🧵थ्रेड
भारताचा राष्ट्रीय ध्वज असा विकसित होत गेला आणि फायनली भारताला तिरंगा मिळाला. #Tricolour
1⃣ 1906 पहिला अनधिकृत ध्वज -
भारताचा पहिला झेंडा 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाता येथे पारसी बागान स्क्वेअरमध्ये फडकवण्यात आला होता. यावर कमळासोबत लाल,पिवळ,हिरवा अशा ३ आडव्या पट्ट्या होत्या
2⃣ 1907 बर्लिन समितीचा ध्वज -
मॅडम कामा आणि इतर क्रांतिकारकांच्या गटाने 1907 मध्ये हा ध्वज पॅरिसमध्ये फडकावला होता. हा पहिल्या ध्वजा सारखाच होता फक्त वरच्या पट्ट्यामध्ये कमळा ऐवजी सप्तर्षी दर्शवणारे तारे होते.
1917 होमरूल आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेला ध्वज -
तिसरा राष्ट्रीय ध्वज डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 1917 मध्ये होमरूल चळवळीदरम्यान फडकवला. या ध्वजावर सप्तर्षीच्या 7 ताऱ्यांसह 5 लाल आणि 4 हिरव्या आडव्या पट्ट्या होत्या आणि पांढरा चंद्रकोर आणि युनियन जॅक होता.
१९२१ मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी डिजाईन केलेला राष्ट्रध्वज -
१९२१ मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वजाची पहिली डिजाईन तयार केली. त्यांनी लाल आणि हिरव्या पट्ट्यांचा ध्वज सुरवातीला बनवला होता. #PingaliVenkayyaBirthAnniversary
नंतर महात्मा गांधीजींच्या सल्ल्यानुसार यामध्ये पांढरी पट्टी आणि राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून चरखा जोडण्यात आला. 1921 मध्ये बेजवाडा (आता विजयवाडा) येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनादरम्यान हा ध्वज फडकवण्यात आला.
1931 मध्ये तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याचा ठराव संमत करण्यात आला. हा महात्मा गांधींच्या चरख्यासह भगवा, पांढरा आणि हिरवा पट्टे असलेल्या सध्याच्या तिरंगासारखाच होता.
फायनली मग १९४७ मध्ये संविधान सभेने तिरंगा हा स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. यामध्ये चरख्याच्या जागी अशोकचक्र ध्वजावरील प्रतीक म्हणून स्वीकारण्यात आलं. आज हा स्वतंत्र भारताचा तिरंगा आहे. #75yearsofIndependence
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
भारताचं चांद्रयान-३ हे मिशन यशस्वी झालं असून विक्रम लँडर यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झालं आहे. आता महत्वाचं
असेल ते म्हणजे विक्रम लँडर चंद्रावर नेमके काय काम करेल? जाणून घेऊया चंद्रावर इथून पुढे लँडर आता नेमकं कोणतं काम करेल...#isrochandrayaan3mission #चांद्रयान३
विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर लँडरपासून प्रग्यान रोव्हर वेगळा होईल.रोव्हर हा एक लहानसा रोबोट असतो आणि त्याला चाकं देखील जोडलेली असतात. त्यामुळे चंद्रावर लँड झाल्यानंतर लँडर एका जागेवर स्टेबल राहील तर त्याचवेळी रोव्हर मात्र चंद्राच्या पृष्टभागावर फिरत राहील.
त्यानंतर या लँडर आणि रोव्हरवर असलेल्या सायंटिफिक उपकरणांच्या माध्यमातून निरनिराळे प्रयोग चालू होतील. या निरनिराळ्या प्रयोगांसाठी लँडरवर चार आणि रोव्हरवर दोन उपकरणं लावण्यात आली आहेत.
🧵थ्रेड
श्रीलंकन क्रिकेटर दानुष्का गुणातिलके याला बलात्काराच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर जे निरनिराळे आरोप लावण्यात आले आहेत त्यामध्ये स्टीलथींगचा (stealthing) देखील आरोप आहे. या थ्रेडमधून जाणून घेऊया स्टीलथींग या गुन्ह्याबद्दल ?
सेक्स करताना जेव्हा पुरुष, पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम काढून टाकतो त्याला स्टीलथींग असं म्हटलं जातं. बऱ्याचदा प्रोटेक्टेड सेक्स करण्यासाठीच पार्टनरने संमती दिलेली असते.
अशावेळी त्याच्या नकळत कंडोम काढल्याने त्याचा पार्टनर नको असलेली गर्भधारणा, सेक्सशुअली ट्रान्समिटेड डिसीज यांना बळी पडू शकतो. त्यामुळे हा गुन्हा धरण्यात यावा अशी मागणी होत असते.
🧵थ्रेड
भारताचे सरन्यायाधीश म्हणून डी. वाय. चंद्रचूड यांनी शपथ घेतली आहे. त्यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यात ते पत्नी आणि फॉस्टर चिल्ड्रन सोबत दिसतायत. फॉस्टर चाइल्ड ही दत्तक मुलांपेक्षा वेगळी कॉन्सेप्ट आहे. थ्रेडमधे जाणून घेऊया फॉस्टर चाइल्ड कॉन्सेप्ट
PC -@tashitobgyal
तर दत्तक मुलांसारखंच फॉस्टर चाईल्ड स्वीकारणारे पालक त्या मुलांचे जन्म देणारे पालक नसतात. मात्र दत्तक मुलांवर पालकांचा कायमचा हक्क असतो. फॉस्टर चाईल्ड कॉन्सेप्टमध्ये तसं नसतं.
ज्या मुलांचे पालक काही कारणास्तव त्यांच्या पोटच्या मुलांचा सांभाळ करू शकत नाहीत अशा मुलांचा ताबा त्यांचा सांभाळ करण्यासाठी सक्षम असणाऱ्या पालकांकडे दिला जातो. फॉस्टर पेरेंट्सकडे गेल्यानंतरही ही मुलं त्यांच्या जन्मदात्या आईवडिलांच्या संपर्कात राहू शकतात.
🧵थ्रेड
NDTV अदानींनी विकत घेतली आहे. अगदी अंबानींनी जसा नेटवर्क 18 ग्रुप विकत घेतला अगदी तसंच NDTV विकत घेण्याची तयारी चालू आहे आणि मेन म्हणजे २००९ मध्येच NDTV विकली जाणार हे जवळपास फिक्स होतं. हे सगळं एक्सप्लेन करणारा हा थ्रेड. #NDTV
तर ज्याप्रकारे अंबानींनी नेटवर्क 18 विकत घेतली तीच स्क्रिप्ट इथं रिपीट झाली आहे. म्हणजे मीडिया कंपनीवर खूप कर्ज असल्याने त्यांना बेलआउटची गरज असते. अशावेळी कंपनीचे प्रमोटर कर्ज घेतात. तेव्हा कर्ज देणारा Debentures ने कर्ज देतो.
Debentures मध्ये कर्जदाराला कर्जाची अमाऊंट कंपनीच्या शेअर्समध्ये कन्व्हर्ट करण्याचा ऑप्शन राहतो. त्यामुळे मग पुढे जाऊन कर्जदार त्याने दिलेल्या कर्जाचं शेअर्समध्ये रूपांतर करतो आणि मालकी बदलते. हेच NDTV च्या उदाहरणातून समजून घेऊ.
🧵थ्रेड
विनायक मेटे यांचा पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर कार अपघातात मृत्यू झाला. मेटेंच्या मृत्यूबाबत शंका कुशंका उपस्तिथ केल्या जातायेत. त्यापैकी एक आहे हायवे हिप्नोसिस. या थ्रेड मधून जाणून घेऊया ‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नक्की काय असतं ? आणि ते टाळण्यासाठी काय करावं?
‘हायवे हिप्नोसिस’ ला अनेकदा हायवेवर गाडी चालवणारे ड्राइवर बळी पडतात. हिप्नोसिस म्हणजे संमोहित होणं.
जेव्हा तुम्ही तुम्हाला माहित असणाऱ्या आणि एकसलग रोडवर ड्राइव्ह करत असता तेव्हा एका टाइमनंतर तुमचा मेंदू तुमचे डोळे काय इनपुट देत आहेत त्याऐवजी तुम्हाला जे आधीपासून रोडबद्दल जे माहित आहे त्यावरच जास्त अवलंबून राहू लागतो.
🧵थ्रेड
आओ बच्चों तुम्हे दिखाएं झाँकी हिन्दुस्तान की
दे दी हमें आज़ादी बिना ..
हम लाएँ है तुफान से कश्ती
ही गाणी तुम्ही आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ऐकली असणार,
पण तुम्हाला माहितेय का? 'जागृति' पिक्चरची ही गाणी, कथा बालकलाकार पाकिस्तानमध्ये डिट्टो कॉपी केली गेली होती
तर जागृति पिक्चररमधली हि सगळी गाणी आहेत आणि या पिक्चरचा पाकिस्तानमध्ये ' बेदारी' या नावाने रिमेक करण्यात आला होता. यामध्ये जागृति सिनेमाचा प्लॉट आहे तसा उचलून फक्त तो पाकिस्तानच्या दृष्टीकोनातून सेट करण्यात आला होता.
या दोन्ही चित्रपटांमधील मुख्य भूमिका नाझीर रिझवी (जो पडद्यावरील रत्न कुमार या नावाने अधिक प्रसिद्ध आहे) या बालकलाकाराने साकारली आहे. १९५० च्या दशकात नाझीर पाकिस्तानात स्थलांतरित झाला आणि त्यानंतर त्याने अनेक लॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले.