Ajay Profile picture
Sep 3, 2022 19 tweets 10 min read Read on X
अचानक ३ दिवसाची सुट्टी भेटली..😀

मग काय..ज्या बसमध्ये जागा भेटली त्या बसचे बुकिंग करून निघालोही..!

ह्या वेळेस एक नवा प्रयोग..Live Travel Blog..!👇

सुरुवात रायगड जिल्ह्याच्या अश्या जागेपासून जिथून कमीत कमी ७ राज्यात एका रात्रीच्या प्रवासात पोहचू शकतो..!

#प्रवासवर्णन

#म ImageImage
महामुंबईत..

विमानांसाठी छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट..

जहाजांसाठी जेएनपीटी बंदर..

रेल्वेसाठी सीएसटी..

आणि

बससाठी कळंबोली MacDonalds..!
खरे तर , कर्नाटकात जायचे तर VRL travels..नाहीतर SRS travels च्या बसेस बेस्ट आहेत.

पण..ऐनवेळी..त्यांची तिकिटे भेटली नाही..म्हणून.. Citizen travels ची बस घ्यावी लागली.

आतापर्यंत तरी ह्या ट्रॅव्हल्सचा आंबट गोड अनुभव..👇
वेळेवर आली..पण AC नीट चालत नाहीये..

पांघरून स्वच्छ आहे..पण बेडशीटला गलिच्छ म्हणण्याशिवाय पर्याय नाही..!

कर्नाटकात फिरायचे तर २ जागा अगदी मोक्याच्या..हुबळी आणि मंगळूर..!

मला हुबळीचे तिकीट मिळाले..तिथून २-४ तासात हम्पी, गोकर्णा, कारवार, दांडेली, अगदी गोव्यालाही सहज पोचता येते..!
खेड शिवापूर म्हटलं की प्रत्येकाचे आवडीचे असे मटण भाकरीचे एक तरी हॉटेल असतेच..!

तसेच..ट्रॅव्हल्स वाल्यांचे आवडते हॉटेल म्हणजे हॉटेल नीलकमल..जिथे मटण भाकरी सोडून सर्व काही मिळते..😅

आणि त्यामुळेच मग सामान्य जनतेला खेड शिवापूरला जाऊनही पावभाजी खायची मानहानी पत्करावी लागते..😬😂 ImageImageImage
तसं..माझ्यावर जर अशा थांब्यांवर कोणता धंदा करायाची वेळ आली असती तर मी नक्की सिगारेट विकायचा केला असता..कमी भांडवलात जास्त नफा..!

नफ्याच चक्र रोज फिरवता येतं त्यात..सकाळी विकत घ्या..रात्री भरपूर मागणी असल्याने संपवून टाका..!

उगाच नाही ITC वरचे वर..वरच चालला आहे..😬😂
रात्री १०.३०-११ ला खेड शिवापूर वरून निघून बसने सांगितल्याप्रमाणे sharp ५ ला हुबळी ला पोचवले.

हुबळी च्या बहुतेक सर्व बस पुढे बंगळूर ला जाणाऱ्या असतात..म्हणून त्या सर्व शहराबाहेर हायवे ला सोडतात..पण Citizen ट्रॅव्हल्स ने गावात बस स्थानकाला सोडले..त्याने सहज २-३००₹ वाचले. Image
तेथून थेट रेल्वे स्टेशन गाठले..आणि सुदैवाने..कर्नाटकच्या मलनाड
(मल -ढग, नाड -देश) अर्थात ढगांच्या देशात जाणाऱ्या ८.३० च्या ट्रेनचे
(इथली हुबळी - म्हैसूर express) टिकीटही भेटले..!✌️

ह्या ट्रेन ने आता हिल स्टेशन्स अन् ट्रेकस टप्प्यात आणलेत..🤩

स्टेशनची सुसज्ज Wating room 🔥👇 ImageImageImageImage
सकाळी ८.३० ला बेळगाव-म्हैसूर जाणाऱ्या विश्वमानव एक्स्प्रेसमध्ये जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म वरून बसलो..!

इथून बिरुर जंक्शनला उतरायचा विचार आहे..कारण ते कूर्ग/माडिकेरी, चिक्के मंगळूर व अगुंबे (देशातील सर्वाधिक पावसाचे २ नं चे ठिकाण) ह्या सर्व Hill stations पायथ्याशी आहे..! ImageImageImage
ढगांच्या प्रदेशात..मलनाड..!

बीरुर जंक्शन @१.१० वाजता

सुदैवाने अजून तरी फक्त ढगच आहेत..
पाऊस नाही..😅 ImageImageImageImage
बिरुर पासून सगळ्यात जवळ आहे ते चिक्केमंगळूर..४५किमी..त्यासाठी दर तासाला बस आहेत..फक्त दुपारचे १२.३०-२.३० चा वेळ सोडून..😬

म्हणून मग अजून एक कार्यकर्ता पकडला आणि रिक्षाने (घासाघीस करून १०००ला) ह्या hill station चा प्रवास नक्की केला..!
महाराष्ट्राबाहेर आलो आणि तिथल्या रस्त्यांचा हेवा वाटला नाही असे कधी तरीच होते..😑 ImageImageImageImage
आजचा पुण्याचा पाऊस बघून..माझ्या फोनची आणि त्यासोबतच माझ्या Live Travel Blog ची वाट लावणारा पाऊस आठवला..😬😅

त्या पावसाने आजारी पडलेला माझा फोन आजच बरा झाला..तो..पुण्याचा पाऊस पाहण्यासाठीच..😂😭

असो.. Image
चिक्कामगलुर - हे राजाने त्याच्या लहान (चिक्का)मुलीला (मगळ)बहाल केलेलं गाव (उरू)लई भारी आहे..!

हिरव्यागार डोंगरातून..
अधूनमधून ढगांना बिलगत..
मख्खन रस्त्यांवर Rent वर मिळणारी बाईक घेऊन उगाचच हुंदडत फिरायची जागा म्हणजे हे चिक्कामगळूर..❤️

Highlights टाकून हा थ्रेड संपवतो..😬 ImageImageImage
बेलूर (तेथून ~३०किमी) येथील होयसळा राजांनी बांधलेल्या ७०० वर्ष जुन्या मंदिरातील कला व होयसळा साम्राज्याचे चिन्ह..!

बरं..हे चिन्ह होयसळा सम्राट विष्णूवर्धन( चिन्हातील व्यक्ती) ह्याने सिंहाला म्हणजे चोला साम्राज्याला पराभूत केल्याचे सांगते..! (सिंह -चोला साम्राज्याचे चिन्ह) ImageImage
कर्नाटकातील सर्वोच्च शिखर - मुलायनगिरी

कळसूबाईपेक्षा हजारभर फूट उंच..पण त्यात काही विशेष नाही..तसंही जसे दक्षिणेकडे जावे तशी सह्याद्रीची उंची वाढतच जाते..! पण इतक्या उंचावर जाणारा रस्ता मात्र विशेष आहे!

साधारण ३ किमीचा ट्रेक..शेवटपर्यंत गाडी नेली तरी ~ १ किमीचा तरी ट्रेक भरेल
शिखरावरचा बाप्पा..शिखर..वाटेवरची फुले अन् रस्ता..! ImageImageImageImage
केळीच्या पानात व पात्रात दम दिलेली बिर्याणी.. अन् चिक्कामगळुर कॉफी ImageImage
तेथील Multilevel Farming !

सर्वात खाली झुडुपे आहेत ती कॉफीची..उंच झाडांवर चढलेल्या वेली आहेत त्या काळे मिरी उगवणाऱ्या..आणि ती सरळसोट झाडे कधी सुपारीची तर कधी पाईनची..! Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ajay

Ajay Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @amhiraigadkar

Oct 20
🟩 Unlocking Opportunities: Everything You Need to Know About #WaareeEnergies #IPO ! 🟩

But first, for those who want a brief overview 👇

- Big Grey market premium .
- Co is good and growing.
- Sector is good and growing.
- Of course , There is a risk, but it's currently relatively low and can't be easily summarized in one tweet..so, kindly read 7th tweet..!

Now ,

Let's start with review 👇

1) Reason for the IPO - 👇

(Image credit - Waaree AR 24🙏)

1/7Image
1) Reason for the IPO -

This IPO is being conducted to raise ~ ₹4,300 crores.

Out of this, ~ 700 crores will go to the Promoters and selling investors of the company. (OFS).

Rest will be used to establish a new solar cell manufacturing factory in Odisha and for ?majorly working capital requirements.(Fresh Issue) Working capital intensive business ?!

2) What exactly does the company actually do?👇+

2/7Image
Image
2) What does the company actually do?

More than 90% of the company’s revenue comes from selling solar modules.

These solar modules are made up of many small blue squares that each square is a solar cell which converts energy from sunlight to electricity.

Currently, the company imports these solar cells and connects them, then covers them with glass etc to create solar modules.

However, these solar cells are fundamentally made from simple sand, specifically silicon.

The sand is heated and melted to remove impurities, resulting in pure silicon, which is then formed into a polysilicon.👇(Key starting material)

In the last 1-2 years, the prices of polysilicon in the global markets have fallen drastically due to an increase in supply.

And perhaps to take advantage of this opportunity , the company is establishing a combined factory in Odisha to produce solar cells and solar modules from polysilicon, using funds from IPO.

Notably, to ensure this production happens in India, the company has received incentives of ~2,000 crores from the Indian government's PLI scheme, along with subsidized land, discounts on electricity rates, and partial tax exemptions from the Odisha government.

Therefore, while the company currently has 4 plants spread over 136 acres, it is now building this new huge plant on ~600 acres.

But to take such a bold step requires a booming sector, so 👇

3) About the sector boom

3/7Image
Image
Image
Image
Read 7 tweets
Oct 12
🟥 4 Reasons to Think Twice Before Subscribing to Hyundai India's IPO 🟥

Reason 1 - Massive IPO 👇

1/5+ Image
Reason 1) Massive IPO

This will be a very large..in fact, it is set to be the biggest IPO in India to date.
Hyundai will be selling shares worth approximately 27,000 crore rupees (~3 billion $) in this IPO.

Looking at the history of such large IPOs, the chances of making a profit from them are generally low.👇👇👇

And, if you really want these shares in your portfolio, why wait in line for the IPO?

They will be available later with considerable possibility that, they might even be cheaper than the IPO price. 😉

Reason 2 - Recession in Auto Sector ?! 👇

(Image credit - Hindu Businessline..🙏)

2/5Image
Reason 2) Recession in the auto sector ?!

The Anchors n managers n sellers of the shares will tell you that only 7.5 out of 100 people in India own a car.
In contrast, more than 90 out of 100 people in the U.S. have cars.

Therefore, They claim that car companies in India will continue to make profits indefinitely and keep growing forever..😅

However…

The reality today is that over 7,00,000 cars are sitting with the dealerships. And There are no buyers for these cars..!

The middle class can not afford to own these cars, prices of which seem to be artificially increased due to GST, road tax, RTO fees, tolls, petrol prices, car insurance, cess, and so on..😑

N that's not it..

Even if someone can afford a car, where will they drive it? Many roads are with potholes and traffic is everywhere !

And if that’s not enough, there’s no parking available in cities , and then there's problem of wrongful digital challans n road rage n what not..Like there's no end to problems of car ownership..😑

You don’t even need to understand the stock market to see all this.

Additionally, there’s the question of why a company that has been in India for so many years, with ₹20,000 crores in the bank, is suddenly launching an IPO and collecting such a large amount of money… 😉

N that's our next reason+

3) Money will leave India - 👇

(Image 1 credit to Kuvera and 2 to The quint..🙏)

3/5Image
Image
Read 5 tweets
Sep 17
🔴 ऑपरेशन पोलो - गोष्ट मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या शेवटच्या ४ दिवसांची !!

स्वातंत्र्यानंतर हैदराबाद आणि एकदोन संस्थाने सोडली तर इतर संस्थाने भारतात विलीनीकरणाच्या करारानुसार सहभागी झाली होती.

हैदराबाद मात्र समजुतीने भारतात सामील होणे तर दूरच..उलट त्याच्या हालचाली वेगळा देश कसा निर्माण होईल त्यानं दिशेने होत होत्या.

भारताला स्वातंत्र्या मिळण्याआधीच निजामाने दोन फर्माने काढून १५ ऑगस्ट १९४७ पासून हैदराबाद हा स्वतंत्र देश असेल हे जाहीर केले होते.

पण निजामाला भारतापासून धोका वाटतं होता. आणि म्हणूनच निजामाला आपले लष्करी बळ वाढवणे गरजेचे वाटू लागले.

१/n + 👇

#म #Live_ThreadImage
आता हे लक्षात घ्या की हैद्राबाद संस्थान हे तेव्हा देशातील सर्वात मोठे संस्थान होते. ज्या ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले होते त्यांच्या ग्रेट ब्रिटनपेक्षा जास्त क्षेत्रफळ (~२ लाख चौ किमी) आणि जवळपास तेवढीच लोकसंख्या (~ २ कोटी) असणारे विशाल संस्थान होते.

आणि निजाम त्याकाळी भारतातच नाही तर जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती होता.पण इतका श्रीमंत असूनही तो तितकाच कंजुषही होता असे म्हणतात.जगातील सर्वात मोठा हिरा ' जेकब ' तो पेपरवेट सारखा वापरणारा माणूस महालात मात्र जुना पायजमा आणि अंगरखा वापरत असे..😬(१९३७ ' टाईम ' मासिकानुसार )

असो..!

२/n+Image
थोडक्यात काय तर, त्याच्याकडे शस्त्र खरेदी आणि लष्कर इ साठी निजामाकडे अमाप पैसा होता.

पण.पण.पण..

भारताचा ब्रिटिशांसोबत जो
' As it is ' / ' जसा आहे तसा ' भारत सोडून जायच्या कराराप्रमाणे सर्व संस्थानांना भारत सरकारमार्फतच शस्त्र खरेदी करणे बंधनकारक होते.

आणि याच कराराचा भंग करण्यासोबत ३ मुख्य चुका दीड शहाण्या निजामाने केल्या.

१) निजामाने झेकोस्लोव्हाकिया, पोर्तुगीज सरकारकडून शस्त्र खरेदी केली ती केली आणि चोरट्या मार्गाने ही शस्त्रे करार तोडून संस्थानातही आणली.त्यात ब्रिटिशांनी आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने संस्थानांनी किती सैन्य ठेवावे याबद्दल काही निर्बंध घातले होते. त्याचाही भंग करून निजामाने सैन्याच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली.

२) 'इत्तेहादुल मुसलमीन' या रझाकारांच्या संघटनेचा प्रमुख कासिम रझवी 👇 याने रझाकारांची संख्या (शेवटीशेवटी ~ २० हजार ) व बळ वाढवून गावोगावी अत्याचार करण्यास सुरुवात केली. राजकीय विरोधकांबरोबरच गोरगरिबांच्या हत्या होऊ लागल्या.संस्थानातील गैरमुस्लिम जनतेत दहशत निर्माण केली जाऊ लागली. रस्त्यारस्त्यात हत्या,स्त्रियांवर अत्याचार होऊ लागले.घरे लुटली जाऊ लागली.ह्याचा सगळ्यात मोठा फटका अंबाजोगाई आणि आसपासच्या भागाला बसला.

३/n+Image
Image
Read 12 tweets
Sep 11
मागच्या थ्रेडमधून कळलं असेलच की महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे.

म्हणून महाराष्ट्रात धंदा करणाऱ्या कंपनीकडे दुर्लक्ष करू नयेच..!

न् त्यासाठीच आज पुण्यात त्यातही लक्ष्मी रोडवर मुख्यालय असलेल्या पु.ना गाडगीळ ज्वेलर्सच्या #IPO बद्दल #सर्वकाही 🧵

#StockMarketअभ्यास #म Image
आधी कारकुनी गोष्टी 👇

>>> कधी येतोय ?

१०-१२ सप्टेंबर

>>> किती पैसे आणि का ?

एकूण ११०० कोटी

२५० कोटी कंपनीची मालक असलेल्या गाडगीळ त्यांच्या SVG बिझनेस ट्रस्टला

३०० कोटी कर्ज कमी करायला

४५० कोटी दुकाने उघडायला इ

इथे कंपनीचा मालक शेअर विकतोय हे लक्षात घ्यावे.

२/n+
Image
Image
>>> कंपनीविषयी थोडंसं

कंपनीला सराफ धंद्याची परंपरा १८३२ ते आज अशा दीर्घ काळापासून असली तरी ती आधी पार्टनरशिप मध्ये चालत होती.

आणि २०१३ मध्ये तो सगळा धंदा IPO आलेल्या कंपनीला जसच्या तसा विकला गेला.(Slump Sale)👇

आणि तेव्हापासूनच खरी कंपनीच्या वाढीला सुरुवात झाली+

३/n+ Image
Read 21 tweets
Jun 8
🟥 NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम बाबत #सर्वकाही 🟥

जन्मभर सरकारी नोकरीत काम कसेही करू दे..पण..रिटायर झालो की निश्चित पेन्शन मिळणार..ही होती २००४ ला NPS लागू व्हायच्या आधीची पद्धत..!

पण..२००४ साली..भारत सरकारने ही निश्चित पेन्शन पद्धत बंद केली आणि -

#StockMarketअभ्यास #म

१/n Image
देशाची ज्या प्रमाणात प्रगती होईल..त्याच प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळेल अशी सोय केली..!

ह्याने २ फायदे झाले

- सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.

- ही प्रणाली २००९ ला सर्व भारतीयांना खुली केल्यानंतर फक्त नोकरदारच नाही तर सर्वांना पेन्शन मिळेल ह्याची सोय झाली.

२/n Image
थोडक्यात काय तर..काही कोटी नागरिकांकडून गोळा केला जाणाऱ्या कराचा मोठा भाग फक्त काही लाख सरकारी कर्मचारी..तेही निवृत्त..यांवर खर्च होऊ नये म्हणून NPS ला चालू केले गेले.

ह्या NPSच्या खात्याचे २ प्रकार आहेत

Tier १ - सरकारी कर्मचाऱ्यांना मिळते त्या पेन्शनच्या सोयीसारखा

३/n Image
Read 26 tweets
Apr 13
काल चीन मधील एका सिमेंट कंपनीचा शेअर शेवटच्या १५ मिनिटात ९९% नी पडला..🤯🟥🤯

ती कंपनी जर भारतात असती तर ती देशातील ३री सर्वात मोठी कंपनी ठरली असती..!

मग..असं काय झालं की हा शेअर अचानक इतका पडला / पाडला गेला..?!

जाणून घेऊ आजच्या ह्या थ्रेडमधून👇

#StockMarketअभ्यास

#मराठीच #म Image
उत्तर एका ओळीत सांगायचं तर - चीनमधील अनेक मोठे बिल्डर कर्जबाजारी झाल्याने तेथील सिमेंटची मागणी कमी झाली..म्हणून हा शेअर पडला असे म्हणता येईल !

पण..हे बिल्डर कर्जबाजारी झालेच कसे ?

ह्या प्रश्नाचं मूळ मात्र चीनच्या इतिहासात..मुळात चीन कम्युनिस्ट कसा झाला त्या गोष्टीत आहे..👇

२/n Image
पहिली गोष्ट जी अनेकांना माहीत नसेल ती म्हणजे..

भारतात जशी ब्रिटिशांनी वसाहत स्थापन केली तशी वसाहत चीनमध्ये कधीच..कोणाचीही नव्हती..!

काही भाग इतरांकडे होते..
जसे - हाँगकाँग >ब्रिटिश,
कंबोडिया > फ्रेंच इ

पण संपूर्ण चीनवर कधीही परकियांनी सत्ता केली नाही..🤯

न् ह्याची कारणे ३

+ Image
Read 25 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(