाव होते - मानसा मुसा !

जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांची यादी
'fortune' हे नियतकालिक दरवर्षी प्रसिद्ध करीत असते..अश्या ह्या नियतकालिकाने ह्या चौदाव्या शतकात होऊन गेलेला पश्चिम आफ्रिकेतील ' माली ' ह्या देशाचा राजा आजच्या पैशांत किती श्रीमंत होता ह्याचे वर्णन ' Unquantifiable ' म्हणजेच संपत्ती मोजताच येणार नाही इतका तो श्रीमंत होता असे वर्णन केले होते..😜🤯🤑 असो..

आजचा हा थ्रेड म्हणजे त्याच मुसाच्या एका गोष्टीवर..👇

१/nImage
हा मुसा ' माली ' साम्राज्याचा राजा होता. हे साम्राज्य सोन्याच्या खाणी, गुलाम आणि हस्तिदंत इ चा व्यापाराने भरपूर श्रीमंत झालं होतं. चौदाव्या शतकात म्हणजे जेव्हा भारतात सोन्याचा धूर निघत होता तेव्हा जगातील ~ अर्धे सोन्याचे उत्पादन हे माली साम्राज्य करत होतं..!

पण ह्या साम्राज्याची..त्यांच्या ह्या अपार श्रीमंत राजाची..फार कोणाला माहिती नव्हती आणि ह्याचीच मुसाला खंत होती.म्हणून आपले नाव जगभर व्हावे म्हणून त्याने ' हज ' यात्रा करत करत विपुल प्रमाणात दानधर्म (सोन्याच्या रूपात ) करायचे ठरवले.

आणि त्याने केलेही तसेच..६० हजार गुलाम.. तेवढेच उंट ( हे फक्त सोने वहायला ) ,१२ हजार सैन्य आणि बाकी दरबारी इतका मोठा लवाजमा घेऊन तो प्रवासाला निघाला..वाटेत त्याने अनेक ठिकाणी गोर गरीबांना सोने फुकट वाटले.त्याने त्याची किर्ती वाढली.पण ही प्रसिध्दी तो जेव्हा इजिप्तला पोचला त्यामानाने काहीच नव्हती..👇

२/nImage
त्याकाळी इजिप्त हे मोठे व्यापाराचे, दळणवळणाचे केंद्र होते..पूर्वेकडून आशिया खंडातून येणारे व्यापारी , उत्तरेच्या युरोप खंडातून येणारे व्यापारी आणि सबंध आफ्रिका खंडातून हज ला जाणारे यात्रेकरू या सर्वांनी इजिप्त त्यातही राजधानी कैरो नेहमी गजबजलेला असायचे.

आणि अशा ह्या १३२४च्या कैरोमध्ये मुसा ने चांगला महिनाभर मुक्काम केला..आणि ह्या मुक्कामात त्याने इतके सोने वाटले इतके सोने वाटले/खर्च केले की..; मुसा.. माली साम्राज्य , त्या साम्राज्याची राजधानी- सोन्याची नगरी ' टिंबक्टू ' ह्यांची किर्ती जगभर पसरली..!

हे इतके सोने इजिप्तमध्ये आल्याने तिथले सर्वच लोक श्रीमंत झाले..सगळीकडे आनंदीआनंद झाला..पण तो आनंद फार काळ टिकला नाही..मुसा पुढील वर्षी हज वरून परत जात होता तेव्हा त्याला तिथली व्यवस्था कोलमडलेली दिसली..व्यापार बंद होताना दिसले. त्याचे कारण तेव्हा त्याला कळले का नाही माहीत नाही पण त्याचे कारण मुसा ने वाटलेले सोने..त्यामुळे अचानक आलेली श्रीमंती होती हे आज कळून चुकले आहे.

पण हे असे कसे होऊ शकते ? 👇

३/nImage
Read 7 tweets
Jan 31
उद्या बजेट !

पुढच्या वर्षीसाठी अजून काही नवीन कर येतील..कदाचित जातीलही..🤞

पण ह्या वर्षीच काय ?

शिवाय आपण F&O केलं..Intraday केलं..Positional केलं किंवा Investment केलं म्हणजे कर कमी लागतो ?

अशा प्रश्नांची उत्तरं आजच्या थ्रेड मध्ये 👇

> > > स्टॉक मार्केटमधील कमाई आणि त्यावरचा इन्कम टॅक्स !

#StockMarketअभ्यास #म

ह्यात समजायला सर्वात सोपी गोष्ट म्हणजे- कर भरण्यासाठी आधी नफा व्हावा लागतो..😅

म्हणून नफ्यासोबत फारसा संबंध नसणाऱ्या प्रकारापासून आधी सुरुवात करू..😜👇

आणि तो प्रकार म्हणजे..अर्थातच -

>>> जे लोक Intra Day किंवा फ्युचर्स & ऑप्शन्स करतात

ह्या भल्या लोकांनी जर चुकून माकून पैसे कमावलेच तर ते त्यांचं बिझीनेस इन्कम पकडले जाते.

म्हणजे हे जर नोकरदार असतील किंवा अजून काही प्रकारे ह्यांचं इन्कम असेल तर त्यात हे इन्कम add केले जाते..आणि एकूण रकमेवर टॅक्स भरावा लागतो.

म्हणजे एखादा जर ३०% स्लॅब मध्ये येत असेल तर त्याला Intraday आणि
F & O नफ्यावर पण ३०% टॅक्स द्यावा लागेल..२०% स्लॅब वाल्याला २०% आणि असंच इतर सर्व टॅक्स स्लॅब वाल्यांसाठी.

थोड्क्यात काय तर - नोकरी करणाऱ्या (२०-३०% स्लॅब मधल्या) लोकांनी Intraday आणि F&O करणे म्हणजे मूर्खपणा आहे.

आणि तेही स्वतःच्या अकाऊंटवरून करणे हा तर महामूर्खपणा आहे..😜

आता ह्याला बिझीनेस इन्कम समजायचा फायदा हा होऊ शकतो की एका वर्षीचा लॉस हे लोक पुढच्या ७ वर्षांच्या नफ्यातून वजा करू शकता..!

म्हणजे एका वर्षी १ लाख तोटा झालाय आणि पुढच्या वर्षी १ लाख नफा तर पुढच्या वर्षीच्या नफ्यावर कर भरावा लागत नाही.

फक्त इतकं लक्षात ठेवावं की Intraday चा तोटा Intraday नफ्यातून आणि F&O चा तोटा F&O नफ्यातूनच वजा करता येतो..!

आता..जरा फायद्याच्या गोष्टींकडे वळू..👇

१/nImage
>>> आता जे लोक Intraday किंवा F&O करत नाहीत

त्यांच्या शेअर मार्केटमधील शेअर

(सोबतच म्युचुअल फंड,बाँड, ETF etc etc सर्व गोष्टी पण)

विकून येणाऱ्या कमाईला सरकार २ प्रकारे बघते -

१) जे लोक शेअर्स घेऊन एक वर्षाच्या आत विकतात -

त्यांना १५% ने कर लागतो. ह्याला सरकार म्हणते STCG अर्थात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणजेच कमाई..हा बिझिनेस नाही..!

म्हणजे १ लाख असे जर कमावले असतील तर त्यातले १५% म्हणजे १५ हजार सरकारला जातील बाकी ८५ हजार तुमचे..!

मग टॅक्स स्लॅब कितीही असू द्या..!🤩

२/nImage
२) जे लोक शेअर्स घेऊन एक वर्षानंतर विकतात -

त्यांना १०% ने कर लागतो. आणि ह्याला सरकार म्हणते - LTCG अर्थात लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजेच कमाई..हाही बिझीनेस नाही..!

इथे फक्त फरक इतकाच आहे की इथे आपले दयावान सरकार १ लाखापर्यंत कमाई असेल तर त्यावर कोणताही कर लावत नाही व त्यावरील सर्व कमाईला १०% कर लागतो.

म्हणजे १ लाख कमाई असेल तर शून्य कर !

२ लाख असेल तर पहिल्या एक लाखावर शून्य कर आणि त्यावरील १ लाखावर १०% म्हणजे १० हजार..! असंच पुढच्या सर्व कमाईवर !

आता..इथे लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे की भले मी करोडपती आहे आणि मी तसा ~ ३०-४०% टॅक्स स्लॅब मध्ये येतो पण जर माझा इन्कम शेअर मार्केट मधून १०० कोटी जरी असेल तरी मला १०% नेच टॅक्स लागेल..🤯

सांगायचं हेच की , २०-३०% स्लॅब मधल्या नोकरी करण्याऱ्या कामगार लोकांनी आपली कष्टाची कमाई इथे लावावी..F&O करून सरकार, ब्रोकर , advisor, शेअर मार्केट गुरू बिरू इ सर्व गरीबांना पोसायची जबाबदारी स्विकारू नये..!😏😜😂

पण..

इतक्या वेळा सांगूनही काही अतिहुशार लोक असे असतीलच जे अजूनही F&O आणि Intraday च्याच मागे पळातील..आणि असे होऊ नये म्हणून..

मायबाप सरकारने वरील कॅपिटल Gains कमाई ही बिझीनेस इन्कम नसूनही ह्यात झालेला लॉस पुढच्या ७ वर्षांत Intraday न् FnO सारखाच नफ्यातून वजा करता येईल अशी सूट दिली आहे..🥳🤯🥳

३/५

+ 👇Image
Read 5 tweets
Jan 3
गोष्ट - अमूल , NDDB आणि महानंदची

आणि उत्तरं - ' महानंद ' गुजरातला NDDB कडे जाणं महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी असू शकते का याची !!?

ह्या गोष्टीची सुरुवात..खरे वाटणार नाही पण होते एका युद्धापासुन..'दुसऱ्या' महायुद्धापासून..🤯👇

१९३९ ते ४५ चाललेल्या दुसऱ्या महायुद्धाचा भारताला..मुंबईला..फार मोठा फायदा झाला..मुंबईचा व्यापार..पर्यायाने लोकसंख्या ह्या काळात झपाट्याने वाढली..सोबतच..मुंबईच्या गरजाही वाढल्या..ह्यातलीच एक महत्वाची गरज म्हणजे..सकाळच्या चहाची..न् त्याला लागणाऱ्या दुधाची..!

त्यावेळी बहुतेक सर्व गुजरात..पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक मिळून एकच बॉम्बे हे महाराज्य होते..आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते..गुजरातचे मोरारजी देसाई..!

त्यांनी मुंबईच्या दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी
' बॉम्बे मिल्क स्कीम ' आणली..ह्या स्किमसाठी त्यांनी साहजिकच गुजरातच्याच(😤)..मुंबईपासून ४५० किमी वर असलेल्या कैरा ह्या जिल्ह्याची निवड केली.

तेव्हाच्या बॉम्बेला दूध मिळाले..पण तरीही..तो काळ इंग्रज भांडवलदारांचा होता..म्हणून शेतकऱ्यांना नफा मिळत नव्हता..शेवटी त्या सर्वांनी सरदार पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे आनंद येथे सहकारी दुग्ध संघ स्थापन केला..व सत्याग्रह करून मुंबईला दूध पुरवठ्याचे कंत्राट त्या सहकारी संघाला मिळवून दिले.

आता..धनाढ्य मुंबईला दूध पुरवून हा संघ चांगलाच मोठा झाला..पण..मुंबईची दुधाची भूक वाढतच होती..त्याच्या पुरवठ्यासाठी हळू हळू गुजरातच्या तालुक्यात - गावात असे दूध संघ तयार झाले.

आणि १९५४-५५ येता येता - 👇

#मराठी

#म

१/nImage
आणि १९५४-५५ येता येता अशी वेळ आली की गुजरातचे दूध उत्पादन मागणीपेक्षा बरेच वाढले..आणि ह्या जास्तीच्या दुधाला प्रक्रिया करून पावडर, बटर ,चीज इ प्रकारात साठवून ठेवावे म्हणून ३८ जिल्हा व तालुक्याच्या दुधसंघानी मिळून नेहरूंच्या हस्ते एक कंपनी थाटली..आणि त्या सर्व कंपनीच्या उत्पादनांचा एक ब्रँड बनवला गेला.. त्याचं नाव ' अमूल '..!

असेच एक दशक गेले..अमुलची आणि पर्यायाने गुजरातच्या शेतकऱ्यांची भरभराट होत गेली..असेच एकदा १९६४ साली अमूलच्या एका नव्या फॅक्टरीच्या उद्घाटनाला भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आले होते..ते अमूल ची सर्वसमावेशक प्रगती पाहून इतके खूश झाले की त्यांनी तेव्हाचे अमूल चे मुख्य व्यवस्थापक असणारे ' वर्गीस कुरियन ' ह्यांना सोबत घेऊन हेच ' आनंद मॉडेल ' देशभर लागू करायचे ठरवले..!

त्यासाठीची व्यवस्था पाहणे व अनुभवी मनुष्यबळ तयार करणे ह्यासाठी लगेचच १९६५ साली NDDB अर्थातच ' नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ' ची स्थापना..साहजिकच ' आनंद ' येथेच केली गेली..!

पुढे अशाच प्रकारे..१९६७ साली

२/n

(जय किसान 👇)Image
पुढे अशाच प्रकारे..१९६७ साली ' महाराष्ट्र राज्य दूध महासंघाची ' स्थापना झाली व १९७० साली सुरू झालेल्या ' धवलक्रांती ' अंतर्गत..आपल्या राज्यातील दुधाचे उत्पन्न वाढल्यानंतर सर्व दुधसंघानी मिळून..१९८३ साली महानंद डेअरी आणि तिचा म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा दूध ब्रँड
' महानंद ' तयार केला..!

पण..महानंद तयार व्हायला वेळ झाला होता..हे दुधसंघ किती ताकदवान बनू शकतात ह्याची चुणूक जणू आपल्या राजकारण्यांना दिसली होती..आणि म्हणूनच पुढे जाऊन नकळत..ह्या दुधसंघांचे राजकीयीकरण झाले..लोकल राजकारणी ह्यात धंदा म्हणून नाही तर राजकारणाची पाहिली पायरी समजून उतरू लागले..अनेक जिल्ह्यात त्यांनी स्वतःचे असे दूध संघ स्थापन केले..साहजिकच..
' महानंद ' मागे पडत गेला..!

आज..महानंदची दुधाची पिशवी पाहिलेला माणूस शोधावा लागतो..आज जिथे ह्या क्षेत्रात कालपरवा तयार झालेले डेअरी स्टार्टअप हजारो कोटींचा धंदा करतात..तिथे महानंद डेअरी रडत पडत ५०० कोटींचा धंदा करत तोट्यात जाते.

NDDB सारखी सरकारी संस्था मदर डेअरी सारखा ब्रँड तयार करून वर्षाला १० हजार+ कोटींचा धंदा करते..न् अमूल ची तर गोष्टच करायला नको..अमूल पुढील वर्षात १ लाख कोटींचा धंदा करायचे स्वप्न बघत नाही तर उद्दिष्ट ठेवते..!🔥🤯

आणि तेव्हाच देशभरच्या विद्यापीठात महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि श्रीमंत राज्याच्या दूध क्षेत्रातील अपयशातून काय शिकावे ह्याचे निबंध लिहिले जातात..😬😐😏

आता आपण सर्वाँना पडणाऱ्या प्रश्नांकडे येऊ -

३/n 👇Image
Read 5 tweets
Jan 2
शून्यातून पैसा तयार करायची टाटांची कला ?!🤑

#StockMarketअभ्यास #LiveBlog

२-४ वर्षांपूर्वी तामिळनाडूच्या वालपराई नावाच्या हिल स्टेशन वरून केरळ मधला अथिरपल्ली हा बाहुबली पिक्चरमुळे प्रसिद्ध झालेला धबधबा पहायला बाईकवर जात होतो.

हिल स्टेशनची हद्द संपताच तिथे टाटांच्या कॉफी बागा चालू होतात..रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या..डोंगराच्या डोंगर पसलरलेल्या अशा ह्या उंच उंच बागा..बघूनच थक्क झाल्याचे आठवते..पण विशेष आठवते तो..त्या बागांचा आकार....त्या बागा..इतक्या मोठ्या आहेत..इतक्या मोठ्या आहेत की.. ४०-५० किमी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सोबत करतात..🤯

आता..आज हे आठवायचं कारण हे की - 👇

१/n

#मराठी

#मImage
टाटा कॉफी कंपनीने त्यांचा हा कॉफी ,चहा असलेल्या बागांचा बिझिनेस आणि ह्यापासून तयार होणारी आणि आपण विकत घेत आलेली चहा आणि इन्स्टंट कॉफी इ चा बिझनेस वेगळा करायचे ठरवले आहे..!(असा हे बिझिनेस वेगळा करायच्या पद्धतीला मार्केटच्या भाषेत म्हणतात ' Demerger ' ! )

आणि हा वेगळा झाल्यानंतर राहिलेला बिझिनेस ते टाटांच्याच ' टाटा कन्सूमर ' ह्या कंपनी सोबत एकत्र करणार आहेत..!
(आणि दोन कंपन्या एकत्र करण्याच्या पद्धतीला मार्केटच्या भाषेत म्हणतात ' merger ' !)

आता..तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की..हा एवढा उपद्याप टाटा का करत आहेत ?! 👇

आणि असा कोणताही प्रश्न कधीही तुम्हाला पडला की बहुतेकदा त्या प्रश्नाचं उत्तर..जीवनात अनेकदा..आणि बिझिनेसमध्ये जवळपास नेहमी एकच असतं..ते उत्तर म्हणजे पैसा..🤑
(त्याचा मोह सामान्य जनतेच्या लाडक्या टाटांना ही सुटत नाही बरं..😜)

असो..पुन्हा कॉफीकडे वळू..👇

२/nImage
आता..अल्पभूधारक शेतकऱ्याची अर्धा एक एकर शेती असो का टाटांच्या हजारो - लाखो एकरच्या बागा असो..ह्या दोन्ही मध्ये एक गोष्ट कॉमन आहे - ती म्हणजे काहीही झालं तरी हे दोघेही निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहेत.. इतकचं नाही तर खताचा..कीटकनाशकाचा..आणि पीक आल्यावर मालाचा भाव अश्या त्यांच्या हातात नसणाऱ्या गोष्टींवर त्यांचा धंदा अवलंबून आहे..!

म्हणजे..कितीही काळजी..कष्ट घेतले तरी..त्या कामाचं फळ मिळेलच ह्याची खात्री नाही..आणि म्हणूनच अश्या बिझिनेसला bad बिझिनेस म्हणतात..!

अन् पर्यायाने हा बिझनेस असलेल्या शेअरची किंमत कमी असते..!

याउलट..ह्याचं bad बिझिनेस चा उत्पन्न प्रक्रिया करून पॅकेटमध्ये घातलं की तो होतो good बिझिनेस..! आणि त्यांच्या शेअरला भाव जास्त मिळतो..पण असं का म्हणताय ?!

तर हेच बघा..👇

मागच्या आर्थिक वर्षात..टाटा कॉफी कंपनीचे उत्पन्न ~३००० कोटींचे होते..!
पण..त्यातले लाखो एकरच्या बागांमधून निघालेले उत्पन्न होते फक्त ~ ५०० कोटी (~२०%) आणि कॉफी - चहा पॅकेट विकणाऱ्या २-४ फॅक्टरी मधून येणारे उत्पन्न होते ~ २५०० कोटी (>७५%+) !

आता..bad बिझिनेस सहसा त्यांच्या उत्पन्नाच्या जास्तीत जास्त २-३ पट विकले जातात..good बिझिनेस सहसा त्यांच्या उत्पन्नाच्या ५-१० पट किमतीने विकले जातात..! (अशी कंपनीची किंमत उत्पन्नावरून काढण्याच्या गुणोत्तराला ' Price to sales ' असे म्हणतात.)

म्हणजे कोणाला टाटा कॉफी कंपनी विकत घ्यायची असेल तर तर त्याचं गणित असेल - > 👇

३/nImage
Read 5 tweets
Dec 4, 2023
जर ' राजराजा चोला ' हा तमिळ राजा आधी होऊन गेला..तरीही..मग आपल्या नौसेनेने शिवाजी महाराजांना भारतीय नौसेनेचा जनक (Father of Indian Navy) का म्हंटले ?!

उत्तर ह्या live thread मध्ये 👇

पण..तोपर्यंत तुम्ही तुमचे उत्तर कॉमेंट्स मध्ये नोंदवा..😅

#मराठी

#म Image
आता..

ज्यांनी कोणी आधी जहाज बनवले त्यांनाच जर श्रेय द्यायचंय तर मग..

ते श्रेय हडप्पा संस्कृतीच्या अनामिक लोकांना द्यावे लागेल..!

कारण..

लोथल येथील जहाज उभारणीची गोदी ही सुमारे ४५००+ वर्षांपूर्वी उभारलेली दिसते..!

पुरावा म्हणून त्यांच्या तर नाण्यांवरही तर जहाजे आहेत..😍👇 Image
मग..

आता..

ही👆 चित्रातली जहाजं छोटी वाटताहेत म्हणता ?!

मग हे बघा..ऋग्वेद जो आपल्या पुरातत्व खात्यानुसार ~ ४००० वर्षांपूर्वी लिहिला..

त्यात..१०० लोक वल्हवत जातील इतक्या मोठ्या जहाजांचा उल्लेख आहे..! 👇

मग..ते श्रेय काही नाही तर..

त्यांना तरी द्यायला हवं होतं..😅

पण नाही..+ Image
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(