माचीवरला बुधा आणि योगायोग:
काही दिवसांपूर्वी 'माचीवरल्या बुधा'शी ओळख @sunandanlele यांच्या एका व्हिडीओ ब्लॉग वरून झाली..त्या नंतर ट्विटर मित्र @amlya02 यांच्या संभाषणात देखील बुधाचा रेफरन्स आला, दुवा होता- प्रवासवरी मधील राजमाची चा उल्लेख
..
गोनीदांच्या लिखाणात फक्त प्रवास वर्णनच नाही तर व्यक्ती वर्णन, प्राणी-पक्षी वर्णन एवढं जिवंत आहे की बुधा, राजमाची, टेम्बलयी चं पठार, बुधाचा कुत्रा, खारी, शेळ्या-मेंढ्या म्हैस डोळ्यासमोर उभे राहिले
त्यातील काही शब्द, जसे- झाप, हरीख, पावटी, किंजळ आणि अनेक असे @MarathiDeadpool यांच्या कडूनच समजून घ्यावे लागतील.
आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे, आज साप्ताहिक सकाळ मध्ये आलेला अंजली काळे यांचा राजमाची वरील लेख..
अश्या योगायोगांमुळे बुधा बरोबर नक्कीच काहीतरी ओळख असे वाटून गेले.
मागे मी राजमाची ट्रेक कर्जत च्या बाजूने केला होता... पण बुधा वाचल्याने आता लोणावळ्या कडून जाण्याची ओढ लागली आहे..
लॉक डाऊन च्या आधी लोकल आणि "फर्स्ट क्लास कट आणि हँडीकॅप्पड डब्बा" ह्या गोष्टी जगण्यातील अविभाज्य घटक होत्या.. सकाळी ऑफिस ला जाताना आधी ७.४४ जी कालांतराने ७.३४ झाली...कट डब्ब्यात चढून डब्याच्या शेवटच्या बाजूस ची विंडो म्हणजे ग्रुप ची फिक्स जागा..
येताना लोकल कुठलीही असली तरी डब्बा ठरलेला.. हँडीकॅप्पड सेक्शन च्या मागे जनरल.. इथे बसायचं कारण म्हणजे एगझिट ला लागून मोठ्ठी जाळी असल्याने हवेशीर जागा..
मुंबई लोकल ने खूप मित्र दिले ..असे मित्र जे फक्त लोकल पुरतेच मर्यादित न राहता मित्रांच्या परिवरासाहित एक मोठ्ठं कुटुंब झालं..
लोकल मधील मित्रांना वयाची चौकट नव्हती.. वय वर्षं २० पासून ६० पर्यंत सगळे मित्रच..लोकल ने अनेक सुंदर आठवणींचे क्षण दिले.. वाढदिवस, दसरा, सेवा-निवृत्ती, दसरा अनेक..खाबूगिरीची तर विचारता सोय नाही.. मग ते घरून आणलेले डब्बे असोत की रामश्रय, लाडू सम्राट, आराम मध्ये केलेली न्याहारी..
#प्रवासडायरी आज कल्याण होऊन पुण्याला कोणार्क एक्सप्रेस नि यायचा योग आला.. सुटीचा शेवटचा दिवस असल्या मुळे तत्काळ मध्ये जे मिळालं ते काढलं.. घाटात उल्हास दरी आणि राजमाची परिसर सुंदर आणि झाडी देखील हिरवी गार होती. करपलेली जमीन पावसाची आतुरतेने पावसाची वाट पाहत होती
पूर्वी कोड्रिंक वाले खूप असायचे..अल्युमिनियम ची बादली. त्यात बर्फ आणि भोवती गोल्डस्पॉट, मँगोला, लिम्का, एनर्जी च्या काचेच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंक वाला तो यायची दवंडी ओपनर नि बाटल्यांवर टिरनिंग-टिरनिंग आवाज करून पिटायचा. आता प्लास्टिक बाटल्यांच्या जमान्यात ते सगळं काळात जमा झालं
कर्जत नंतर या दिवसात करवंद, जांभळं घेऊन पाड्यातल्या मावश्या यायच्या. हल्ली पण असतात.. आज गोड जांभळं मिळाली.. पण झाडांच्यापानात केलेला द्रोण नाही.. कधी कधी मिळतात द्रोणात.. डेक्कन एक्सप्रेस पाड्यांवर थांबते.. तिच्यात मिळायची शक्यता जास्त
@kreedajagat दुभाष्या (ट्रान्सलेटर) ते जग प्रसिद्ध आणि मुख्य म्हणजे कायम बातम्यांमध्ये असणे आवडणारा आणि भरमसाठ इगो असणारा (जे जोसे स्वतः मान्य करतो) आणि पोर्तो सारख्या टीम ला घेऊन युनायटेड ला हरवणारा अवलिया. कोणे एके काळी बार्सिलोनाचा सहा. प्रशिक्षक ते कट्टर शत्रू ही एक वेगळीच कथा
@kreedajagat कधी खेळाडू म्हणून खास नव्हता... पण चांगला प्रशिक्षक होईल असे गुण आधी पासूनच जोसे कडे होते.. ज्या साठी त्याने व्यवसायिक प्रशिक्षण देखील घेतले. जोसे चे वडील देखील पोर्तुगाल मध्ये फुटबॉल प्रशिक्षक होते. जेंव्हा पोर्तो चे प्रशिक्षक म्हणून आले तेंव्हा पोर्तो चा संघ कामगिरी करत नव्हता
@kreedajagat अनोळखी आणि महाग नसलेले प्लेयर्स घेऊन चषक जिंकणे ही जोसे ची खासियत. आधी पोर्तो बरोबर पोर्तुगीज लीग आणि नंतर २००३ मध्ये चॅम्पियन्स लीग जिंकून जागतिक फुटबॉल च्या नकाशावर स्वतः चे नाव कोरले आणि पाय भक्कम केले