हॉटेलच्या आवारात सामसूम होती. सगळे वाघ डाराडूर झोपले होते. त्यांच्या गुरगुरण्याचा आवाज शांत झाला होता. सगळ्या वाघांचा राजा असलेला, ढाण्या वाघासारखा
दिसणारा तो दाढीधारी हळूच आपल्या रूममधून बाहेर पडला. त्याने चष्मा सारखा केला. एका हाताने दाढीला ताव दिला आणि (वाघ असला, तरी) मांजरीच्या पावलांनी तो हळूच बाहेर पडला.बाहेर रिक्षा त्याला न्यायला सज्ज होतीच.
आधी स्वतःच ती चालवावी, असा मोह त्याला झाला. पण मर्सिडीजपेक्षा आपली रिक्षा वेगवान आहे, हे दाखवण्याची ही वेळ नाही, ती नंतर येणार आहे, याची त्याला कल्पना होती. आवाजही न करता तो रिक्षात बसला आणि त्यानं रिक्षावाल्याला खूण केली.``अरे, दातेसाहेब, तुम्ही?``
रिक्षावाल्यानं ओळखीचं हसू फेकलं.धर्मवीरचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही, हे त्याच्या लक्षात आलं आणि तो दाढीतल्या दाढीत हसला.``दाते नव्हे, मी स्वतः शिं.....`` बोलता बोलता तो अचानक थबकला. आपल्याला कुठल्याही प्रकारे स्वतःची ओळख जाहीर करायची नाहीये,
हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं हसून वेळ मारून नेली.``साहेब, बातम्या लावू का रेडिओवर?`` रिक्षावाल्यानं विचारलं.``नको नको. रोज तेच तेच ऐकून कंटाळा आलाय!`` दाढीधारी म्हणाला, ``त्यापेक्षा गाणी लाव.``रिक्षावाल्यानं पडत्या धनुष्यबाणाची आज्ञा प्रमाण मानून लगेच रेडिओवर गाणी लावली.
``या चिमण्यांनो, परत फिरा रे, घराकडे अपुल्या...`` सुरेल आवाजातलं गाणं लागलं होतं.``बंद करा....बंद करा ते आधी!`` दाढीधारी कडाडला.``साहेब, भोली सुरत दिल के खोटे लावू का?`` रिक्षावाल्यानं विचारलं.``नको, कुठलंच नको. मुळात इथे मराठी गाणं कसं लागतं?`` दाढीधारीला प्रश्न पडला होता.
``अहो इथेच काय साहेब, उद्या गुवाहाटीत गेल्यावरही मराठी गाणी ऐकायला मिळतील तुम्हाला. मराठी भाषा कुठेकुठेपर्यंत पोचली आहे! माझा तमाम मराठी बांधव आणि भगिनी....``रिक्षावाला एकदम वेगळ्याच वाटेला लागला आणि दाढीधारीला या क्षणी नको असलेल्या आठवणी जागृत झाल्या.
त्यानं पुन्हा त्याला थांबवलं.मुळात गुवाहाटीचं नाव ह्यानं का घेतलं? सहज, की ह्याला काही अंदाज आला असेल आपल्या प्लॅनचा? दाढीधारी अस्वस्थ झाला.दुसरीकडे सागराला उधाण आलं होतं. नुकतंच यू ट्यूबच्या एका नव्या गाण्याचं रेकॉर्डिंग पूर्ण करून अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या ताई घरी आल्या होत्या.
दारातून त्यांनी आत प्रवेश केला, तर अचानक डोळ्याला मोठ्ठा चष्मा लावलेला, डोक्यावरून हूडी घेतलेला एक अनोळखी माणूस त्यांना समोर दिसला आणि त्या दचकल्याच!``चोर...चोर!!`` त्या किंचाळल्या.``शsss….!! हळू....!! काय ईडी-बिडी झालीस की काय? मी चोर नाही....मी....`` हूडीधारी बोलता बोलता थबकला
महाशक्ती बनून आपण राज्याचं भवितव्य पालटण्यासाठी निघालो असलो, तरी आत्ता या क्षणी ओळख जाहीर करायची नाहीये, हे त्याला आठवलं.``मीच आहे. जरा बाहेर निघालोय.`` त्यानं सांगितलं.ती गोंधळून बघत राहिली.``अरे हो...पण पहाटे तुझा रियाज असेल ना?````हो.`` तिनं नकळत उत्तर दिलं.
``मग उशिराच येईन. पण मी पुन्हा येईन.`` एवढंच बोलून तो तिथून सटकला. अजूनही ती गोंधळल्यासारखंच बघत होती. मग अचानक त्याचं शेवटचं वाक्य तिला आठवलं आणि तिच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला.दाढीधारी आणि हूडीधारी ठरलेल्या ठिकाणी भेटले.
``काय वेगळे दिसता हो तुम्ही! सुरुवातीला ओळखलंच नाही. काय हूडी, काय अवतार, काय चष्मा...! एकदम ओक्के मधी सगळं.`` हूडीधारीला त्यावर हसू आलं.``तुमची व्यवस्था नीट आहे ना?`` त्यांनी खातरजमा केली.``हो हो. आता महाशक्तीच पाठीशी आहे म्हटल्यावर....`` दाढीधारीने डोळा मारला.
``हॉटेलमधले सगळे सहकारी झोपल्यावर निघालोय. पहाटे ते उठायच्या आत परत जायचंय.`` दाढीधारीनं सांगितलं.``मला खरंतर लवकर निघायचं आहे, पण पहाटे जायला निघालो, तर चुकून राजभवनाकडेच जाईन!`` हूडीधारीनं त्याचा प्रॉब्लेम सांगितला आणि दाढीधारीला एका बाजूला नेलं.
दाढीधारीचं सहज हूडीधारीजवळ असलेल्या झोळीकडे लक्ष गेलं, तर त्यात चाणक्यनीतीचा ग्रंथ डोकावत होता. दुसऱ्या पुस्तकाच्या शीर्षकाकडे त्याची नजर गेली आणि तो दचकलाच.``राऊत? त्यांचं आत्मचरित्रही आलंय?`` त्यांनी आश्चर्यानं विचारलं.``राऊत नाही हो, राऊ म्हणून कादंबरी आहे ती.
फावल्या वेळेत वाचण्यासाठी. ते राऊ दे, मला सांगा, तुमचं पुढचं सगळं नक्की आहे ना?````होय तर! सगळे घट्ट आहेत, ठाकरायचं कारण नाही!" त्यांनी ग्वाही दिली.हूडीधारीला समाधान वाटलं."एकूणच कुठलीही नॉर्मल नसलेली वेळ तुमची जास्त आवडती दिसतेय. एकदा पहाटे तुम्ही शपथविधी केला होतात.
आता शपथविधीसाठी आपण मध्यरात्री, पहाट व्हायच्या आधी भेटून चर्चा करतोय. राज्याचं भवितव्य बदलण्यासाठी आपल्याला पुढे जे काम करायचंय, ते दिवसाढवळ्या नीट करता येणारेय ना?" दाढीधारीनं शंका विचारली.``नक्कीच! तुम्ही धाडस करून जे पुण्याचं काम करताय, त्यासाठी….````पुण्याचं नाही हो,
ठाण्याचं...ठाण्याचं काम करतो मी.`` दाढीधारीनं खुलासा केला.``पुण्याचं म्हणजे पुणे शहराचं नाही हो, पाप-पुण्यामधल्या पुण्याचं!`` हूडीधारीनं स्पष्ट केलं. ``तर त्या कामासाठी तुम्हाला अमितशः धन्यवाद!`` हूडीधारी
म्हणाला.``शतशः म्हणायचंय का तुम्हाला?`` दाढीधारींनी जरा बिचकतच विचारलं.यावर हूडीधारीनं कपाळावर हात मारून घेतला आणि दोघं दिलखुलास हसायला लागले.
काल पाहिलेला #मामूटी अभिनीत साऊथ कडील आणखी एक उत्कृष्ट सिनेमा. एका मंत्र्याच्या मृत्यूपासून सुरवात होते . मंत्र्याचे दिल्लीवरून परत येताना त्यांचा हार्ट
अटॅअने मृत्यू होतो . त्यानंतर त्यांचा असिस्टंट गायब होतो . त्या सोबत मंत्र्याच्या मृत्यूवर संशय घेतल्याने मारला गेलेला फ्री लान्स पत्रकार . त्यांनतर त्या पत्रकाराच्या मृत्यू मागील कारण शोधत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या होते
आणि एका दोन नंबर करण्याला अटक करतात त्यानंतर हे प्रकरण CBI कडे सोपविण्याची मागणी होते त्यानुसार CBI ची एन्ट्री होते .
त्यानंतर सुरू होतो खेळ कारण यात जे समोर दिसते तसे काहीच नसते जसे ज्या पोलीस अधिकाऱ्याकडून केस CBI
शब्दांच्या पलीकडचे आहे हे सगळं... एखादा क्षण...एखादा सिन चुकवणे म्हणजे महत्प्रपाप म्हणावं एवढं सुंदर मांडले आहे आर माधवनने आणि ह्या सगळ्यांचे रचयिते आहेत ते म्हणजे...नंबी नारायणन.
खरंच खेदाने मान्य करतो की मंगळयान, पद्मभूषण आणि त्यांनंतर चित्रपटाच्या निमित्ताने...ह्याव्यतिरिक्त ह्या महान व्यक्तीविषयी काहीच माहिती नव्हती...कदाचित जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना तेवढे समोरच आणले गेले नाही जेणेकरून सर्वांपर्यंत पोचवेत... विक्रम साराभाई, अब्दुल
कलाम ह्यांच्यासोबतच घडलेलं हे व्यक्तिमत्त्व...ज्याने देशाचे नाव उंचावण्यासाठी ज्या सुखाचा त्याग केलाय त्यासमोर नतमस्तक होण्यापलीकडे काहीच नाहीये आपल्याकडे...पाच वर्षात संपूर्ण कुटुंब कमावेल एवढा पगार एका महिन्याला देण्याची ऑफर धुडकवणारा निव्वळ
नॅशनल हेराल्ड..नक्की काय प्रकरण आहे ?
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ही कंपनी नॅशनल हेराल्ड चालवत असे. पेपर २००८ साली बंद पडला. काँग्रेसने एजेएलला एकूण ९०.२५ कोटी इतके बिनव्याजी कर्ज दिले
होते. त्यावर्षी तिच्या मालकीची स्थावर मालमत्ता सुमारे २००० कोटी रुपये इतक्या बाजारमूल्याची होती !! आणि त्यासमोर काँग्रेसने दिलेले ९०.२५ कोटी रुपये कर्ज होते. म्हणजे उरलेल्यावर फक्त आणि फक्त एजेएलच्या मूळ भागधारकांचा हक्क होता.
यंग इंडियन ही चॅरिटेबल कंपनी नोव्हेंबर २०१० मधे स्थापन झाली. तिचे उद्दिष्ट होते "देशातील तरुणांमध्ये लोकशाही आणि सर्वधर्मसमभाव बिंबवणे" .तिचे भाग भांडवल होते फक्त ५ लाख रुपये. त्यात सोनिया गांधी ३८% आणि राहुल गांधी
राहुल गांधी 'India at 75' या विषयावर बोलायला केंब्रिजला जाणार अशा बातम्या पेरून काँग्रेस इकोसिस्टिमने अशी हवा निर्माण केली आहे की जणू राहुलबाबाला केंब्रिज विद्यापीठानेच व्याख्यानाचे आमंत्रण दिले आहे.
हे वाचून आश्चर्याचा धक्का बसलेल्यांसाठी एक स्पष्टीकरण. हा कार्यक्रम
'ब्रिज इंडिया' या वेबसाईटने आयोजित केलेला असून त्याचा केंब्रिज विद्यापीठाशी कसलाही संबंध नाही.
ब्रिज इंडिया हे काँग्रेस इकोसिस्टिमचेच एक पिल्लू आहे. या इव्हेंटसाठी त्यांनी पप्पूबरोबरच सलमान खुर्शीद, तेजस्वी यादव, महुआ मोईत्रा, सीताराम येचुरी... असा नेहमीचाच दरबारी गोतावळा जमा
केला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हा कंपू देशाची यथेच्च बदनामी करणार आणि देवळात म्हातार्या कोतार्या, सुनांच्या नावाने बोटे मोडत कीर्तन ऐकतात, तसेच मोदींना शिव्या देत, आपल्या वैफल्यग्रस्त आयुष्यात काहीतरी अर्थ शोधण्याचा प्रयत्न करणार.
#वांझ_स्त्री
वांझ असणं खरच खूप वाईट आहे
आज सहज एका व्यावसायिक मित्राकडे कामानिमित्त गेलो होतो.त्याला अपत्य नाहीये अन् त्याच खापर फुटत ते बाईवरच
अमाप पैसा अडका गडगंज संपती आणि विशेष म्हणजे सर्व घर सुशिक्षित तरीही इतर लोकांनी बोललेल्या वाक्यात त्या स्त्रीच्या भावना जाणवल्या म्हणून पोस्ट प्रपंच.
वांझ निपुत्रीक वंशाला दिवा नाही वंश खंड आहे हिचा तोंड पाहु नये पांढरतोडीचं,पांढरी पाल लेकरूबाळ
नसणारणीला कदर नसती लेकरांची मानपान कशाला द्यायचा? ओटी भरायला तिला कशाला बोलवितात?अन ती जर आली तर मग आम्ही नाहीत यायचो. सकाळी सकाळी वांझ बाईचं तोंड बघीतलं की बरकत येत नाही वांझ बाईच्या खांद्याला खांदा लावू नये
गेल्या एक – दीड महिन्यात अनेक घटना फार वेगाने घडलेल्या आहेत. महाबलाढ्य रशिया ने युक्रेन वर आक्रमण केले. साधारण दोन – चार दिवसात युक्रेन चा पूर्ण पाडाव होईल हेच सर्वांचे भाकीत होते. मात्र तसे झाले नाही. नाटो देश आणि
अमेरिका यांनी प्रत्यक्ष मैदानातून माघार घेऊनही युक्रेन सारखा लहानसा देश, आज सदोतीस दिवस झाले तरी चिवटपणाने झुंजतोय. लढतोय. ह्या दरम्यान दोन गोष्टी घडल्या. एक – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि दोन – दिनांक ११ मार्च ला ‘द कश्मीर
फाईल्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. विधानसभांच्या निकालांनी एक गोष्ट परत अधोरेखित केली की उत्तर प्रदेश सारख्या महाकाय राज्यातली जनता हिंदुत्वाचे समर्थन करणार्या भाजपा च्या मागे उभी आहे.
‘द कश्मीर फाईल्स’ ने मात्र जणू एखाद्या क्रांतीची सुरुवात केली. सुमारे चौदा कोटींचा हा सिनेमा.