🧵थ्रेड
NDTV अदानींनी विकत घेतली आहे. अगदी अंबानींनी जसा नेटवर्क 18 ग्रुप विकत घेतला अगदी तसंच NDTV विकत घेण्याची तयारी चालू आहे आणि मेन म्हणजे २००९ मध्येच NDTV विकली जाणार हे जवळपास फिक्स होतं. हे सगळं एक्सप्लेन करणारा हा थ्रेड. #NDTV
तर ज्याप्रकारे अंबानींनी नेटवर्क 18 विकत घेतली तीच स्क्रिप्ट इथं रिपीट झाली आहे. म्हणजे मीडिया कंपनीवर खूप कर्ज असल्याने त्यांना बेलआउटची गरज असते. अशावेळी कंपनीचे प्रमोटर कर्ज घेतात. तेव्हा कर्ज देणारा Debentures ने कर्ज देतो.
Debentures मध्ये कर्जदाराला कर्जाची अमाऊंट कंपनीच्या शेअर्समध्ये कन्व्हर्ट करण्याचा ऑप्शन राहतो. त्यामुळे मग पुढे जाऊन कर्जदार त्याने दिलेल्या कर्जाचं शेअर्समध्ये रूपांतर करतो आणि मालकी बदलते. हेच NDTV च्या उदाहरणातून समजून घेऊ.
एनडीटीव्हीच्या बाबतीत कंपनीचे प्रोमोटर असलेल्या RRPR होल्डिंग कंपनीने २००९ मध्ये VCPL कंपनीकडून ४०० कोटी रुपये कर्ज घेतलं होतं. NDTV वर असणारं इतर बँकांचं कर्ज फेडण्यासाठी हे कर्ज घेण्यात आलं होतं.
RRPR ही NDTV चे संस्थापक राधिका रॉय, प्रणॉय रॉय यांची कंपनी आहे ज्यांच्याकडे NDTV ची 29% मालकी होती. तर VCPL ही अदानींच्या AMG Media Networks (AMNL) ची एक सबसिडरी कंपनी आहे.
आता VCPL ने NDTV मधील २९ टक्के शेअर्स घेतले आहेत म्हणजे २००९ मध्ये त्यांनी दिलेल्या ४०० कोटींचं शेअर्समध्ये रूपांतर केलं आहे.
यावर NDTV ने आम्हाला कोणतीही माहिती न देता हे टेकओव्हर केलं गेलं असल्याचं म्हटलं आहे. मात्र असंच रिलायन्सने देखील केलं होतं.
तेव्हा रिलायन्सने नेटवर्क 18 ग्रुपला २०१२ मध्ये Debentures बदल्यात कर्ज दिलं होतं. त्यांच्याकडे १० वर्षांपर्यंत कर्जाला शेअर्समध्ये कन्व्हर्ट करण्याचा ऑप्शन होता मात्र त्यांनी अडीच वर्षातच आपल्या कर्जाला शेअर्समध्ये कन्व्हर्ट करून नेटवर्क 18चा ताबा घेतला होता.
त्यावेळी नेटवर्क 18 ने अंबानींना असं करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि हे कायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं नेटवर्क 18 चे संस्थापक राघव बहेल यांनी नेटवर्क 18 ग्रुप अंबानींना सुपूर्द केला होता.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
🧵थ्रेड
विनायक मेटे यांचा पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर कार अपघातात मृत्यू झाला. मेटेंच्या मृत्यूबाबत शंका कुशंका उपस्तिथ केल्या जातायेत. त्यापैकी एक आहे हायवे हिप्नोसिस. या थ्रेड मधून जाणून घेऊया ‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नक्की काय असतं ? आणि ते टाळण्यासाठी काय करावं?
‘हायवे हिप्नोसिस’ ला अनेकदा हायवेवर गाडी चालवणारे ड्राइवर बळी पडतात. हिप्नोसिस म्हणजे संमोहित होणं.
जेव्हा तुम्ही तुम्हाला माहित असणाऱ्या आणि एकसलग रोडवर ड्राइव्ह करत असता तेव्हा एका टाइमनंतर तुमचा मेंदू तुमचे डोळे काय इनपुट देत आहेत त्याऐवजी तुम्हाला जे आधीपासून रोडबद्दल जे माहित आहे त्यावरच जास्त अवलंबून राहू लागतो.
🧵थ्रेड
आओ बच्चों तुम्हे दिखाएं झाँकी हिन्दुस्तान की
दे दी हमें आज़ादी बिना ..
हम लाएँ है तुफान से कश्ती
ही गाणी तुम्ही आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ऐकली असणार,
पण तुम्हाला माहितेय का? 'जागृति' पिक्चरची ही गाणी, कथा बालकलाकार पाकिस्तानमध्ये डिट्टो कॉपी केली गेली होती
तर जागृति पिक्चररमधली हि सगळी गाणी आहेत आणि या पिक्चरचा पाकिस्तानमध्ये ' बेदारी' या नावाने रिमेक करण्यात आला होता. यामध्ये जागृति सिनेमाचा प्लॉट आहे तसा उचलून फक्त तो पाकिस्तानच्या दृष्टीकोनातून सेट करण्यात आला होता.
या दोन्ही चित्रपटांमधील मुख्य भूमिका नाझीर रिझवी (जो पडद्यावरील रत्न कुमार या नावाने अधिक प्रसिद्ध आहे) या बालकलाकाराने साकारली आहे. १९५० च्या दशकात नाझीर पाकिस्तानात स्थलांतरित झाला आणि त्यानंतर त्याने अनेक लॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले.
🧵थ्रेड
आज १० वर्षांनंतर सुरेश कलमाडी पुणे महानगरपालिकेत आले. शरीराने थकलेल्या कलमाडींना ओळखनं देखील अवघड झालं होतं. मात्र कधीकाळी भारताने भारतातल्याच नागरिकांवर केलेला एकमेव हवाई बॉम्बहल्ला म्हणून ज्या हल्ल्यावर आरोप होतो त्यात कलमाडी सामील होते. त्याचाच हा किस्सा.
भारताचा ईशान्य भाग कायम असंतोषामुळे धगधगता राहिला आहे. स्वातंत्र्य मिळल्यावरही या मिझोराम हा आसाम राज्याचा जिल्हा म्हणून राहिला.मिझो लोकांच्या विकासाकडे तत्कालीन प्रांतिक सरकारने पुरेसे लक्ष न दिल्यामुळे या लोकांतील असंतोष वाढत गेला.
शेजारच्या पूर्व पाकिस्तानमधून येणारे निर्वासितांचे लोंढे यांना देखील आवर घालण्यात आसाम सरकार कमी पडत होतं. त्यांतच वारंवार होणाऱ्या भीषण दुष्काळाची भर पडली.मिझो तरुणांनी दुष्काळ निधी न देणाऱ्या आसाम सरकारच्या विरोधात शस्त्रे उचलली.
#फोटोऑफद_डे
सोशल मीडियावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचा ##महंगाई_पर_हल्ला_बोल आंदोलनातील हा फोटो व्हायरल होतोय आणि सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही. या दोन फोटोंमागची नेमकी स्टोरी जाणून घेऊ.
असा आहे इंदिरा गांधींच्या त्या फोटोचा इतिहास @INCIndia@INCMaharashtra
हा फोटो आहे १९७७ सालातला. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर इंदिरा गांधींनी आंदोलन केलं होतं. आणीबाणीनंतर झालेल्या या निवडणुकीत इंदिरा गांधींचीच सत्ता येईल अशी खात्री त्यांना इंटेलिजन्स ब्युरो मधल्या काँग्रेस निकटवर्तीयांकडून देण्यात आली होती.
मात्र तसं झालं नाही. काँग्रेसला सपाटून पराभव स्वीकारावा लागला, खुद्द इंदिरा गांधीही रायबरेलीमधून हरल्या आणि या सगळ्या परिस्थितीमुळं त्यांनी आपल्याच बंगल्याच्या लॉनवर आंदोलन केलं. त्यांचा हा फोटो सुप्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांनी काढला आहे.
🧵थ्रेड
नरेंद्र मोदींच्या #HarGharTiranga मोहिमेला प्रतिसाद देत अनेकजण प्रोफाइल पिक्चरमध्ये तिरंगा ठेवत आहेत. मात्र RSS ने आपल्या ऑफिशिअल अकाउंटवर तिरंगा न ठेवल्याने टीका होत आहे. याला RSS ने १९५० ते २००२ अशा ५२ वर्षे संघ कार्यालयावर तिरंगा फडकवला नसल्याच्या घटनेशी जोडलं जातंय.
१९५० पासून ते २००२ सालापर्यंत संघाच्या मुख्यालयात प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन या भारताच्या राष्ट्रीय सणादिवशी झेंडावंदन केले जात नव्हते.
२२ जुलै १९४७ ला भारताच्या संविधान सभेने सर्वसंमतीने राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा स्वीकारला. मात्र संघाचे तत्कालीन सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांनी तिरंग्याचा जाहीरपणे विरोध केला.
🧵थ्रेड
सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीत एक महत्वाचा निर्णय होता, पुढील सुनावणीपर्यंत शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये. ठाकरे गटाचा शिवसेनेचा मुद्दा इलेक्शन कमिशनकडे नेण्यास विरोध आहे. जर आयोगाकडे हा विषय गेला तर सेनेची स्थिती लोकजनशक्ती पक्षागत होऊ शकते.
त्याचवेळी शिंदे गट मात्र निवडणूक आयोगाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा यासाठी आग्रही आहे. कालच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीतही शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ येत असल्याने आम्ही इलेक्शन कमिशन कडे धनुष्यबाणाची मागणी केली असल्याचं म्हटलं होतं.
निवडणूक आयोगाकडे असंच रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या फुटीचं प्रकरण गेलं होतं. फुटीनंतर पक्ष कोणाचा ? हा निर्णय येइपर्यंत पक्षाचं बंगला हे चिन्ह गोठवलं होतं आणि लोकजनशक्ती पक्ष हे पार्टीचं नाव वापरण्यासही मनाई केली होती.