सध्या बॉलिवूडला उतरती कळा लागलेली आहे. हे मत एखाद दोन चित्रपट आपटल्याने तयार झालेलं मत नाहीये. तर कुठल्याच विचारधारेशी, राजकीय पक्षाशी काही देणंघेणं नसलेल्या व्यक्ती जेव्हा बॉलिवूड चित्रपटांबाबत फारसे उत्सुक दिसत नाही तेव्हा हे जाणवते. असेही नाही की लोकांकडे पैसे नाहीत.
परंतु लोकांना बॉलिवूडच्या थिल्लर चित्रपटांवर खर्च करायचा नाहीये. याबाबत प्रामुख्याने काही कारणे लक्षात घेतली तर बॉलिवूडचा हिंदुद्वेष व राष्ट्रविरोधी भावना जोपासणारे घटक कारणीभूत आहेतच. परंतु रसिक प्रेक्षक म्हणून ह्यासोबत मला अजून काही कारणे महत्वाची वाटतात.
बॉलिवूड म्हणजे एकतर उचलेगिरी किंवा अगदी चोथा झालेल्या त्याच कथानकांवर "त्याच तिकिटांवर केलेला तोच खेळ" त्यातल्या त्यात अगदी रद्दाड झालेले पन्नाशीचे हिरो व हिरोइन्स, त्यात अभिनयाचा मोठा अभाव तर आहेच आहे पण त्याची पुसटशी जाणीवही त्या कलाकारांना किंवा एकंदरीत बॉलिवूडला अजून नाही.
त्या उलट दुसरीकडे OTT धुमाकूळ घालत आहेत. कारण भारत जगातील सर्वाधिक तरुणांचा देश आहे, त्याप्रमाणे विविध विषयांवरील विविध सहजतेने स्विकारणारा प्रेक्षक वर्गही भारत ह्या देशात आहे. एकंदरीतच मनोरंजनाच्या आणि कलाकृतीबाबतच्या एकूणच कक्षा आता भारतीय तरुण प्रेक्षकांच्या रुंदावल्या आहेत.
उदाहरणार्थ सांगायचे तर अगदी तगडा VFX असणाऱ्या इंग्लिश सिरीज पाहणाऱ्या तरुणांना बॉलिवूडच्या लुटुपुटूच्या VFX मध्ये काडीमात्र रस नाही. इंटरनेट सुलभतेमुळे ग्रामीण भागही याला अपवाद राहिलेला नाही. त्यात बॉलिवूडचा चित्रपट म्हणून एक फिक्स फॉर्म्युला आहे, "मसाला चित्रपट" तो प्रत्येक यात
जाणवतो. मग त्यामुळे विषय सत्य घटनेवर असो, की रोमँटिक, की कॉमेडी, की हॉरर प्रत्येक यात त्या काही ठराविक बाष्कळ गोष्टींचा मसाला टाकलेला असतो. त्यामुळे कुठल्याही धाटणीचा सिनेमा असला तरी तो त्याचे काही वेगळेपण घेऊन येत नाही व त्याचा प्रभाव प्रेक्षक वर्गावर सोडत नाही. हे सर्व पाहता
मनात अनेकदा येऊन जाते की बॉलिवूडच्या छत्रछायेखाली वाढू न शकलेल्या मराठी इंडस्ट्रीला आता मुसंडी मारायला ह्यासारखी सुवर्णसंधी नाही. कारण बॉलिवूडचा कुणाचा चित्रपट असो तुलनेने बहुसंख्य लोक पाहण्यासाठी तूर्तास उत्सुक नाही. मराठी दर्जेदार चित्रपट आले तर मराठी इंडस्ट्री दाक्षिणात्य
इंडस्ट्रीसारखी मुसंडी मारू शकते. कारण मी आणि माझा मित्रपरिवारातील अनेक लोकांनी एक वर्षभरात कुठले चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहिले असतील तर ते म्हणजे मराठी चित्रपट. ते फार उत्तम होते का? तर उत्तर 'नाही' असेच आहे. परंतु बॉलिवूड पेक्षा निश्चित चांगले होते. फक्त इथे विषय येतो की
मराठी प्रेक्षक मराठी इंडस्ट्रीला डोक्यावर घ्यायला तयार असताना त्यांना मुसंडी मारायची इच्छा आहे का नाही. कारण जसे देशातून इंग्रज गेल्यावरही त्यांच्या प्रभावाखाली अनेक पिढ्या वाढल्याच तसेच मराठी इंडस्ट्री बॉलिवूडच्या गुलामी मानसिकतेत अजून अडकलेली वाटते. म्हणजे मराठी मध्ये एवढे
दर्जेदार साहित्य असताना, त्यातून अनेक अफलातून कथानक मिळू शकत असताना यांना थिल्लर बॉलिवूड सारख एकतर उचलेगिरी करायचीय, किंवा बॉलिवूड सारख हिंदुद्वेषी, जातीवाचक वागायचंय. कलेला जात, धर्म नसतो अस म्हणतात परंतु "कला कुठल्या जाती किंवा धर्माविरोधात नसावी" हे मात्र सोयीने विसरले जाते.
त्यातल्या त्यात मराठी इंडस्ट्रीमध्येही इनमीन 3.5 हिरो व 2.5 हिरोईन चित्रपटात पाहून प्रेक्षक उबगलाय. खडतर काळात मराठी चित्रपट अगदी 2 ते 4 नटांच्या जीवावर तग धरण्याचा काळही आपण पाहिलाय, कारण त्यांच्याकडे अभिनय होता, प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव सोडून जाण्याची शैली होती. त्याउलट आता
अलीकडे त्याचा अभाव आहे. थोडक्यात काय तर वाढत्या जागतिकीकरणात जे दर्जेदार असेल ते टिकून राहील. बॉलिवूड संपेल का तर? उत्तर आहे नाही. कारण अशा काळात काहीतरी वेगळं करण्याची उर्मी असणाऱ्या कलाकारांना व दिग्दर्शकांना ही संधी असेल, फक्त प्रस्थापित त्यांना त्यातून कसे मार्गक्रमण करून
देतात हे पाहण्यासारखे असेल. मराठी इंडस्ट्रीला तर खूप नामी संधी आहे फक्त त्यांना त्याचे सोने करायचं की माती हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असेल. बाकी आजकाल प्रेक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रकार उद्विग्नतेतून वाढलाय. परंतु सरतेशेवटी हाच प्रेक्षक तुम्हाला स्टार
बनवणार किंवा कचऱ्यात घालणार याची खूणगाठ प्रत्येक कलाक्षेत्रातील व्यक्तीने बांधणे गरजेचे आहे. कारण एक काळ होता तेव्हा प्रेक्षक हा त्यांच्यावर अवलंबून होता, परंतु आता स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म एवढे आहेत की 'तू नही तो और भला सही" अशी भावना बळावली आहे. त्यातल्या त्यात कलाकार व दिग्दर्शक
मंडळींना ईथुनपुढे प्रेक्षक हाच राजा हे फक्त बोलण्यापूरते नाहीतर प्रत्यक्षात मनावर बिंबवून आपली वागणूक ठेवणे क्रमप्राप्त असेल. एखाद दुसऱ्या थिल्लर कृतीतून ते तात्पुरते पैसे कमावतीलही, परंतु 'लंबी रेस का घोडा' बनून टिकायच असेल तर सुधरण्याशिवाय पर्याय नाही. कारण आता मोक्याच्या क्षणी
जुन्या चुकलेल्या गोष्टींच्या आरश्याचा ससेमिरा चुकवणे किती कठीण आहे याचा प्रत्यय बॉलिवूड व राजकीय व्यक्ती एक दशक झाले घेत आहेत. तसेही बहुसंख्य लोकांना काय वाटते हे महत्वाचे आहे. कारण तुम्ही आर्ट लिबर्टी म्हणून प्रत्येकवेळी त्यांच्यावर केलेली कुरघोडी ते सहन करूनच घेतील असेही नाही.
कारण कुठलीही गोष्ट अगदी तुटेपर्यंत ताणली की त्याचा जोरदार फटका बसतोच. हा थ्रेड लिहताना फक्त 'मला काय वाटत' याचा विचार केलेला न करता, जवळपासच्या अनेक लोकं एकंदरीत ह्या घडामोडींकडे कसे पाहतात याचा घेतलेला कानोसा आहे. शब्द माझे असले तरी ह्या भावना अनेकांच्या आहेत.
क्रमशः
✍️ #मार्मिक
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आघाडी सरकारकडे वीजबिल माफ करायला, शेतकरी कर्ज माफीला, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्याकरीता असलेल्या "सारथी शिष्यवृत्तीस" देण्यासाठी, सरकारी नोकर भरती करायला पैसे (निधी) नाही. परंतु दुसरीकडे धर्मनिरपेक्ष आघाडी सरकारला अल्पसंख्यांक समाजाला आकर्षित
करण्यासाठी कोटीच्या कोटी रुपये आहेत.
औरंगाबाद येथील हज हाऊस बांधणीसाठी ₹ २९.८८ कोटी निधीला मान्यता राज्यसरकारने दिली आहे. सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) ₹ १२ कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे, त्यातील 30% निधी बांधकामासाठी "सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
ऑफ महाराष्ट्र" कंपनीला वितरित करण्याची मान्यता देण्यात येत आहे.
तसेच वक्फ बोर्डच्या बळकटीकरणासाठी ₹ १५ कोटी व वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी यंत्रणा उभारणीस ₹ ३.८७ कोटी सुपूर्द करण्यात येत आहे.
डॉ.शीतलताई आमटे यांच्या निधनाची बातमी जशी इतरांसाठी धक्कादायक आहे, तशीच माझासाठीही आहे. त्या सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे त्या अनेक लोकांशी संवाद करायच्या हे कालपासून विविध सोशल पोस्टवरून लक्षात येतच आहे. माझीही इकडेच ओळख झाली होती, त्यानंतर नंबरची देवाणघेवाण आणि संवाद. 1/n
काही महिन्यांपूर्वी लोकसत्ताने ह्या वृत्तपत्रातत त्यांच्याविषयीचे दोन लेख प्रसारित झाल्यावर त्या व्यथित होत्या. त्यावेळी बोलताना "मोठे षडयंत्र आहे, महिला नेतृत्व नको असते अनेकांना, भ्रष्ट लोकांची साखळी आहे, राजकारणी जमिनीवर डाव लावून बसल्याचे बोलले होते"
स्क्रीनशॉट👇 2/n
"लोकसत्ता" वृत्तपत्राने त्यांच्यावर लिहलेल्या लेखाचे खंडन करणारे स्पष्टीकरण ताईंनी लोकसत्ताला पाठवूनही ते छापले जात नाहीये असे त्यांचे म्हणणे होते. त्या स्पष्टीकरण लेखाची pdf माझाकडे आहे व अजून बऱ्याच जणांकडे आहेच. त्यात डॉ. विकास आमटे यांचेही स्पष्टीकरणं छापण्याबाबत पत्र आहे.3/n
सध्या जगभरात कोरोना, भारत-चीन तणाव सोबतच नव्याने चर्चेत आलेला विषय म्हणजे टर्की देशातील इस्तांबूल शहरातील हाइया सोफिया संग्रहालय, आपल्याकडे जसा राम जन्मभूमी- बाबरी मस्जिद वाद जुना होता तसाच वाद आजही पाश्चिमेकडे "हाइया सोफिया"च्या रुपाने धगधगता आहे. #HagiaSofia 1/n
शेकडो वर्षांपूर्वी रोमन शासकांच्या ताब्यात असलेल्या ह्या भूभागात तत्कालीन रोमन राज्याने सध्या जिथे "हाइया सोफिया" इमारत आहे तिथे लाकडी चर्च बनवले, ते तेव्हाच्या युद्धात शत्रूंकडून जाळले गेले, पुन्हा लाकडी चर्च उभारले गेले तेसुद्धा युद्धात जाळण्यात आले.
2/n
नंतरच्या रोमन राजाने त्याच जागेवर पुन्हा भव्यदिव्य दगडी बांधकामातील अस चर्च उभारले, आपण "हाइया सोफिया" वास्तू म्हणून पाहतो ती तेव्हाच उभारलेली दगडी बांधकामातील चर्च आहे. परंतु नंतरच्या काळात युरोपात "ऑटोमन साम्राज्य" उदयास आले आणि त्यांनी वेगाने विस्तारही केला.
3/n
@OfficeofUT साहेब तुम्ही पूर्णपणे राजकीय व्यक्ती नाहीत आधीपासून म्हणून हे मनोगत मांडण्याचा प्रयत्न आहे.
तुम्ही कोरोनाशी लढण्यासाठी तुमच्या पातळीवर उपाययोजना करताय, परंतु दिवसेंदिवस त्या कुठेतरी कमी पडतायेत हे मान्य करा तुम्ही आता कृपया, अपयश मान्य करण्यात काही कमीपणा नाही.
अपयश मान्य केलेत तर ते दूर करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याचे मार्ग मोकळे होतील. तुम्ही तुमच्या पातळीवर निर्णय घेतले त्याला जनतेने जमेल तेवढे सहकार्य केले, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांनीही त्यात पूरक असे योगदान दिले. परंतु रोज नव्याने हजारात रुग्ण वाढतायेत.
त्यामुळे ह्या क्षणाला पारंपरिक राजकारण्यांसारखे न वागता संवेदनशील व्यक्ती म्हणून जनतेसमोर येऊन सद्यस्थितीची पूर्णपणे सविस्तर कल्पना द्या. मुंबईची परस्थिती खूप हाताबाहेर गेलेली आहे. तेथील नागरिकांना वाचवण्यासाठी का होईना मनाचा मोठेपणा दाखवून खुलेपणाने केंद्राकडे मदतीची मागणी करा.
"एक होत माळीण"
मध्यरात्री झालेली माळीण घटनेची बातमी तिथं जाणाऱ्या एस.टी. चालक वाहकामुळे दुसऱ्या दिवशी प्रशासनाला समजली. दुपारपर्यंत शेजारील तालुक्यांमध्ये सर्वत्र वाऱ्यासारखी ही बातमी पसरली होती. प्रशासकीय यंत्रणेची हालचाल सुरू झाली होती.
दुपारनंतर ह्या घटनेचे भीषण स्वरूप बातम्यांच्या माध्यमातून देशभर पसरले. आम्हीही मित्रपरिवार गाड्या काढून तिकडे निघालो. वाटेत वाडा-भीमाशंकर रस्त्यावर कधी नाही एवढं ट्रॅफिक लागलं. अनेक पर्यटक बाहेरून भीमाशंकरमध्ये माळीण घटना समजल्यामुळे लँड स्लाईडच्या भीतीने बाहेर पडण्यास सुरुवात
झाली होती. वाडा-भीमाशंकर मार्ग अरुंद असल्याने हे ट्रॅफिक काढून दिले नाहीतर परिस्थिती अजून अवघड बनेल ह्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या परीने वाहतूक नियमनाचे काम करू लागला होता. आमचाही बराच वेळ अडकलेल्या गाड्यांना मार्ग करून देण्यात गेला. सोबतीला मुसळधार पाऊस कोसळत होताच.