भाजपचे नेते- जे लोकशाहीत अधिकृतपणे कुठल्याही शासकीय प्रशासनात सहभागी नाही.
ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, विरोधी पक्षांतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करतात, अन शासकीय यंत्रणा लगेच कारवाई करतात..! याचा अर्थ जनतेने नक्की काय घ्यायचा ?
ज्या पक्षाचे सरकार आहे त्या पक्षातील पक्षातील नेते पदाधिकारी यंत्रणेत हस्तक्षेप कसा काय करू शकतात ? अन त्यांनी दिलेले पुरावे व तत्सम बाबींवर तातडीने होकारार्थी निर्णय घेऊन, सरकारी यंत्रणेतील लोक संबंधीत विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी मोठ्या वेगाने करतात, आणि थेट अटक करतात..!
नीट पाहिलं तर त्या राजकीय पक्षांनी केलेले आरोप हे फारसे मोठ्या स्वरूपाचे नसूनही, त्या यंत्रणा केवळ हुकमावरून असा हावभाव दाखवतात जणू काय त्यांनी भारत सरकारची तिजोरी फोडलीय. मला वाटत अशा आकसभावनेतून केलेल्या कारवाया समाजात, अन त्या विरोधी पक्षात एक विक्षिप्त मत तयार करत आहेत..!
याचे वाईट परिणाम देशाच्या कार्यकारी, संसदीय, न्यायपालिका या मंडळावर होणारे व संविधानीक प्रक्रियेला सुडाची संसर्गजन्य बाधा करणारे असून. यापुढे जनमत बदलून सत्ता बदल झाला अन, सत्तेत नवीन आलेले किंवा पूर्वीचे विरोधीपक्ष सत्तेत आले तर ह्याच पद्धतीने वागण्याची शक्यता नाकारता येत नाही
कारण इतर सजीव वृत्ती असो किंवा मानवी वृत्ती जात्याच सूडबुद्धीने वागणारी आहे. आणि आतापर्यंत राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक इतिहास याची प्रबळ उदाहरणे आणि ग्वाही देतो. याच कारणे जनतेतील संविधानावर श्रध्दा असलेल्या सुजाण व बुद्धिजीवी वर्गाला ह्याच प्रकारची धास्ती आहे..!
भारतात उद्या चालून काँग्रेस सरकार आले तर मी तरी किंवा कुणीही खात्री देणार नाही, की या यंत्रणांच्या सूड कारवाई थांबवतील. कारण हेच की त्याना गतवर्षात झालेला ज्या कारवाया होत्या त्याच्या त्रासाचा वचपा काढून मानसिक आनंद मिळेल किंवा आपल्या पुढील राजकीय भविष्यासाठी मोकळे रान मिळेल.
पण याने लोकशाहीच्या रचनात्मक भव्य आणि सुंदर व्यवस्थेचा मनोरा पोखरला जात असून, त्यात जर पुढे सत्तेत येऊन कुणी आणखीचे ठोसे दिले तर तो मनोरा सर्वांच्या अंगावर धाडदिशी कोसळेल, परंतु यात हकनाक चिरडले जातील ते या भिकार भानगडीचा लांबवर संबंध नसणारे सामान्य नागरिक..!
हे कितपत ठीक आहे ?
लोकशाही व्यवस्था हवी असणारे काही-काही लोक याबाबत जागरूक आहेत. मात्र यावर त्यांच्याकडून कुठलीही ठोस प्रभावी कृती होताना दिसत नाही. ही फार चांगली बाब नाही.
लोकांचा ह्या सर्व बाबीकडे असलेला दुर्लक्षित व्यवहार हा लोकशाहीला मारक आहे. मला वाटत सध्या तरी ह्यावर सकारात्मक जागरूकता हवी.
याने, सत्ताधारी पक्षाच्या एकाधिकारशाही महत्वाकांक्षेला खीळ बसण्यास मदत होईल..!
हा मुद्दा मुळातच सार्वत्रिक चर्चिण्याचा आहे. यावर माझ्या सभोवताली जी बुद्धिजीवी लोकांची आणि माझी साधकबाधक चर्चा झाली त्यातुन जो सारांश निघाला तो अपल्यापुढं मांडला आहे. आपल्याला जरूर पटेल. #जय_हिंद 🇮🇳
देशात अनेक पुढारी होऊन गेले प्रत्येक जण लोकप्रिय होता, सर्वाना जनतेनं भरभरून प्रेम दिल, मात्र त्यात मला राष्ट्रपिता गांधी बापूचं व्यक्तिमत्त्व हे अधिक तेजस्वी आणि अद्वितीय दिसतं. त्याची अनेक कारणं आहेत, त्यापैकी मुख्य कारणे.👇
स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व गांधी बापु आधी बऱ्याच जणांनी केलं होतं, मात्र त्या सर्वांना गांधीजी इतका प्रतिसाद आणि प्रेम मिळाला नाही, फक्त गांधीजीना का लोकांनी डोक्यावर घेतले याचा कुणी मनन केलंय का ? ते मला ठाऊक नाही. पण मला जे वेगळेपण आढळलं ते थोडक्यात आपल्यापुढे स्पष्ट करतो..!!
कुठल्याही राष्ट्राला पारतंत्र्याच्या अभेद्य पोलादी साखळदंडातुन मुक्त करावयाचे झाल्यास नेमकं काय करायचं ? सशस्त्र उठाव, की आक्रमक आंदोलन, ? की शांततापूर्ण आंदोलन ?
ह्यामध्ये गांधींनी निवडलेला पर्याय आपल्याला ज्ञात आहेच. यामागे जी आंदोलने झाली ती हिंसक आणि नुकसानकारक होती.
१) नमस्कार, आपल्याला वाटेल मी हे काय नवीनच शीर्षक लिहलय ? त्यासाठी आपल्याला हा लेख विस्तृतपणे वाचावा लागेल..!
महाराष्ट्र हा बहुजनांची भुमी आहे. इतिहास, सांस्कृतिक ठेवण, लोकसंख्या, विचार प्रवाह, आदींकडे ढोबळमानाने आपण पाहिलं तर-
२) आपल्या हेच आढळून येईल की महाराष्ट्र हा बहुजनवादाचा भोक्ता आहे. मागे चित्पावन पेशवेशाहीचा काळ असेल किंवा थोड्या-फार फरकाने भटभिक्षुकशाहीचा वर्चस्ववादी वरवंटा या मराठी भुमीवर आदळत असेल.
त्याच्या ठिकऱ्या- ठिकऱ्या उडवण्याच काम संतांनी व आधुनिक काळात समाजसुधारकानी केलं.
३) त्यात प्रबोधनकार ठाकरे यांच नाव आपण आदराने घेतो. प्रबोधनकार हे समाजसुधारक, बहुजनवादी, प्रखर हिंदुत्ववादी होते.
ते एकट्याने त्यांची लढाई लढत, नंतर लोक त्यांच्या विचाराकडे आकर्षित झाली. पण त्यानी राजकरणात सक्रिय सहभाग घेतला नाही.
#Thread भट्ट सांगे अन मठ्ठ ऐके- भाग ३.
१)
पुर्वी कुठल्या प्रांतात भयंकर दुष्काळ पडला की, लोकांना भाकरीसाठी अमाप संघर्ष करावा लागायचा, त्याच वेळी ऐतखाऊ भटाळ टोणगे म्हणायचे देव कोपला, अमुक तमुक ग्रामदेव- ग्रामदेवता कोपली, आता चंदनात, तेलातुपात काजूबदामात; यज्ञ होमहवन करावं लागेल.
२) तेव्हा तो गरीब बहुजन, घरातली दागदागिने मोडुन पैशाची तजवीज करत, आणि त्या
बिचाऱ्या कुणब्याच्या अशा दुष्काळसमयी घरात शिळ्या भाकरी चटणीची पंचाईत पण भटभोजन मोठे राजेशाही पार पाडण्याकरिता, फार हाल काढावे लागत, तेव्हा कुठेतरी लचाड भटांचे पोटदेव तृप्तानंदी होऊन ढेकर देत..!!
३) आपल्याला दक्षिणा नावाचा प्रकार सर्वश्रुत असेलच, त्याकाळी हेच उपजीविकेचे साधन, दक्षिणा अल्पप्रमाणात मिळु नये यासाठी मनुनी आपल्या भिक्षुकी धर्मघटनेत खास तरतूद करूनच ठेवलिय.
Happy birthday Rahul gandhi..🎂
१) राहुल गांधी म्हणजे कोण ? जेव्हा तुम्हाला कुणी अस विचारेल तेव्हा त्याला हे सांगा -
आपल्या विचारावर, तत्वावर, निर्णयांवर ठाम राहणारा माणूस. कितीही संकट, अपयश आली तरी हार मानली नाही. झुकला नाही, अनेक जवळच्यानीं साथ सोडली.
( पुढे वाचा. )👇
२) कुटूंबाची व स्वतःची घाणेरडी बदनामी केली तरीही डगमगला नाही. सोशल मीडियाद्वारे त्यांचं भ्रामक व खोटं चित्र तयार केलं.
ज्यात राहुल म्हणजे मोठ्या घरचा अय्याश पोरगा, जो कधी माणसात गेला नाही, ज्याला लोकनेतृत्व कळत नाही. आणि इतर व्यक्तीगत आरोप, चरित्रावर किळसवाणी चिखलफेक, 👇
३) असे सर्व हल्ले परतवुन 'राहुल राजीव गांधी' धीरोदात्त महानायकाप्रमाणे पाय रोवून उभा आहे, तेही रणभेरी वातावरणात न घाबरता.
ताणतणाव समोर असताना, पार्टी खोल दरीत असताना सुद्धा हा माणूस संयमी मुद्रेत, आपल्या मुखावर हलकंस स्मितहास्य करतो. ते बेजबाबदार किंवा अजाण म्हणून नाही.👇
#आधुनिक_दुर्योधन
मोदींनी देशाला उपयुक्त होईल अशी एकही महायोजना आणली का..? काँग्रेसच्या 23 योजना जशाच्या तशा चालु ठेवल्या त्यात 19 योजनांची नावे बदलली. आणि अपूर्ण अभ्यास करत, ज्या नवीन योजना आणतात त्यात असंख्य त्रुटी असतात. मोदी हे अत्यंत एकाधिकारशाहीने वागणारे प्रशासक आहेत.
२) असा व्यक्ती प्रचंड हेकेखोर स्वभावाचा असतो, त्याला मनाला आवडेल असे सल्ले देणारे लोक आसपास आणि स्वतःच्या राजदरबारी असलेली आवडतात, जे अधिकारी
खरच चांगल्या हेतूने काम करत, त्यांची तात्काळ बदली करण्यात आली. राक्षसी बहुमताच्या जोरावर विविध जनहिताच्या कायद्यात अनावश्यक बदल केले..
३) शेतकरी आंदोलन असो वा CAA NRC, अशा बऱ्याच निर्णयाला समाजाच्या विविध स्तरावरून एकजूट विरोध झाला, पण तो विरोध इतर ठिकाणी दिसू नये, जेणेकरून इतरांनाही त्याची जाणीव होईल, या हेतूने प्रसारमाध्यम आपल्या चोरखिश्यात ठेवली.
त्याचा उपयोग, योजनेला विरोधच होत नाही हे दाखवायला झाला.
#Thread - अफजलखान वध
दगाबाज विरुद्ध दगलबाज..⚔️
१) अफजलवध म्हणजे आदिलशाहीचा पालापाचोळा करून टाकणारी ऐतिहासिक घटना. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा सर्वश्रेष्ठ दाखला महाराजांनी सबंध जगाला दाखवून दिला व स्वराज्याची पेटती मशाल आणखी बुलंद केली. स्वराज्याचा मार्गही सुकर केला.
२) अफजलखान वध आपण चित्रपट-नाटक पोवाडा, पुस्तकाच्या किंवा आपल्या थोरां मोठ्यांच्यां वाणीने ऐकला असेल. पण इतिहासातील काही बारकावे बघत अफजलखान वधाचा हा व्यापक आढावा.
हा थ्रेड मोठा जरी होणार असला तरी छत्रपतींच्या शौर्यकीर्तिपूढे तो केवळ सुक्ष्मंच असेल.
३) छत्रपती महाराजांचे पराक्रम सारखे वाचावे वाटतात, त्यातील प्रत्येक चित्र, चलचित्र डोळ्यापुढे येतात. अशा सर्व शिवइतिहास वाचकप्रेमीनी जरूर वाचावे. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ, दगलबाजी म्हणजेच मुत्सद्दीपणाची प्रेरणा आपल्या जीवनात घ्यावी. अशी विनंती.