आतून तुटलेली माणसं मनाने अतीशय ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात, त्यांच इमोशनल होण कालांतराने बंद होत जात.
आतून तुटलेली माणस फारशी व्यक्त होत नाहीत,त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही, ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागल असेल काहीतरी.
२+२=५ कुणी म्हणाल तरी ते "it's okay"
म्हणून निघून जातात.
ती माणसं वाद टाळतात,माणसांशी बोलणं टाळतात.एका पॉइंट नंतर त्यांचा realisation sense झपाट्याने वाढलेला असतो.समोरचा माणूस किती खरं बोलतोय,किती खोटं बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येत.काहीच रिॲक्ट न करता ती माणसं पुढे निघून जातात.
आणि यातच
खरा शहाणपणा असतो.
थोड्या कालावधीनंतर ही माणसं सेल्फ motivated होऊन जातात. कुणाचा सल्ला नको असतो, कुणाचा interfare नको असतो कारण जेव्हा खऱ्या आधाराची गरज असते तेव्हा ती गोष्ट मिळालेली नसते म्हणून सेल्फ dependent होतात.
आतून तुटलेल्या माणसाला वादळाची भीती नसते,
संकटांची काळजी नसते
कारण आपण लढू शकतो याची खात्री मनाला पटलेली असते. छोट्या छोट्या गोष्टीपासून इमोशनल होण्यापासून mindset प्रॅक्टिकल होण्यापर्यंतची प्रवासाची सुरवात आतून तुटण्यापासून होते...
म्हणून,
"कभी कभी दर्द भी अच्छा होता है"
❤️