वटसावित्री!
नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती. मी सहज नवीन वहिनींना प्रश्न केला, काय वहिनी! झाले का बुकिंग?तर ती फणकार्यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे.असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नाही.
सगळेच हबकले.
मित्राच्या चेहर्यावरचे भाव, ‘सांग बाबा काही समजावून!’ असे होते. मग म्हणालो ‘वहिनी’ बसा! विज्ञाननिष्ठा म्हणजे काय हो?
कोणत्याही गोष्टीची कार्यकारणमीमांसा समजून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास न ठेवणे हेच ना? त्या म्हणाल्या हो! बरोबर.
मी म्हणालो, मग आता सांगा वडाचीच पूजा का करायची? आंबा, फणस, जांभूळ वा बाभळीची का नाही? मी म्हणालो,
मला काय माहिती? म्हटले जाऊ द्या. ज्येष्ठ पौर्णिमेलाच का करायची श्रावणी वा माघ पौर्णिमेला का नाही? ती पुन्हा म्हणाली, मला काय माहिती? मग मी म्हणालो, हे काहीच माहिती नाही?
बाबा आणि मी, दोघांच्या बऱ्याच आवडी-निवडी सारख्याच.....
.... लहानपणी ते माझे सुपरहिरो... त्यांचीच कॉपी करायचो......
.... आयुष्याच्या शाळेत ठामपणे उभं रहायला त्यांनीच भक्कम आधार दिला..... काळानुसार दोघांचे आयुष्य वेगवेगळे झाले....
मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर्ड लाईफ.....
.... वाद नव्हता पण संवाद कमी मात्र नक्कीच कमी झाला..... अचानक.... आम्ही दोघंच.. असे खूप वर्षांनी हॉटेलात जाण्याचा योग आला...... पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी बाबांचा हात हातात घेतला..... बाबा हसले......
त्यांच्या मनात काय आले असेल याची कल्पना आली.....
:
:
:
:
पस्तीस वर्षापूर्वी परिस्थिती बरोब्बर उलटी होती......
.... तेव्हा त्यांनीच मला आधार दिला होता आता मी......
.... काळानुसार आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्या सुद्धा.....
कोकणात साधारणतः 7 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होतं. चार चार दिवस आकाश उघडत नाही. हा खूप वेगळा अनुभव आहे. गेले काही पावसाळे बाहेर काढल्यावर आता त्याची प्रकर्षाने जाणीव होते आहे.
आता आता हे मिडीयावाले पावसाचा पाठलाग करत रिपोर्ट्स ब्राॅडकास्ट करीत असतात.
केरळमध्ये मान्सून दाखल अशा फूटनोट्स किंवा मग ती सॅटेलाईट पिक्चर्स पावसाची चाहूल सांगत असतात. अगोदर कुठे होते टीव्ही नि हे इंटरनेट. कोकणात खूप आधीपासून बर्याच पद्धती आहेत पाऊस साधारण कधी येईल हे ओळखण्याच्या.
सकाळी परसात देवपूजेची फूलं काढायला बाहेर पडलं की हवा गार असते, पायात अगदी छोट्या आकाराचे लाल किडे दिसायला लागतात. हे एका रात्रीत कुठून उत्पन्न होत असतील याचं मला आजही कुतूहल वाटतं. त्यानंतर भिंगरी नावाचे उडणारे जीव खूप खाली खाली येऊ लागतात.
सदगुरु कशासाठी हवा?
महाभारतातलीच एक कथा आहे.
द्रौपदी स्वयंवरात सर्व राजे, युवराज आपापलं कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करीत होते.
पणही विलक्षणच होता!
उंच छताला एक चक्र फिरत राहणार. त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला.
ते चक्र फिरत असतांना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा.
उ:! एवढंच?
नाही! ते तर कुणीही करेल! इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते!
अन् स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचं! सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटलेले!
पऱंतु खरी मेख पुढेच होती!!
नेम सरळ माशाकडे बघून धरायचा नव्हता. खाली भलंमोठं तसराळं पाणी भरून ठेवलं होतं. वर मासा लावलेलं चक्र फिरत असतांना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता अन् माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता!
"मी तुमच्या संभाजीला कैद केल्यावर लगेच त्यांचं शीर धडावेगळं करता आलं असतं पण मी तसं केलं नाही. मी त्याची अक्षरशः धिंड काढत त्यांना शक्य तितकी अपमानास्पद वागणूक देत माझ्या छावणीत आणवलं. "इस्लाम स्वीकार,तुला जिवंत सोडतो,अशी लालूच दिली, पण,
तो थुकला माझ्या खैरातीवर. तेव्हाच त्याचं मरण अटळ होत. पण , मी ते सहजासहजी दिलं नाही, पुढे कित्येक दिवस संभाजीवर अनन्वित अत्याचार केले. त्याची चामडी सोलली,डोळे काढले,नख उपटून काढली,पण तो बधला नाही.. आणि शेवटी त्याची मुंडी मारली. मेल्यावर वैर तुमच्यात संपत असेल,आमच्यात नाही.
मेल्यावर त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून भीमा नदीच्या काठी अक्षरशः फेकले.
का ?
मला वाटलं," ह्या क्रौर्यानं मराठे दहशत खातील. राजा नाही,राजधानी नाही,सिंहासन नाही,खजिना नाही म्हणून शरण येतील." पण नाही,संभाजी नंतर राजाराम,त्यानंतर ती ताराबाई मग कधी संताजी कधी