डिप्रेशन वरील अत्यंत जालीम व पूर्ण प्रभावी उपाय: अद्वैत वेदांत...
ज्याच्या बुद्धीला अद्वैत वेदांत थोडा जरी कळला असेल त्याच्या मनात कधी डिप्रेशन किंवा असले निगेटिव्ह विचार येणे शक्य नाही. आले तरीदेखील स्वतःहूनच त्यांना पळवून लावायची ताकद स्वतःच्या आत आपोआप आलेली असते.
आजपर्यंत मी अनेक पोस्ट टाकल्या अद्वैत वेदांत यावर. परंतु असले कसले तत्वज्ञान किंवा उगाचच जड जड विषयांवर काय हा माणूस लिहित असतो असेदेखील बऱ्याच लोकांना वाटत असते. उगीचच डोक्याच्या वर चे विषय आणि अद्वैत वेदांत सारखे जड नावे बघून नव्वद टक्के लोक या गोष्टी वाचत नाहीत.
परवा मी टाकलेल्या लोकांच्या पोस्ट बद्दल अनेकांच्या कमेंट्स आल्या..तू किती माणुसकी नसलेला किंवा निष्ठूर आहेस वगैरे वगैरे. त्यातील बऱ्याच जणांनी मी लिहिलेल्या आद्वैत वेदांताच्या पोस्टवर कधीही काहीही लिहायचा प्रयत्न केला नाही किंवा त्या वाचल्या देखील आहेत की नाहीत माहित नाही.
परंतु माझ्या अद्वैत वेदांत वरील पोस्ट वाचणाऱ्या लोकांना मी ती पोस्ट का टाकले हे समजले असावे.
परवाच्या माझ्या पोस्टवर कमेंट करणार आहे काही लोक हे खरोखर मानसिक डिप्रेशन वगैरे गोष्टींसाठी लोकांना मदत करणारे आहेत हे अत्यंत चांगले. परंतु त्यांना देखील आपल्या भारतीय तत्वज्ञान माहीत
नाही व त्यांनी कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही. कारण पाश्चात्त्य औषधे किंवा उपचार हे डिप्रेशन वर त्यात पुरतेच काम करतात कायमस्वरूपी नाही. याउलट वेदांत यासारखे गोष्ट ही कायमस्वरूपी काम करणारी आहे. त्यामुळे मेंटल हेल्थ काम करण्याची त्यांची प्रचंड इच्छा असले
तरीदेखील त्याच्या मुळावर त्यांना कधीही घाव घालत येत नाही. कारण TMC and many of medication जे डिप्रेशन वर काम करते ते कायमस्वरूपी नसते. अत्यंत तात्पुरती गोष्ट आहे ती. आंब्याच्या झाडाला बांडगुळ लागल्यानंतर वर्षानुवर्षे लोक फक्त बांडगूळ कापड असतात परंतु त्याचे मूळ
शोधून जर का मूळ संपवले तर नंतर परत परत वाढलेली बांडगुळ कापावे लागत नाहीत.... त्यामुळे आत्ताच जे जे डिप्रेशन वरती जे औषधोपचार आहेत ते असेच आहेत अत्यंत वरवरचे काही काळापुरते काम करणार आहे परंतु कोणतीही शाश्वती पूर्णपणे न देणारे.
अर्थात या उपचारांचा उपयोग झाला पाहिजे मी काही त्यांच्या विरोधात नाही परंतु त्याच बरोबर भारतीय तत्वज्ञान लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तर मुळातच डिप्रेशन या स्टेट मध्ये जायचे कमी होतील.
अर्थात माझे आद्वैत वेदान्तावर असलेले लेख वाचणारे व समजून घेण्याचा प्रयत्न करणारे देखील खूप जण आहेत. व त्यांना माझा मुद्दा समजला असेल.
अद्वैत वेदांत हा डिप्रेशन घालवण्यासाठी कसा काय कारणीभूत ठरू शकतो?? मुळात डिप्रेशन न येण्यासाठीच तो किती प्रभावी असतो
हे थोडक्यात सांगतो.
मी म्हणजे कोण ? हा मूलभूत प्रश्न आहे अद्वैत वेदांत मधील. त्याचे उत्तर शोधायचे असते. व त्यामध्ये हे जेव्हा हे लक्षात येते की मी म्हणजे हे शरीर नाही किंवा बुद्धी नाही किंवा मन नाही.
अर्थात अगदी खोलवर जाऊन आत्मसाक्षात्कार होईपर्यंत ही गोष्ट लक्षात येणे गरजेचे नसते. फक्त बुद्धीला जरी ही गोष्ट समजली तरी देखील डिप्रेशन सारखी गोष्ट तुम्हाला टच देखील करणार नाही.
जोपर्यंत आपण जागे असतो तोपर्यंत मी म्हणजे कोण या प्रश्नाला आपण उत्तर देऊ
की मी म्हणजे हे शरीर आहे मन आहे आणि बुद्धी देखील आहे. त्यामुळे जागे असताना शरीर मन आणि बुद्धी हे तिन्ही मिळवून आपण स्वतःला " मी" म्हणून प्रेसेंट करतो.
परंतु निद्रित अवस्थेमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला आपण स्वप्नामध्ये जगत असतो त्यावेळेला शरीर हे बऱ्यापैकी की त्यामध्ये नसते. केवळ मन आणि बुद्धी यांचा खेळ असतो स्वप्न म्हणजे. म्हणजेच स्वप्नावस्थेत मी म्हणजे कोण असा प्रश्न विचारला तर त्या वेळेला आपण म्हणजे
मन आणि बुद्धी यांचे मिश्रण असतो.
गाढ झोपेमध्ये गेले असता तेथे मन आणि विचार निर्मिती पूर्ण थांबलेली असते. तिथे पूर्ण ब्लँक नेस असतो. तेथे बुद्धी देखील काहीच काम करीत नाही. शरीरामधील अत्यावश्यक व्यवस्था म्हणजे श्वास घेणे किंवा हृदयाची धडधड ही कामे ऑटोमॅटिक मोडवर चालू असतात
म्हणजेच ती एक अशी अवस्था आहे येथे हे हा प्रश्न विचारला गेला की मी म्हणजे कोण तर त्याचे उत्तर एकच असेल कि ब्लांकनेस किंवा पूर्णपणे सायलेन्स. कारण तेथे ना शरीर कोणत्याही गोष्टीत भाग घेते ना मन ना बुद्धी.
थोडक्यात सांगायचे तर काही अपवाद वगळले असता तुम्हाला हाच अनुभव असेल दिवसा तुमच्या आयुष्यात आलेले प्रॉब्लेम्स किंवा संकटे किंवा सुख याच्यापेक्षा स्वप्नातील जग भलतेच आणि पूर्ण वेगळे असते. अर्थात बऱ्याच वेळेला स्वप्न आहे जागृतावस्थेत मधील मानसिक अवस्थेवर अवलंबून असतात यात वाद नाही.
परंतु जागृत अवस्थेमधील ताणतणाव झोपेमध्ये बऱ्यापैकी संपलेले असतात म्हणूनच माणूस जिवंत राहू शकतो. त्याला विसर पडलेला असतो. अगदी प्रचंड दारू पिणारे दारू आहे व्यक्तींना देखील व्यसन आता विसर पडलेला असतो.
तुम्ही खरोखर आठवुन बघा की तुमचा ब्रेकअप झालेला असेल किंवा तुमच्या ऑफिसमध्ये प्रचंड मोठे भांडण झाले असेल आणि त्यादिवशी तुम्ही पूर्णपणे निगेटिव्हिटी मध्ये असाल तरीदेखील अत्यंत थोड्या प्रमाणावर त्या रात्री तुमच्या स्वप्नांमध्ये हे सगळे असते.... जवळपास नसतेच
म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला म्हणजे तू स्वतः जो कोणी आहेस जो त्या शरीरामध्ये राहतो त्याला त्या ब्रेकअप बद्दल किंवा ऑफिसमधील भांडण बद्दल काहीही देणेघेणे नसते....मग गर्लफ्रेंड सोडून गेली किंवा बॉयफ्रेंड सोडून गेल्यावर इतक्या टेन्शन घ्यायची गरज नाहीये.
अर्थात ते वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे परंतु डिप्रेशनमध्ये जाण्यासारखे नाही...
या उलट काही स्वप्नांमध्ये अनुभवलेला आनंद, प्रेम, वासना, भीती, आश्चर्य याचे परिणाम देखील जेव्हा आपण जागृत अवस्था मध्ये येतो तेथे विरून गेलेले असतात किंवा अत्यंत कमी झालेले झालेले असतात.
थोडक्यात काय तर आपण जागी असताना अनुभवत असलेले जग हे स्वप्नातील जगाच्या दृष्टीने नश्वर आणि स्वप्नामधील जग हे जागृत अवस्थेमध्ये नश्वर. थोडक्यात दोन्ही जग हे नश्वर आहेत व अशाश्वत आहेत. ही जाणीव अद्वैत वेदान्ताचा अभ्यास करताना अगदी सुरुवातीलाच येऊन जाते.
व ज्या व्यक्तीला ही जाणीव झालेली असेल की जग किंवा आजूबाजूची प्रत्येक गोष्ट नश्वर आहे....मग ती फक्त बुद्धी पर्यंत असूदेत त्याने फरक पडत नाही.... कारण या बुद्धीचा उपयोग पुढे मनाला समजण्याकरता केला जातो. असा व्यक्ती डिप्रेस्ड होईलच कसा??
ज्याप्रमाणे स्वप्नांमध्ये जग स्वप्नामधील जागा व माणसे आपण स्वतः तयार केलेली असतात.... परंतु आपल्याला त्याची जाणीव स्वप्नात नसते... म्हणून आपण घाबरतो किंवा आनंदित होतो.... पण खोलात जाऊन विचार केला तर थोडक्यात ती प्रत्येक गोष्ट जी तुम्ही स्वप्नात बघता ते तुम्ही स्वतःपासूनच तयार
केलेली असते.... म्हणजे थोडक्यात तुम्ही निर्माते आहात परमेश्वर....त्याचप्रमाणे या जागृत अवस्थेमध्ये देखील आपल्याला जाणीव नसते की हे विश्व आपल्या स्वतःपासूनच तयार झालेले आहे... कारण आपण तो प्रत्यक्ष परमेश्वर आहोत....
ज्या माणसाच्या केवळ बुद्धीला ही गोष्ट समजलेली
असेल की आपण म्हणजे प्रत्यक्ष ब्रम्ह आहोत किंवा परमेश्वर आहोत... आपल्या आजूबाजूला व आपल्या शरीराबरोबर व मनाबरोबर घडणाऱ्या गोष्टी देखील आपणच स्वतः तयार केलेल्या आहेत व त्या पूर्णपणे आभासमय आहेत म्हणजेच मिथ्या आहेत..... तो depress कधी होऊच कसाकाय शकेल?????
आपल्या सध्याच्या सनातन धर्मात दुफळी का आहे याचे कारण शोधायचा प्रयत्न करत होतो.
खरे तर सनातन धर्म म्हणजे सर्वव्यापी.
याच ठिकाणी एकमेकाच्या मतांना आव्हान देणारी दर्शनांची निर्मिती झाली. प्रत्यक्षात कोणी किती दर्शने वाचली आहेत हे मला माहीत नाही. परंतु मुल सनातन धर्मात किती पद्धती
आणि प्रकार आहेत हे देखील लोकांना माहीत आहे की नाही याबद्दल मला कल्पना नाही. परंतु केवळ आपल्या बायो मध्ये सनातनी असे नाव लावले की काम झाले असे प्रत्येकाला वाटते. सनातन धर्म याचे प्रमुख साहित्य मानले जाते ते म्हणजे वेद.
या वेदांना धरूनच अनेक दर्शनाची निर्मिती झाली.
तर वेदांना धरुन असणाऱ्या साहित्याला आपल्या भारतात वैदिक अशी मान्यता मिळते. परंतु जे वेदांना मानत नाहीत त्यांना देखील आपल्याकडे तेव्हढीच मान्यता आहे. असे महान आहे भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्म.
अथर्वशीर्ष खूप जणांना पाठ असेल.
अथर्ववेद याचा भाग असलेल्या हे गणेशाचे वर्णन.
पण त्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा शांतपणे गणपती समोर बसून आपण त्याच्याशी अथर्वशीर्षाच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून संवाद करतो.
जरी आपल्या समोर सगुणरूपी गणपतीची मूर्ती असेल तरी जसा म्हणण्यामागे भाव येत जातो तसे हळूहळू निर्गुण गणेशा कडे वाटचाल होण्यास सुरुवात होते. मग अथर्वशीर्ष म्हणणे हे केवळ यांत्रिक राहत नाही. प्रत्येक ओवी किंवा वाक्य म्हणताना त्याचा अनुभव येत जातो.
अथर्वशीर्ष हे जास्त करून तर निर्गुण गणेश, ओंकार रूपे गणेश याचेच वर्णन करते.
सुरुवातीची जवळपास सर्व ओव्या ह्या निर्गुण गणेशाच्या स्तवना साठी वापरलेली आहेत.
जागृत जीवन आणि स्वप्न यात अंतर नसते.
तुम्ही तुमच्या आयुष्यात घडलेला कोणताही प्रसंग आठवायचा प्रयत्न करा आणि तुमचे कोणतेही स्वप्न आठवायचा प्रयत्न करा.
दोन्ही ची माहिती एकाच स्वरूपात साठवलेली असते. दोन्ही thoughts असतात. एकदा हा चालू क्षण संपला की स्वप्न आणि त्यात काहीच अंतर नसते.
तुम्ही कधीतरी हे स्थापित देखील करू शकत नाही की नक्की मी आठवलेली ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडली होती का मी ती स्वप्नात बघितली होती. कारण दोन्ही गोष्टी घडून गेल्यानंतर त्या मेमरी झालेले असतात. जेव्हा कधीही आपण ते आठवायचा प्रयत्न करू त्यावेळेला विचाराच्या स्वरूपातचते आपल्यासमोर येतात
त्यामुळे आपण जागृतावस्थेत जगलेले जीवन आणि स्वप्नामध्ये जगलेले जीवन यामध्ये काही अंतर राहतच नाही.
आयुष्यात या रोज आपण अनुभवणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण त्यांच्याकडे कदाचित कधी निरखून बघत नाही. प्रचंड बिझी आयुष्य आपण जगत असतो आणि स्वतःच्या आत डोकवायला वेळ मिळत नाही.
A stolen life: Jaycee dugard...
The girl who was kidnapped for 18 years.
हे पुस्तक वाचले तर पुढे काही दिवस झोप येणार नाही किंवा प्रचंड अस्वस्थ असाल.
खऱ्या घटनेवर आधारित पुस्तक माझ्या हातात तीन वर्षांपूर्वी पडले. जगामधील सगळ्यात मोठी म्हणजे अठरा वर्ष किडन्याप केल्या गेलेल्या
मुलीने लिहिलेले पुस्तक आहे हे.
Jaycee dugard नावाची एक सुंदर छोटी अकरा वर्षाची मुलगी शाळेमध्ये जात असताना तिला एका व्यक्तीने किडनॅप केलेले. त्यानंतर ते 18 वर्ष त्या माणसाच्या ताब्यात होती. तिचा अकरा वर्षाचा असताना
चा फोटो या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती आहे. वय वर्ष 29 झाल्यावर तिची सुटका झाली आणि ती देखील अत्यंत आश्चर्यकारक आणि आपल्याला विचार करायला लावणाऱ्या पद्धतीमुळे.
तो माणूस आणि त्याची बायको या दोनच व्यक्ती जेसी क्या आयुष्यात होत्या त्या 18 वर्षात. तो माणूस प्रचंड
ओम
या शब्दाला आपल्याकडे प्रचंड महत्त्व आहे. याचा अर्थ विविध प्रकारे सांगण्यात येतो. परंतु एक उपनिषद खास या शब्दासाठी तयार केले गेले आहे ते म्हणजे मांडक्योपनिषद.
अ ऊ म या तीन अक्षरांचा व त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा अर्थ या उपनिषदात सांगण्यात आला आहे.
तर हे उपनिषद काय सांगते? केवळ 12 श्लोक असलेले हे उपनिषद्. यामध्ये कोणत्याही दैवतांची चर्चा नाही, आपण रोज जे काही अनुभवतो त्या गोष्टींचा आधार घेऊन ब्रह्म म्हणजेच परमेश्वर काय आहे तो सांगण्याचा प्रयत्न यात आहे. अद्वैत वेदांत किंवा उपनिषदांची खासियत हीच.
रोजच्या रोज आपण जे काही अनुभवतो त्याचा आधार घेऊन बुद्धीच्या द्वारे त्याच्या खोलात शिरून त्याचा नक्की अर्थ काय हे समजून घेणे.
तर मांडक्योपनिषद हे सांगते आपल्या तीन अवस्था ज्या आपण रोज अनुभवतो 1. जागृतावस्था: आपण रोज दिवसभरात जे काही करत असतो ते म्हणजे जागृत अवस्था 2. स्वप्नावस्था:
#फोटोग्राफी_टीप #photography_tip #thelonewolfotos
कॅमेरा पेक्षा खरा फोटोग्राफर फ्रेमींग बघतो. म्हणजे फोटो च्या आत कोणती वस्तू कशी आहे कोणत्या जागी आहे. याचा अभ्यास आयुष्यभर केला तरी संपत नाही असे मोठे फोटोग्राफर सांगत असतात.
त्यामुळे कंपोजीशन किंवा फ्रेमिंग सगळ्यात महत्त्वाचे.
हल्ली प्रत्येकाकडे मोबाईल असतो त्यामुळे ही प्रॅक्टीस प्रचंड सोपी आहे. 2008 पासून मला सवय लागली आहे मी माझ्या बाईकच्या आरशाचा उपयोग फ्रेम म्हणून करतो. कुठेही थांबलो असेल तर त्या आरशातून मागे बघायची मला सवय लागली आहे. मग आरसा हलवत बसायचा व त्याचे चौकोनी आरशात, मागील दिसणारे जग
जास्त कोणत्या अँगलने चांगले दिसेल हे बघत बसायचे ...hehe. तुम्ही म्हणाल काय वेड्याचे चाळे आहेत. पण खरच सांगतो या गोष्टीमुळे चौकोनी प्रेम मध्ये गोष्टी कशा चांगल्या बसवाव्यात हे थोडेफार समजू लागले व ती सवय लागली. हल्ली मोबाईल असल्यामुळे सरळ मोबाईलचा कॅमेरा ऑन करावा व मोबाईलमध्ये