मोदी सरकारची कमाल!

मागील ८वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या,त्यात सर्वात चांगली बाब,पण बऱ्याच पत्रकार आणि खुद्द भाजपाच्या नेत्यांना प्रचारात मांडता आली नाही. पण जनतेच्या हिताची गोष्ट म्हणजे,पूर्वी बँका, गॅस,शाळा, टोल,धान्याच्या दुकानात आणि इतर तस्संम ठिकाणी ज्या रांगा लागायच्या
१/१०
त्याच अचानक गायब होऊ लागल्या आहेत.त्याचे कारण सध्या आपला देश जागतिक स्तरावर डिजिटल क्रांती घडवून आणत आहे.डिजिटल पेमेंटच्या दिशेने खूप मोठी झेप घेत आहे.सध्या देशात ४५कोटी जनतेचे जन-धन खाते आहे.जे मोदी सरकारने उघडलं आहेत.इतर वेगेळेच,देशात ११८कोटी मोबाईलधारक आणि १३०कोटी आधार कार्ड
आहेत.आता मोबाईल-जनधन खाते-आधार कार्ड या तिघाडीने देशातील प्रत्येक सामान्य व्यक्ती डिजिटल जगाशी जोडला आहे.या मोदींच्या कल्पनेचा फायदा देशातील त्या गरीब,वंचित,किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला शेतकरी वर्गाला मोदी सरकारच्या DBT च्या माध्यमातून जबरदस्त फायदा झाला आहे.मागील ८
३/१०
वर्षात तब्बल २३ लाख कोटी रुपये डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्स्फरच्या माध्यमातून या वंचित जनतेला मिळाले आहेत.शिवाय देशात १००पेक्षा अधिक सरकारी सेवा आता ऑनलाईन आहेत.यामुळे देशातील लांबच्या लांब दिसणाऱ्या रांगा अचानक गायब झाल्या आहेत.हा छोटासा दिसणारा फरक बऱ्याच लोकांच्या निदर्शनास
अजून पर्यंत आला नाही.जगातील ४०% डिजिटल आर्थिक व्यवहार हे फक्त एकट्या भारतात होत आहेत.८२ कोटी पेक्षा अधिक इंटरनेट वापरणारे देशात आहेत.जगात वेगाने वाढणारी #digital_economy म्हणून भारताची 🇮🇳 🔥 ओळख होऊ लागली आहे.याने सरकारच्या योजनेत होणाऱ्या १००% भ्रष्टाचारावर चाप बसला आहे.या
५/१०
डिजिटल सेवेच्या आघाडीत एक सर्वात मोठा आणि मैलाचा दगड ठरला आहे तो म्हणजे शेतकरी आणि उद्योजकांना सहज कर्ज मिळावे म्हणून १३ सरकारी योजनांशी सबंधित credit linked portal जनसमर्थ या नावाने सुरू केले आहे.याच्या अंतर्गत तब्बल ११.३२कोटी लोकांनी याचा लाभ घेतला आहे.UPI, Co-win,Digi Locker
या सारख्या प्लॅटफॉर्मने देशातील नागरिकांचे काम खूप सुसाह्य झाले.शिवाय देशातील डिजिटल साक्षरतेचे प्रमाण विक्रमी प्रमाणात वाढत चालले आहे.देशातील ७०/८०वर्षाच्या व्यक्ती सहज ऑनलाईन व्यवहार करू शकतात. स्मार्ट फोन वापरू लागले आहेत.याची कित्येक उदाहरणे आपण आजूबाजूला पाहत आहोत.
७/१०
भारत आता चीन,जर्मनी,आफ्रिका आर्थिक समावेशानाच्या बाबतीत यांच्या पुढे आहे.खरी प्रभावी ठरली तरी जन धन योजना याने ग्रामीण भागातील बेकिंग क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे.
सध्या आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे.त्यात #5G तंत्रज्ञान येत असल्याने
चर्चेला आणखी उधाण आले आहे.यामुळे येत्या काहीं दिवसांत भली मोठी गुंतवणूक होण्याची आशा आहे. कुशल मनुष्य बळाची गरज लागणार आहे.त्यात ऑटोमेशन,क्लाउड computing,data science, artificial intelligence, Machine learning या सारख्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल.
तरी आपण याबाबत शिक्षण घेतले
९/१०
तर आपला फायदा होऊ शकतो.आणि देशाच्या विकासाच्या मोहिमेला अधिक बळ मिळू शकते.

जय हिंद 🇮🇳

#मोटाभाई_गुजरातवाले 🇮🇳🚩

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻

😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Motabhaigujratw

Jul 9
देशाचा इतिहास आणि भूगोल !

सध्या आपल्या देशात २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.आता अमेरिकेचा आपण विचार केला तर ५० राज्यांचे संघराज्य आहे.
मुळात आपले संघराज्य करताना फक्त भाषेचा आणि जातीचा विचार केला गेला?
अणि तो कितपत योग्य होता?
जात,धर्म याच्या पुढे भारत कधी जाईल का?
१/८
छोट्या राज्यांची जर निर्मिती झाली तर भाषावाद आणि जातीवाद संपुष्टात येऊ शकतो आणि विकासाचे धोरण अवलंबिले जाऊ शकते.२०२४ नंतर कर्नाटक,महाराष्ट्र मध्ये २ राज्य होऊ शकतात.
उत्तर प्रदेश ४भाग करण्याचे नियोजन चालू आहे.यामुळे दर निवडणुकीवेळी जातीचे/धर्माचे राजकारणच संपुष्टात येऊ शकते.
अणि ही देशाच्या नवीन प्रगती साठी खूप मोठी दिशा ठरू शकते.राज्यांची संख्या वाढल्याने रोजगार आणि विकासाची नवीन दारे खुली होऊ शकतात.
अनेक शहरांचे रखडलेले प्रश्न सहजपणे मार्गी किंवा त्यावर निर्णयप्रक्रियेत येणारे अडथळे लवकर दूर होतील आणि त्यावर होणारे राजकारण पण.
१९५३ साली फक्त
३/८
Read 9 tweets
Jul 8
उतरती कळा ..!

गेल्या ५०-५५ वर्षातील राज्यातील सर्वात मोठा ब्रँड म्हणजे शिवसेना होता,आता असेच म्हणावं लागतय..गेल्या ५-६ दशकातील हा सर्वात मोठा बंड सेनेने पाहिला या आधी ही बंड झाले पण अगदी राज ठाकरे हा आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा बंड मानला गेला.पण या बंडामुळे शिवसेनेला उतरती
१/१२
कळा लागू शकते.यापुढे आपण शिवसेनेला पुन्हा उभारी मिळवून देऊ.
- उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी शिवसेनेला उतरती कळा लागल्याचे जणू मान्यच केले.
मुळात शिवसेना हा फक व्यक्तीनिष्ठा माननाऱ्यांचा पक्ष आहे.फक्त बाळासाहेब ठाकरे या नावावर श्रद्धा आणि निष्ठा आहे अणि हेच
२/१२
नाव सेनेची ताकत आहे.याची बाळासाहेबांना पण पूर्ण कल्पना होती.म्हणून त्यांनी नेत्यांना कायम बगल देत थेट शिवसैनिकांशी संवाद साधायचे हेच उद्धव ठाकरेंना जमले नाही.फक्त ड्रॉइंग रूम मधून राजकारण करायला माहीर असणारे उद्धवजी आता हे दिवस गेले हे त्यांच्या कधी लक्षातच आलंच नाही का काय ?
३/
Read 12 tweets
Jul 6
युगे २८ उभा माझा विठ्ठल !

संत नामदेवांची एक आरती आहे.त्यात ते म्हणतात "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा"आता युगे २८ म्हणजे काय तर हिंदू धर्मात असणारे ४वेद,१८ पुराणे,६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते.म्हणूनच विठ्ठल युगे २८ उभा या वेद, शास्त्रे व पुराणात श्री विठ्ठलाचे च गुणगान गायले
१/११
गेलं आहे. बऱ्याच जणांना वेद माहिती आहेत.पण शास्त्र आणि पुराणे माहितीच नाही.
वेद: ऋग्वेद, यजुर्वेद,सामवेद, अथर्ववेद.
शास्त्र: वेदांत, संख्याशास्त्र, योगशास्त्र,न्यायशास्त्र, वैश्विक शास्त्र, मीमांसा.
पुराण: मार्कंडेय,वामन,ब्रह्म,लिंग,ब्रम्हांड, मस्त्य,अग्नी,कुर्म,ब्रम्हवैवर्त
२/११
भागवत,गरुड, विष्णू,शिव,वराह,वायू,नारद,पद्म, स्कंद.
म्हणजे लक्षात घा मिञांनो,जगाच्या सुरवाती पासूनच देव आहे.
पुराण या शब्दाचा वाच्यार्थ प्राचीन असा आहे.
हिंदू संस्कृती मध्ये मनू ही कालगणना आहे.तिला मन्वंतर पण म्हणतात,का तर ती एका मनू नावाच्या क्षत्रिय राज्याने सुरू केली होती.
३/११
Read 11 tweets
Jul 5
स्वारी दक्षिणेची !

१९८४ पासून अवघ्या २ जांगापासून सुरवात करणाऱ्या भाजपने २०१४ पर्यंत अनेक पराभव पाहिले.प्रत्येक पराभवातून त्यांनी नव्यानं सुरवात केली. मार्गक्रमण करीत राहिल्याने या दीर्घकालीन राजकारणाची पायाभरणी झाली. सुरवातीला उत्तरेकडील राज्यांमध्ये वर्चस्व निर्माण झाले.
१/७
पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये मध्ये चांगले यश मिळालं.पण दक्षिणेंत हवे तसे स्थान मिळाले नाही ही खतं भाजपला वारंवार टोचत आहे.काही कालावधीत कर्नाटक मध्ये सत्ता मिळाली पण आता तरी दक्षिणेकडील स्वारी यशस्वी होईल असे वाटले पण ते तेवढे सोपं नव्हते हे भाजपच्या मागच्या १५वर्षांत चांगले
२/७
लक्षात आले. त्यामुळें दक्षिणेकडील लढाई जिंकण्यासाठी भाजपने पुन्हा छाती ठोकली आहे.त्यामुळेंच यंदाची राष्ट्रीय कार्यकारिणीची २दिवसीय बैठक हैद्राबाद मध्ये संपन्न झाली.यात काही मोर्चेबांधणी झाली आहे त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या वर्षी होणाऱ्या तेलंगणा निवडणुकीत पहायला मिळतीलच.
३/७
Read 7 tweets
May 20
#ज्ञानवापी_मंदिर

याठिकाणचे पुरावे कोर्टात तर ३२GB te२३०GB पर्यंत चे चित्रफिती आणि कैक हजार छायाचित्रं जमा केले आहेतच.पण एक असा पुरावा काही सादर केलेला आहे,असे सांगितले जात आहे.जो तत्कालीन थेट औरंगजेबशी निगडित आहे.१७०७साली जेंव्हा त्याचा मृत्यू झाला त्यानंतर म्हणजे १७१०मध्ये
१/४
त्याचे चरित्र लिहले गेले. Maasir I Alamgiri म्हणून ते जदुनाथ सरकार यांनी इंग्रजी मध्ये अनुवादित केलें आहे.मूळ पर्शियन भाषेतून अनुवादीत केलं असावं.यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की काशी चे मंदिर तोडायला औरंगजेबाने ८ एप्रिल १६६९ मध्ये आदेश दिलेले आहेत असे यामध्ये नमूद केलेलं आहे
२/४
या सहित अजून अनेक पुरावे आहेत.जे कोर्टामध्ये दिलेले आहेत.ही भव्य वास्तू तोफांनी फोडण्यात आली आणि या ठिकाणी मशीद उभारण्यात आली.हा उल्लेख तत्कालीन साकी मुस्ताद खानने यामध्ये केलेला आहे.हे पुस्तक १९४७ मध्ये प्रकाशित झालेलं होते आणि यात ५५क्रमांकाच्या पानावर स्पष्टपणाने नमूद केलेले
Read 4 tweets
May 19
मधुबाला चट्टोपाध्याय✨

मानववंशशास्त्रज्ञ किंवा मानव जातीचा अभ्यास करणाऱ्या या मूळच्या पश्चिम बंगालच्या सध्या ६१वर्षाच्या असलेल्या यांच्या कामगिरीचे किंवा धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.अंदमानच्या बेटांवर अजूनही काही आदिवासी लोकं राहतात ज्यांना आपल्या जगाशी
१/९
#anthropology
काहींही देणें घेणें नाही.या साठी अंदमानच्या North Sentinel या बेटाला एक संरक्षित क्षेत्र म्हणून अगोदरच घोषित केलेलं आहे.या समुहाबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता होती. वयाच्या १२व्या वर्षीच यांच्या जीवनाविषयी कुतूहुल वाटू लागले होते.हेच धेय्य ठेवून त्यांनी #anthropology मध्ये
२/९
स्वतःची Phd केली.ही लोकं कोणालाही त्यांच्या बेटांवर येऊ देत नाही आणि आली तर मारून देखील टाकतात.त्यांचे संपूर्ण जीवन नैसर्गिक असते.याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या ४जानेवारी१९९१मध्ये अंदमानच्या सेंटीनेलिज आदिवासीं बरोबर शांततापूर्ण भेट घेण्याच्या एका पथकाच्या त्यासदस्या बनल्या
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(