जर्मन फौजांनी एजियन समुद्राच्या तोंडावर, नेव्हरॉन बेटावर दोन अत्याधुनिक, अजस्त्र, महाकाय तोफा वसवल्या होत्या ज्या समोर येणाऱ्या दोस्त राष्ट्रांच्या प्रत्येक युद्धनौकेचा घास गिळत होत्या.
त्यातच जवळच्या बेटावर असलेल्या दोस्त राष्ट्रांच्या २०००
सैन्यावर हल्ला करण्याचे जर्मन फौजांचे बेत सुरू होते. दोस्त राष्ट्रांच्या विमानदलाने ह्या घातकी तोफांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण त्यात हल्ला करणारी विमानेच गमावली.
अश्या बिकट परिस्थितीत जर त्या तोफा निकामी केल्या तर २००० सैनिकांना कुमक पोहोचवली जाईल आणि अशी परिस्थिती निर्माण
झाली आणि हाती होता जेमतेम आठवडा!
दोस्त राष्ट्रांनी त्यांच्या काही कमांडोनाह्या तोफा निकामी करण्याची कामगिरी सोपवली. ह्या कमांडो गॅंग मध्ये मेजर रॉय( अँथनी क्वेल), कॅप्टन किथ( ग्रेगरी पेक), तूर्की आर्मीचा कर्नल आंद्रिया ( अँथनी क्वेन), स्फोटक तज्ञ कॉर्पोरेल मिलर( डेव्हिड निवेन),
इंजिनियर आणि चाकूबाज ब्राऊन ( जेम्स डॅरेन) आणि आणि नॅव्हरॉनचा स्थानिक स्पायरॉस ( स्टॅनले बेकर)! कामगिरी तशी अवघड-अशक्यच होती.
कमांडो गॅंग चा भूमध्य समुद्रातील जर्मन बोटीबरोबरची गनफाईट, वादळाने त्यांच्या बोटीची केलेली वाताहत, वादळातील पाण्याची ती अजत्र लाट, गॅंग चे कड्यावर चढणे,
जर्मन सेनेकडून अटक आणि करून घेतलेली सुटका, त्या किल्ल्यात प्रवेश, त्या अजस्त्र तोफा आणि त्या निकामी करताना रंगलेले शेवटचे नाट्य, उत्कंठा कमालीची वाढवते!
ही कमांडो गॅंग नेव्हरॉनच्या किल्ल्यावरील तोफांपर्यंत कशी पोहोचते त्यांना कोणत्या अडचणी येतात, त्यांच्या आपापसातील मतभेद आणि
वैर त्यांच्या मध्ये येतं का, तोफांचे काय होते ह्या सगळ्याची उत्तरे आहेत क्लासिक वॉरपट ' गन्स ऑफ नेव्हरॉन' मध्ये!
१९६१ साली रिलीज झालेला हा चित्रपट काही वर्षांनी भारतात प्रदर्शित झाला. दुसरं महायुद्ध संपताना जन्मलेल्या पिढीने ऐन पंचविशीत पाहिला. पुढं त्या पिढीची लग्न झाली,
मुलं-बाळं झाली, संसार सुरळीत सुरू झाल्यावर हा चित्रपट पुण्यात पुन्हा १९८५ च्या सुमारास रिलीज झाला, २००६ साली शाळेतून आम्हाला हा चित्रपट दाखवला होता. त्याचं गारुड मनावर राहिले होते. नुकताच हा चित्रपट मी नेटफ्लिक्सवर बघितला!
रिमेकचं भूत
जेव्हा मी लहान होतो, तेव्हा आमिर खानचा 'गजनी', सलमानचा 'वॉन्टेड' आणि अक्षय कुमारचा 'रावडी राठोड' आला होता. त्या काळात रिमेक म्हणजे काय हे कितीतरी लोकांच्या गावी नव्हतं. त्यामुळे सीन टू सीन कॉपी केलेला चित्रपट आम्ही
बघायचो आणि अचंबित व्हायचो. त्या चित्रपटांनी जवळपास 100 करोड गल्ला जमवला. ही झाली 2011-12 पर्यंतची गोष्ट. नंतरसुद्धा हॉलिडे सारखे चित्रपट रिमेक होऊन येतच होते. हिटसुद्धा व्हायचे.
गोष्ट अशी झाली,की त्यानंतर भारतात OTT ने जम बसवला. Youtube तर होतंच. डब मूवी च्या
नावाखाली जिथे सेट मॅक्स वर नागार्जुनचा 'मेरी जंग: One Man Army', 'Don No. 1' यासारखे मोजके चित्रपट बघायला मिळायचे, त्या जागी आता बरेच मूळ चित्रपट,मग ते दाक्षिणात्य असोत किंवा जगभरातील कोणतेही चित्रपट उपलब्ध होऊ लागले. माझ्या मते शेवटचा सुपरहिट ठरलेला रिमेक 'Simba' आहे.
स्टोव्ह मध्ये राॅकेल भरायला नरसाळे, पत्र्याची नळी असलेला पंप,पुढे काही वर्षांनी प्लॅस्टिकचा फुग्याचा व काॅक असलेला पंप आल्यावरचा आनंद विसरणे शक्य आहे का?
जमिनीवर थोडेफार सांडलेल्या राॅकेलचा वास अजूनही चांगला आठवतो आहे.
स्वयंपाक करताना अन्नाला राॅकेलचा वास येऊ नये
म्हणून घेतलेली काळजी..
आईचे आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे, हे आता जाणवते.
स्टोव्ह पेटवण्यासाठी काकडा व तो बुडवण्यासाठी "बिटको काला दंत मंजन" च्या छोट्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीत राॅकेल भरून ठेवायचे.
काडेपेटी व ती ठेवण्यासाठी हिंगाची रिकामी झालेली पत्र्याची डबी असा
सगळा थाट असायचा.
पीन करणे एक कौशल्याचे काम होते. हात अगदी सरळ धरून. पीन वाकडी होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे जर पीन निपलमधे तुटली तर सगळाच खोळंबा व्हायचा. त्याकरीता निप्पल पाना, सायकलची तार, कातडी वायसर इत्यादी हत्यारे घरीच ठेवलेली असायची.
राजा परीक्षिताचा जीव तक्षकाने घेतला आणि मग सर्पनाशक यज्ञ पेटवून जनमेजयाने सर्प मेध आरंभला. जनमेजयाच्या अफाट सामर्थ्याची इंद्राला आधीच भीती होती आणि तक्षकाच्या मृत्युनंतर तो अधिकच शक्तिशाली होणार ही सार्थ भीती सुद्धा त्याला होती. त्यातच तक्षक
इंद्राच्या दरबारात दाखल झाला आणि पूर्वपुण्याईचा हवाला देत त्याने तमाम सर्प कुळाचा कुलच्छेद वाचवण्याची विनंती केली. इंद्राने दूरगामी विचार करून तक्षकाला अभय दिले आणि स्वर्गलोकात स्थान सुद्धा दिले. इकडे संतापाने बेभान झालेल्या जनमेजयाने ते सुप्रसिद्ध शब्द उच्चारले. “इंद्राय स्वाहा
तक्षकाय स्वाहा”
हा सगळा महाभारतकालीन संदर्भ आज सांगण्याचे कारण म्हणजे अमीर खानचा रिलीज झालेला चित्रपट, त्याविरुद्ध हिंदूंनी पेटवलेला बहिष्कार धोरणाचा यज्ञ आणि त्यामुळे व्यथित झालेला देशातील सेलिब्रिटी वर्ग, बॉलीवूड कलाकार, मिडिया आणि सेक्युलर मंडळींनी केलेले अरण्यरुदन.
कलाकार हा
चित्रकलेसाठी लागणाऱ्या रंगांबरोबरच शालेय साहित्याच्या निर्मितीत अग्रेसर असलेल्या कॅम्लिन या प्रख्यात कंपनीच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुख, सुभाष दांडेकर यांच्या पत्नी रजनी दांडेकर (वय ८०) यांचे गुरुवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती सुभाष दांडेकर, मुलगा आशिष, मुलगी अनघा असा परिवार आहे.
अनेक चित्रकार, चित्रकला शिक्षक, कलावंत आणि विद्यार्थी यांना प्रोत्साहन देत दांडेकर कुटुंबीयांनी कॅम्लिन व चित्रकला उद्योगाला चालना
दिली. सुभाष आणि रजनी दांडेकर यांनी २००१ मध्ये कॅम्लिन फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनच्या माध्यमातून दांडेकर दाम्पत्याने समाजोपयोगी विविध उपक्रम राबवले. गेल्या काही दिवसांपासून रजनी आजारी होत्या. लोणावळ्याच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आजच हॉटस्टार वर तमिळ थ्रिलर O2 हा चित्रपट पाहिला... दिवसेंदिवस हिंदी फिल्म इंडस्ट्री पेक्षा बाकीच्या फिल्म इंडस्ट्री आपली वेगळी ओळख निर्माण करताहेत...
Rather, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमुळे त्या दबून राहिल्या होत्या ज्या आज हिंदीच्या फोलपणामुळे पुढे आल्या... कदाचित पुढे भविष्यात हिंदी फिल्म इंडस्ट्री पुन्हा उभी राहील, पण सध्या तरी इतर भाषिक फिल्म इंडस्ट्री आपल्याला एंटरटेन करायला मागे पडत नाहीय हेच खरं....
तर, आज सकाळी कॉफी विथ करन शोचा दुसरा एपिसोड download करण्यासाठी मी मोबाइल उघडला, (हो.. controversy gains more TRP ह्याला मीही बळी पडलोय...😑) तर recommendation मध्ये हा चित्रपट दिसला... ट्रेलर पाहून लगेच चित्रपट डाऊनलोड ला टाकला
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी वरून तोंडावर पडलेल्या सूत्रांनी स्वतःला सावरून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या नावांचे पतंग उडवले होते. पुरोगामी-सेक्युलर सूत्रांना अश्या नियुक्त्या
जात-पंथ-भाषा यावरून करण्यात लिबरल समाधान मिळत असते. अश्या संवैधानिक पदाच्या निवडीची चर्चा ही निवड करतानाची राजकीय स्थिती, सत्तारूढ पक्षाची स्थिती, घडून गेलेली एखादी मोठी घटना, आगामी काळातील संभाव्य घटना, पक्षांतर्गत समतोल, एखाद्याची सोय यातून करण्याची
सवय ही काँग्रेसची कार्यपद्धती होती. सूत्रांना अंदाज बांधताना हीच पद्धत सोईची वाटत आहे. यालाच शोध पत्रकारिता असे सध्या म्हटले जात आहे. काही चालवलेल्या नावांपैकी एका नाव नक्की होते. त्यामुळे सूत्र कॉलर ताठ करून फिरण्यास मोकळे होतात. आम्ही सांगितले होते असे सांगत सुटतात.