🧵थ्रेड
नरेंद्र मोदींच्या #HarGharTiranga मोहिमेला प्रतिसाद देत अनेकजण प्रोफाइल पिक्चरमध्ये तिरंगा ठेवत आहेत. मात्र RSS ने आपल्या ऑफिशिअल अकाउंटवर तिरंगा न ठेवल्याने टीका होत आहे. याला RSS ने १९५० ते २००२ अशा ५२ वर्षे संघ कार्यालयावर तिरंगा फडकवला नसल्याच्या घटनेशी जोडलं जातंय.
१९५० पासून ते २००२ सालापर्यंत संघाच्या मुख्यालयात प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन या भारताच्या राष्ट्रीय सणादिवशी झेंडावंदन केले जात नव्हते.
२२ जुलै १९४७ ला भारताच्या संविधान सभेने सर्वसंमतीने राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा स्वीकारला. मात्र संघाचे तत्कालीन सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांनी तिरंग्याचा जाहीरपणे विरोध केला.
गोळवकरांच्या या विचारांमागील प्रेरणा त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या विचारुतून घेतल्याचं सांगण्यात येते. सावरकर यांच्या मते हिंदुस्थानमध्ये अधिकृत झेंडा फक्त आणि फक्त कुण्डलिनी आणि कृपाणच्या सह असलेला भगवा ध्वजच असू शकतो.
सोबतच त्यांनी हे देखील स्पष्ट केलं होतं की, हिंदू कोणत्याही परिस्थितीमध्ये अखिल हिंदू ध्वज म्हणजेच भगवा ध्वजाशिवाय अन्य कोणत्याही ध्वजाला सलाम करणार नाही.
पुढे १९५० मध्ये जेव्हा सरदार पटेल यांनी संघावरील बंदी हटवण्याची तयारी दाखवली, त्यावेळी त्यांनी संघासमोर दोन अटी ठेवल्या. त्यापैकी एक अट होती, तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून मानण्यात यावं. या अटींचा स्वीकार केल्यामुळे त्यावेळी संघावरील बंदी उठवण्यात आली.
मात्र त्यानंतर देखील पुढची जवळपास ५२ वर्ष संघाच्या मुख्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवशी झेंडा वंदन केलं जात नव्हतं.
मात्र २००१ साली एक घटना घडली आणि त्यानंतर लगेचच २००२ सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकू लागला. नेमकी काय घटना घडली होती ? सविस्तर वाचा खालील लिंकवर. bolbhidu.com/after-that-ins…
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
🧵थ्रेड
आज १० वर्षांनंतर सुरेश कलमाडी पुणे महानगरपालिकेत आले. शरीराने थकलेल्या कलमाडींना ओळखनं देखील अवघड झालं होतं. मात्र कधीकाळी भारताने भारतातल्याच नागरिकांवर केलेला एकमेव हवाई बॉम्बहल्ला म्हणून ज्या हल्ल्यावर आरोप होतो त्यात कलमाडी सामील होते. त्याचाच हा किस्सा.
भारताचा ईशान्य भाग कायम असंतोषामुळे धगधगता राहिला आहे. स्वातंत्र्य मिळल्यावरही या मिझोराम हा आसाम राज्याचा जिल्हा म्हणून राहिला.मिझो लोकांच्या विकासाकडे तत्कालीन प्रांतिक सरकारने पुरेसे लक्ष न दिल्यामुळे या लोकांतील असंतोष वाढत गेला.
शेजारच्या पूर्व पाकिस्तानमधून येणारे निर्वासितांचे लोंढे यांना देखील आवर घालण्यात आसाम सरकार कमी पडत होतं. त्यांतच वारंवार होणाऱ्या भीषण दुष्काळाची भर पडली.मिझो तरुणांनी दुष्काळ निधी न देणाऱ्या आसाम सरकारच्या विरोधात शस्त्रे उचलली.
#फोटोऑफद_डे
सोशल मीडियावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचा ##महंगाई_पर_हल्ला_बोल आंदोलनातील हा फोटो व्हायरल होतोय आणि सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही. या दोन फोटोंमागची नेमकी स्टोरी जाणून घेऊ.
असा आहे इंदिरा गांधींच्या त्या फोटोचा इतिहास @INCIndia@INCMaharashtra
हा फोटो आहे १९७७ सालातला. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर इंदिरा गांधींनी आंदोलन केलं होतं. आणीबाणीनंतर झालेल्या या निवडणुकीत इंदिरा गांधींचीच सत्ता येईल अशी खात्री त्यांना इंटेलिजन्स ब्युरो मधल्या काँग्रेस निकटवर्तीयांकडून देण्यात आली होती.
मात्र तसं झालं नाही. काँग्रेसला सपाटून पराभव स्वीकारावा लागला, खुद्द इंदिरा गांधीही रायबरेलीमधून हरल्या आणि या सगळ्या परिस्थितीमुळं त्यांनी आपल्याच बंगल्याच्या लॉनवर आंदोलन केलं. त्यांचा हा फोटो सुप्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांनी काढला आहे.
🧵थ्रेड
सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीत एक महत्वाचा निर्णय होता, पुढील सुनावणीपर्यंत शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये. ठाकरे गटाचा शिवसेनेचा मुद्दा इलेक्शन कमिशनकडे नेण्यास विरोध आहे. जर आयोगाकडे हा विषय गेला तर सेनेची स्थिती लोकजनशक्ती पक्षागत होऊ शकते.
त्याचवेळी शिंदे गट मात्र निवडणूक आयोगाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा यासाठी आग्रही आहे. कालच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीतही शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ येत असल्याने आम्ही इलेक्शन कमिशन कडे धनुष्यबाणाची मागणी केली असल्याचं म्हटलं होतं.
निवडणूक आयोगाकडे असंच रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या फुटीचं प्रकरण गेलं होतं. फुटीनंतर पक्ष कोणाचा ? हा निर्णय येइपर्यंत पक्षाचं बंगला हे चिन्ह गोठवलं होतं आणि लोकजनशक्ती पक्ष हे पार्टीचं नाव वापरण्यासही मनाई केली होती.
उद्धव ठाकरे गट
- शिंदे गटाला स्वतःला मूळ पक्ष म्हणता येणार नाही
ते पार्टीतून बाहेर पडले आहेत आणि इलेक्शन कमिशन समोर त्यांनी ते मान्य केलं आहे
-पक्षाची बैठक बोलवली असताना गुवाहाटी , सुरतला जाणे, पक्षाच्या विरोधात जाऊन व्हीप नेमने, अधिकृत व्हीपच्या निर्देशांच्या विरोधात जाऊन मतदान करणे अशा शिंदे गटाच्या आचरणावरून शिंदे गटाने शिवसेना सोडल्याचे प्रतीत होते.
🧵थ्रेड
भारताचा राष्ट्रीय ध्वज असा विकसित होत गेला आणि फायनली भारताला तिरंगा मिळाला. #Tricolour
1⃣ 1906 पहिला अनधिकृत ध्वज -
भारताचा पहिला झेंडा 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाता येथे पारसी बागान स्क्वेअरमध्ये फडकवण्यात आला होता. यावर कमळासोबत लाल,पिवळ,हिरवा अशा ३ आडव्या पट्ट्या होत्या
2⃣ 1907 बर्लिन समितीचा ध्वज -
मॅडम कामा आणि इतर क्रांतिकारकांच्या गटाने 1907 मध्ये हा ध्वज पॅरिसमध्ये फडकावला होता. हा पहिल्या ध्वजा सारखाच होता फक्त वरच्या पट्ट्यामध्ये कमळा ऐवजी सप्तर्षी दर्शवणारे तारे होते.
1917 होमरूल आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेला ध्वज -
तिसरा राष्ट्रीय ध्वज डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 1917 मध्ये होमरूल चळवळीदरम्यान फडकवला. या ध्वजावर सप्तर्षीच्या 7 ताऱ्यांसह 5 लाल आणि 4 हिरव्या आडव्या पट्ट्या होत्या आणि पांढरा चंद्रकोर आणि युनियन जॅक होता.
🧵थ्रेड -संजय राऊत यांना ज्यामुळं अटक झाली त्या पत्राचाळ प्रकरणाचा घटनाक्रम असा आहे. #SanjayRautArrested 2007- प्रवीण राऊतांची गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (GACPL) पत्रा चाळीतील रहिवासी आणि म्हाडा यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला.
यानुसार GACPL पत्रा चाळीतील 672 भाडेकरूंना नवीन घरं बांधण्याचं त्याचबरोबर तिथे म्हाडासाठी काही फ्लॅट विकसित करण्याचं आणि उर्वरित क्षेत्र खाजगी विकासकांना विकण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं.
2014-15- प्रवीण राऊत आणि GACL च्या इतर संचालकांनी म्हाडाची दिशाभूल केली आणि 672 विस्थापित भाडेकरूंसाठी पुनर्वसन नं करता तसेच म्हाडाच्या भागाचे बांधकाम न करता 901.79 कोटी रुपये वसूल करून नऊ खाजगी विकासकांना एफएसआय विकला .