मी मात्र या सर्वांच्या अगदी उलट. ऐसपैस उठबस….दणदणीत आवाज…..
दहा वीस फुटांवरील मित्राला काय इंटरकॉम करायचा म्हणून जागेवरूनच “अरे …..ऐक ना” करून जोरात माळरानात आवाज द्यायचा तसा द्यायचो.
सगळं ॲाफीस माझ्याकडे सुरूवातीला अतिशय त्रासिक नजरेनं पहायचं. मग हसायचं. नंतर त्यांना
२/२७
ती माझी सवय कळली आणि काही जणं मग माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले.
इमेल वगैरेपेक्षा माझा जोर सरळ बोलून समोरासमोर हो की नाही करून घ्यायचं अन पुढे जायचं…
एखादी गोष्ट नाही पटली की “ओपन फोरम” मधे बिनधास्त सर्वांसमोर आपलं मत ठोकून द्यायचं. कोणाला काय वाटेल फारसा विचार नसायचा.
३/२७
बरं इंटरनल पॉलिटिक्स किंवा इतर बुद्धीबळाच्या स्पर्धेत नसल्याने माझा तसा कोणाला त्रास नव्हता.
आपलं काम आणि काम हीच एकमेव कमिटमेंट.
या गुणांमुळे म्हणा किंवा अवगुणांमुळे काही लोकांमधे मी लोकप्रिय होतो तर काहीसाठी “गावठी” किंवा “घाटी”. होतो.
कामाच्या बाबतीत मात्र अगदी काही
४/२७
दिवसात बऱ्यापैकी चांगली जबाबदारीची कामं मिळत गेली.
असेच नव्या मुंबईत बेलापूरला एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीसोबत मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी माझ्यावर आली.
तिथे त्यांना माझ्यावर त्यांना ठरलेल्या वेळेत त्यांना जो हवाय तो टेक्निकल डेटा द्यायची आणि कोऑर्डीनेशनची
५/२७
जबाबदारी होती.
त्यांच्या टिममधे चार जणं होते दोन माझ्याच वयाचे तरूण इंजिनियर्स होते तर दोन अतिशय सिनियर कंसल्टंट होते. (साधारण ५० वर्ष पार केलेले).
माझी थोड्याच दिवसात त्या दोन्ही तरूण इंजिनियर्ससोबत मैत्री झाली.
मिटींगनंतर चहा,कॉफी एखादंवेळ जेवणही झाले.
त्यामुळे मी जरा
६/२७
निवांत झालो. मिटींगमधे माझा आत्मविश्वास वाढलेला असायचा.
त्यांचे सिनियर काही बोलू लागले की आधीच मी उत्तर द्यायचा प्रयत्न करायला लागलो…
कधीकधी त्या दोन्ही मित्रांना ते काही चूकीचे विचारू लागताच चेष्टा करून हसायचो. त्यात खरं तर माझा उद्देश वाईट नसायचा पण तरीही नको तेच झाले.
७/२७
माझ्या नकळत त्यांच्या बॉसेसने माझी तक्रार आमच्या कंपनीतील सिनियर्सकडे केली. पुढच्याच आठवड्यात किक ॲाफ मिटींगच्या निमित्ताने माझे साहेबही मुद्दाम सोबत आले.
पण मला त्या तक्रारीची काहीच कल्पना नव्हती.
नेहमीप्रमाणे मिटींग सूरू झाली. मी अगदी अग्रेसिव्हली उत्तर देत होतो.
८/२७
त्यांची मला जी चूकीची मत वाटत होती ती हलकासा पॉज मिळाला तरी खोडत होतो.
त्यावर ते काही आर्ग्युमेंट्स करत होते मग मी पुन्हा तावातावाने बोलायचो. त्यात बॅासवर इंप्रेशन मारण्यासाठी मधेच अत्यंत क्लिष्ट तांत्रिक मुद्दे मांडत होतो.
हे सर्व चालले असताना माझे साहेब मात्र धीरगंभीर.
९/२७
ते काहीच बोलत नव्हते. ते फक्त सर्व पहात होते.
मी असाच एकदा त्यांचा मुद्दा खोडत असताना समोरचे सिनियर कंसल्टंट एकदम जोरात रागावले. “This man doesn’t have listening skills at all, Why are you sending such xxxxx to our office.”
तसेच माझ्या साहेबांकडे पाहून - इंग्रजीत मला फार
१०/२७
अद्वातद्वा बोलले.
अगदी आमची ॲार्डर कॅंसल करतो व भविष्यात तुमच्या सोबत पुन्हा कधीही काम करणार नाही इथपर्यंत येऊन पोहचले.
पुढचे १५/२० मिनिटं ते सलग मला रागावत होते. माझे साहेब हे सर्व शांतपणे पहात होते. नंतर त्यांनी मध्यस्ती केली. सर्वांसमोर त्यांनीही मला प्रचंड झापले.
११/२७
शेवटी माझ्यावतीने त्यांनी सर्वांची माफी मागितली.
मला चूक उमगली होती. मी पण माफी मागितली. भविष्यात अशी चूक करणार नाही असे लेखी पत्र तिथेच दिले आणि मान खाली घालून मी बाहेर आलो.
बाहेर पडतानाच हृदय धडधडत होतं. आपली नोकरी तर १००% गेली याची खात्री वाटत होती. कारण या चूकीला
१२/२७
कोणत्याही कंपनीत अशीच शिक्षा मिळाली असती.
बॉसच्या नजरेला नजर भिडवायची हिंमत होत नव्हती. बाहेर पडल्यावर त्यांच्या गाडीत बसलो. ते खूप रागावणार ही खात्रीच होती.
पण त्यांनी अनपेक्षितपणे खांद्यावर हात ठेवला. म्हणाले, “घाबरू नकोस… तूझी चूक आहेच पण इथून पुढे नेहमी लक्षात ठेव,
१३/२७
आपण बरोबर असो की चूक - समोरचा माणूस बोलत असताना ऐकून घ्यायला शिक.
प्रतिक्रिया द्यायची अजिबात घाई करायची नाही. ज्या लोकांमुळे आपला उद्योग - व्यवसाय चालतो, आपल्याला पगार मिळतो त्यांच्यावर उगीचच कुरघोडी करायचा प्रयत्न करायचा नाही. आपण त्यांचा त्रास कमी करायचा प्रयत्न करायचा.
१४/२७
नेहमी आपल्या समोरच्या माणसाला पुर्ण बोलू द्यायचे. अगदी तो चूकीचा असला तरी.”
मला त्यांनी मग माझ्या बऱ्याच पुर्वीच्या चुकाही उदाहरणासह सांगितल्या. मलाही त्या पटल्या. मी मनोमन खजिल तर झालोच होतो पण अगदी थोडक्यात वाचलो याची पुर्ण जाणीव होती.
आता कट टू -
पुढे काही वर्षानंतर
१५/२७
मी उद्योगात उतरलो. साधारण २०१० च्या दरम्यान आम्ही अत्यंत आधूनिक अशा रेडीमेड गारमेंट बनविणाऱ्या कंपनीचे बॉयलर, स्टिम पाईपलाईन्स, फ्युअल स्टोरेज व इतर सर्वच युटीलिटीजचे मोठे काम घेतले होते.
असे सर्व प्रोजेक्ट मी स्वतः जातीने पहात असे. इकडे काही मशीन्स आम्ही दिलेल्या होत्या
१६/२७
तर काही इंपोर्ट केलेल्या व काही इतर भारतीय उत्पादकांनी बनवलेल्या होत्या.
नेहमीप्रमाणे अशा प्रोजेक्टमधे डेडलाईन फार महत्त्वाच्या असतात आणि इथेच नेमकी एकमेकांवर ढकलाढकल सूरू होते.
प्रत्येक व्हेंडर, मी कसा बरोबर आहे आणि दुसऱ्यामुळे हे काम कसे खोळंबले आहे हे अगदी तावातावाने
१७/२७
प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतो.
आमच्यासाठी हा प्रोजेक्ट अत्यंत महत्वाचा होता कारण या कामामुळे अजून पुढे तीन - चार मोठे प्रोजेक्टच्या लिड आम्हाला मिळणार होत्या.
अगदी गरजेपेक्षा अधिक माणसं लावून आम्ही वेळेच्या आधी ते काम जवळपास पुर्ण केले होते.
दर आठवड्याला त्यांचे
१८/२७
प्रोजेक्ट डायरेक्टर साईटवर कामाचा रिव्ह्यूव्ह घ्यायचे. त्यामुळे त्यादिवशी मी अगदी खुशीतच त्यांना भेटायला गेलो. पण त्यांच्या ऐवजी त्यांचे मालकच रिसेप्शनमधे भेटले.
त्यांनी मला तुमचे नाव काय विचारले तर मी ते सांगितलं.
ते पहिल्यांदाच मला भेटत होते. पण कामाबद्दल नक्की शाबासकी
१९/२७
देतील असं मनोमन वाटतं होतं.
पण झालं भलतचं. त्यांनी अचानक जे काही माझ्यावर तोंडसूख घेतलं ते अत्यंत भयंकर होतं. बर ते काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. माझ्यासाठी तर हे पुर्णपणे “आऊट ॲाफ सिलॅबस” होतं.
त्यांचा पारा जो काही चढला होता त्याला काही मर्यादाच नव्हती.
२०/२७
एका क्षणी तर त्यांनी सिक्यूरिटीला बोलावून मला गेटच्या बाहेर हाकलून द्यायला लावले.
अगदी खरं सांगतो - थोड्या वेळासाठी तर मला खरचं माझी चूक आहे असही वाटलं कारण ते मला नावानिशी शिव्या घालत होते पण अचानक पाठीमागून त्यांचे प्रोजेक्ट डायरेक्टर धापा टाकत साहेबांना सांगत होते,
२१/२७
आहो हा तो प्रफुल्ल नाही तो दुसरा प्रफुल्ल आहे. आणि मी झपकन मागे वळून जागेवरच थांबलो.
आता काय तो सर्व प्रकार माझ्या आणि त्यांच्या मालकांच्याही डोक्यात आला होता. मला हायसं वाटतं होतं….पण ते दोघेही मात्र फारच ओशाळले होते.
त्यांनी मला हाताने इशारा करून जवळ बोलावलं. मी गेलो.
२२/२७
मग ते म्हणाले, “मी इतका वेळ तुला ओरडतोय….एवढे बोलतोय तरी मला का सांगितले नाही?”
मी म्हणालो, “तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला पण तुम्ही फारच रागावला होतात त्यामुळे माझ्याकडे ऐकून घेण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.”
प्रोजेक्टच्या साहेबांनी मग आमच्या कंपनीविषयी व कामाविषयी
२३/२७
अत्यंत सकारात्मक फिडबॅक दिला.
त्यांचे मालक मात्र मला वारंवार एकच प्रश्न विचारत होते -तू एवढं सगळं कसकाय ऐकून घेतलस? मला उलटा रागावला किंवा पटकन थांबवलं का नाहीस? आणि तू एवढं सगळं कसकाय ऐकून घेऊ शकलास?
त्यांनी नंतर जवळपास दिवसभर मला सोबत ठेवलं. त्यांना खर तर गिल्ट होतं.
२४/२७
मग मी दुपारी जेवण करताना माझा जूना प्रताप आणि माझ्या या अवगुणाविषयी प्रामाणिकपणे सांगितलं.
त्यावेळी असे मार्गदर्शन करणारे लोक आजूबाजूला होते म्हणून हे जमू शकलं आणि सर्व श्रेयही त्यांनाच जातं हे प्रामाणिकपणे कबुल केलं.
पुढे त्या साहेबांच्या रेफरंसने आम्हाला बरेच मोठमोठे
२५/२७
प्रोजेक्ट तर मिळालेच शिवाय तो किस्साही कायमची आठवण बनला.
आईवडील आपल्याला संस्कार देतात, ते पहिले गूरू असतातच पण अशी अवघड गणितं सोडवायला असे अनेक मार्गदर्शक लाभणं खरं भाग्याचं!
आज व्यवसायात आम्ही जो काही उद्योग भारतात आणि जगभर करतो त्याचे पुर्ण श्रेय हे अशाच मार्गदर्शक
२६/२७
गूरूजींना जाते.
कधी ते बॅास, कधी ग्राहक, कधी व्हेंडर, कधी सहकारी तर कधी अधिकारी म्हणून भेटले.
योग्य वेळी, योग्य लोकांच्या सानिध्यात असणं तसेच त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घेत मार्गक्रमण करणं हे शाश्वत यशाकडे जाण्यात मोठी भूमिका बजावते.
🙏
२७/२७
बऱ्याचदा स्वतःच्याच क्षमता आपल्याला नीट उमजत नाहीत….. सहसा गरीब, निम्नमध्यम वर्गीय किंवा समाजाच्या खालच्या स्तरातल्या कुटूंबात तर कोणी यावर साधी चर्चाही करत नाही.
काय करावं, कुठे जावं काही समजत नाही!
तूला जसं जमतेय ते कर यामागे स्वातंत्र्य नसते तर - नक्की आपण काय सांगायचं हे अगतिक अज्ञान असतं.
कितीतरी जीव फक्त - आता पुढे काय करायचं या प्रश्नापुढे जातच नाहीत…. एक भयंकर न्यूनगंड (जे जवळपास प्रत्येकातच असतो) आहे त्या परिस्थितीतच ठेवतो…..
निर्लज्ज पणे करियर बद्दल प्रश्न विचारता यायला हवेत, तसं वातावरणं तयार व्हायला हवं. खर तर पुस्तकं, इंटरनेट आणि समाजमाध्यम यात फार मोठी भूमिका निभावू शकतात पण त्यात फार कोणाला इंटरेस्ट नसतो….. ट्रॅक्शन नसतं… हे जग नक्की आपल्याला कुठे घेवून चाललंय?
स्टार्टअप असो, सेट बिझनेस असो की पिढीजात उद्योग त्यांच्याकडे कितीही अद्ययावत मशीन्स-तंत्रज्ञान असले तरी या सर्वात महत्वाचा कॉमन घटक असतो तो म्हणजे त्या “यंत्रामागचा माणूस”
आता या अशा जीवघेण्या स्पर्धेत कंपन्यांना टिकायचे असेल,आपल्या क्षेत्राचे पुढे जायचे असेल तर ऑटोमेशन
२/१०
किंवा कोणत्याही आधूनिक टेक्नॉलॉजीएवढेच महत्वाचे असते ते म्हणजे आपल्याकडील “मानव संसाधन” टिकवून ठेवण्याचे आव्हान!
मुलामुलींनीही हे समजून घेणे फार गरजेचे आहे की Hire & Fire टाईपच्या कंपनीत स्वातंत्र्य नसतं, अशा ठिकाणी मोठी झेप घेता येत नाही, चांगली प्रगती तर कधीच होत नसते.
३/१०
तेंव्हा मध्यप्रदेशमधे मी एका हिटिंग फर्नेसचा मोठा प्रोजक्ट हेड करत होतो.
काही डेडलाईन्स पाळायच्या असल्याने मी सलग पंधरा-पंधरा दिवस साईट २४ तास साईट रोटेशन पद्धतीने (दोन शिफ्टमधे) चालू ठेवायचो.
फक्त झोपायला जवळच्या हॅाटेलवर यायचो बाकी सलग १६- १८ तास साईटवरच जायचे. असेच एक
२/२४
दिवस काम संपवून रात्री उशीरा २ वाजता हॅाटेलवर पोहचलो, आंघोळ, जेवण करून झोपायला ३ वाजले.
नुकतीच झोप लागलीच होती की साधारण साडेतीन- चार वाजता माझा मोबाईल वाजला…. तो साईटवरील एक सहकारी सतिशचा होता, मी फोन लगेच उचलला, त्याचा आवाज प्रचंड घाबरलेला होता - एका दमात तो म्हणाला -
३/२४
उर्जा साक्षर होणं ही काळाची गरज आहे. एकविसावं शतकं हे विज्ञान-तंत्रज्ञान तसेच चौथ्या औद्योगिक क्रांतीचे आहे.
सोलार, विंडएनर्जी, बायोएनर्जी, इलेक्ट्रिक गाड्या हे शब्द जरी आज रोजचे झाले असले तरी जैविक इंधने- डिझेल,पेट्रोल, कोळसा, सीएनजी, एलपीजी #उर्जासाक्षरता#SaturdayThread
१/१२
रोजच्या वापरातले प्लॅस्टिक, सौंदर्यप्रसाधने, डांबर, औद्योगिक वापरासाठीचे फरनेस ॲाईल, लाईट डिझेल ॲाईल तसेच आपल्या आजूबाजूच्या शेकडो गरजेच्या वस्तूंसाठी हे जैविक इंधन क्रूड ॲाईलच्या स्वरुपात वापरले जाते.
आपण कल्पनाही करू शकत नाही इतके मोठे हे उर्जा विश्व आहे. बरं ते आपल्या
२/१२
अगदी बेसिक गोष्टींसाठी वापरले जाते तरीही आपण फक्त डिझेल, पेट्रोल, एलपीजी आणि हल्ली सीएनजी भाववाढ इथपर्यंतच सिमित ठेवतो.
खर तर क्रुड ॲाईल, त्यावरील प्रोसेस आणि त्यातून आपण काढत असलेली उत्पादने ही मानवाला गेल्या दिड-दोन शतकात मिळालेले वरदान आहे. आज कितीही आपण ग्रीन हायड्रोजन
३/१२
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतात तापमानाचा पारा अंगाची लाही लाही करतोय.
पुर्वी या दिवसात विदर्भात जायचे म्हटले तरी एसीमधेही दरदरून घाम फुटायचा पण समस्त मानवजातीची पृथ्वीवर कृपा झाली व ग्लोबल वॉर्मिंगमुळे अखंड विश्वाचेच चंद्रपुर व्हायला सूरूवात झालीये.
ग्लोबल वॉर्मिंग हा आजचा मुद्दा नाही तो खरं तर आपल्या प्रत्येक श्वासासोबतचा मुद्दा आहे त्यावर पुन्हा कधीतरी.
आजचा विषय म्हणजे यावर्षी आपल्या आयुष्यात आलेला नवा उन्हाळा.
आपल्याकडे एप्रिल, मे मधे तापमान वाढते आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात विजेची गरजही वाढते, बरं हे दरवर्षी
२/१०
होणारं ऋतुचक्र काही नवे नाही. वीजेची गरज अचानक किती जास्त वाढू शकते याचे वर्षानूवर्षाचे सरासरी आकडे सरकार दरबारी असतातच.
मागचे दशकानुदशके हे चालू आहे. बरं आपल्याकडे ७५ ते ८०% वाजनिर्मिती ही कोळश्यावरच होते त्यामुळे वीजनिर्मितीसाठी कच्चा माल काय लागणार याबाबत काही संदिग्धता
३/१०