|| डॉ. दाभोळकरांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना घातला होता घेराव ||
यशवंतरावजी चव्हाण साहेब परराष्ट्रमंत्री असतानांचा एक प्रसंग, #साताऱ्यातील एका महिलेवर अत्याचार करून तिच्या पतीची हत्या करण्यात आली होती. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ दाभोळकर, किशोर बेडकिहाळ, चंद्रकांत
शेडगे, विजय मांडके, पार्थ पोळके, उपराकार लक्ष्मण माने असे पंधरा-वीस जणांचे शिष्टमंडळ यशवंतरावजी चव्हाण साहेबांना भेटण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर गेले. त्या दुर्दैवी घटनेचा सारा वृत्तांत सांगून आरोपीला तात्काळ अटक करण्याची आग्रही मागणी या शिष्टमंडळाने केली आणि यामधून काही मार्ग
काढल्याशिवाय आम्ही तुम्हाला उठूच देणार नाही,अशी भूमिका घेतली.
यावेळी डॉ दाभोळकर चव्हाण साहेबांना म्हणाले,"साहेब माफ करा,आपल्याला न सांगता घेराव करावा लागतोय."
तेव्हा चव्हाण साहेब म्हणाले,"अहो दाभोळकर, हा प्रसंगच मुळात असा आहे ज्यामध्ये अशा औपचारिकता बाळगण्याची गरजच नाही. आरोपीला
अटक होईपर्यंत तुमचा घेराव आता उठणार नाही."
आणि चव्हाण साहेबांनी बाहेर उभ्या असलेल्या एस पी आणि #जिल्हाधिकाऱ्यांना पाचारण केले व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले.एवढ्यात साहेबांना घेराव घातल्याची बातमी बाहेर #पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांना कळाली ते पुढारी व कार्यकर्ते मध्ये
आले #दाभोळकरांना चढ्या आवाजात बोलू लागले तेव्हा साहेबच म्हणाले,
"हो त्यांनी मला घेराव केलाय आणि त्यांचा घेराव मी कबूल केलाय. आरोपी सापडेपर्यंत हा घेराव उठणार नाही."
एक कार्यकर्ता म्हणाला, "साहेब ही #मुठभर माणसं....."
त्या कार्यकर्त्याचं वाक्य अर्ध्यातच तोडत साहेब म्हणाले,"
माणसं किती हा प्रश्न महत्त्वाचा नाही. #सामाजिक_न्यायाचे प्रश्न संख्येने सोडवायचे नसतात. इथं तर अन्याय अन्याय आहे."
दहा वीस मिनिटातच आरोपीला अटक करण्याची बातमी आली. #जिल्हाधिकाऱ्यांनी घेराव उठवण्याची विनंती शिष्टमंडळाला केली, तेव्हा साहेब हसले व म्हणाले, "चला दाभोळकर, उठवायचा का
घेराव?"
'यशवंतराव चव्हाण: आठवणी- आख्यायिका' या ग्रंथात या प्रसंगाचे वर्णन करताना लेखक #लक्ष्मण_माने म्हणतात, " मनात आणले असते तर साहेबांनी पाच मिनिटात आम्हाला बाहेर काढले असते. कार्यकर्त्यांची मोठी फौज होती.आमदार, खासदार, मंत्री होते. त्यांना काय अशक्य होते? पण ज्या पद्धतीने
त्यांनी विषय हाताळला ती पद्धती एका #कुटुंबवत्सल पित्याची होती. दीनदुबळ्यांना न्याय द्यायचा, तर माया लागते. मायाच नसेल तर #लोकशाही असली काय, नसली काय. गरिबांना सारे सारखेच. छत्रपती शाहू महाराज राजेच होते. अपार करुणेनं भरलेलं त्यांचं ह्रदय लोकशाही पेक्षा मोठं होतं. यशवंतराव त्यांचे
भीमाची वाघीण बनुबाई येलवे गेली.
शेवटी #दवाखान्यातच आणि आता #स्मशानातच निवारा मिळाला.
वाघिणीला शेवटचा जय भीम... 🙏
काही वर्षांपूर्वी #शालिनी_पाटील हे नाव अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलं, आपल्या बिनबुडाच्या आणि जातीयवादाला चिथावणी देण्याऱ्या वक्तव्यामुळे असंख्य लोकांनी त्यांच्यावर
टिकेचा भडीमार केला होता.
'राज्यघटना केवळ #आंबेडकरांनी लिहिलेली नाही,ते फक्त मसुदा समितीचे मुख्य सदस्य होते. गांधी आणि नेहरू हेच स्वातंत्र्यासाठी लढत होते. ज्या वेळी हे शिक्षा भोगत होते, त्यावेळी डॉ. आंबेडकर ब्रिटीश सरकारमध्ये मंत्री होते. भारताची #गोपनीय माहिती ते ब्रिटिश सरकारला
पुरवत होते'. #शालिनी_पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशा अनेक #वादग्रस्त विधानांचा सपाटा लावलेला होता, पण याची पुष्टी करणारे कोणतेही #पुरावे किंवा #तथ्य ते देऊ शकल्या नाही. यावरून हे स्पष्ट झालं होतं की, त्यांचा हेतु हा फक्त समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा होता.
#फर्स्ट_क्लास मिळवूनही
ज्याला #सातबारा आणि #8अ मधला फरक कळत नाही,
ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही,
ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होतं,
ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही,
जे आजही कंम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात,
जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,
ज्यांना बँक पासबुकावर #व्याजाचा आकडाच सापडत नाही,
ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि #रिजर्व्हची भानगड कळत नाही,
असे उच्चशिक्षित एकीकडे-
आणि त्या तुलनेत-
#तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,
घरातला फ्यूज उडताच #वायरमनची वाट न बघणारे,
बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे,
मापातले #लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे,
बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे,