Ajay Profile picture
उद्देश - मराठी घरात गुंतवणूक रुजावी ह्यासाठी प्रयत्न करणे..🔥 स्वप्न - मराठी माणूस म्हणजे 'गुंतवणूकदार' अशी ओळख जगभर झालेली बघणे..✌️🔥

Jun 15, 2022, 9 tweets

👇ह्या ट्विट वरून आइन्स्टाईनची एक भारी गोष्ट आठवली..

गोष्टीची सुरुवात👇खग्रास सूर्यग्रहणाच्या छायाचित्रापासून करू..ह्या चित्रात उजवीकडे वर एक तारा दिसतोय..खरे तर अशाच एका चिमुकल्या तारा समूहाच्या मदतीने आइन्स्टाईनने जग नेहमीसाठी बदलून टाकले..!

ही त्याचीच गोष्ट आहे..❤️ #म १/९

साल होते..१९१६..पाहिल्या महायुद्धाने जोर धरला होता..ह्या महायुद्धाच्या धामधुमीत वैज्ञानिक जगतात नवखा म्हणावा अश्या फक्त ३७ वय असलेल्या अल्बर्ट आईन्स्टाईनने सापेक्षवादाचा सामान्य सिद्धांत (Theory of General Relativity) मांडला..!

खरं तर वैज्ञानिक जगात प्रतिष्ठेला फार महत्व असते..

त्यात आइन्स्टाईन पडला जर्मन..त्यात नवीन..त्याने त्याचा सिद्धांत मांडून इंग्लंड साठी देवासमान असणाऱ्या न्यूटनच्या सिद्धांतालाच आव्हान केले होते..!!

न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रकाश किरण हे एका सरळ दिशेत प्रवास करतात आणि आइन्स्टाईनचे म्हणणे होते की -

गुरुत्वाकर्षण त्या प्रकाश किरणांना वळवू शकते..! झाला ना मोठा पेच..!

आता कोण बरोबर हे ठरवण्यासाठी काय प्रयोग करायचा हे ठरवता ठरवता २-३ वर्ष गेली..तेवढ्यात महायुध्दही संपले..साल उजाडले १९१९..!

ह्या वर्षी एक मोठे खग्रास सूर्यग्रहण होते..त्याचा फायदा घेऊन प्रयोग करायचे ठरले-

होते काय की..खग्रास सूर्यग्रहणच्या वेळी चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये येतो..त्यामुळे पृथ्वीच्या काही भागातून (निळी रेषा 👆) तेवढा वेळ सूर्य दिसतच नाही..म्हणजेच दिवसा रात्र होते आणि दिवसा तारे दिसू लागतात..!

आता..न्यूटनच्या म्हणण्याप्रमाणे अशा वेळेस👆सर्व तारे दिसायला

पाहिजे..फक्त.. सुर्याच्यामागे असणारे तारे सोडून..कारण प्रकाश सरळ रेषेत येत असेल तर सूर्य मध्ये आल्याने त्यामागचे तारे आपल्याला दिसायला नको..🧐

आणि आइन्स्टाइनचे म्हणणे होते की सूर्य त्या ताऱ्यापासून येणारा प्रकाश वळवतो म्हणून आपल्याला ते तारे पण दिसतील..!!

ह्या प्रयोगातील ते तारे म्हणजे वृषभ नक्षत्रातील एक तारका समूह होता..आणि जसे आइन्स्टाईनच्या सिद्धांताने सांगितले तसेच झाले..आणि त्याने जग नेहमीसाठी बदलून टाकले..!!

असे म्हणतात की ह्या सिद्धांतामुळे माणसाने उत्क्रांतीच्या एका नव्या पर्वात प्रवेश केला..इतका हा मोठा शोध होता..😍

अशातच शोधल्या गेलेल्या गुरूत्वीय लहरी ह्या पण आइन्स्टाईनने १०६ वर्षापूर्वीच सांगितलेल्या सिद्धांतालाच बळ देतात.. आणि अजूनही आपण त्या सिद्धांताचे नवनवीन निष्कर्ष शोधतोच आहे..!!

हे 👇 १९१९ च्या त्या सूर्यग्रहणाचे छायाचित्र व त्याचा कॅमेरा अन् उपकरण..❤️

टीप - विज्ञान न आवडणाऱ्या लोकापर्यंत पण आइन्स्टाईनची महती पोचावी ह्या हेतूने खूपशा तांत्रिक बाबी मुद्दाम गाळल्या आहेत..🙏

अजून काही 👇

गुरूत्वीय लहरी - विश्वाची हाक

maayboli.com/node/69167

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling