#याकूब_मेमन ला फाशी कोर्टाने दिली. भारताच्या कायद्यात फाशीनंतर मृतदेह समुद्रात फेकून देण्याची तरतूद नाही. त्यामुळे #आदित्य_ठाकरे यांनी कितीही दावा केला तरी याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांना दिला गेल्यास त्याचा दोष तत्कालीन गृहमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांना जात नाही. १/३
परंतु निरपराध मुंबईकरांचे प्राण घेणाऱ्या याकूब मेमनची फाशी रद्द करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या #असलम_शेख यांना त्याच मुंबईचा पालकमंत्री करण्याचं पाप मात्र आदित्य ठाकरेंच्या वडिलांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत केलं. २/२
एवढेच नव्हे तर #दाऊद शी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीच्या #नवाब_मलिक यांनादेखील #उद्धव_ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं होतं.
चहा बिस्कीट पत्रकारांनी #आदित्य_ठाकरे यांची री ओढण्यापेक्षा त्यांना हे प्रश्न विचारले असते तर बरं झालं असतं. ३/३
ताजा कलम:
इथे काही जण याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याच्या संदर्भात टिप्पणी करत आहेत. कसाबप्रमाणेच याकूब मेमनचा मृतदेह तुरुंगाच्या आवारातच का पुरला नाही असा प्रश्न उपस्थित करत आहेत आणि तसं न करण्याला ते फडणवीसंना जबाबदार धरत आहेत.
ता क: १/३
प्रिझन मॅन्युअल प्रमाणे, फाशी दिल्यानंतर मृतदेह ताब्यात द्यावा असा अर्ज मृताचे नातेवाईक करू शकतात आणि त्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार जेल सुप्रीपेंडेंट ना असतात. बाहेर सार्वजनिक निदर्शना न करण्याच्या अटीवर नातेवाईकांना मृतदेह देण्यात येतो.
ता क: २/३
कसाबचं उदाहरण या ठिकाणी देण्यात येत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी की कसाबचा मृतदेह ताब्यात मिळावा असा अर्ज घेऊन कसाबचे नातेवाईक आले नव्हते.
ता क: ३/३
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#मराठा_आरक्षण मोर्चाच्या वेळी स्टेजवरून एक मुलगी "आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही" असं तत्कालीन मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांना म्हणत होती तेव्हा आपण गप्प होतात, #सुप्रियाताई. मुख्यमंत्र्याला असं म्हणणं म्हणजे #महाराष्ट्राचा_अपमान आहे असं आपल्याला तेव्हा वाटलं नव्हतं. १/९
आज तुमच्या #अजितदादा ला, म्हणजेच उपमुख्यमंत्र्याला भाषण करायला मिळालं नाही तर तुम्हाला तो #महाराष्ट्राचा_अपमान वाटतोय? वा ताई वा! भले शाब्बास.
उपमुख्यमंत्री हे संविधनिक पद नाही. प्रोटोकॉलमधे त्याचा विचार झालाच पाहिजे अशी सक्ती नसावी. २/९
तरीही भाषणासाठी #पंतप्रधान#नरेंद्र_मोदी यांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मोदींनी खुणेनेच अजितदादांना बोलण्याचं सुचवलं परंतु त्यांनीच नकार दिला हे कॅमेरात स्पष्ट दिसतं. ३/९
काही धार्मिक धारणा म्हणा अथवा गैरसमजूत म्हणा परंतु वस्तुस्थिती ही आहे की बहुतांश मुस्लिम समाज रक्तदान अथवा मरणोत्तर देहदान त्याज्य (हराम) समजतो. अशी समजूत असणारे मुसलमान स्वतःचा अथवा आपल्या जिवलगाचा जीव वाचवताना दुसऱ्याचे रक्त वा अवयव घेण्याचे सुद्धा टाळत असेल का? १/८
तर अर्थातच त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि अगदी नाईलाजास्तव जर ते दुसऱ्याचे अवयव घेत असतील तर वरील वस्तुस्थिती पाहता ते अवयव एखाद्या हिंदूचे (काफिर) असण्याची शक्यताच जास्त. तर मग अशा वेळी एखाद्या काफिराचे अवयव आपल्या शरीरात जोडून घेणे हराम होत नाही का? २/८
डॉ. अमोल कोल्हे यांनी भगव्याचे रक्त, हिरव्याचे रक्त अशा अर्थाची काहीतरी टिपण्णी केल्याची बातमी वाचण्यात आली त्यावरून हे मुद्दे डोक्यात आले. तुमचा पेशंट मरत असेल आणि त्याला रक्ताची गरज असेल तर हिरव्याचं रक्त आहे का भगव्याचं रक्त आहे हे विचारणार का असा प्रश्न कोल्हे करतात. ३/८
ज्या दिवशी महाराष्ट्राच्या सशस्त्र पोलीस दलाने नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आदिवासींच्या एका जाहीर कार्यक्रमात शरद पवारांनी "अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही" अशा अर्थाचं एक विधान केलं. १/७
पवारांचं हे विधान एरवी कितीही सुयोग्य वाटलं तरी त्याचं टायमिंग बघता ते बुद्धीभेद करणारं ठरावं. पवारांना असं खरंच वाटत असेल तर त्यांनी मुक्तकंठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून वनवासी कल्याण आश्रमांद्वारे आदिवासीबहुल भागात जे मोलाचं काम केलं जातं त्याचं कौतुक करावं. २/७
परंतु वस्तुस्थिती अशी आहे की स्वतःला पुरोगामी म्हणवणार्या पवारांसहित तथाकथित सेक्युलर बुद्धिवाद्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे काम डोळ्यात सलतं. डाचतं. ३/७
महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर एल्गार परिषद प्रकरणी अटक असलेल्यांची सुटका होण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केले. या सरकारच्या काळात शहरी नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेचा सशस्त्र पोलीस दलाकडून खातमा करण्यात आला. राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यानी त्याबद्दल पोलीस दलाचं अभिनंदन केलं.
बाबासाहेब पुरंदरेंवर नको तितकी खालच्या पातळीवरची टीका करणाऱ्या आणि त्यांच्या मृत्यू बद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या ब्रिगेडींना एरवी पाठीशी घालणाऱ्या शरद पवारांनी, सुप्रियाताईंनी व अजितदादांनी पुरंदरेंच्या देहावसनानंतर शोक व्यक्त केला.
सावरकरांवर सातत्याने होणाऱ्या टीकेला मूक संमती देणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाच्या अजित दादा पवार यांचं नाव पिंपरी चिंचवड मधील सावरकर स्मारक व उद्यानाच्या कोनशिलेवर आहे. खुद्द शरद पवार यांनी सावरकरांची स्तुती जाहीर भाषणात केलेली आहे.
१. कित्येकांना २०१४ साली भारतात हुकुमशाही अवतरली असं वाटतं. एखादीला २०१४ साली भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असं वाटत असेल तर त्यात एवढी आदळआपट करण्यासारखं काय आहे?
२. खरं स्वातंत्र्य २०१४ मधे मिळालं असं कंगना म्हणाली तर फणकारणारेच जेव्हा कन्हैय्या छाप झोळीवाले अजूनही आझादी मागत असतात तेव्हा खुश होऊन टाळ्या पिटताना दिसतात.
थोडक्यात काय तर विचार आणि उच्चार स्वातंत्र्य फक्त यांना स्वतःसाठी हवं आहे. इतरांनी विचार करु नये आणि केलाच तर त्याचा उच्चार करु नये.
इतकी वर्ष एकाचएक विचारधारेचा धाक समाजमनावर होता तो आता उरला नाही आणि समाजमाध्यमं आल्यापासून यांना उघडं पाडणं सहज शक्य झालं हे यांचं खरं दुःख आहे.