स्टोव्ह मध्ये राॅकेल भरायला नरसाळे, पत्र्याची नळी असलेला पंप,पुढे काही वर्षांनी प्लॅस्टिकचा फुग्याचा व काॅक असलेला पंप आल्यावरचा आनंद विसरणे शक्य आहे का?
जमिनीवर थोडेफार सांडलेल्या राॅकेलचा वास अजूनही चांगला आठवतो आहे.
स्वयंपाक करताना अन्नाला राॅकेलचा वास येऊ नये
म्हणून घेतलेली काळजी..
आईचे आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे, हे आता जाणवते.
स्टोव्ह पेटवण्यासाठी काकडा व तो बुडवण्यासाठी "बिटको काला दंत मंजन" च्या छोट्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीत राॅकेल भरून ठेवायचे.
काडेपेटी व ती ठेवण्यासाठी हिंगाची रिकामी झालेली पत्र्याची डबी असा
सगळा थाट असायचा.
पीन करणे एक कौशल्याचे काम होते. हात अगदी सरळ धरून. पीन वाकडी होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे जर पीन निपलमधे तुटली तर सगळाच खोळंबा व्हायचा. त्याकरीता निप्पल पाना, सायकलची तार, कातडी वायसर इत्यादी हत्यारे घरीच ठेवलेली असायची.
स्टोव्हची टाकी गळत असेल तर
तिथे लावण्यासाठी 501 नं.चा साबण.
स्टोव्ह बिघडल्यावर घरातली होणारी चिडचिड तर विचारूच नका आणि दुरूस्त करून आणल्यावर आईची प्रसन्न मुद्रा, ओसंडून वाहणारा आनंद पाहिला की घरातली माणसे अगदी खूष व्हायची.
स्वयंपाक झाल्यावर आईने सोडलेला सुस्कारा जितका मनाला शांत करतो ना...
अगदी तसाच
शांतपणा स्टोव्हची चावी सोडल्यावर येणारा स्सूsssssss आवाजही खूप मनाला प्रसन्न करणारा होता...
राजा परीक्षिताचा जीव तक्षकाने घेतला आणि मग सर्पनाशक यज्ञ पेटवून जनमेजयाने सर्प मेध आरंभला. जनमेजयाच्या अफाट सामर्थ्याची इंद्राला आधीच भीती होती आणि तक्षकाच्या मृत्युनंतर तो अधिकच शक्तिशाली होणार ही सार्थ भीती सुद्धा त्याला होती. त्यातच तक्षक
इंद्राच्या दरबारात दाखल झाला आणि पूर्वपुण्याईचा हवाला देत त्याने तमाम सर्प कुळाचा कुलच्छेद वाचवण्याची विनंती केली. इंद्राने दूरगामी विचार करून तक्षकाला अभय दिले आणि स्वर्गलोकात स्थान सुद्धा दिले. इकडे संतापाने बेभान झालेल्या जनमेजयाने ते सुप्रसिद्ध शब्द उच्चारले. “इंद्राय स्वाहा
तक्षकाय स्वाहा”
हा सगळा महाभारतकालीन संदर्भ आज सांगण्याचे कारण म्हणजे अमीर खानचा रिलीज झालेला चित्रपट, त्याविरुद्ध हिंदूंनी पेटवलेला बहिष्कार धोरणाचा यज्ञ आणि त्यामुळे व्यथित झालेला देशातील सेलिब्रिटी वर्ग, बॉलीवूड कलाकार, मिडिया आणि सेक्युलर मंडळींनी केलेले अरण्यरुदन.
कलाकार हा
चित्रकलेसाठी लागणाऱ्या रंगांबरोबरच शालेय साहित्याच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या कॅम्लिन या प्रख्यात कंपनीच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुख, सुभाष दांडेकर यांच्या पत्नी रजनी दांडेकर (वय ८०) यांचे गुरुवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती सुभाष दांडेकर, मुलगा आशिष, मुलगी अनघा असा परिवार आहे.
अनेक चित्रकार, चित्रकला शिक्षक, कलावंत आणि विद्यार्थी यांना प्रोत्साहन देत दांडेकर कुटुंबीयांनी कॅम्लिन व चित्रकला उद्योगाला चालना
दिली. सुभाष आणि रजनी दांडेकर यांनी २००१ मध्ये कॅम्लिन फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनच्या माध्यमातून दांडेकर दाम्पत्याने समाजोपयोगी विविध उपक्रम राबवले. गेल्या काही दिवसांपासून रजनी आजारी होत्या. लोणावळ्याच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आजच हॉटस्टार वर तमिळ थ्रिलर O2 हा चित्रपट पाहिला... दिवसेंदिवस हिंदी फिल्म इंडस्ट्री पेक्षा बाकीच्या फिल्म इंडस्ट्री आपली वेगळी ओळख निर्माण करताहेत...
Rather, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमुळे त्या दबून राहिल्या होत्या ज्या आज हिंदीच्या फोलपणामुळे पुढे आल्या... कदाचित पुढे भविष्यात हिंदी फिल्म इंडस्ट्री पुन्हा उभी राहील, पण सध्या तरी इतर भाषिक फिल्म इंडस्ट्री आपल्याला एंटरटेन करायला मागे पडत नाहीय हेच खरं....
तर, आज सकाळी कॉफी विथ करन शोचा दुसरा एपिसोड download करण्यासाठी मी मोबाइल उघडला, (हो.. controversy gains more TRP ह्याला मीही बळी पडलोय...😑) तर recommendation मध्ये हा चित्रपट दिसला... ट्रेलर पाहून लगेच चित्रपट डाऊनलोड ला टाकला
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी वरून तोंडावर पडलेल्या सूत्रांनी स्वतःला सावरून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या नावांचे पतंग उडवले होते. पुरोगामी-सेक्युलर सूत्रांना अश्या नियुक्त्या
जात-पंथ-भाषा यावरून करण्यात लिबरल समाधान मिळत असते. अश्या संवैधानिक पदाच्या निवडीची चर्चा ही निवड करतानाची राजकीय स्थिती, सत्तारूढ पक्षाची स्थिती, घडून गेलेली एखादी मोठी घटना, आगामी काळातील संभाव्य घटना, पक्षांतर्गत समतोल, एखाद्याची सोय यातून करण्याची
सवय ही काँग्रेसची कार्यपद्धती होती. सूत्रांना अंदाज बांधताना हीच पद्धत सोईची वाटत आहे. यालाच शोध पत्रकारिता असे सध्या म्हटले जात आहे. काही चालवलेल्या नावांपैकी एका नाव नक्की होते. त्यामुळे सूत्र कॉलर ताठ करून फिरण्यास मोकळे होतात. आम्ही सांगितले होते असे सांगत सुटतात.
हॉटेलच्या आवारात सामसूम होती. सगळे वाघ डाराडूर झोपले होते. त्यांच्या गुरगुरण्याचा आवाज शांत झाला होता. सगळ्या वाघांचा राजा असलेला, ढाण्या वाघासारखा
दिसणारा तो दाढीधारी हळूच आपल्या रूममधून बाहेर पडला. त्याने चष्मा सारखा केला. एका हाताने दाढीला ताव दिला आणि (वाघ असला, तरी) मांजरीच्या पावलांनी तो हळूच बाहेर पडला.बाहेर रिक्षा त्याला न्यायला सज्ज होतीच.
आधी स्वतःच ती चालवावी, असा मोह त्याला झाला. पण मर्सिडीजपेक्षा आपली रिक्षा वेगवान आहे, हे दाखवण्याची ही वेळ नाही, ती नंतर येणार आहे, याची त्याला कल्पना होती. आवाजही न करता तो रिक्षात बसला आणि त्यानं रिक्षावाल्याला खूण केली.``अरे, दातेसाहेब, तुम्ही?``
काल पाहिलेला #मामूटी अभिनीत साऊथ कडील आणखी एक उत्कृष्ट सिनेमा. एका मंत्र्याच्या मृत्यूपासून सुरवात होते . मंत्र्याचे दिल्लीवरून परत येताना त्यांचा हार्ट
अटॅअने मृत्यू होतो . त्यानंतर त्यांचा असिस्टंट गायब होतो . त्या सोबत मंत्र्याच्या मृत्यूवर संशय घेतल्याने मारला गेलेला फ्री लान्स पत्रकार . त्यांनतर त्या पत्रकाराच्या मृत्यू मागील कारण शोधत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या होते
आणि एका दोन नंबर करण्याला अटक करतात त्यानंतर हे प्रकरण CBI कडे सोपविण्याची मागणी होते त्यानुसार CBI ची एन्ट्री होते .
त्यानंतर सुरू होतो खेळ कारण यात जे समोर दिसते तसे काहीच नसते जसे ज्या पोलीस अधिकाऱ्याकडून केस CBI