'विंदा करंदीकर'( २३ ऑगस्ट १९१८ - १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, समीक्षक होते. गोविंद विनायक करंदीकर हे विंदा करंदीकर या नावाने प्रसिद्ध झाले. विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, #पुस्तकआणिबरचकाही 👇
गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते. अशावेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता-ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते.👇
तर कधी कधी लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पुंगवाची मुसंडी आणि हरिणशावकाची नाजूक हालचाल, दगडगोट्यांनी भरलेले विस्तीर्ण माळरान आणि तुरळक नाजूक रानफुलांनी नटलेली लुसलुशीत हिरवळ, गौतमबुद्धाची ध्यानमग्न मूर्ती आणि👇
जातिवंत विदूषकांची मिस्किल नजर यांची एकदम किंवा एकामागून एक आठवण व्हावी असेच तिचे रूप आहे. निखालस शारीर अनुभवातील रसरशीत सत्याला सुरूप देण्यात ती जशी रंगून जाताना दिसते तशीच केवळ वैचारिक अनुभवांच्या वातचक्रातून गिरगिरत वरवर जाण्यात संपूर्ण देहभान विसरते. ती कधी चित्रमयी बनते, 👇
कधी कोड्याच्या भाषेत बोलते, तर कधी तिच्या अभिव्यक्तीत एक प्रकारचा गद्याचा परखडपणा अवतरतो. तिचे रूप न्यारे आहे. व्यक्तित्व आगळे आहे. तिचा रोख झोक नोक सर्व तिचा आहे. ती एकाच वेळी रसिकास आकर्षून घेते आणि गोंधळून सोडते.( मृदगंध, मलपृष्ठावरून )करंदीकरांमध्ये जसा एक कवी आहे तसाच एक 👇
तसाच एक तत्त्वचिंतकही आहे. कविता, ललित निबंध, समीक्षा, इंग्रजीतील मौलिक ग्रंथांची भाषांतरे अशा विविध अंगांनी करंदीकरांनी थोर साहित्यसेवा केली आहे. साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च असा ज्ञानपीठ(२००३) याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, 👇
जनस्थान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. २०११ पासून महाराष्ट्र शासन साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देत आहे ( संकलीत)
तस्लीमा नसरीन ((२५ ऑगस्ट १९६२ ) बांगलादेशी डॉक्टर व लेखिका आहेत. उदयोन्मुख लेखिका म्हणून इ.स. १९८० च्या दशकात त्यांची साहित्यिक कारकीर्द सूरू झाली. स्त्रीवादी विचारसरणीमुळे, तसेच धर्मावरील व विशेषकरून इस्लामावरील टीकेमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व व साहित्य #पुस्तकआणिबरचकाही 👇
आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनले. १९९४मध्ये बांगलादेशातून परागंदा झाल्यवर भारतात आश्रय घेतला. लज्जा’ ही तसलिमा नासरिन यांची वास्तवावर आधारलेली कादंबरी. बांगलादेशातील मुसलमानांनी हिंदूंचा केलेला छळ आणि बांगलादेशावर प्रेम करणार्या हिंदूंची केलेली कोंडी असा या कादंबरीचा👇
विषय आहे. कडव्या मुसलमानांनी लेखिकेची हत्या करण्याचा फतवा काढला. तिच्या बंडखोर वृत्तीचे यथार्थ दर्शन या कादंबरीत घडले आहे. धर्म आणि देश या गोष्टींमधून काय पसंत करायचे असा मूलभूत प्रश्न उपस्थित करून या कादंबरीने तत्त्वज्ञानालाच हात घातला आहे.. माणसाला जर बळजबरीने आपला प्रिय देश‚👇
डॉ वसंत दिगंबर कुलकर्णी ( २३ ऑगस्ट १९२३ - २५ ऑगस्ट २००१ ) ‘मराठी साहित्य समीक्षा’ हा त्यांचा एक प्रिय विषय होता. त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्या विषयावरील त्यांचे लेखन ग्रंथरूपाने प्रकाशित होत राहिले. कलावाद, जीवनवाद असे समीक्षेत #पुस्तकआणिबरचकाही 👇
अटीतटीचे वाद होताना त्यामध्ये त्यांचे पूर्वकालीन व समकलीन समीक्षक हिरिरीने सहभागी होताना, त्यांची भूमिका मात्र मध्यम क्रमवादी राहिली. साहित्यकृतीच्या रचना सौंदर्याचा विचार त्यांना जसा हवासा वाटत असे, तसाच तिच्यातून आविष्कृत होणार्या जीवनसमस्यांचे सूक्ष्म भान त्यांना अपेक्षित 👇
असे. साहित्यकृतीच्या वाचनाने वाचकाच्या जाणिवा विस्तारल्या पाहिजेत आणि त्यामुळे मानवी जीवन समजायला मदत व्हायला हवी, अशी त्यांची धारणा होती. ‘आलोचना’ मासिकातून ‘संगीत सौभद्र’विषयी त्यांनी लेखमाला लिहिली. पुढे त्याचे पुस्तक झाले. सदर पुस्तक संशोधन म्हणून त्यांनी मुंबई 👇
गंगाधर गाडगीळ : (२५ ऑगस्ट १९२३ - १५ सप्टेंबर २००८ ) कथा, कादंबरी, प्रवासवृत्त, समीक्षा, नाटक, बालसाहित्य, अर्थशास्त्रविषयक इ. विविध प्रकारचे लेखन. महाविद्यालयात शिकत असतानाच कथालेखनास प्रारंभ केला आणि एक नामवंत नवकथाकार म्हणून लौकिक मिळविला. मराठी #पुस्तकआणिबरचकाही 👇
कथेला वेगळे वळण देण्यात गाडगीळांचा वाटा मोठा आहे. मानवाचे बाह्यवर्तन आणि अंतर्गत भावविश्व ह्यांत अनेक कारणांनी विसंगती निर्माण होते, ह्याची जाण ठेवून त्याच्या अनपेक्षित, उठवळ व चमत्कारिक उक्तिकृतींमागील सूक्ष्म-तरल भावना व संवेदना आणि सुप्त मनातील संज्ञाप्रवाह यांचा गाडगीळांनी👇
वेध घेतला. यंत्रयुगातील शहरी जीवनातल्या ताणाबाणांचे सूक्ष्मसूचक दर्शन त्यांच्या कथांनी घडविले आहे. नवीन्यपूर्ण प्रतिमा व लवचिक, मार्मिक शब्दकळा यांमुळे त्यांच्या कथांतील जीवनदर्शन कलात्मक झाले आहे. साचेबंद घटनाप्रवणता कमी करून मनोविश्लेषणावर भर देणारी जी नवकथा १९४५ पासून रूढ 👇
रामकृष्ण गोपाळ भांडारकर : (६ जुलै १८३७-२४ आँगस्ट १९२५). थोर प्राच्य विद्यासंशोधक संस्कृतचे प्रकांड पडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक व कर्ते धर्मसुधारक तथा समाजसुधारक.त्यांची विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देते. एवढेच नव्हे, तर #पुस्तकआणिबरचकाही ⏬
तर प्राचीन भारताचा सुसंगत पुराव्यांच्या आधारे इतिहास कसा शोधून काढावा, ऐतिहासिक घटनांचा प्रमाणशुद्ध अर्थ कसा लावावा, याचा उत्कृष्ट नमुना त्यांच्या ऐतिहासिक लेखनात सापडतो. त्यामुळे त्यांचे ग्रंथ हे भारताच्या प्राचीन इतिहासाचे आधारभूत ग्रंथ म्हणून स्वीकारले जातात. मालती-माधव ⏬
संस्कृत ग्रंथाचे त्यांनी उत्कृष्टपणे संपादन केले.
प्राचीन भारतातील विविध धार्मिक संप्रदायांचा आणि विविध धार्मिक तत्त्वज्ञानांचा संगतवार इतिहास दाखविण्याचे महत्वाचे कार्य भांडारकरांनी लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथांनी केलेले आहे. ते धार्मिक आणि सामाजिक सुधारणेचे प्रार्थनासमाजवादी ⏬
बहिणाबाई चौधरी ( २४ ऑगस्ट १८८० - ३ डिसेंबर १९५१ ) निरक्षर असुनही बहिणाबाईंकडुन जी साहित्यनिर्मिती झाली त्याला तोड नाही. त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरक्षर होत्या तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची #पुस्तकआणिबरचकाही ⏬
निसर्ग दत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे "लेवा गणबोली" तील ओव्या व कविता रचून गात असत. पुत्र सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. बहिणाबाईंनी रोजचे काम करता करता ह्या कविता ⏬
रचलेल्या आहेत. १९५० सालच्या जुलै आगस्ट मध्ये बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी प्र के अत्रे यांच्याकडे आले. त्यांच्या हातात कवितांचे बाड होते . बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या सामानाची विल्हेवाट लावताना हे बाड हाती लागले होते. ते चाळल्यावर ⏬
नरसिंह चिंतामण केळकर : (२४ ऑगस्ट १८७२–१४ ऑक्टोबर १९४७). एक श्रेष्ठ मराठी साहित्यिक, संपादक व राजकारणी नेते. महाराष्ट्रीय समाजाच्या त्या काळात राजकीय व सांस्कृतिक जीवनात एक महनीय स्थान केळकरांना हळूहळू प्राप्त होत गेले. या काळाचा विचार करता, केळकर ही केवळ #पुस्तकआणिबरचकाही ⏬
व्यक्ती नव्हती, तर लोकांच्या आदरास व विश्वासास पात्र झालेली संस्था होती असे म्हणावे लागते. अनेक साहित्यसंस्थांच्या अध्यक्षपदांवरून त्यांनी भाषणे केली आणि वाङ्मयविषयक प्रश्नांची चर्चा करणारे काही अभ्यासलेख व ग्रंथपरीक्षणे लिहिली. ह्यांतून व उपर्युक्त सुभाषित आणि विनोद व ⏬
हास्यविनोदमीमांसा या ग्रंथांतून त्यांचा वाङ्मयविचार व्यक्त झाला असून तो लक्षणीय आहे. साहित्यसम्राट’ म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या जवळजवळ १५,००० च्या आसपास आहे. समग्र केळकर वाङ्मय ह्या ग्रंथमालेचे बारा खंड आहेत (१९३८). त्यानंतरचा खंड केळकरांची ⏬