स्टार्टअप असो, सेट बिझनेस असो की पिढीजात उद्योग त्यांच्याकडे कितीही अद्ययावत मशीन्स-तंत्रज्ञान असले तरी या सर्वात महत्वाचा कॉमन घटक असतो तो म्हणजे त्या “यंत्रामागचा माणूस”
आता या अशा जीवघेण्या स्पर्धेत कंपन्यांना टिकायचे असेल,आपल्या क्षेत्राचे पुढे जायचे असेल तर ऑटोमेशन
२/१०
किंवा कोणत्याही आधूनिक टेक्नॉलॉजीएवढेच महत्वाचे असते ते म्हणजे आपल्याकडील “मानव संसाधन” टिकवून ठेवण्याचे आव्हान!
मुलामुलींनीही हे समजून घेणे फार गरजेचे आहे की Hire & Fire टाईपच्या कंपनीत स्वातंत्र्य नसतं, अशा ठिकाणी मोठी झेप घेता येत नाही, चांगली प्रगती तर कधीच होत नसते.
३/१०
कंपन्यांना चांगले मनुष्यबळ हवेच असते त्यासाठी करियरच्या सुरूवातीलाच योग्य प्लानिंग केले, बुद्धी स्थिर ठेवून विचार केला तर कमी कालावधीत अधिक मोठे यश मिळवता येते.
त्यासाठी-
१. कामावर फोकस
कित्येकांसाठी नोकरी हे फक्त उदरनिर्वाहाचे, चार पैसे कमवून जगण्याचे साधन असते, त्याकडे
४/१०
पाहण्याचा दृष्टिकोनही मर्यादित वा संकुचित असतो. गंभीरपणे करियर म्हणून, त्याकडे दूरदृष्टीने पाहणारे तरूण पुढे चांगली प्रगती करतात.
आयुष्यात हा “फोकस एरिया” जेवढ्या कमी वयात कळतो तेवढे यश मोठे!
२. जबाबदारी - तुम्ही तरूण असाल, खरोखर प्रगती करायची असेल तर निर्णयाचे अधिकार
५/१०
हवेत. त्यासोबत येणाऱ्या काटेरी जबाबदाऱ्याही मग हक्काने घ्यायलाच हव्यात.
संकटांना भिडायला शिकलो तरच अनुभव मिळतो, तरच प्रगती होते.
३. सतत शिकत राहणे - Learning, unlearning & relearning is the part of life…. In this process always keep reading books. Books will never allow
६/१०
you to settle down.
प्रोफेशनल आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर तरूणांनी या पाच गोष्टी सतत शिकत रहायला हव्यात-
▪️आर्थिक साक्षरता
▪️आपात्कालिन व्यवस्थापन
▪️वेळेचे नियोजन अन व्यवस्थापन
▪️जात-धर्म-पक्ष या पलीकडची माणूसकी
▪️कोणत्याही बदलांना सामोरे जाण्याची लवचिकता
आपले शिक्षण
७/१०
कितीही चांगले असो, आपल्याकडे कितीही पैसे येवो वरील कौशल्यांशिवाय ते कोणत्याही वेळी पुन्हा शुन्यावर येऊ शकतात.
४. टिमवर्क -
जगातल्या ऊत्तमोत्तम कंपन्यांच्या यशाचे श्रेय हे त्यांच्याकडे असलेला पैसा, इंन्फ्रास्ट्रक्चर किंवा ब्रॅंड हे नसते तर त्यांच्याकडील माणसं नवनवीन
८/१०
“कल्पना” किती सचोटीने “एकत्र येऊन राबवतात” यात दडलेलं असते. त्यामुळे विविध स्किल्स असलेल्या लोकांसोबत एकत्रित काम करता यायला हवं.
५. Sustainable Growth
आपली प्रगती, वाढ ही शाश्वत असायला हवी, थोड्याफार किंवा तत्कालिन लाभाच्या मागे लागून भविष्य अंधकारमय व्हायला नको याची फार
९/१०
काळजी घ्यायची.
जगात चौथी औद्यगिक क्रांती सूरू आहे, आता पाचवी येईल पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची-
नव्या कल्पना आणि नवी स्वप्न हे माणसाला मिळालेले सर्वोत्तम वरदान आहे. त्यासाठी कोणत्याही वेळी आपल्या आजूबाजूस असणारी चांगली, विश्वासू माणसं हीच सर्वात मोठी संपत्ती आहेत 🙏
१०/१०
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
बऱ्याचदा स्वतःच्याच क्षमता आपल्याला नीट उमजत नाहीत….. सहसा गरीब, निम्नमध्यम वर्गीय किंवा समाजाच्या खालच्या स्तरातल्या कुटूंबात तर कोणी यावर साधी चर्चाही करत नाही.
काय करावं, कुठे जावं काही समजत नाही!
तूला जसं जमतेय ते कर यामागे स्वातंत्र्य नसते तर - नक्की आपण काय सांगायचं हे अगतिक अज्ञान असतं.
कितीतरी जीव फक्त - आता पुढे काय करायचं या प्रश्नापुढे जातच नाहीत…. एक भयंकर न्यूनगंड (जे जवळपास प्रत्येकातच असतो) आहे त्या परिस्थितीतच ठेवतो…..
निर्लज्ज पणे करियर बद्दल प्रश्न विचारता यायला हवेत, तसं वातावरणं तयार व्हायला हवं. खर तर पुस्तकं, इंटरनेट आणि समाजमाध्यम यात फार मोठी भूमिका निभावू शकतात पण त्यात फार कोणाला इंटरेस्ट नसतो….. ट्रॅक्शन नसतं… हे जग नक्की आपल्याला कुठे घेवून चाललंय?
तेंव्हा मध्यप्रदेशमधे मी एका हिटिंग फर्नेसचा मोठा प्रोजक्ट हेड करत होतो.
काही डेडलाईन्स पाळायच्या असल्याने मी सलग पंधरा-पंधरा दिवस साईट २४ तास साईट रोटेशन पद्धतीने (दोन शिफ्टमधे) चालू ठेवायचो.
फक्त झोपायला जवळच्या हॅाटेलवर यायचो बाकी सलग १६- १८ तास साईटवरच जायचे. असेच एक
२/२४
दिवस काम संपवून रात्री उशीरा २ वाजता हॅाटेलवर पोहचलो, आंघोळ, जेवण करून झोपायला ३ वाजले.
नुकतीच झोप लागलीच होती की साधारण साडेतीन- चार वाजता माझा मोबाईल वाजला…. तो साईटवरील एक सहकारी सतिशचा होता, मी फोन लगेच उचलला, त्याचा आवाज प्रचंड घाबरलेला होता - एका दमात तो म्हणाला -
३/२४
उर्जा साक्षर होणं ही काळाची गरज आहे. एकविसावं शतकं हे विज्ञान-तंत्रज्ञान तसेच चौथ्या औद्योगिक क्रांतीचे आहे.
सोलार, विंडएनर्जी, बायोएनर्जी, इलेक्ट्रिक गाड्या हे शब्द जरी आज रोजचे झाले असले तरी जैविक इंधने- डिझेल,पेट्रोल, कोळसा, सीएनजी, एलपीजी #उर्जासाक्षरता#SaturdayThread
१/१२
रोजच्या वापरातले प्लॅस्टिक, सौंदर्यप्रसाधने, डांबर, औद्योगिक वापरासाठीचे फरनेस ॲाईल, लाईट डिझेल ॲाईल तसेच आपल्या आजूबाजूच्या शेकडो गरजेच्या वस्तूंसाठी हे जैविक इंधन क्रूड ॲाईलच्या स्वरुपात वापरले जाते.
आपण कल्पनाही करू शकत नाही इतके मोठे हे उर्जा विश्व आहे. बरं ते आपल्या
२/१२
अगदी बेसिक गोष्टींसाठी वापरले जाते तरीही आपण फक्त डिझेल, पेट्रोल, एलपीजी आणि हल्ली सीएनजी भाववाढ इथपर्यंतच सिमित ठेवतो.
खर तर क्रुड ॲाईल, त्यावरील प्रोसेस आणि त्यातून आपण काढत असलेली उत्पादने ही मानवाला गेल्या दिड-दोन शतकात मिळालेले वरदान आहे. आज कितीही आपण ग्रीन हायड्रोजन
३/१२
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतात तापमानाचा पारा अंगाची लाही लाही करतोय.
पुर्वी या दिवसात विदर्भात जायचे म्हटले तरी एसीमधेही दरदरून घाम फुटायचा पण समस्त मानवजातीची पृथ्वीवर कृपा झाली व ग्लोबल वॉर्मिंगमुळे अखंड विश्वाचेच चंद्रपुर व्हायला सूरूवात झालीये.
ग्लोबल वॉर्मिंग हा आजचा मुद्दा नाही तो खरं तर आपल्या प्रत्येक श्वासासोबतचा मुद्दा आहे त्यावर पुन्हा कधीतरी.
आजचा विषय म्हणजे यावर्षी आपल्या आयुष्यात आलेला नवा उन्हाळा.
आपल्याकडे एप्रिल, मे मधे तापमान वाढते आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात विजेची गरजही वाढते, बरं हे दरवर्षी
२/१०
होणारं ऋतुचक्र काही नवे नाही. वीजेची गरज अचानक किती जास्त वाढू शकते याचे वर्षानूवर्षाचे सरासरी आकडे सरकार दरबारी असतातच.
मागचे दशकानुदशके हे चालू आहे. बरं आपल्याकडे ७५ ते ८०% वाजनिर्मिती ही कोळश्यावरच होते त्यामुळे वीजनिर्मितीसाठी कच्चा माल काय लागणार याबाबत काही संदिग्धता
३/१०