गेल्या ५०-५५ वर्षातील राज्यातील सर्वात मोठा ब्रँड म्हणजे शिवसेना होता,आता असेच म्हणावं लागतय..गेल्या ५-६ दशकातील हा सर्वात मोठा बंड सेनेने पाहिला या आधी ही बंड झाले पण अगदी राज ठाकरे हा आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा बंड मानला गेला.पण या बंडामुळे शिवसेनेला उतरती
१/१२
कळा लागू शकते.यापुढे आपण शिवसेनेला पुन्हा उभारी मिळवून देऊ.
- उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी शिवसेनेला उतरती कळा लागल्याचे जणू मान्यच केले.
मुळात शिवसेना हा फक व्यक्तीनिष्ठा माननाऱ्यांचा पक्ष आहे.फक्त बाळासाहेब ठाकरे या नावावर श्रद्धा आणि निष्ठा आहे अणि हेच
२/१२
नाव सेनेची ताकत आहे.याची बाळासाहेबांना पण पूर्ण कल्पना होती.म्हणून त्यांनी नेत्यांना कायम बगल देत थेट शिवसैनिकांशी संवाद साधायचे हेच उद्धव ठाकरेंना जमले नाही.फक्त ड्रॉइंग रूम मधून राजकारण करायला माहीर असणारे उद्धवजी आता हे दिवस गेले हे त्यांच्या कधी लक्षातच आलंच नाही का काय ?
३/
हे सांगणे कठीणच आहे.बाळासाहेबांची संघटनेवर पूर्णपणे पकड होती.कोणाची ताकत नव्हती त्यांच्यावर बोट दाखवण्याची हाच अभिमान,रुबाब किँवा ठाकरी बाणा होता.तो उद्धव ठाकरेंना जपायला जमलाच नाही.१९९५ ला सेना भाजप चे सरकार जेव्हा आलं तेंव्हा प्रमोद महाजन यांनी बाळासाहेबांना आग्रह केला होता.
४
की पण मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली पाहिजे.तेंव्हा बाळासाहेबांनी डंके की चोट पे तो आग्रह नाकारत रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवला.बाळासाहेबांनी जी चूक करणे साफ टाळले होते,नेमकी तीच चूक उध्दवजींनी केली.सत्तेचा रिमोट मातोश्री वरूनच चालवणे योग्य झाले असते.पण असे न करता त्यांनी
५
स्वतः TV झाले आणि फेसबुक लाईव्ह ही झाले.या गोंधळात सत्तेचा रिमोट मातोश्री वरून सिल्व्हर ओक ला गेला ते कळलेच नाही.मातोश्रीला जे स्थान होते तेच स्थान सिल्व्हर ओकला प्राप्त झाले.यात भरीस भर म्हणून संजय राऊत यांनी पवारांच्या बाजूची वक्तव्ये केली,यामुळे पवारांचे हात आणखी बळकट झाले.
६
सर्व सरकारी अधिकारी ब्रिफिंगसाठी सिल्व्हर ओकला जात होते असे म्हणतात.आता शिवसेनेचेच ८०-९० टक्के आमदार म्हणत आहेत.आम्ही ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरुद्ध लढून निवडून आलो,त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी फक्त सत्तेचा उपभोग घेण्यासाठीच घेतला.
७/१२
मागील २.५वर्षात राष्ट्रवादी हि शिवसेनेला एखाद्या वाळवी सारखी पोखरत होती.हे शिंदे गटातील आमदार ओरडुन ओरडुन सांगत होते.
शरद पवारांनी शेकाप,जनता दल सारखें पक्ष काँग्रेस सोबत घेऊन केंव्हा संपवले हे त्यांना देखील कळलं नाही.तशीच शिवसेना ही संपवण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले होते.
८/१२
पण शिंदे गटाने या खेळीला खिंडार पाडले असेच म्हणावे लागेल. राहीला प्रश्न भाजपचा, सेने आणि भाजपमध्ये हिंदुत्वाचा समान धागा होता तो उध्दव ठाकरेंनी संपुष्टात आणला.खर् तर उध्दव ठाकरेंना शिवसैनिकांनी बाळासाहेबांकडे बघूनच किंवा त्यांचा मुलगा आणि ठाकरे नावावर ची निष्ठा यांमुळेच
९/१२
स्वीकारले,बाकी त्यांना पक्ष वाढीसाठी किती रस होता हे जनतेला चांगले माहिती आहे.ज्यांना ज्यांना वाटतें की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनंतर पक्ष वाढविला १८खासदार निवडून आणले वैगेरे वैगेरे,बाळासाहेबांच्या काळात १६च खासदार होते वैगेरे वैगेरे जर तुम्हाला वाटत असेल ही उद्धव ठाकरेंची
१०/१२
कमाल होती.तर प्रत्येक निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे पेक्षा मोठा मोदींचा फोटो होता.तो कशासाठी ?अहो इतकंच काय! आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणत्याही शिवसैनिकाला वाटत नव्हते हे आपले सरकार आहे.पाठीमागे बोर्ड फक्त "मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य" बाकी कर्तृत्व काहीच नाही. असे
११/१२
१२/१२
शिवसैनिक च आता बोलू लागले आहेत.हे ऐकण्यासाठी मुंबईतील शाखाशाखंवर चक्कर मारावी लागेल.
आता कोण कोण आला रे कोण आला ?
अशी जेंव्हा आरोळी/घोषणा निघेल
आता तो व्यक्ती शिंदे असेल की ठाकरे ?
याच विवंचनेत एक सामान्य शिवसैनिक असेल.
सध्या आपल्या देशात २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.आता अमेरिकेचा आपण विचार केला तर ५० राज्यांचे संघराज्य आहे.
मुळात आपले संघराज्य करताना फक्त भाषेचा आणि जातीचा विचार केला गेला?
अणि तो कितपत योग्य होता?
जात,धर्म याच्या पुढे भारत कधी जाईल का?
१/८
छोट्या राज्यांची जर निर्मिती झाली तर भाषावाद आणि जातीवाद संपुष्टात येऊ शकतो आणि विकासाचे धोरण अवलंबिले जाऊ शकते.२०२४ नंतर कर्नाटक,महाराष्ट्र मध्ये २ राज्य होऊ शकतात.
उत्तर प्रदेश ४भाग करण्याचे नियोजन चालू आहे.यामुळे दर निवडणुकीवेळी जातीचे/धर्माचे राजकारणच संपुष्टात येऊ शकते.
२
अणि ही देशाच्या नवीन प्रगती साठी खूप मोठी दिशा ठरू शकते.राज्यांची संख्या वाढल्याने रोजगार आणि विकासाची नवीन दारे खुली होऊ शकतात.
अनेक शहरांचे रखडलेले प्रश्न सहजपणे मार्गी किंवा त्यावर निर्णयप्रक्रियेत येणारे अडथळे लवकर दूर होतील आणि त्यावर होणारे राजकारण पण.
१९५३ साली फक्त
३/८
संत नामदेवांची एक आरती आहे.त्यात ते म्हणतात "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा"आता युगे २८ म्हणजे काय तर हिंदू धर्मात असणारे ४वेद,१८ पुराणे,६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते.म्हणूनच विठ्ठल युगे २८ उभा या वेद, शास्त्रे व पुराणात श्री विठ्ठलाचे च गुणगान गायले
१/११
गेलं आहे. बऱ्याच जणांना वेद माहिती आहेत.पण शास्त्र आणि पुराणे माहितीच नाही.
वेद: ऋग्वेद, यजुर्वेद,सामवेद, अथर्ववेद.
शास्त्र: वेदांत, संख्याशास्त्र, योगशास्त्र,न्यायशास्त्र, वैश्विक शास्त्र, मीमांसा.
पुराण: मार्कंडेय,वामन,ब्रह्म,लिंग,ब्रम्हांड, मस्त्य,अग्नी,कुर्म,ब्रम्हवैवर्त
२/११
भागवत,गरुड, विष्णू,शिव,वराह,वायू,नारद,पद्म, स्कंद.
म्हणजे लक्षात घा मिञांनो,जगाच्या सुरवाती पासूनच देव आहे.
पुराण या शब्दाचा वाच्यार्थ प्राचीन असा आहे.
हिंदू संस्कृती मध्ये मनू ही कालगणना आहे.तिला मन्वंतर पण म्हणतात,का तर ती एका मनू नावाच्या क्षत्रिय राज्याने सुरू केली होती.
३/११
१९८४ पासून अवघ्या २ जांगापासून सुरवात करणाऱ्या भाजपने २०१४ पर्यंत अनेक पराभव पाहिले.प्रत्येक पराभवातून त्यांनी नव्यानं सुरवात केली. मार्गक्रमण करीत राहिल्याने या दीर्घकालीन राजकारणाची पायाभरणी झाली. सुरवातीला उत्तरेकडील राज्यांमध्ये वर्चस्व निर्माण झाले.
१/७
पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये मध्ये चांगले यश मिळालं.पण दक्षिणेंत हवे तसे स्थान मिळाले नाही ही खतं भाजपला वारंवार टोचत आहे.काही कालावधीत कर्नाटक मध्ये सत्ता मिळाली पण आता तरी दक्षिणेकडील स्वारी यशस्वी होईल असे वाटले पण ते तेवढे सोपं नव्हते हे भाजपच्या मागच्या १५वर्षांत चांगले
२/७
लक्षात आले. त्यामुळें दक्षिणेकडील लढाई जिंकण्यासाठी भाजपने पुन्हा छाती ठोकली आहे.त्यामुळेंच यंदाची राष्ट्रीय कार्यकारिणीची २दिवसीय बैठक हैद्राबाद मध्ये संपन्न झाली.यात काही मोर्चेबांधणी झाली आहे त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या वर्षी होणाऱ्या तेलंगणा निवडणुकीत पहायला मिळतीलच.
३/७
याठिकाणचे पुरावे कोर्टात तर ३२GB te२३०GB पर्यंत चे चित्रफिती आणि कैक हजार छायाचित्रं जमा केले आहेतच.पण एक असा पुरावा काही सादर केलेला आहे,असे सांगितले जात आहे.जो तत्कालीन थेट औरंगजेबशी निगडित आहे.१७०७साली जेंव्हा त्याचा मृत्यू झाला त्यानंतर म्हणजे १७१०मध्ये
१/४
त्याचे चरित्र लिहले गेले. Maasir I Alamgiri म्हणून ते जदुनाथ सरकार यांनी इंग्रजी मध्ये अनुवादित केलें आहे.मूळ पर्शियन भाषेतून अनुवादीत केलं असावं.यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की काशी चे मंदिर तोडायला औरंगजेबाने ८ एप्रिल १६६९ मध्ये आदेश दिलेले आहेत असे यामध्ये नमूद केलेलं आहे
२/४
या सहित अजून अनेक पुरावे आहेत.जे कोर्टामध्ये दिलेले आहेत.ही भव्य वास्तू तोफांनी फोडण्यात आली आणि या ठिकाणी मशीद उभारण्यात आली.हा उल्लेख तत्कालीन साकी मुस्ताद खानने यामध्ये केलेला आहे.हे पुस्तक १९४७ मध्ये प्रकाशित झालेलं होते आणि यात ५५क्रमांकाच्या पानावर स्पष्टपणाने नमूद केलेले
३
मानववंशशास्त्रज्ञ किंवा मानव जातीचा अभ्यास करणाऱ्या या मूळच्या पश्चिम बंगालच्या सध्या ६१वर्षाच्या असलेल्या यांच्या कामगिरीचे किंवा धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.अंदमानच्या बेटांवर अजूनही काही आदिवासी लोकं राहतात ज्यांना आपल्या जगाशी
१/९ #anthropology
काहींही देणें घेणें नाही.या साठी अंदमानच्या North Sentinel या बेटाला एक संरक्षित क्षेत्र म्हणून अगोदरच घोषित केलेलं आहे.या समुहाबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता होती. वयाच्या १२व्या वर्षीच यांच्या जीवनाविषयी कुतूहुल वाटू लागले होते.हेच धेय्य ठेवून त्यांनी #anthropology मध्ये
२/९
स्वतःची Phd केली.ही लोकं कोणालाही त्यांच्या बेटांवर येऊ देत नाही आणि आली तर मारून देखील टाकतात.त्यांचे संपूर्ण जीवन नैसर्गिक असते.याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या ४जानेवारी१९९१मध्ये अंदमानच्या सेंटीनेलिज आदिवासीं बरोबर शांततापूर्ण भेट घेण्याच्या एका पथकाच्या त्यासदस्या बनल्या
३
मध्यंतरी कोणी तरी ट्विट टाकले होते. मुलं सांभाळता येत नसतील तर जन्माला घालू नयेत वैगेरे वैगेरे विषयावरून,तसाच काहीसा हा बहीण-भावाचा हळवा विषयावर आहे.२०११च्या सिरियाच्या युद्धात जवळ जवळ५०लाख लोक सिरिया मधून इतर जवळच्या देशात निर्वासित म्हणून जगत होती
१/
हा चित्रपट अश्याच एका सत्य घटनेवर आधारित आहे.एक १० लोकांचे मुस्लिम कुटुंब त्यातील १२ वर्षाचं हे कवळं पोरं (जहन)आपल्याच आई वडिलांवर केस करतो.या कुटुंबातील बापाला ८मुलं असतात.याच्या असलेली ही त्याची बहीण(सहेर).त्यातील हा प्रसंग खूप बोलका आणि अंगावर शहारा उभा करणारा आहे.आपली समान
२/
वयाची बहीण हीची काळजीने हा ग्रासलेला हा बालक सकाळी जेंव्हा बेड वरून उठतो आणि त्यावर रक्ताचे डाग बघतो. तो तिला विचारतो तुझ्या पँट मधून रक्त कसं आलं. दोघांनाहि याबाबत काही ज्ञान नसते. तो तिला बाथरूम घेऊन जाऊन सगळी डागाळेले अंतर्वस्त्रे धुवून देतो आणि थोडी या विषयी माहिती घेतो.तो
३/