स्वातंत्र्य - जी कालपर्यंत अमूर्त कल्पना होती, आज ती मूर्त स्वरूपात येत होती.
जे, काळ एक स्वप्न होते, ते आज सत्य ठरणार होते.
जो, कालपर्यंत एक संकल्प होता, तो आज सिद्ध होणार होता.
1
कालपर्यंत गुलाम असलेला एक देश आज स्वतंत्र होणार होता.
पारतंत्र्याचा काळोख संपून स्वातंत्र्यासाठी मंगल प्रभात आज उगवणार होती.
गप्पागोष्टी चालल्या होत्या, आम्ही साजऱ्या केलेल्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाची आठवण निघाली होती
2
स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून लाहोर काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला, त्या दिवशी २६ जानेवारी १९३० ला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आदेश काँग्रेसने दिले होते.
म.गांधीजींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या लढाईतील आम्ही सैनिक आहो
3
देशाच्या स्वातंत्र्यासाठी पडेल तो त्याग करावयाला आम्ही सिद्ध आहो
प्रसंगी आम्ही आमचे प्राणही अर्पण करणार आहो
आम्ही कराडच्या चौकाचौकांतून कशी वाटली, शाळेतील विद्यार्थ्यांना कशी दिली याच्या आठवणी निघाल्या
या आठवणींची उजळणी चालू असतानाची एक गोष्ट मला चांगलीच स्मरते
5
म.गांधींबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेने आमची मने अगदी ओतप्रोत भरून आली होती
आम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करीत होतो, पण आमचा स्वातंत्र्याचा सेनानी मात्र दूर नौखालीमध्ये दंगलीत बरबाद झालेल्यांचे अश्रू पुसत होता!
त्यांची आठवण झाली आणि माझे मन गंभीर झाले.
मी गांधीवादी केंव्हाच नव्हतो,
6
पण गांधीजींबद्दल एक अपरंपार श्रद्धा मनात वागवत होतो!
इतरांप्रमाणे मीही त्यांना केवळ लांबूनच पाहिलेले होते
त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढली होती
बलाढ्य ब्रिटिश सत्तेशी जनतेने निर्भय होऊन झुंज दिली होती, ती महात्मा गांधींच्याच प्रेरणेने !
7
भारत स्वतंत्र होत असताना त्यांचे स्मरण पदोपदी येत होते
माझे लक्ष सहज घरातील भिंतीवर गेले आणि मनातल्या मनात मला शरमल्यासारखे झाले
माझ्या मुंबईतल्या घरी म.गांधीजींचा फोटोसुद्धा नव्हता !
मन बेचैन झाले
चाललेल्या गप्पांतून लक्ष उडाले आणि सारखे वाटू लागले, हे काही खरे नाही
8
आज स्वातंत्र्यदिन आहे, आज आपल्या घरी म.गांधीजींची तसबीर आपण लावू या
मनात आले आणि मी हळूच घरातून बाहेत पडलो
कोणाशीही न बोलता, न सांगता चालताच ठाकूरद्वार नाक्यावर पोहोचलो
गर्दीने दुथडी भरून वाहणाऱ्या रस्त्याकडे माझे लक्षच नव्हते
मी फ्रेममकरचे दुकान शोधात होतो
9
एक दुकान सापडले; तिथे मिळाला, तो म.गांधींचा एक फोटो मी घेतला आणि घराकडे निघालो
हातात म.गांधींची तसबीर होती, आणि मनात त्यांच्याबद्दलची अपरंपार कृतज्ञता होती
त्यांचाच विचार करीत मी चाललो होतो
घरी आलो आणि माझ्या अभ्यासिकेत तो फोटो मी लावला, तेंव्हा माझे मन थोडे शांत झाले
10
आज पंचवीस वर्षे झाली, मरीन लाइन्समधून आम्ही मलबार हिलवर गेलो, आणि गेली दहा वर्षे आमचे बिऱ्हाड दिल्लीला आहे.
घराच्या जागा बदलल्या, कालमानानुसार घरातले फर्निचर बदलले, अनेक कालावस्तूंचीही भर पडली..
पण बदलली नाही, अशी एकच वस्तू म्हणजे म.गांधींचा तो तो फोटो!!
11
त्या फोटोचा विषयच निघाला, म्हणून सांगायला हरकत नाही,
सौ.वेणूबाईंची त्या फोटोवर अपरंपार श्रद्धा जडलेली आहे,
का कोणास ठाऊक, त्या फोटोला ती कधीही नजरेआड होऊ देत नाही !
फुटू नये, म्हणून तिने त्याची काच काढून ठेवली आहे !!
12
प्रवासाला निघाली, तर म.गांधींची ती तसबीर तिच्या सामानात हलक्या हाताने, कपड्यांच्या घडीत जपून ठेवलेली असते
स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्या दिवशी स्वतंत्रदिनी भायखळ्याच्या सभेत म.गांधींच्या नेतृत्वाबद्दल, त्यांच्या नौखालीच्या यात्रेबद्दल मी बरेच काही सांगितले
13
त्या दिवशी मी अगदी गांधीमय होऊन गेलो होतो !!
स्वातंत्र्य सार्थ करण्याचे नवे संकल्प, त्याचा सामाजिक आर्थिक अर्थ, पक्षातील वाद, स्वातंत्र्याशी समरस न झालेले अधिकारी या सगळ्या विचारांच्या आवर्तात म.गांधी, पं नेहरू यांच्या नेतृत्वाचा आधार वाटत होता !
14
स्वातंत्र्य युद्धाचे हे सेनानी, ज्यांनी राजकीय बदल घडविला, ते आर्थिक व सामाजिक बदल घडविल्याशिवाय राहणार नाहीत, असे मनोमन वाटत होते !
तोच दिलासा होता, तेच सामर्थ्य होते !!
15
आतापर्यंतच्या निराशेच्या ढगातून प्रकाशाची रुपेरी कडा या दोघा नेत्यांच्या स्मरणातून मनात चमकून गेली आणि मनाला थोडी स्वस्थता मिळाली
विश्वासाने मी स्वतःशीच म्हणालो:
'चला, पहिली मजल संपली, एक चढ चढून आलो; आता पुढल्या चढाईची वाटचाल सुरु!'
- यशवंतराव चव्हाण, शब्दाचे सामर्थ्य
16/16
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
६ तारखेला आमच्या लग्नाच्या वाढदिनी रायगडावर माथा टेकवून आलो
सदर पहिल्या फोटोतल्या शिवरायांच्या पुतळ्याजवळ एक गाईड जिवाच्या आकांतानं आलेल्या शिवभक्त कुटुंबाला सांगत होता -
1
"या पुतळ्याला संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत रोज सकाळी हार घातला जातो"
राज्य तसेच देशभरातून असंख्य कुटुंबं, लोक रायगडाला भेटी देतात, त्यांच्या कानावर मनोहर भिडेंच्या शिवछत्रपतींवरील हाराचे "उपकार" पोटतिडकीनं घालून
2
मी देवळात जातो का?
- तर जातो !
मी हिंदू सणवार साजरे करतो का?
- तर करतो !
मग तुम्ही माझ्या कशावर नाराज आहात?
माझ्या,
धर्मचिकित्सेवर?
धर्मातील अनिष्ठ रूढी, चालीरीतींवर बोलण्यावर?
की, २०१४ पासून वाढत चाललेल्या कट्टर धर्मांधतेवरच्या बोलण्यावर?
1
काय म्हणता तुम्ही?
- आपल्या धर्माला नावं ठेऊ नका, धर्माभिमान बाळगा !
संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना मारणारे तत्कालीन सनातनी, तुकोबांचे तुकडे करून ठार मारणारा मंबाजी, ज्योतिबांवर मारेकरी धाडणारे मनुवादी, महात्मा गांधीजींवर गोळ्या झाडणारा गोडसे ते
2
दाभोळकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश यांची हत्या करणारी सनातन संस्था हे सर्व मुस्लिम होते का?
- तर नव्हते !
काय म्हणतात ते?
- आपल्या धर्माला नावं ठेऊ नका, धर्माभिमान बाळगा !
हे प्रत्येकाने ऐका विशेषतः द्वेषाचा डोस घेऊन हिंदुत्ववादाच्या अंधाऱ्या गर्तेत बुडालेल्या प्रत्येक "शिक्षित" बहुजन अंधभक्ताने तर जरूर ऐकावे
या नीच माणसानं परवा शिवरायांवर गरळ ओकली
आज तो ज्योतिबा-सावित्रीबाई फुलेंवर घसरला
1
मध्ये एकाने "द्वेषधुंद" अवस्थेत इंग्रजीमध्ये संभाजी महाराजांवर अनैतिहासिक मुक्ताफळे उधळली होती
आरएसएस / भाजप च्या "खास" तालमीत तयार झालेली ही विषारी विचारवल्ली कशाप्रकारे महामानव, समाजक्रांतिकारकांबद्दल मनात खोलवर प्रचंड घृणा आणि पराकोटीचा मत्सर व हीनतेची भावना बाळगत असतात
2
याचं नमुणादाखल उदाहरण म्हणजे "विषारी भाज्यपाल कोश्यारी" !
जिजाऊ-शिवरायांपासून, ज्योती-सावित्री ते गांधी-दाभोळकरांपर्यंत सर्वांना हीन लेखणाऱ्यांच्या मेंदूने आपण अजून किती दिवस चालणार याचा आज झोपताना नक्की विचार करा मित्रांनो..
3
भिमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!
- सुरेश भट
दुमदुमे जयभिमची गर्जना चोहीकडे!
सारखा जावे तिथे हा तुझा डंका जडे!
घे आता घे राहिलेल्या संघरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!
1/7
कोणते आकाश हे तु आम्हा नेले कुठे!
तु दिलेले पंख हे पिंजरे गेले कुठे?
या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
2/7
कालची सारे मुके आज बोलु लागले!
अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले!
घे वसंता घे मनाच्या मोहरांची वंदना!
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!!
एक आम्ही जाणतो आमुची तु माऊली!
3/7
...बळीराजा...
बळी !
सात काळजाच्या आत जपून ठेवावा,असा निरागस ‘माणूस’ !
आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता !!
भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर !!!
1/10
बळी–हिराण्याकशिपुचा पणतू,प्रल्हादाचा नातू,विरोचानाचा पुत्र,कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता.भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व!सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट,एक महातत्त्ववेत्ता!
2/10
या बळीचा वंश तो बळीवंश. या बळीवंशातील माणसे - आपली माणसे, आपल्या रक्तामांसाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे ! ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्त्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासावर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही,अशी माणसे.
3/10
आधुनिक नटसम्राटाची कैफियत
--------------------------------------------
बोसांना आपलं म्हणावं की पटेलांना आपलं म्हणावं,
शास्त्रींना जवळ करावं की भगतसिंग आपला म्हणावा,
हा एकच सवाल आहे.
1/6
ह्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात
कोणाचं अपहरण करून जगावं बेशरम लाचार आनंदानं?
की घुसडून टाकावं हेडगेवार गोळवलकरांना या दिव्य लढ्यात ?
आणि करावा सर्वांचा समावेश एकाच अभ्यासक्रमात?
गांधींचा हेडगेवारांचा आणि बाबासाहेबांचाही.
2/6
ज्ञानाच्या यज्ञकुंडात अशी पाचर मारावी की उद्याच्या विद्यार्थ्याला
कधीही लाभू नये जागृतीचा किनारा
पण
पण मग त्या
विद्यार्थ्यालाही सत्य कळू लागलं तर?
तर ...
तर ....
इथेच खरी मेख आहे.
3/6