भीमाची वाघीण बनुबाई येलवे गेली.
शेवटी #दवाखान्यातच आणि आता
#स्मशानातच निवारा मिळाला.
वाघिणीला शेवटचा जय भीम... 🙏

काही वर्षांपूर्वी #शालिनी_पाटील हे नाव अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलं, आपल्या बिनबुडाच्या आणि जातीयवादाला चिथावणी देण्याऱ्या वक्तव्यामुळे असंख्य लोकांनी त्यांच्यावर
टिकेचा भडीमार केला होता.
'राज्यघटना केवळ #आंबेडकरांनी लिहिलेली नाही,ते फक्त मसुदा समितीचे मुख्य सदस्य होते. गांधी आणि नेहरू हेच स्वातंत्र्यासाठी लढत होते. ज्या वेळी हे शिक्षा भोगत होते, त्यावेळी डॉ. आंबेडकर ब्रिटीश सरकारमध्ये मंत्री होते. भारताची #गोपनीय माहिती ते ब्रिटिश सरकारला
पुरवत होते'.
#शालिनी_पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशा अनेक #वादग्रस्त विधानांचा सपाटा लावलेला होता, पण याची पुष्टी करणारे कोणतेही #पुरावे किंवा #तथ्य ते देऊ शकल्या नाही. यावरून हे स्पष्ट झालं होतं की, त्यांचा हेतु हा फक्त समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा होता.
#जातीयवादी वर्गाकडून त्यांना मोठा प्रतिसाद लाभला,पण, समाजातून अनेक स्तरातून याचा तीव्र निषेध सुद्धा करण्यात आला होता.

त्यांच्या या संतापजनक विधानानंतर #बनुबाई_येलवे नावाची एक सामान्य कुटुंबातील आंबेडकरी विचारांची महिला कमालीची अस्वस्थ झाली. शालिनी पाटील यांचा विरोध करायचा पण,
केवळ तोंडी निषेध करणे त्यांना मान्य नव्हते. कारण,शालिनी पाटील यांनी संपूर्ण #भारतीयांच्या अस्मितेला धक्का पोहचवला होता.

शालिनी पाटील या कराड येथील टाऊन हॉलमध्ये येणार असल्याचे त्यांना समजले. स्वतः कर्करोगाशी झुंजत असलेल्या बनुबाईंनी त्यांना टाऊन हॉल येथे गाठलेच. गाडीतून उतरताच
समोर जाऊन पोलिसांचे #कडे तोडुन मोठ्या हिंमतीने शालिनी पाटील यांचे तोंड काळे केले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा #गगनभेदी घोषणा दिल्या.
या घटनेने सर्वत्र खळबळ निर्माण झाली, अनेकांनी बनुबाई येलवे यांचे भरभरून कौतुक केले.तेव्हापासून बनुबाई येलवे हे नाव अचानक प्रसिद्ध झाले
त्यांची मोठी चर्चा झाली.
बनुबाई येलवे नावाचा #आंबेडकरी_विचारांचा कृतीशील झंझावात अनेक दशके #कराड_सातारा परिसरात वादळासारखा फिरत राहिला.
अक्षरओळख नसलेल्या बनुबाई स्वतःवर झालेल्या अन्याय अत्याचारानंतर पेटून उठल्या. याला तोंड द्यायचं असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय पर्याय
नाही हे त्यांनी जाणले. वाचता-लिहिता येत नाही म्हणून त्या निराश झाल्या नाही. अनेक #विचारवंत लोकांची भाषणे त्यांनी ऐकलेली होती,बाबासाहेबांचा वैचारिक आणि कृतिशील संघर्ष अनेक भाषणातून त्यांनी ऐकलेला होता.याच विचाराचा वारसा घेऊन त्यांनी गरजु, गरीब आणि अन्यायग्रस्त लोकांची मदत करत आपला
लढा सुरु केला.
बनुबाई येलवे स्वतःला #भीमाची_वाघीण मानत. त्यांनी आंदोलनात गायलेल्या या गाण्यातून त्यांच्या कामाची प्रेरणा आणि तत्व दिसून येते.
लेक भीमाची, नव्या दमाची,
वैऱ्याला झाडाला टांगीन,
झाडाला टांगीन हाय मी भीमाची वाघीण.
कुणी दावील मजला बोट मला आवडत नाही खोट,
त्याच्या नरडीचा
घेईन घोट,
हाय मी भीमाची वाघीण
बनुबाईंचे काम म्हणजे #डरकाळी फोडणाऱ्या वाघिणी प्रमाणेच होते.कुठेही गरिबांवर अन्याय अत्याचार झाल्याचे कळताच त्याच्या दुसऱ्या दिवशी #कराड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून शेकडो महिलांचे नेतृत्व करणारा त्यांचा मोर्चा ठरलेलाच असायचा
त्या सरकारी कार्यालयात आल्या की भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी त्यांना बघताच घाबरायचे.
हातात #निळा_झेंडा घेतलेल्या बनुबाईंनी अनेक अन्याय-अत्याचारग्रस्त लोकांना न्याय मिळवून दिला.अनेक #विधवांना शासकीय पेन्शन मिळवून दिली, नवरा नांदवत नसलेल्या स्त्रियांचा संसार पुन्हा उभा करून दिला, शासकीय
स्वस्त धान्याचा प्रश्न असो किंवा विद्यार्थ्यांच्या अनेक दाखल्याचा प्रश्न असो, त्यांनी तो #लोकशाही पद्धतीने आंदोलन करून सोडवला.कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता.
एकदा तर त्यांनी थेट #तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर बोंबा-बोंब आंदोलन केले. तेथील काही भ्रष्ट अधिकारी-
कर्मचारी गरीब गरजु मुलांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही त्यांना काही दाखले देण्यास #हलगर्जीपणा करत होते, ही बाब #बनुबाईंना कळताच त्यांनी तहसील कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. जोवर संबंधित मुलांना दाखले मिळत नाहीत तोवर हे #बोंब_बोंब आंदोलन थांबणार नाही असे संबंधित अधिकारी-
कर्मचाऱ्यांना खडसावले,लगेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यावर कारवाई करत ते दाखले तात्काळ त्या मुलांच्या सुपूर्द केले.
अनेक वर्षापासून #कराड_तहसीलदार कार्यालयाचा पदभार सांभाळणारे नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड त्यांच्याबद्दल मोठ्या कौतुकाने सांगतात की,"बनुताई गोरगरीब,विधवा,अपंग,
गरजु यांचे प्रश्न घेऊन नेहमी कार्यालयात येत असायच्या.त्या खूपच तळमळीने,आक्रमकपणे पण,लोकशाही मार्गाने लोकांच्या समस्या मांडतात व सोडवतात देखील. अन्यायाविरोधात त्या कायम संघर्ष करतात. सामान्यांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्ती आपल्या समाजात फार कमी आहेत,त्यातीलच त्या एक आहेत"
याच कार्यालयात #लिपिक पदावर असलेले राजेंद्र चव्हाण सांगतात की,येलवे यांनी अन्याय कधीच सहन केला नाही,त्यांनी अनेक आंदोलने केली.त्यांच्या आंदोलनांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे बळ व प्रामाणिकता आहे. त्यांनी संवैधानिक मार्गाने अतिशय आक्रमकपणे आंदोलन करत सामान्यांच्या
अनेक समस्या सोडवल्या'.
बनुबाई यांची आंदोलने देखील अनोखी असायची. कराडमधीलच एका गावातील नदीमध्ये वाळूतस्कर बेकायदा #जिलेटीनचा वापर करून स्फोट करायचे, त्या स्फोटाने नदीतील अनेक मासे मृत होत होते. स्फोटामुळे नदी काठावर असलेल्या वस्तीतील घरांचे देखील सतत नुकसान होत असे. अनेकदा अर्ज
करूनही याची कुठेही दखल घेतली जात नाही हे पाहून बनुबाईंनी काय केले यावर त्या स्वतः सांगतात की,"मी ते मेल्यालं मोठं-मोठं मासं गोळा केलं,ते गाडीत भरून तहसिलदाराच्या गेटावर नेऊन टाकलं.माशाच्या वासानं तहसीलदार हैराण झाले.कर्मचार्याना म्हणाले की,'मी तहसीलदार हाय का कोण हाय?हि घाण का
म्हणून हिथं टाकल्या'. यावर मी त्यांना माजी समस्या सांगितली.तिथूनच ते घटनास्थळावर माझ्या बरुबरनं आले आण वाळू तस्करांच्या गाड्या जप्त केल्या".
प्रश्न सुटेपर्यंत बनुबाई येलवे यांनी कधीही माघार घेतली नाही.
एकदा शासकीय स्वस्त धान्य दुकानामध्ये दिला जाणारे अत्यंत निकृष्ट दर्जाचे सडके
धान्य त्यांनी तहसील कार्यालयात नेऊन फेकले होते. त्यानंतर तहसीलदाराने लगेच त्यावर तातडीने लक्ष घालुन स्वतः शासकीय स्वस्त धान्य दुकानांची पाहणी करून संबंधितावर तातडीने कारवाई करत ती समस्या दुर केली.
महापुरामुळे अनेक गरिबांचे नुकसान होत होते,पण खऱ्या पात्र नुकसानग्रस्तांची नावे एक
भ्रष्ट #तलाठी जाणीवपूर्वक वगळत होता.अनेकवेळा सांगूनही तो तलाठी बनुबाईंचे ऐकत नव्हता. तोच तलाठी एकदा जोशी नावाच्या तहसीलदार साहेबांच्या सोबत गावात आला होता. बनुबाईंनी तहसीलदारांचा आदरपूर्वक सत्कार केला पण,गरिबांना मुद्दाम त्रास देणाऱ्या त्या भ्रष्ट तलाठ्याचा सत्कार फुल देऊन कसा
करायचा म्हणून,त्यांनी पिशवीतून आणलेला खास चपलांचा हार त्या तलाठ्यांच्या गळ्यात टाकला. हे बघुन सर्वजण चकित झाले,मग बनुबाई यांनी तहसीलदार साहेबांना सर्व प्रकार सांगत त्या तलाठ्याचा भ्रष्टाचार उघडकीस आणला. तहसीलदार साहेबांनी लगेच त्या भ्रष्ट तलाठ्यावर चौकशीचे आदेश देत, सर्व नुकसान
ग्रस्तांची नावे समाविष्ट करून घेतली.
बनुबाई या #निरक्षर होत्या,पण त्यांचे संघटन कौशल्य कमालीचे होते. त्या परिसरात त्या 'पांढऱ्या साडीवाल्या बनुताई' म्हणून ओळखल्या जातात.या भीमाच्या वाघीणीने आवाज देताच शेकडो महिला जमा व्हायच्या,त्यांनी परिसरात मोठे संघटन उभे केले होते. स्थानिक
राजकारणात त्यांचा मोठा दबावगट निर्माण झाला होता.त्यांनी #विलास_उंडाळकर यांच्या विरोधात #आमदारकी निवडणूक लढवली,या निवडणुकीत त्यांना आठ हजार मते मिळाली.
अन्यायग्रस्त लोकांच्या समस्या सोडवताना बनुबाईंनी कधीही त्यांच्याकडून कसल्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवली नाही, यातूनच त्यांची
#जनसेवेची प्रामाणिक तळमळ दिसुन येते.
अहोरात्र समाजासाठी राबणाऱ्या बनुबाईंचे स्वतःच्या कुटुंबाकडे मात्र दुर्लक्ष झाले. दुर्दैवाने त्यात त्यांना कर्करोगाने सुद्धा घेरले होते. पण चळवळीचा घेतलेला वसा त्यांना सोडवत नव्हता.त्यांची मुलगी कमल सावंत सांगते की,"आई अडाणी होती,पण एक दिवस वाघ
होऊन जगा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य तिने ऐकलेले होते.ती आयुष्यभर स्वाभिमानाने जगली.कुणापुढे झुकली नाही. वाळू तस्कर आईला देण्यासाठी मोठ्या रकमा घेऊन यायचे पण,तो पैसा तिने कधीच स्वीकारला नाही.ती गरिबीत जगली,पण वाघासारखी स्वाभिमानाने जगली".
बनुबाई यांनी त्यांच्या तरुणपणात
स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करून समाजासाठी अहोरात्र झटल्या.यावर त्यांचा मुलगा किरण उद्विग्न व मार्मिक प्रश्न करते,ज्या समाजासाठी आईने स्वतःचे आयुष्य खर्च केले,त्या समाजाने तिला काय दिले?या पडक्या मातीच्या भिंती?हे गळके घर?कि आई ज्या ठिकाणी झोपते ती झिरपणारी जमीन?आयुष्यभर प्रामाणिक
काम करणाऱ्या आईला शेवटचे आयुष्य काढायला साधे नीटके घर नाही कि त्या घरात झोपायला जागा नाही".
किरण सावंत यांनी बनुबाई यांचा मुलगा म्हणून उपस्थित केलेल्या या प्रश्नाचे उत्तर त्याच्या डोळ्यात डोळे घालून द्यायची हिम्मत आपल्या समाजाची आहे का?बनुबाई यांनी आयुष्यभर ज्यांच्यासाठी लढा दिला
तेच #समाजबांधव त्यांच्या या बिकट परिस्थितीकडे दुर्लक्ष करतात ही खुप लाजिरवाणी बाब आहे.पण,बनुबाई याबद्दल कधीही वाईट वाटून घेत नाही किंवा तक्रारसुद्धा करत नाही हा त्यांच्या #आंबेडकरी विचारशील आणि प्रामाणिक मनाचा मोठेपणा आहे.
बनुबाई यांनी गरिबांसाठी लढणारी प्रामाणिक कार्यकर्ती
म्हणून त्यांचे कर्तव्य पार पाडताना त्यांचे आयुष्य देशोधडीला लागले पण,समाज म्हणून त्यांना जगवण्याचे आणि त्यांना आधार देण्याचे कर्तव्य समाजाने पार पाडायला हवे होते.त्यांनी स्वतःसाठी कधी आंदोलने केली नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामान्य लोकांसाठी,
कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निळा झेंडा घेऊन अन्यायाच्या विरोधात डरकाळी फोडणारी हि वाघीण सध्या दुर्दैवाने आपल्या पडक्या घरात कर्करोगाने शांत पडली होती. तिला साथ देण्याची जबाबदारी आपण घ्यायला हवी होती, ती जर नाही घेतली तर उद्या समाजावर होणाऱ्या अन्याय अन्याय आणि
अत्याचाराविरोधात डरकाळी फोडणारी पांढऱ्या साडीवाली दुसरी #भीमाची_वाघीण कशी घडेल???
🙏🏻🙏🏻🙏🏻
@HagawaneSantosh @pravinsatara @HemantRanpise3 @kamblesandeep12

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with VishalWaghmareOfficial

VishalWaghmareOfficial Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishalWSpeaks

Aug 21
|| डॉ. दाभोळकरांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना घातला होता घेराव ||
यशवंतरावजी चव्हाण साहेब परराष्ट्रमंत्री असतानांचा एक प्रसंग, #साताऱ्यातील एका महिलेवर अत्याचार करून तिच्या पतीची हत्या करण्यात आली होती. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ दाभोळकर, किशोर बेडकिहाळ, चंद्रकांत
शेडगे, विजय मांडके, पार्थ पोळके, उपराकार लक्ष्मण माने असे पंधरा-वीस जणांचे शिष्टमंडळ यशवंतरावजी चव्हाण साहेबांना भेटण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर गेले. त्या दुर्दैवी घटनेचा सारा वृत्तांत सांगून आरोपीला तात्काळ अटक करण्याची आग्रही मागणी या शिष्टमंडळाने केली आणि यामधून काही मार्ग
काढल्याशिवाय आम्ही तुम्हाला उठूच देणार नाही,अशी भूमिका घेतली.
यावेळी डॉ दाभोळकर चव्हाण साहेबांना म्हणाले,"साहेब माफ करा,आपल्याला न सांगता घेराव करावा लागतोय."
तेव्हा चव्हाण साहेब म्हणाले,"अहो दाभोळकर, हा प्रसंगच मुळात असा आहे ज्यामध्ये अशा औपचारिकता बाळगण्याची गरजच नाही. आरोपीला
Read 9 tweets
Nov 27, 2021
#फर्स्ट_क्लास मिळवूनही
ज्याला #सातबारा आणि #8अ मधला फरक कळत नाही,
ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही,
ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होतं,
ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही,
जे आजही कंम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात,
जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,
ज्यांना बँक पासबुकावर #व्याजाचा आकडाच सापडत नाही,
ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि #रिजर्व्हची भानगड कळत नाही,
असे उच्चशिक्षित एकीकडे-

आणि त्या तुलनेत-
#तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,
घरातला फ्यूज उडताच #वायरमनची वाट न बघणारे,
बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे,
मापातले #लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे,
बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे,
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(