उध्दवजी, पुरंदरचा तह आणि शिवरायांना आठवा!

दत्तकुमार खंडागळ - संपादक वज्रधारी, मो. 9561551006

शिवसेनेतील भाजप पुरस्कृत बंडाळीमुळे सध्या राज्यात राजकीय भुकंप झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि पक्षालाच मुळासकट उखाडून काढण्याचा प्रयत्न ...
शिवसेनेतील आमदारांना हाताशी धरून केला गेला आहे. शिवसेनेत या पुर्वी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे अशा लोकांची बंडाळी झाली पण या वेळी एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड मोठे आणि धक्कादायक आहे. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान देणारे आहे.
उध्दव ठाकरेंच्याकडे १७ आमदार उरलेत तर शिंदे तब्बल ३७ आमदार घेवून पळाले आहेत. आज उध्दव ठाकरेंची झालेली अवस्था बघून पुरंदरच्या तहाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. ११ जून १६६५ साली पुरंदरच्या तहात छत्रपती शिवरायांचा मोठा पराभव झाला होता.
राजांनी पाची पातशाह्यांना जेरीस आणत स्वराज्य उभारले होते. स्वराज्य मुलखा मुलखात दौडत होते. स्वराज्यावरची प्रत्येक चाल परतवून लावली जात होती. औरंगजेबाला जेरीस आणून सोडले होते. तो स्वराज्य उध्वस्त करण्यास टपला होता. नामवंत सरदार भल्या मोठ्या फौजा घेवून स्वराज्यावर पाठवत होता.
शाहीस्तेखान सत्तर हजाराची फौज घेवून स्वराज्यावर चालून आला होता पण जाताना तीन तुटकी बोटे घेवून परत गेला होता. शिवरायांनी या आक्रमकांना माती चारली होती. वैतागलेल्या औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंहांना स्वराज्यावर चालून करण्यास पाठवले होते. तो पुरंदरवर चालून आला. पुरंदरला वेढा टाकला.
मावळ्यांनी पुरंदर लढवला पण त्यांचा प्रतिकार टिकला नाही. मुरारबाजी धारातिर्थी पडले. मिर्झाराजे जयसिंहासमोर शिवरायांना माघार घ्यावी लागली. अखेर शिवरायांना तह करावा लागला. या तहामुळे शिवरायांना त्यांच्याकडे होते नव्हते तेवढे गमवावे लागले.
स्वराज्यातले तब्बल २३ किल्ले व चार लक्ष होन औरंगजेबाला द्यावे लागले होते. तसेच चाळीस लाखाची खंडणी व वर्षाला तीन लाखाचे हप्ते लादले गेले. संभाजी राजांना मिर्झाराजांकडे ओलीस ठेवावे लागले. शिवरायांच्याकडे केवळ बारा किल्ले आणि लाख होन उरले.
प्रचंड त्यागातून, बलिदानातून उभारलेले स्वराज्य संपते की काय ? अशी अवस्था निर्माण झाली होती पण शिवरायांनी त्यातूनही स्वराज्य ताकदीने उभे केले. राजे आग्र्याला गेले. तिथे भर दरबारात अपमान होताच भर दरबारात कडाडले. जिथे मान उंच करून बोलण्याची मुभा नव्हती ...
तिथेच त्यांनी स्वाभिमानाची डरकाळी फोडत दिल्लीचे तख्त हादरवून सोडले. संभाजी राजांना सोडवलेच पण गेलेले सगळे किल्ले पाहता पाहता स्वराज्यात आणले. त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहिती आहे.

आज उध्दव ठाकरेंची अवस्था शिवरायां सारखीच झाली आहे. त्यांनाही दिल्लीश्वरांनी जेरीस आणले आहे.
योगायोगाची बाब म्हणजे पुरंदरचा तह ११ जूनला झाला आणि एकनाथरावांची बंडाळी २१ जुनला झाली. ११ जून आणि २१ जून अवघ्या दहा दिवसांचा फरक. पुरंदरच्या तहाला ४३५ वर्षे पुर्ण झाली. ४३५ वर्षानंतर तसाच बाका प्रसंग शिवसेनेसमोर उभा ठाकला आहे.
जून महिन्यातल्याच या दोन्ही घडामोडी घडल्या आहेत. दिल्लीश्वरांनी त्यांची शिवसेना पुरती उध्वस्त केली आहे. दिल्लीश्वरांसमोर त्यांचे मावळे लढले नाहीत तर फितूर झाले. या फितूरांनी दिल्लीश्वरांशी हातमिळवणी करत उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.
आमचीच शिवसेना खरी असल्याचे ते आता बोलू लागले आहेत. या दोन्ही घटनात कमालीचे साम्य आहे. छत्रपतींनी स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाला नंतर पुरता लोळवला होता. त्याचे कंबरडे मोडले होते. पुढच्या काळात त्याची महाराष्ट्रात मराठ्यांनीच कबर खोदली.
औरंग्याने जंगजंग पछाडले पण त्याला स्वराज्य संपवता आले नाही. स्वराज्य संपवण्याची स्वप्ने पाहत पाहत तोच संपला, मातीत मिसळला पण त्याचे स्वप्न सत्यात उतरले नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी शिवरायांचे स्मरण करायला हवे. त्यांनी कंबर बांधून शिवसैनिकांच्या जोरावर हे ...
दिल्लीश्वरांचे आक्रमण परतवून लावायला हवे. आमदार विकले गेले असतील, फितूर झाले असतील पण त्यांच्याकडे लढणा-या जातीवंत व कडव्या शिवसैनिकांची फौजच्या फौज आहे. ही फौज येत्या काळात सर्व विकाऊ लोकांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही.
छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे या सर्वांना शिवसैनिकांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. शिवसैनिकांनी यातले बहूतेक लोक भुईसपाट केले आहेत. उध्दव ठाकरेंनी पुरंदरचा तह आणि शिवरायांचा प्रताप आठवावा. त्यांचे स्मरण करून दिल्लीश्वरांचा बंदोबस्त करावा.
उध्दव ठाकरेंनी गेल्या काही दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिखट हल्ले केले आहेत. त्यांनी "आमचे हिंदूत्व शेंडी आणि जान्हव्याचे नाही !" असे म्हणत संघावर निशाणा साधला होता. काही दिवसापुर्वी संघाला थेट शिंगावर घेतले होते.
देशाच्या राजकारणात राहूल गांधीनंतर इतक्या ताकदीने संघाला थेट शिंगावर घेण्याची हिम्मत कुठल्या नेत्याने दाखवली नव्हती. उध्दव ठाकरेंच्या याच हल्ल्याचा हा हिशोब आहे. ठाकरे संघावर तुटून पडू लागल्याने, संघाचा कावा उघड करू लागल्याने त्यांचा पक्ष आणि त्यांचे नेतृत्वच मुळासकट उखाडून ...
काढण्याचे कारस्थान रचले गेले आहे. या शिंदेंच्या कारस्थानाला भाजपाची पुर्ण ताकदीने साथ, फूस आणि रसद आहे. भाजपाची साथ असल्याशिवाय हे शक्यच नव्हते. साम, दाम, दंड व भेद निती वापरून सगळे आमदार गोळा केले गेले आहेत.
मागची अडीच वर्षे मंत्रीपदाच्या खुर्च्या उबवताना या फितूर लोकांना हिंदुत्वाची आणि विकासाची आठवण झाली नाही. सत्ता चापून वरपताना त्यांना हिंदूत्व आठवले नाही. मग आत्ताच कसे काय आठवले ? पडद्यामागे काय काय ठरलय ? काय काय नाट्य घडलय ? सांगता येत नाही.
इडीची आणि बेडीची भिती घालून यातल्या अनेकांना शिवसेनेपासून वेगळं केले गेले असण्याची दाट शक्यता आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख तुरूंगात आहेत. अनिल परब चौकशीसाठी हेलपाटे मारत आहेत. जिथे राज ठाकरेंची बुलंद तोफ गारठली तिथे हे बिच्चारे आमदार काय करणार ? ते ही इडीच्या भितीने गारठले असणार!
तुरूंगात जाण्यापेक्षा मंत्री झालेलं, सत्तेत गेलेलं काय वाईट ? असा विचार करून ते भाजपासोबत गेले असतील. त्यातले काही मंत्रीपद आणि कोटी कोटीच्या उड्डाणालाही भुलले असतील. हे कारस्थान एका दिवसातले नाही. हा कट गेल्या अनेक दिवसापासून रचला गेलाय!
यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील सामिल आहेतच पण नरेंद्र मोदी व अमित शहासुध्दा सामिल आहेत. त्यामुळेच बंड केलेली सगळी सेना सुरतलाच गेली व सुरतमधून गुवाहटीला गेली. सगळे फुटीर व फितूर आमदार भाजप शासीत राज्यातच का गेले ? हैद्राबाद, चेन्नईला का गेले नाहीत ?
तिकडे त्यांचा पाहूणचार, सरबराई कोण करतय ? एकनाथ शिंदे यांनी अखेर फुटीर आमदारांना भाजप महाशक्ती असल्याचे सांगितले आहेच. म्हणजे हे सगळे कारस्थान याच तथाकथित महाशक्तीचे आहे हे उघड सत्य आहे. मध्यप्रदेशात, कर्नाटकात केले गेलेले "ऑपरेशन लोटस" महाराष्ट्रात केले गेले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तुटून पडणा-या, संघाची वैदीकशाही उघडी पाडू पाहणा-या व प्रबोधनकार ठाकरेंच्या वाटेवर जाऊ पाहणा-या उध्दव ठाकरेंना राजकारणातूनच पुर्ण नेस्तनाबूत करण्याचा हा प्रयत्न आहे. शिवसेना मनूवादी हिंदूत्वापासून बाजूला गेली, ब्राम्हणशाहीच्या जोखडातून बाहेर पडली तर...
राज्यात अडचण होईल. संघाचे इरादे यशस्वी होणार नाहीत याची पुरती जाणीव असणा-या संघाने उध्दव ठाकरेंचा गेम केलाय!

शिवसेनेच्या खांद्यावर बसून राज्यभर वाढलेल्या, पसरलेल्या भाजपाने व संघाने शिवसेनेचेच पाय तोडायचे कारस्थान रचले आहे. अजगर पाळला की तो गिळणारच हे सेनेच्या लक्षात नाही आले.
उध्दव ठाकरेंनी हे संघ व भाजप पुरस्कृत कारस्थान उलथवून लावण्यासाठी सज्ज व्हायला हवे. त्यासाठी त्यांनी शिवरायांचा प्रताप आठवायला हवा. शिवरायांचे मावळे जसे लढले तसे शिवसैनिक लढवायला हवेत. अंगात रग, धग असणारा झुंजार शिवसैनिक हे आव्हान पेलू शकतो.
या नव्या सत्तापिपासू औरंगजेबांना तो मातीत गाढू शकतो. ती धमक, ती आग, ती रग त्याच्याकडे आहे म्हणूनच फुटीर आमदार सुरत आणि गुवाहटीला पळून गेलेत. शिवसैनिकांची भिती व धाक नसता तर ते महाराष्ट्रातच थांबले असते!
#cp #शिवसैनिक_💪

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rajan Shridhar Mhapsekar

Rajan Shridhar Mhapsekar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MhapsekarRajan

May 13
वाटलं होतं की कोविडनंतर लोक बदलतील!

जगण्याची एक संधी मिळावी म्हणून त्या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... पण त्यांना ती संधी मिळालीच नाही!

कोविडमुळे ५ लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण ...
एका न दिसणाऱ्या विषाणूने मारुन टाकला. त्यावेळी आपल्या मनात काय विचार होते हे प्रत्येकाने स्वतःला एकदा विचारून पाहावे. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू, पुन्हा उभं राहू... फक्त या आजाराच्या संकटातून बाहेर पडावं, आपल्याला एक संधी मिळावी हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता ना?
आपल्याला ती संधी मिळालीही... आणि आपण काय करतोय?

जागतिक पातळीवरील रशिया-युक्रेन युद्ध असो की भारतातील दंगली असो... की महाराष्ट्रातील सध्याचं किळसवाणं राजकारण असो... माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे!

३६५ दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसाठी बेड उपलब्ध होत नव्हते...
Read 12 tweets
May 6
नोक्टुरिया ...
(Frequent urination at Night)

ज्येष्ठ नागरिकांसाठी, खरे तर सर्वांसाठी!
लघवी केली की लगेच पाणी प्यायला हवे!

नॉक्टुरिया म्हणजे रात्री वारंवार लघवी होणे, हे हृदयाच्या विफलतेचे लक्षण आहे, मूत्राशयाचे नाही.
शिवपुरीचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. बन्सल स्पष्ट करतात की, नॉक्टुरिया हे खरेतर हृदय आणि मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळा येण्याचे लक्षण आहे. याचा प्रौढ आणि वृद्ध लोकांना सर्वात जास्त त्रास होतो कारण त्यांना लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते.
झोप मोड होईल वा उठण्याचा कंटाळा, या भीतीने लोक रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. पाणी प्यायलं तर लघवी करण्यासाठी पुन्हा पुन्हा उठावं लागेल, असं त्यांना वाटतं. त्यांना माहित नाही की झोपण्यापूर्वी किंवा रात्री लघवी केल्यानंतर पाणी न पिणे ...
Read 14 tweets
Mar 29
पत्रकार हेमंत देसाई यांच्या वॉलवरून

लोकांच्या मनावर एखादी गोष्ट कशी बिंबवायची याचे एक आधुनिक विज्ञान आहे आणि त्यामधील पीएचडी भाजपने संपादन केली आहे. मोदीजींनी फारसा विकास केला नसूनही, ते 'विकासपुरुष' असल्याची प्रतिमा या मंडळींनी निर्माण केली.
त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सकाळी हातपायतोंड धुवून, मग लगेच पैसे खायला बसतात, अशाप्रकारचे समीकरण त्यांनी ठळक केले आहे. हे सरकार महावसुली सरकार आहे, असे भाजपमधील सर्व नेते जप केल्यासारखे म्हणत असतात.
जणू यांच्याबाबत मात्र 'गंगा मेरी माँ का नाम बाप का नाम हिमाला' अशीच स्थिती आहे... मविआ सरकारमधील काहीजण भ्रष्ट आहेतच, पण अवघे मंत्रिमंडळ अहोरात्र नोटा मोजत आहेत, असे कोणी म्हणू लागले, तर नाइलाजाने दुसरी बाजूही दाखवावी लागते.
Read 20 tweets
Jan 29
मद्यराष्ट्र???

सुपर मार्केटमध्ये वाइन विकायला ठेवली म्हणून काही प्रत्येक दारू न पिणारा माणूस वाइन प्यायला सुरू करणार नाही. हातभट्टी, देशी, फेनी, व्हिस्की, स्कॉच, रम, जिन, ब्रँडी, व्होडका, टकीला, श्यांपेन वगैरे वेगळ्या प्रकारची दारू पिणारे लोकही इतर सगळ्या दारू सोडून ...
फक्त वाइन प्यायला सुरू करणार नाहीयेत.

वाइन ही आजकाल उच्चभ्रू आणि रईस (जमिनी विकून श्रीमंत झालेल्या अडाणी लोकांना वगळून) लोकांमध्ये इज्जतीने पिली जाणारी गोष्ट आहे. २००० रुपयांची वाइन पिवून कुठल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराने बायकोला मारहाण केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.
ख्रिस्ती धर्मात वाइन हे सर्वमान्य आणि दैवी पेय आहे. येशू ख्रिस्ताने एका लग्नात वाइन कमी पडली म्हणून पाण्याला वाइनमध्ये बदलण्याचा चमत्कार केला. आजही जगभरातल्या चर्चमध्ये प्रार्थनासभेत प्रसादासारखी बुचभर वाइन प्यायला दिली जाते.
Read 8 tweets
Jan 12
बराक ओबामांची अकरा मिनिटं आणि मोदींची वीस मिनिटं...

पंतप्रधान मोदींच्या पुलावरील वीस मिनिटाच्या जाममुळं गोदी मीडिया पिसाळला होता. अगदी राष्ट्रपती भवन ते सर्वोच्च न्यायालयही धुंडाळून झाले. २०१० मध्ये जगाचा महासत्तेचे प्रमुख तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा मुंबईत आले होते.
मुंबईच्या झेवियर महाविद्यालयात कृषी प्रदर्शन (USDA-ICAR) करार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद असा कार्यक्रम होता. कृषी पत्रकार या नात्याने अमेरिकन कॉन्सुलेटने हा कार्यक्रम कव्हर करण्याची संधी मिळाली. बराक ओबामा ताज हॉटेल थांबले होते. माझे कार्यालय फोर्ट विभागात होते.
अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी पूर्ण फोर्ट आणि नरिमन पॉईंट विभागाची नाकेबंदी केली होती. सोबतीला मुंबई पोलिसांची यंत्रणा होती.

सेंट झेवियर येथे ओबामा यांच्या भेटीच्या एक दिवस अगोदर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस यांच्यात खटका उडाला होता.
Read 16 tweets
Jan 10
शहिद शिवराम हरी राजगुरु ...
काही न माहित असलेल्या गोष्टी ...

पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल त्रोटक तरी माहिती असते. परंतू 'राजगुरु' मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही. ही काय दर्जाची उपेक्षा म्हणायची?
मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता. ते इतके निष्णांत होते की, संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत.
कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता. नेमबाजीत ते शब्दवेधी होते.
एवढेच नव्हे तर उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवित (कधी प्रयत्न करा मग कळेल ही गोष्ट किती अवघड आहे ते!).
स्वत:स कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत-धावत १५-२० मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत, इतका त्यांचा दम होता.
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(