गेले दोन - तीन दिवस झाले उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचे टिझर येताहेत, ते पाहत असताना कमालीची कीव येते, इतक्या टुकार गप्पा आणि टोमणे केवळ तेच मारू शकतात. मुलाखत पाहणं सोडा, टिझरही पाहणं जीवावर येतंय. मात्र त्या टिझरमध्ये सर्वात जास्त भांडवल काय असेल तर ते त्यांच्या आजारपणाचं आहे.+
केवळ आजार, आजार आणि आजार या शिवाय त्यांनी वेगळं काही त्यात सांगितलं असेल असं मला वाटत नाही.
मला हे ऐकत असताना भाजपाचे गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहरजी पर्रीकर यांचा फोटो सतत डोळ्यासमोर येत होता. एका दुर्धर आजाराशी झुंज देत असताना आपण एका राज्याचे मुख्यमंत्री आहोत,+
आपल्यामुळे राज्याचे नुकसान होऊ नये हे लक्षात ठेवणारा आणि कर्तव्याशी इमान ठेऊन अक्षरशः शेवटच्या श्वासापर्यंत जीव ओतून काम करणारा दुसरा कोणताच नेता देशाने अनुभवला नाही. ना कधी त्यांनी त्या आजाराचं भांडवल केलं, ना त्यावर कधी चकार शब्द!
नाकाला नळी लावलेली असताना सभागृहात आलेला हा+
नेता असामान्य आहे. उद्धव ठाकरे सातत्याने मी आजारी होतो हे सांगत आहेत, पण सांगताहेत कुणाला? आणि कशासाठी? तेच कळत नाही.
मनोहरजी पर्रीकर हेही मुख्यमंत्री होते आणि उद्धवजी सुद्धा मुख्यमंत्री होते मात्र मनोहरभाईंनी जे कमावलं त्याच्या जवळपासही उद्धवजींना जाता आलं नाही, खरंतर यांची+
तुलनाच होऊ शकत नाही. त्या मुलाखतीतून आजारपणाचे भांडवल करून सहानुभूती मिळवण्याची जी निन्जा टेक्निक उद्धवजींनी वापरली आहे, ती सपशेल फेल गेलीय, उलट ते सगळं जुगाड ऐकून लोकांना हसू यायला लागलंय.
कामाशी निष्ठा आणि आत्मीयता असायला हृदयात राष्ट्र प्रथम हे ब्रीद जगणारी माणसं असायला हवीत.+
"कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती" हे मनोहरजी पर्रीकर यांनीच सार्थ जगलं... भाई राजकारणातले राजहंस होते!❤️🌷🙏

- विकास विठोबा वाघमारे
वाघोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर
#vikaswaghamare #mohol

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with vikas waghamare

vikas waghamare Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @WaghamareVikas

Jul 16
थ्रेड👇
परवाच भाजपा- शिंदे युती सरकारने काही अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले, त्यातला एक म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा अधिकार दिला. हा निर्णय घेतला त्यावेळी खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.+
खरंतर हा निर्णय 2017 मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि सुभाष (बापू) देशमुख हे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांनी घेतला होता. मात्र त्यांनतर 2019 ला झालेल्या सत्ताबदलानंतर उद्धव ठाकरेंच्या महाआघाडी सरकारने तो निर्णय रद्द करत शेतकऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवलं होतं.+
मात्र पुन्हा देवेंद्रजींनी या निर्णयाला समोर आणत, शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मतांचा अधिकार मिळवून दिला.

जो शेतकरी काळ्या मातीत राबतो, कष्ट करतो अन उत्पादन केलेला आपला माल बाजार समितीत आणतो त्याला बाजार समितीच्या कोणत्याच प्रक्रियेत घेतलं जात नव्हतं. ना त्याला योग्य बाजारभाव मिळत+
Read 14 tweets
Jun 24
मला दोन - तीन दिवसांपासून पिंजरा सिनेमाची आठवण येतेय, व्ही. शांताराम यांनी पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ, ब्रह्मचारी आणि आदर्शवादी शिक्षकाची केवळ एका तमाशातील बाईच्या नादी लागून व मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अध:पतनाची कथा चांगली रंगवलीय. ती+
पाहताना प्रेक्षकांचे मन हेलावते.

गुरुजी सुरुवातीला स्वतःला आदर्शवादी मास्तर समजत असतात, अशातच गावात तमाशा आल्यानंतर रागाने तमाशाचा तंबू पाडला जातो, त्यावेळी तमाशातील बाई मास्तरला शाप देते की,
"मास्तर, एक दिवस बोर्डावर तुणतुणं घेऊन नाय उभा केलं तर नावाची चंद्रकला नव्हं"

मग+
नंतर नंतर हे आदर्शवादी मास्तर त्या तमाशातील बाईच्या नादाला लागतात, प्रेमात पडतात, वाहत जातात आणि तमाशाच्या तंबूतच मुक्काम ठोकतात. आणि एक दिवस खरंच हातात तुणतुणं घ्यावं लागतं!😅

उद्धवजी इकडे राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर वर्षानुवर्षे टोकाची जहरी टीका करायचे, काँग्रेस आणि+
Read 5 tweets
May 27
"चर्चेत ठरवण्यात आलेला ड्राफ्ट नंतर परस्पर बदलण्यात आला आणि उद्धव ठाकरेंनी माझा फोनही उचलला नाही" असा गौप्यस्फोट संभाजीराजे छत्रपती यांनी आज केला आहे. शिवसेनेच्या या कुटील कारस्थानामुळे आज संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. खरंतर हा छत्रपती घराण्याशी खूप मोठा+
दगा आहे, आणि शिवसेनेने राजघराण्याला दगा देऊन मोठं नुकसान करून घेतलं आहे.

जी शिवसेना छत्रपती आणि मराठी मुलाखांच्या गप्पा मारते त्यांनीच राजघराण्याला असा शब्द फिरवून दगा द्यावा हे दुर्दैवी आहे.
आज राजेंनी खुलासा केल्यानंतर मला मागची एक घटना आठवली, जेव्हा 2019 ला विधानसभा निवडणुका+
झाल्या, युतीला बहुमत आलं, तेव्हा अचानक उद्धव ठाकरेंना उपरती झाली अन सेनेला भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याचा कांगावा करत महाआघाडी सोबत सरकार स्थापन केलं, मुळात भाजपाने कोणता शब्द दिलाच नव्हता.

आज त्याच उद्धव ठाकरेंनी संभाजीराजे यांना शब्द देऊन फिरवला आणि हेच+
Read 8 tweets
May 26
थ्रेड👇
केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावर कसा दबाव टाकला जात होता हे ऑन रेकॉर्ड महाराष्ट्राने पाहिले, एवढा माज आणि मग्रुरी मंत्री अनिल परब तेव्हा दाखवत होते. आज त्याच अनिल परबांवर ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे, सोबतच परबांशी+
संबंधित 7 प्रॉपर्टीवर सकाळीच धाडी टाकल्या गेल्या आहेत, सध्या परब ज्या शासकीय निवासस्थानी आहेत तिथेच सकाळपासून धाड सुरूच आहे.

शिवसेनेने हट्ट करून किरीट सोमय्या यांच्या राजकीय करिअरला ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत तिकीट कापण्यासाठी अडून बसले, पण आज तेच किरीट सोमय्या सेनेच्या+
नेत्यांची वेशीवर टांगत आहेत.
जेव्हा परबांच्या दापोलीच्या रिसॉर्ट विरोधात स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यानंतर कारवाईच्या अगोदरच पोलीस स्टेशनला आग लागली आणि त्यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली, पण सोडून देतील ते सोमय्या कसले! त्यांनी रीतसर+
Read 8 tweets
May 25
#महत्वाचा_थ्रेड
छत्रपती संभाजीराजे यांनी महाआघाडीकडे राज्यसभेची उमेदवारी मागितली, काही दिवस वाटही पाहिली मात्र त्यांचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अक्षरशः अपमान केला, जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेचा विषय आला आणि राजेंनी सांगितलं की "मी अपक्ष फॉर्म भरणार आहे मला मदत करावी." तेव्हा+ Image
राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणाले आमचा उमेदवार निवडून येऊन उरलेली मतं आम्ही संभाजीराजेंना देणार! उरलेली? खरंतर उरलेली मतं हा शब्दच चांगला नाही, तुम्हाला द्यायची होती तर हक्काची उमेदवारी आणि तीही पहिली द्यायला पाहिजे होती. मात्र त्या स्टेटमेंट नंतर 24 तासांनी शरद पवारांनी पलटी मारली+
आणि शिवसेना सहाव्या जागेवर ज्यांना उमेदवारी देईल त्यांना आम्ही आमची मते देणार अशी घोषणा केली. म्हणजे संभाजीराजे यांना दिलेला शब्द 24 तासात फिरवला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर कमाल केली, थेट संभाजीराजे यांना अटी शर्ती आणि अल्टीमेटम देत दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत मातोश्रीवर+
Read 14 tweets
May 6
महत्वाचा थ्रेड👇
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचा काल कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी चौकशी समितीसमोर जबाब नोंदवला, त्यात त्यांनी मांडलेली भूमिका ऐकल्यानंतर धक्का बसला, मला त्यांच्या मागच्या अनेक स्टेटमेंटची आठवण आली, कारण शरद पवार जे बाहेर बोलत होते ते आतमध्ये आयोगासमोर+
शपथेवर का बोलले नाहीत? हा खरा सवाल आहे!

कोरेगाव भीमाचा हिंसाचार झाला 1 जानेवारी 2018 रोजी, आणि 2 जानेवारी 2018 ला शरद पवार मीडियासमोर आले, अजून पुरता हिंसाचार थांबला नव्हता, द्वेष आणि हिंसा मनात धगधगत होती, त्यावेळी मिडियासमोर येऊन शरद पवार म्हणाले की, "मी वढू गावातून माहिती+
घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून त्या ठिकाणी जाऊन चिथावणी देण्याची भूमिका अगोदर 3-4 दिवस केली, मी त्यांची नावे घेऊ इच्छित नाही पण ग्रामस्थ सांगतात!"
हे शरद पवार बोलेपर्यंत कोणीही हिंदुत्ववादी संघटनांचे नाव घेतले नव्हते, ना कोणी संशय व्यक्त+
Read 18 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(